स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ

0
1980
स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. अनेक वेळा आपण शांत झोपलेले असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात. मग स्वप्नामध्ये आपल्याला काहीही दिसत असते. अगदी आपण कुठल्यातरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊन येत असतो. काहीजण तर स्वप्नामध्ये विदेश यात्रा देखील करून येत असतात. काहींना स्वप्नही चांगल्या प्रकारचे पडत असतात, तर काहीजणांना स्वप्न ही वाईट प्रकारची पडत असतात.  त्यामुळे ते अगदी झोपेतून घाबरून उठत असतात. तर काहीजणांचे भयानक स्वप्नांमुळे संपूर्ण शरीर हे घामेघूम झालेले असते. खरंतर मित्रांनो, स्वप्नांना मर्यादा नसतात, सीमा नसतात. आपण स्वप्नामध्ये अगदी काही घटना बघत असतो. कुठल्याही वस्तू, प्राणी, पशु-पक्षी बघत असतो. आपण दिवसभरामध्ये ज्या घडामोडी बघितलेल्या असतात. ज्या गोष्टींचा अनुभव जास्त घेतलेला असतो, ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटत असतात, तर अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात. तर काहीवेळा आपण ज्या गोष्टींचा साधा विचारही केलेला नसतो ही गोष्ट कधीही बघितली नसते तर, अशा प्रकारचे ही स्वप्न आपल्याला पडत असते. अनेक जण अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करत असतात. परंतु मित्रांनो, अशी स्वप्न पडण्यामागील आपल्या पुढील भविष्याच्या वाटचालीबद्दल काही तरी संकेत देण्याचे प्रयत्नही स्वप्न करत असावीत.मित्रांनो, अनेक जणांना स्वप्नामध्ये मुंगूस दिसत असतो. त्यामुळे अनेक जण घाबरुन जातात की आपल्या स्वप्नांमध्ये नेमका मुंगूस का आला असावा? आपण तर याला कधीपासून बघितले ही नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या स्वप्नामध्ये मुंगूस दिसलेला असेल, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. कदाचित हे स्वप्न तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचाली बद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असावा. मुंगूस स्वप्नामध्ये दिसणे एक प्रकारे शुभ मानले जात असते. आपल्या समोरच्या रस्त्याने जर मुंगूस आपल्याला जाताना दिसला, अथवा आपल्या बाजूने जाताना दिसला, तर हे अगदी शुभ मानले जाते आणि आपण असे म्हणतो की यामुळे आपल्या आता पुढचे होणारे काम हे शुभ होतील. पूर्ण होतील. मुंगूस आणि सापाची लढाई हे तर सर्वांनाच माहिती आहे अगदी सापाला विषारी सापाला ही मुंगूस हरवून टाकत असतो सापाचा जीव देखील घेत असतो. तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये मुंगूस बघितलेला असेल, तर हे एक प्रकारे शुभ मानले जात असते. परंतु, तुम्ही मुंगुसाचे स्वरूप हे नेमके कोणत्या प्रकारचे बघितलेले असेल, त्यावरून तुम्हाला शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. तर मित्रांनो, स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो, मुंगूस हा अनेक वेळा सापावर भारी पडत असतो. मुंगूस आणि सापाची लढाई झाली असता, मुंगूस विजयी होत असतो. सापाचा जीव देखील घेत असतो. तसेच, प्रत्यक्ष जीवनामध्ये मुंगूस बघणे देखील शुभ मानले जात असते. कारण, यामुळे आपले पुढील होणारे काम हे शुभ होते. जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये मुंगूस बघितला असेल, तर ते शुभ आहे की अशुभ याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात चेटकिन दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात मुंगूस दिसणे
स्वप्नात मुंगूस दिसणे

स्वप्नात मुंगूस दिसणे : Swapnat Mungus Disne

स्वप्न शासनुसार, जर तुमच्या स्वप्नात तुम्ही मुंगूस बघितलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मुंगूस हा सापावर भारी पडत असतो. अगदी सापाला लढाईमध्ये हरवत असतो. जर तुम्ही मुंगूस स्वप्नात बघितलेला असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या शत्रूंवर भारी पडणार आहात. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये लवकर विजयी होणार आहात. तुमच्या शत्रूंना हरवणार आहात. कुठलाही कठीण प्रसंग असो, कुठलेही कठीण कार्य असो, तर त्यावर तुम्ही मात करून पुढे जाणार आहात. तुमच्या प्रत्येक कामात सफल होणार आहात.

