नमस्कार मित्रांनो. पूर्वीच्या काळी हव्या तेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. पूर्वी कोणी आजारी पडले, तर ते घरगुती इलाज करून घेत असे किंवा एखादी जंगलातील जडीबुटी वापरून, औषधी वनस्पती वापरून त्याचा उपयोग करत होते. परंतु तेव्हा त्या काळाची माणसे ही लवकर ठणठणीत बरी व्हायची देखील आणि दीर्घकाळ जगायची. गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय ह्यावर आज आपण विविध प्रकरारची माहिती घेणार आहोत.
आताच्या काळात तसे नाही. आताच्या काळात जर थोडेही खराब पाणी पोटात गेले, तर लगेच अनेक आजारांना आपण बळी पडत असतो. जसे की, टाइफाइड वगैरे. मित्रांनो, पूर्वीच्या काळाचे लोकं नदी, नाले, विहिरी अगदी कुठलेही पाणी पीत होते. तरीही त्यांना कुठलाच त्रास होत नसे. परंतु, हल्ली, पाणी फिल्टर करून उकळून, खूप काळजी घेऊनही लोक आजारी पडतात.
आताचे वातावरण हे प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजारही वाढलेले आहेत. म्हणून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. नियमित व्यायाम केले पाहिजे.
व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही टिकून राहण्यास मदत होत असते.
त्याचप्रमाणे, आपण नियमित हिरवे पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे, फळे खाल्ली पाहिजे, फळांचा ज्यूस सेवन केला पाहिजे, सर्व प्रकारची फळभाजी देखील खाल्ली पाहिजे. डाळींचा आहार समावेश केला पाहिजे.
जेणेकरून, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक घटक, पौष्टिक मूल्य त्यातून मिळतील, सर्व प्रकारच्या जीवनसत्वांचा पुरवठा आपल्या शरीराला होऊ शकेल.
हल्ली, तर आता नवनवीन शस्त्रक्रिया निघालेल्या आहेत. मित्रांनो, आज आपण गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय? याबद्दल जाणून घेणार आहोत. गॅस्ट्रोस्कोपी याचा नेमका अर्थ काय असतो? गॅस्ट्रोस्कोपी का करतात? कधी करतात? याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. चला तर मग, गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय? त्याबद्दलची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात!
गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय?
गॅस्ट्रोस्कोपी यालाच एंडोस्कोपी असेही म्हटले जाते. मित्रांनो, गॅस्ट्रोस्कोपी म्हणजेच यामध्ये एक दुर्बिणीचा वापर केला जातो.
मित्रांनो, ही एक ट्यूब असते त्यामध्ये शेवटच्या भागाला एक लाईट आणि एक कॅमेरा बसवलेला असतो. ही दुर्बीण मुखाद्वारे टाकून जठर, अन्ननलिका आणि छोट्या आतड्याचा पहिला भाग हे एंडोस्कोपी द्वारे तपासले जाते. ही एंडोस्कोपी उपाशीपोटी केली जात असते.
मित्रांनो, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. यामध्ये दुर्बीण आणि कॅमेरा असल्यामुळे स्क्रीनवर, मॉनिटरवर आतील भाग बघितला जातो आणि त्यावर निदान सुचवले जाते. एंडोस्कोपी करताना तीस ते चाळीस मिनिटे लागतात.
एन्डोस्कोपी ही व्यक्ती शुद्धीवर असतानाही करता येते परंतु, ज्या व्यक्ती एंडोस्कोपी करताना घाबरत असतील, तर त्यांना झोपेचे औषध देऊन देखील एंडोस्कोपी करता येते.
गॅस्ट्रोस्कोपी का करावी लागते?
मित्रांनो, गॅस्ट्रोस्कोपी म्हणजेच एन्डोस्कोपी ही का करावी लागते? याबद्दलही आपल्या माहिती असायला हवी. तर कुठल्या कारणासाठी आपण एन्डोस्कोपी करू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया!
गॅस्ट्रोस्कॉपी हे वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांसाठी आपण करू शकतो, ते खालील प्रमाणे–
- ज्या व्यक्तीचे जास्तीत जास्त पोट दुखत असेल, नेहमी सतत पोटदुखीचा त्रास होत असेल, तर अशा व्यक्तींसाठी.
- या व्यक्तींना कुठलाही पदार्थ गिळताना किंवा कुठले पेय गिळताना त्रास होत असेल, तर अशा व्यक्तींसाठी.
- ट्यूमरला बाहेर काढण्यासाठी.
- अन्ननलिका तपासणी करण्यासाठी.
- ज्या व्यक्तीला अल्सरचा त्रास होत असेल, तर अशा व्यक्तीसाठी.
- नसातील उपचार करण्यासाठी.
मित्रांनो, वरील प्रकारे जर तुम्हाला त्रास होत असेल, तर त्यासाठी एन्डोस्कोपी करावे लागते. वरील प्रकारचा कोणताही त्रास तुम्हाला होत असेल, तर एन्डोस्कोपी द्वारे तपासणी करून तुम्हाला त्यावर निदान दिले जाते. त्यासंदर्भात तुमचे पुढचे उपचार सुरू होतात. तर मित्रांनो, या सर्व प्रकाराला गॅस्ट्रोस्कोपी असे म्हटले जाते.
मित्रांनो, वरील प्रमाणे गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय? गॅस्ट्रोस्कोपी का करावी लागते? याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली,हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.