मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

0
3813
मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये
मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये

नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेऊया मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये. शाकाहारी आणि मांसाहारी असे खाण्याचे दोन प्रकार असतात. काहीजण फक्त शाकाहारी पदार्थ खात असतात. म्हणजेच, भाजीपाला वगैरे खाण्यावर भर देत असतात. तर काही जण मांसाहारी पदार्थ देखील खात असतात. आपल्या शरीरासाठी म्हणजेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारचे अन्न खाणे फायदेशीर ठरत असते. मांसाहारी पदार्थ खाल्ल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. मांसाहारी म्हटले म्हणजे त्या मध्ये मटन, चिकन, मास, मच्छी, अंडे इत्यादी प्रकार आलेच.

जर मांसाहारी पदार्थांचे व्यवस्थित प्रकारे सेवन केल्यास त्याचे अनेक प्रकारचे फायदे शरीराला होत असतात. परंतु, कुठला पदार्थ हा मर्यादितच खायला हवा अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे देखील त्रास होण्याची शक्यता असते. मित्रांनो, जे मांसाहारी पदार्थ खातात अशा लोकांना मासे खाण्याची देखील खूप आवड असते. शिवाय, मासे खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे विटामिन्स, पोषक घटक हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. मासे तुम्हाला सहज उपलब्ध होत असतात. नदी, तलाव इत्यादी ठिकाणी तुम्हाला मासे लगेच मिळू शकतात. तसेच मासे खाणे आपल्या डोळ्यांसाठी देखील चांगले प्रकारे फायदेशीर ठरत असते. मासे खाल्ल्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होत असते.

शिवाय, मासे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही देखील चांगल्या प्रकारे राहते. आणि जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल, तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. मित्रांनो, मासे खाल्ल्यावर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळायला हवे. म्हणजेच काही पदार्थ असे असतात, की जे सोबत खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याची त्रास होऊ शकतो  तर मासे खाल्ल्यावर तुम्ही काय खाऊ नये, या विषयाबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मासे खाल्यानंतर काय खाऊ नये, या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

मासे खाल्ल्यानंतर काय खाणे टाळायला हवे ?