मुंगूस आणि सापाची लढाई दिसणे : Mungus Ani Sapachi Ladhai Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्न मध्ये मुंगूस आणि सापाची लढाई होताना बघितली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे तुमच्या मित्रांशी अथवा नातेवाईकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे भांडण, लढाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून वागले पाहिजे.

साप हा मुंगूस चा शिकार करताना दिसणे : Sap Ha Mungus Cha Shikar Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साप हा मुंगूसचा शिकार करताना दिसलेले असेल, तर हे स्वप्न अशुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे शत्रू हे तुम्हाला हानी पोहोचवणार आहेत. तुमचे नुकसान करणार आहे. तुम्हाला हरवणार आहेत. पुढील जीवनामध्ये तुम्हाला अनेक संकटाशी सामना करावा लागणार आहे. कठीण परिस्थितीशी तुम्हाला दोन हात करावे लागणार आहे.

स्वतःला मुंगूस च्या रूपात बघणे : Swathala Munguschya Rupat Baghne

स्वप्न शासनुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला मुंगूसच्या रूपात बघितलेले असेल, तरी स्वप्न शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, समाजात लवकरच तुमचा मानसन्मान वाढणार आहे. तुमचे नाव लौकिक होणार आहे. कुटुंबात तुमचं मानसन्मान होणार आहे तुमचे पद वाढणार आहे. त्यासाठी तुम्ही खुश झाले पाहिजे.

वाचा  स्वप्नात गुरुद्वारा दिसणे शुभ की अशुभ

मुंगूस ने सापाची शिकार करताना दिसणे : Mungus Ne Sapachi Shikar Kartana Pahne

स्वप्न शासनुसार, जर तुम्ही मुंगूसला स्वप्नामध्ये सापाची शिकार करताना बघितलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवणार आहात तुम्ही तुमच्या शत्रूंवर भारी पडणार आहात. तुमच्यावर जे कोणते संकट होते ते नष्ट होणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सफल होणार आहात यशस्वी होणार आहात त्यासाठी तुम्ही आनंदी झाले पाहिजे.

मुंगूस चे मास खाताना दिसणे : Mungus Che Mass Khatana Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नांमध्ये मुंगूसचे मांस खाताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या शब्दाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एखादा गंभीर आजार होणार आहे त्यासाठी तुम्हाला भरपूर पैसे खर्च करावे लागणार आहे. दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही आधीच सांभाळून जपून राहिले पाहिजे.

एकच वेळी अनेक मुंगूस दिसणे : Eakach Veli Anek Mungus Pahne

सपना शास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नांमध्ये एकाच वेळी अनेक मुंगूस बघितले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की भविष्यामध्ये तुमचे भरपूर मित्र बनणार आहेत मित्रांमध्ये तुम्ही आनंदित जीवन व्यतीत करणार आहे. मौज मजा करणार आहात. तुमचे पुढील जीवन हे सुखदायी असणार आहे.

मुंगुसाने तुम्हाला चावतांना दिसणे : Mungusane Tumhala Chavtana Disne 

स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नामध्ये तुम्हाला मुंगूस सावतांना दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा कि, लवकर समान आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या कामासाठी तुम्ही पैसे खर्च केले होते ते काम पूर्ण होणार नाही तुमच्या पैशांचे नुकसान होऊ शकते अचानक तुमच्या घरखर्चात वाढ होऊ शकते. आर्थिक परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

वाचा  स्वप्नात लिफ्ट दिसणे शुभ की अशुभ

तुम्ही मुंगूसला पकडताना दिसणे : Mungusla Pakdne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये मुंगूस ला पकडताना दिसले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहेत त्यामध्ये बाधा, अडचणी निर्माण होणार आहेत. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये असफल होणार आहात. तुमचे काम हे मध्येच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार आहेत.

मुंगूस च्या मागे पळताना दिसणे : Munguschya Mage Palne

स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नामध्ये तुम्ही मुंगूसच्या मागे पडताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एखाद्या मानसिक ताण- तणावाला, टेन्शनला सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या पुढील जीवनामध्ये अनेक संकटे येणार आहेत, आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही घेतलेल्या कार्यामध्ये छोट्या-मोठ्या संकटाला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात मुंगूस बघणे शुभ मानले जाते फक्त त्याची परिस्थिती नेमकी कशी असेल, मुंगूस हा तुम्हाला कोणत्या स्वरूपात दिसलेला असेल, त्यावर तुम्हाला चांगले व वाईट संकेत मिळू शकतात,  हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here