स्वप्नात बिछाना दिसणे शुभ की अशुभ

0
836
स्वप्नात बिछाना दिसणे
स्वप्नात बिछाना दिसणे

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न अगदी सगळ्यांनाच पडतात. तसेच स्वप्नांमध्ये आपण हसवणारे स्वप्न बघतो. तर कधी रडवणारे, तर कधी घाबरणारे स्वप्न बघतो. तर कधी अगदी आरामदायक स्वप्न बघतो. तर मित्रांनो, या स्वप्नांमध्ये असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये बिछाना दिसणे. स्वप्नात आपल्याला विविध स्वप्न पडतात. 

मित्रांनो, ज्यावेळी आपण दिवसभर काम करतो, थकतो आणि आपला थकवा काढण्यासाठी आपण ज्यावेळी बिछानावर झोपतो, त्यावेळी आपल्याला अगदी रिलॅक्स वाटते. आपल्याला शांतता लागते. असे निवांत वाटते. तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये जर बिछाना दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, की माझ्या स्वप्नात बिछाना का बर दिसला असेल? तसेच स्वप्नामध्ये बिछाना दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात.

तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात बिछाना दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात बिछाना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बिछाना दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नामध्ये बिछाना कसा दिसला? कुठे दिसला? कोणत्या प्रकारचा दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊया… ! 

वाचा  स्वप्नात रेणुका माता दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात बिछाना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बिछाना दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या धावपळीच्या जीवनात दगदगीच्या जीवनात थकलेले आहेत, आणि तुम्हाला आरामाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आराम करा किंवा कुठे फिरायला जायचे बेत आखा, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही बिछाना टाकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्ही बिछाना टाकताना दिसत असेल, तर ते स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला येत्या काही काळात आनंददायी गोष्टी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्य अगदी सुखाने आणि आरामात जगणार आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काम करत आहेत, त्यामध्ये बढोतरी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आरामदायक जीवन जगणार आहेत. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बिछाना अस्त्यवस्था अवस्थेत पडलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर बिछाना तुम्हाला अस्तव्यवस्था अवस्थेत पडलेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुमची अवस्था ही नाजूक होणार आहे, म्हणजेच तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे. किंवा आर्थिक टंचाई भासणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या कामांमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे. तरच तुम्हाला त्याचे फळ मिळणार, असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्न तुम्ही बिछान्यावर पडलेले दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही बिछान्यावर पडलेले दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शस्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा तुमच्या घरातील मंडळींच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी, तुमचेच स्वास्थ्य जपावे, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही बिछानाची घडी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात तुम्ही जर बिछाण्याची घडी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शासनुसार त्याचा अर्थ आहे, की तुमची आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही निरोगी राहणार आहे. तसेच प्रत्येक कार्य तुम्ही उत्साह आणि उत्तेजित होऊन करणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत स्वप्नात येते. 

वाचा  स्वप्नात आई एकविरा दिसणे शुभ की अशुभ ?

स्वप्नात बिछाना ओला दिसणे

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रनुसार स्वप्नात बिछाना जर तुम्हाला ओला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या कामावरील दुर्लक्षितपणा हा तुम्हाला घातक ठरू शकतो. म्हणजेच तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारू शकतात. त्यासाठी कोणतेही कामे करताना काळजीपूर्वक करावीत. कारण तुमच्या आजूबाजूला तुमचे शत्रू आहेत आणि तुमच्या दुर्लक्षितपणाचा ते फायदा घेऊ शकतात. व तुमचे कामांमध्ये नुकसान होऊ शकते, त्यामुळे ही काळजी घ्यावी. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात बिछान्यावर तुम्हाला इतर कोणी दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात तुम्ही तुमच्या बिछान्या वर इतर कोणाला बघत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या कामाचे फळ हे इतर कोणीतरी घेणार आहेत. म्हणजेच तुम्ही जे कामे करत आहात जी मेहनत करत आहात, त्यावर कोणीतरी जाणून-बुजून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे कामे होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बिछाना फाटलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बिछाना जर तुम्हाला फाटलेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला येत्या काही काळात नुकसान सोसावे लागणार आहे. तसेच परिवारामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त स्थिती किंवा  तणावग्रस्त स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय हे शांततेने घ्यावेत. संयमाने घ्यावे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात बिछान्यावर किडे दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला बिछानावर किडे दिसत असतील, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुमचा साधेपणाचा कोणीतरी फायदा घेणार आहे व तुमचे कामांमध्ये अडथळे आणून तुमचे काम हिरावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुमचे नाव बदनाम करण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्वांनी मान खाली घालावी लागणार असे कृत्य ते करणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करा. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  बडिशोप सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

स्वप्नात अगदी स्वच्छ आणि साफ बिछाना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात अगदी स्वच्छ आणि साफ बिछाना दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टींची सुरुवात झाली आहे. सुख-सुविधा तुम्हाला भरभरून मिळणार आहेत. तसेच तुमचे मेहनतीचे फळ आणि मन लावून काम करण्याचे फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे. तसेच वरिष्ठ मंडळी ही तुमच्यावर खुश राहणार आहे व तुमचे एखादे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात बिछाना दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

                         धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here