स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशुभ

0
1843
स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. आपला शारीरिक थकवा दूर होण्यासाठी आपल्याला झोपेची गरज असते. झोप झाल्यावर मुळे आपला मानसिक शारीरिक थकवा निघत असतो. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये आपण विविध प्रकारचे वस्तू घटना बघत असतो. शांत झोप लागली म्हणजे स्वप्नही हमखास पडतात. असा एकही व्यक्तींनी की ज्याला स्वप्न पडत नसतील. काही व्यक्तींना झोपेमध्ये चांगल्या प्रकारची स्वप्ने पडत असतात. तर काही जणांना मनावर दडपण आणणारी, एकदम घाबरणारे स्वप्ने पडत असतात. भयानक स्वप्न पडत असतात. त्यामुळे बरेच जण भयानक स्वप्न बघितल्यामुळे घामेघूम देखील होत असतात. स्वप्नामध्ये अगदी आपण दूर दूर फिरून येत असतो काही जण स्वप्नामध्ये पंढरीची वारी करून येत असतात. खर तर आपण दिवसभरामध्ये जो विचार जास्तीत जास्त केलेला असतो, ज्या गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात ते आपल्या स्वप्नात दिसत असतात. तर काही स्वप्ने अशी असतात की आपण त्यांचा विचारही केलेला नसतो जे आपल्या मनातली नसतात कदाचित असे स्वप्न आपल्याला आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल काहीतरी संकेत देण्याचे प्रयत्न करत असावेत.बऱ्याच लोकांना त्यांच्या स्वप्नामध्ये उंदीर देखील दिसत असतो. उंदराला बरेच जण उंदीर मामा असे देखील म्हणत असतात. तर काहीजण मूषकराज असे म्हणून संबोधतात. श्री गणेशाचे वाहन हे उंदीर आहे. गणपतीची पूजा करताना आपण उंदीर मामाची देखील पूजा करत असतो. उंदराला देखील पूजनीय स्थान आहे. असे म्हटले जाते की, गणपती मंदिरामध्ये जर आपण उंदीराच्या कानामध्ये एखादी मनातली इच्छा बोलले तर ती इच्छा उंदीर मामा गणपती ला सांगत असतो आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत असते, अशी मान्यता आहे. मित्रांनो तुमच्या स्वप्नात उंदीर दिसलेला आहे का? जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंदीर दिसलेला असेल, तर घाबरून जाऊ नका. कदाचित हे स्वप्न तुम्हाला तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीबद्दल काहीतरी संख्या देण्याचा प्रयत्न करत असावे. त्यामुळे आपण वेळी सावध होऊ शकतो. परंतु, मित्रांनो स्वप्नामध्ये तुम्हाला उंदीर हा नेमका कोणत्या स्वरुपात बघितला असेल, त्यावरच शुभ व अशुभ संकेत तुम्हाला कळू शकतात,स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशुभ याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशु

मित्रांनो, उंदीर मामा हे गणपतीचे वाहन आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंदीर दिसले असेल, तर नेमक त्याच स्वरूप कसे असेल, कोणत्या स्वरूपात तुम्ही उंदराला बघितले होते? यावरूनच त्याचे शुभ-अशुभ संकेत आपल्याला कळू शकतात. चला तर मग, आपण याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात बीट दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात उंदीर दिसणे
स्वप्नात उंदीर दिसणे

स्वप्नात उंदीर दिसणे : Swapnat Undir Disne

स्वप्नशास्त्रनुसार, जर तुम्हाला स्वप्नात उंदीर दिसलेला असेल तर हे स्वप्न चांगले मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला कोणा कडून तरी धोका मिळणार आहे. अशा व्यक्तींकडून धोका मिळणार आहे ती व्यक्ती ही बाहेरील व्यक्ती नसून तुमच्याशीच कोणीतरी रिलेटेड असणारी आहे. असे स्वप्न पडले तुम्ही जपून वागले पाहिजे.

 एकच वेळी भरपूर उंदीर दिसणे : Ekach Veli Bharpur Undir Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये एकाच वेळी भरपूर उंदीर बघायला मिळालेले असतील, उंदीरांचा झुंड बघायला मिळालेला असेल, तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. जर तुमचे एखाद्या नातेवांमध्ये तुमच्याशी दुरावा झालेला असेल, तुम्ही विनंती करूनही, खरं बोलूनही मतभेद झालेले असतील आणि अशा वेळेस जर तुम्हाला हे स्वप्न पडलेले असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ मानले जाते.

उंदीर ला पिंजऱ्यात अडकलेले बघणे : Undir La Pinjryat Adklele Baghne

स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्हाला स्वप्नामध्ये उंदीर हा पिंजऱ्यात अडकलेला दिसलेला असेल, तर हे  स्वप्न अशुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला शारीरिक कष्टाला सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला भरपूर मेहनतीची, कष्टाची कामे करावी लागणार आहेत.

