स्वप्नात पित्ताचा त्रास होणे, शुभ की अशुभ!

0
323
स्वप्नात पित्ताचा त्रास होणे, शुभ की अशुभ!
स्वप्नात पित्ताचा त्रास होणे, शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. शांत झोपेच्या दरम्यान आपल्याला अनेक स्वप्न पडत असतात. आपण दिवसभरामध्ये जर एखाद्या गोष्टीबद्दल चिंता केलेली असेल, एक सारखा विचार केला असेल, अथवा दिवसभराम स्वप्नात पित्ताचा त्रास होणे याच्या बाबतीत बघितले तर आपण जास्तीत जास्त आपल्या शरीराबद्दल विचार करणाऱ्या लोकांना स्वप्न पडतात असे मानले जाते.

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार, आपण बघितलेल्या स्वप्नांचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. म्हणून, आपण स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. काही स्वप्न ही आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल आधीच सावध करण्याचा प्रयत्नही करत असतात. म्हणून, आपण स्वप्नांचा अर्थ जाणून घेतलेला बरा. जेणेकरून, आपण वेळीच सावध होऊ शकतो. प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका  विशिष्ट स्वरूपाच्या स्वप्नाबद्दल सांगणार आहोत स्वप्नात पित्ताचा त्रास होणे, शुभ की अशुभ. या स्वप्नाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना पित्ताचा त्रास होत असतो. पित्त होण्याची कारणे देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात.अधिक गरम पदार्थ सेवन केल्याने तिखट पदार्थ सेवन केल्याने तेलीय पदार्थ सेवन केल्यामुळे आपल्याला लवकर पित्ताचा त्रास होत असतो.

पित्त झाल्यामुळे शरीराची दुर्गंधी वाढते. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला लवकर राग येतो, लवकर थकवा येतो वगैरे. अशी याची लक्षणे दिसून येत असतात. मित्रांनो, जर दिवसभरामध्ये तुम्हाला पित्त झाले असतील अथवा इतरांना तुम्ही पित्त झाले बघितलेले असतील, तर अशा स्वरूपाचे स्वप्न तुम्हाला पडू शकते. परंतु, हे स्वप्न तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले?

त्यावर, तुम्हाला त्याचे शुभ व शुभ संकेत कळू शकतात. जसे की, स्वप्नात तुम्हाला पित्ताचा त्रास होताना दिसणे, स्वप्नात इतरांना पित्ताचा त्रास होताना दिसणे, स्वप्नात पित्त झाल्यामुळे तुमचे डोके दुखताना दिसणे, स्वप्नात पित्त वाढल्यामुळे अंगदुखी होणे, स्वप्नात पित्तामुळे उलट्या होणे, स्वप्नात तुमचे पित्त बरे होताना दिसणे, वगैरे. स्वरूपाची स्वप्ने पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? तर या बद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात पित्ताचा त्रास होणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला पित्ताचा त्रास होताना दिसलेले असेल,तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचे आरोग्य अचानक बिघडणार आहे. तुम्ही घरातील अन्नपदार्थ खाण्यापेक्षा बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्यावर जास्तीत जास्त भर देतात त्यामुळे त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. असे स्वप्न दिसतेस तुम्ही पूर्वीपेक्षाही तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

वाचा  स्वप्नात तुळशी विवाह सोहळा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात इतरांना पित्ताचा त्रास होताना दिसणे.

स्वप्न शासनुसार जर स्वप्नात तुम्ही इतरांना त्रास होताना बघितलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा केला काळामध्ये तुमच्या घरातील सदस्य अथवा तुमच्या मित्रपरिवारातील सदस्य याचे आरोग्य अचानक बदलू शकते. तुमच्या जवळची व्यक्ती आजारी पडणार आहे.

स्वप्नात पित्तामुळे अंगदुखी होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात पित्तामुळे अंगदुखी होताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कार्यातील अडथळे अडचणी वाढणार आहेत आणि छोटे-मोठे संकटे येत राहणार आहेत. परंतु, तुमच्यातील आत्मविश्वास तुम्ही वाढवला पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना तोंड दिले पाहिजे.

स्वप्नात पित्त झाल्यामुळे डोकेदुखी होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात पित्त झाल्यामुळे डोकेदुखी होताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडणार आहेत. तुमच्यावर अधिक कामाचे प्रेशर येणार आहे. तुम्ही मानसिक टेन्शनमध्ये येणार आहात.

स्वप्नात पित्तामुळे उलट्या होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात पित्तामुळे उलट्या होताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही गंभीर आजाराला बळी पडणार आहात. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही जास्तीत जास्त आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

स्वप्नात तुमचे पित्त बरे होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमचे पित्त बरे होताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमचे आरोग्य हे ठणठणीत राहणार आहे. तुमच्यावर आलेले संकटे नष्ट होणार आहेत. तुमच्या मार्गातील अडथळे अडचणी दूर होणार आहेत. तुमची राहिलेली कामे पूर्ण होणार आहेत, असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

वाचा  स्वप्नात रातराणी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला इतरांची पित्त बरे होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला इतरांचे पित्त बरे होताना दिसले असतील, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या जवळची व्यक्ती आजारी असेल तर, ती लवकरच ठणठणीत बरी होणार आहे. जर तुमच्या घरातील सदस्य आजारी असेल, तर लवकरच तो आजार मुक्त होणार आहे. त्याचे आरोग्य चांगले राहणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात पित्ताचा त्रास होणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 

       धन्यवाद…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here