स्वप्नात बगळा दिसणे शुभ की अशुभ

0
632
स्वप्नात बगळा दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बगळा दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्रच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे सगळ्यांनाच पडत असतात. स्वप्नांचे नियम नसतात. तसेच अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना स्वप्न पडतात. मित्रांनो, स्वप्नांमध्ये काही चित्र आकृत्या आपल्याला अशा दिसतात की, आपल्याला त्याचे अर्थ लावता येत नाही. त्या स्वप्नाबद्दल माहिती समजत नाही आणि आपण गोंधळून जातो. तर आज आपण त्या स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये बगळा दिसणे.

बगळा हा सगळ्यांनीच बघितला असेलच. तो पांढरा शुभ्र रंगाचा, तसेच त्याचे पाय हे लांबट असतात आणि काळसर रंगाचे असतात. तसेच त्याची मान लांब व सडपातळ असते व त्याची चोच तीक्ष्ण धारदार असते, असे त्याचे वर्णन होय,  त्याची शिकार तो अगदी चपळाईने करतो. मित्रांनो, स्वप्नामध्ये बगळा हा खूप जणांना दिसतो.

पण त्याचे अर्थ लागत नाही, मनात शंका निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात की, मला बगळा का दिसला असेल? तसे स्वप्नात बगळा उडताना दिसणे? पाण्यातील मासे पकडताना दिसणे? वेगवेगळ्या रूपात आपण बगळा बघू शकतो? तर त्याच स्वप्नाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात बगळा दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात बगळा दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात बगळा दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नात बगळा तुम्ही कशा स्वरूपात बघितला, त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात सूर्यफूल दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात बगळा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठी कामगिरी करणार आहे. यशाचे शिखर तुम्ही चढणार आहे. आनंददायी गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात पांढऱ्या रंगाचा बगळा दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात तुम्हाला पांढऱ्या रंगाचा बगळा जर दिसत असेल, तर ते शुभ संकेत मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनात सुख- समृद्धी, शांतीने जगणार आहेत. तसेच परिवारासोबत वेळ घालवणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बगळा उंच झेप घेताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा तुम्हाला उंच झेप घेताना दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठी झेप घेणार आहे. मोठ्या स्थानावर जाणार आहेत. तसेच व्यवसायामध्ये प्रगतीची व आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बगळा मासे पकडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा जर तुम्हाला मासे पकडताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नांचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या कामाप्रती नेहमी तत्पर राहतात. तसेच शत्रूंवर तुम्ही विजय मिळवतात. तसेच कोणतेही काम तुमच्या तल्लख बुद्धीने तुम्ही यशस्वीरित्या पार करतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बगळा मृत अवस्थेत दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा तुम्हाला मृत अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काळात तुमच्यावर काहीतरी संकट ओढावून येणार आहेत. आरोग्या विषयी काही तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात. किंवा आर्थिक समस्या तुम्हाला जाणवू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात बगळा पाण्यात पोहताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा पाण्यात पोहताना जर दिसत असेल, तर ते शुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जीवनातील धावपळीमुळे स्वतःसाठी वेळ काढणार आहे. विश्रांती घेणार आहेत. तसेच परिवारासोबत कुठे फिरायला जाण्याचे बेत आखणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बगळा शिकार करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा तुम्हाला शिकार करताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमचे काम करताना नेहमी तत्पर राहतात. त्यामुळे शत्रूंवर तुम्ही यशस्वीरित्या मात करतात आणि चोख कामामुळे तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणीही लवकरच ओळखले जाणार आहेत. तुमचे वर्चस्व निर्माण करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात काळा रंगाचा बगळा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात काळा रंगाचा जर बगळा तुम्हाला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वतःचा असा अर्थ होतो की, तुमच्या व्यापारामध्ये मोठे नुकसान तुम्हाला होऊ शकतात. किंवा घरात काहीतरी दुखद बातमी तुम्हाला कळू शकते, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बगळ्याला उडताना बघणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा जर तुम्ही उडताना दिसत असेल, तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्हाला स्वतंत्रपणे जगायला आवडते, तसेच तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहतात. जीवनामध्ये कोणतेही काम तुम्ही सहज आणि सोप्यारीत्या करतात, त्यामुळे तुम्हाला येते काही दिवसात काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बगळा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  स्वप्नात पंचामृत दिसणे शुभ की अशुभ

 

   धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here