उंदीरला जिवाचा आटापिटा करून पिंजऱ्यातून बाहेर निघताना बघणे : Undirla Jivacha Aatapita Karun Pinjryatun Baher Nightana Bghne

स्वप्न शास्त्रनुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये उंदीरला पिंजऱ्यातून अगदी जीवाच्या आटापिटा करून बाहेर पडताना बघितलेले असेल, तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही कष्टाची कामे करत होते, त्यातून तुम्हाला आता मुक्तता मिळणार आहे. तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत.

उंदीर हा पिंजऱ्यातून आनंदाने उड्या मारून बाहेर निघताना दिसणे : Undir Ha Pinjryatun Anandane Udya Marun Baher Nightana Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये उंदीर हा पिंजऱ्यातून आनंदाने उड्या मारत बाहेर निघताना तुम्हाला दिसलेला असेल, तर हे तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला चांगल्या खुशखबरी मिळणार आहेत, की ज्या ऐकून तुम्ही आनंदाने उड्या मारणार आहात. तुमच्या मनाची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. येणारे पुढचे दिवस हे खूप आनंददायी असणार आहेत.

वाचा  स्वप्नात बोरं दिसणे शुभ की अशुभ

तुम्ही उंदराला मारताना दिसणे : Undrala Martana Baghne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये उंदराला मारताना दिसलेले असेल त्याला मारून टाकलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या मानसिक रोगाने पीडित झालेला आहात. तुमच्यावर एखादे कुठलेतरी संकट येणार आहे. तुमच्या हातून तुमचे काहीतरी नुकसान होणार आहे.

उंदराला हातात पकडताना दिसणे : Undrala Hatat Pkdne 

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये असे बघितले असेल, की तुम्ही एकदम लहान मुल असाल आणि खेळता-खेळता तुम्ही उंदीर याला हातात पकडले असेल, तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. तर याचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एखादा धनाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या हाती पैसा येणार आहे. तुमचे आर्थिक संकट नष्ट होणार आहे.

घरात उंदीर फिरताना दिसणे : Gharat Undir Firne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्ही तुमच्या घरातून उंदरांना फिरताना बघितले असेल, तर घाबरून जाऊ नका  हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे स्वप्न आहे या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्या घरा मध्ये कोणतीतरी शुभवार्ता कळणार आहे. ज्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य हा आनंदी होणार आहे. सुखी समाधानी होणार आहे घरामध्ये आनंद लहरी येणार आहेत.

मेलेला उंदीर दिसणे : Melela Undir Disne

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मेलेला उंदीर दिसलेला असेल, तर घाबरू नका, हे स्वप्न शुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, जर तुमचा एखादा व्यापार असेल व्यवसाय असेल, तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नुकसान न होता तुमचा व्यापार वृद्धिंगत होणार आहे, द्विगुणित होणार आहे. व्यापारामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. मित्रांनो हेच स्वप्न जर एखाद्या गृहिणीला पडले असेल, तर याचा अर्थ असा की, लवकरच या घरातील क्लेशदायक वातावरण नष्ट होणार आहे. घरात शांतता नांदणार आहे. घरातील सदस्य सुखी समाधानी राहणार आहेत.

वाचा  स्वप्नात आत्मा दिसणे शुभ की अशुभ!

पायाखाली उंदीर दाबला जाताना दिसणे : Payakhali Undir Dabla Jane

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नामध्ये तुम्ही चालताना तुमच्या पायाखाली उंदीर दाबला गेलेला तुम्हाला दिसलेला असेल, तर हे स्वप्न अतिशय अशुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या हातून एखादी मोठी चूक घडणार आहे. जी माफीच्या ही लायकीची नाही. तुम्ही मोठी घोडचूक करणार आहेत, ज्या चुकीला तुम्हाला कधीही माफी मिळणार नाहीये. मित्रांनो,असे स्वप्न तुम्हाला पडल्यावर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अगदी छोटीशी चूकही करू नका. नाहीतर, त्याच्यामुळे तुमचे भरपूर नुकसान होऊ शकते, तुम्हाला त्याबद्दल माफी मिळणार नाही.

उंदीर यांनी घेरलेले दिसणे : Undir Yani Gherlele Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंदरांनी घेरलेले दिसले असेल, तर हे अतिशय शुभ संकेत देणारी स्वप्न मानले जाते. असे स्वप्न पडणे म्हणजे, तुम्ही खूपच खुश नसीब आहात. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला भरपूर प्रमाणात मित्र मिळणार आहेत. ते मित्र खूपच इमानदार राहणार आहेत. जे प्रत्येक क्षणाला तुम्हाला मदत करणार आहेत. तुम्हाला त्यांची सदैव साथ राहणार आहे.

तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला उंदीर दिसले असतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. कदाचित हे स्वप्न तुम्हाला तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीबद्दल चांगले संकेत अथवा वाईट संकेत देणारे असू शकते. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊ शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here