स्वप्नात शनिमंत्र ऐकणे शुभ की अशुभ

0
200
स्वप्नात शनिमंत्र ऐकणे शुभ की अशुभ
स्वप्नात शनिमंत्र ऐकणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. स्वप्न बघायला अनेकांना आवडत असते. परंतु, मित्रांनो स्वप्न यामध्येही दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्ने आणि दुसरे म्हणजे झोपेच्या दरम्यान बघितलेली स्वप्ने यामध्ये खूप फरक आहे. उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न ही काल्पनिक असतात. त्यावर आपले नियंत्रण असते. स्वप्नात शनिमंत्र ऐकणे, हे स्वप्न आध्यात्मिक स्वरूपाचे मानले जाते.

परंतु, झोपेच्या दरम्यान बघितलेल्या स्वप्नांवर आपले कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसते. दिवसभरामध्ये आपण जे विचार केले असतात अथवा ज्या घटना बघितलेल्या असतो ज्या वस्तू अथवा व्यक्तींना भेटलेला असतो तर अशा स्वरूपाची स्वप्न आपल्याला पडण्याची शक्यता असते. कधी चांगली स्वप्न पडत असतात तर कधी वाईट स्वप्न देखील पडू शकतात.

     मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात शनि मंत्र ऐकणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. अनेक जण देवपूजा अगदी मनापासून करत असतात. नियमित देवाच्या स्तोत्रांचे पठण वगैरे करत असतात. तर काहींचे अगदी तोंड पाठही झालेले असते. शनि मंत्र हा शनि देवाचा मंत्र आहे.

अनेकजण शनीदेवाची भक्ती भावाने सेवा करत असतात. आराधना करत असतात. नियमितपणे शनी मंत्राचे तसेच, शनि चालीसाचे पठणही करत असतात. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात तुम्ही शनि मंत्र ऐकताना तुम्ही दिसलेले आहात काय? जर तुम्हाला असे स्वप्न पडलेले असेल, तर त्याचा अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न केला पाहिजे.

चला तर मग स्वप्नात शनि मंत्र ऐकणे शुभ की अशुभ या शब्दाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात शनि मंत्र ऐकणे शुभ की अशुभ!

     काही व्यक्तींना स्वप्नात शनिदेव देखील दिसत असतात. जसे की, स्वप्नात ते शनि मंत्र ऐकताना दिसणे, स्वप्नात शनि चालीसा ऐकताना दिसणे, स्वप्नात शनिदेव दिसणे, स्वप्नात शनिदेवाचा फोटो दिसणे, स्वप्न शनि देवाची पूजा करताना दिसणे, वगैरे स्वरूपाची स्वप्ने पडू शकतात. तर या स्वप्नाचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शनि मंत्र ऐकणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शनि मंत्र एक त्यांना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दुःख दूर होणार आहे. तुमच्यावरील संकटे नष्ट होणार आहेत. तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. तुमचा व्यापार हा जोरात चालणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारातून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला शनिदेव दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, तुम्हाला शनिदेव दिसलेले असतील तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, जर तुम्ही एखाद्या संकटात अडकलेला असाल आणि त्यावेळेस जर तुम्हाला हे स्वप्न पडले असेल, तर लवकरच तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

स्वप्नात तुम्ही शनि देवाची पूजा करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रनुसार,जर स्वप्नात तुम्ही शनि देवाची पूजा करताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात, तुमच्या कार्यातील अनेक अडथळे अडचणी दूर होणार आहेत. तुम्ही जे काही कार्य सुरू केलेले असेल, त्यामध्ये तुम्हाला चांगले यशही मिळणार आहे. तुमच्यावर शनि देवाची कृपा राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही शनि चालीसा ऐकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शनि चालीसा ऐकताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की,येणाऱ्या दिवसात तुम्ही दुःख मुक्त होणार आहात. तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. तुमच्यावरील अनेक संकटे दूर होणार आहेत. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केलेला असेल, तर तुमचा व्यवसाय उत्तम चालणार आहे.

स्वप्नात तुम्हाला शनिदेवाचा फोटो दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला शनि देवाचा फोटो दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्यावरील पिडा नष्ट होणार आहे. तुम्हाला अचानक धनालाभ होणार आहे. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ होणार आहे.

वाचा  स्वप्नात प्राणी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला शनि देवाची मूर्ती दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला शनि देवाची मूर्ती दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे किंवा अशुभ संकेत देणारे स्वप्न असू शकते. जर तुमचे ग्रह हे चांगले असतील, तर तुम्ही आर्थिक पिडा मुक्त, संकट मुक्त होणार आहात आणि जर तुमचे ग्रह हे थोडे भारी असतील, तर तुमच्यावर अनेक छोटे-मोठे संकट येण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला शनि देवाचे मंदिर दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला शनि देवाचे मंदिर दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की,येणारे दिवस हे तुमच्यासाठी खूप चांगले ठरणार आहेत. तुमच्यावर शनि देवाची कृपा राहणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व बळकट राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही शनिदेवाला तेल चढवताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शनि देवाला तेल चढवताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. जर तुम्ही आर्थिक टेन्शनमध्ये असाल  व मानसिक टेन्शनमध्ये असाल, तुमचे वाईट दिवस सुरू असतील आणि अशा वेळेस जर तुम्हाला हे स्वप्न पडले असेल, तर लवकरच तुम्ही यातून मुक्त होणार आहात. तुमच्यावर शनि देवाची कृपा होणार आहे

       मित्रांनो, स्वप्नात शनि मंत्र ऐकणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here