बरेच मांसाहारी लोकांना मासे खाणे खूपच आवडत असतात. तसेच, माशांचे वेगवेगळे प्रकारचे डिशेस त्यांना आवडीने खायला आवडत असतात. परंतु, मित्रांनो काही पदार्थ असे असतात, की ते सोबत खाऊ नये. म्हणजेच, विरुद्ध आहार अस त्यांना म्हटला जात असतो. जसे की, कारल्या सोबत दही खाऊ नये, दूध पिऊ नये वगैरे. त्याचप्रमाणे, मासे खाल्ल्यानंतर तुम्ही काही गोष्टी खाणे शक्यतो टाळले पाहिजे. मासे खाल्ल्यावर बऱ्याच लोकांना काहीना काही खाण्याची सवय असते. परंतु, मासेसोबत दुसऱ्या गोष्टींच्या म्हणजेच विरुद्ध पदार्थ सेवन केल्यामुळे त्याचे परिणाम हे शरीराला होत असतात. तर मित्रांनो, मासे खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये? म्हणजेच, कोणता विरुद्ध आहार घेऊ नये? याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  • माशांचे सेवन केल्यावर म्हणजेच मासे खाल्ल्यावर तर तुम्ही लगेच त्यावर दूध पीत असाल, म्हणजे दुधाचे सेवन करत असाल तर यामुळे आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजेच मासे खाल्ल्यावर जर तुम्ही दूध पिलेत, तर त्यामुळे तुम्हाला शरीराच्या त्वचेचे संदर्भात लगेच एलर्जी होत असते. शिवाय, शरीरातील आतडे देखील खराब होण्याची शक्यता असते.
  • जर तुम्ही दही चे सेवन मासे खाल्ल्यानंतर करत असाल तर ही एक खूपच चुकीची गोष्ट आहे. अनेक वेळा आपण जेव्हा खानाखजाना अथवा यूट्यूब चैनल वर नवनवीन रेसिपीज बघत असतात, त्यावेळी मासे ची रेसिपी बनवताना त्यामध्ये दही चा वापर देखील केला जात असतो. परंतु, मित्रांनो ही एक चुकीची गोष्ट आहे. कारण मासे म्हटले तर ते गरम असतात म्हणजेच गरम प्रवृत्तीचे असतात. तर दही ही थंड प्रवृत्तीची असते आणि गरम व थंड हे एकत्रित मिक्स केल्यामुळे त्याचा त्रास हा आपल्या शरीराला होत असतो. त्यामुळे, आपल्या शरीरातील आतड्यांना देखील त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय, आपल्याला शरीरावर पांढरे डाग पडण्याची देखील शक्यता असते एक प्रकारे स्किन ॲलर्जी देखील उद्भवू शकते.
  • मासे याचे सेवन केल्यानंतर जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले. जसे, की पनीर, खीर खाल्लेत तर त्यामुळे तुमच्या शरीरावर फोड येण्याची समस्या देखील येऊ शकते. मासे व दुग्धजन्य आहार हा एकत्रित घेतल्यामुळे किंवा मासे खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराच्या त्वचेला एलर्जी होऊ शकते. शिवाय, पांढरे डाग देखिल पडण्याची शक्यता असते. म्हणून मासे खाल्ल्यानंतर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाणे त्याचे सेवन करणे शक्यतो जेवढे टाळलेत तेवढे तुमचे शरीरासाठी ते फायदेशीर ठरेल.
  • तुम्ही ताकाचे सेवन मासे खाल्ल्यानंतर देखील करू नये. कारण हा देखील एक विरुद्ध आहार मानला जातो. मासे खाल्ल्यानंतर तुम्ही 12 ते 13 घंटे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करायला नको. जर मासे खाल्ल्यावर तुम्ही ताकाचे सेवन केले असेल, तर त्यामुळे मासे व ताक यातील दोन्ही घटकांचे एकत्रीकरण झाल्यामुळे पोट दुखीचे समस्या येऊ शकते. शिवाय, पित्ताचा त्रास देखील उद्भवू शकतो. मासे खाल्ल्यानंतर ताकाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटा विषयी देखील समस्या येऊ शकतात. जसे की पोटाचा अल्सर इत्यादी वगैरे. म्हणून, मासे खाल्ल्यानंतर ताकाचे सेवन करणे देखील टाळायला हवे. 
  • मासे खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या पोटामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. शिवाय, मासे खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे अन्नपचनास खूप वेळ लागतो  परिणामी, अपचनाचा त्रास देखील होण्याची शक्यता असते. तसेच, हा विरुद्ध आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला खाज येण्याची देखील समस्या येऊ शकते. म्हणजे एक प्रकारे पूर्ण अंगाला खाज येण्याची समस्या होऊ शकते.
  • मासे खाल्ल्यानंतर जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले असेल तर त्यामुळे पोटामध्ये विरुद्ध आहार घेतल्यामुळे एक प्रकारे, विष होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला उलट्या होण्याची देखील समस्या येऊ शकते अथवा आजारी पडू शकतो.
वाचा  दातांमधून रक्त येणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

तर मित्रांनो, मासे खाणे आरोग्यासाठी तर फार उत्तम ठरत असतात. मासे खाल्ल्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. शिवाय, आपले केस लांबसडक देखील होण्यास मदत होत असते केस गळती देखील बंद होऊ शकते. मासे खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांची देखील काळजी घेतली जात असते. आपले  डोळे निरोगी राहण्यासाठी आपण मासे यांचे सेवन करणे उत्तम ठरते. परंतु, मासे खाल्ल्यानंतर आपण काही गोष्टी या पाळल्या पाहिजेत.

मासे खाल्ल्यावर आपण जेवढे दूध व दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले, तेवढे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते. मासे खाल्ल्यानंतर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाणे वर्ज्य करायला हवे. जर आपण विरुद्ध आहार घेतला नाही तर आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते आणि जर विरुद्ध आहार घेतला तर त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही आहार घेताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे विरुद्ध आहार घेणे टाळायला हवे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here