नमस्कार, म्हणतात ना, माणसाचे सौंदर्य हे त्याच्या केसांवर अवलंबून असते, कुणाची लांब केस बघितले की, असे वाटते की, आपले केस असे असायला हवेत. आपल्या शरीरातीला मुख्य भाग म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस, जर डोक्यावर केस कमी असतील तर आपल्या सौंदर्यात कमतरता येते. पण जर आपल्या केसांना फाटे फुटण्याची ग्रहण लागले तर मग काय करावे ? आणि एकदा जर केसांना फाटे फुटले, तर केस तुटतात, अक्षरशः कधीकधी गळायला ही लागतात, तर मग केसांना असे काय करावे? काय लावावे? काय खावे? कोणत्या कारणांमुळे आपल्या केसांना फाटे फुटतात, चला तर मग बघुया केसांना फाटे फुटण्याची कारणे काय आहेत ते ? चला तर मग पाहुयात केसांना फाटे आले असतील तर ? काही घरगुती उपाय !
Table of Contents
केसांना फाटे फुटणे याची कारणे काय आहेत ?
आपले सौंदर्य केसांवर अवलंबून असते, याच वेळी जर केसांना फाटे फुटत असेल, तर कशामुळे ते जाणून घेऊया,
- हल्लीच्या बदलत्या प्रदूषणामुळे, त्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतो, आणि त्यामुळे आपल्या केसांना फाटे फुटतात.
- जंक फ्रूट्स, मसालेदार, तेलकट पदार्थ, खाल्ल्याने ही आपल्या आरोग्यावर परिणाम होऊन, केसांना फाटे फुटतात.
- थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी होते, त्याचप्रमाणे केसही रुक्ष होऊन, डोक्यात कोरडेपणा व केसांना फाटे फुटणे च्या समस्या होतात.
- तसेच अनुवांशिक गुण असलेल्या लोकांमध्येही फाटे फुटण्याच्या समस्या होऊ शकतात.
- जास्ती केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधने व शाम्पू वापरल्याने, ही केसांना फाटे फुटतात.
- तसेच आपल्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आल्यामुळे, ही केसांना फाटे फुटणे च्या समस्या होऊ शकते.
- शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे ही केसांना फाटे फुटू शकतात.
- अति गरम पाण्याने केस धुतल्याने ही फाटे फुटण्याच्या समस्या होऊ शकतात.
- केसांना तेल न लावल्याने ही केसांना फाटे फुटणे ची समस्या होऊ शकते.
केसांना फाटे फुटणे वर काही घरगुती उपाय :
चला, तर आपण केसांना फाटे फुटण्याची कारणे जाणून घेतली आहेत तसेच वरील दिलेल्या माहितीमध्ये तुम्ही कोणकोणत्या कारणांमुळे केसांना फाटे फुटतात, ते जाणून घेतले त्यावर कोणकोणते घरगुती उपाय आपण करायला हवे ? ते जाणून घेऊयात.
मध आणि दही चा वापर करून बघा :
हल्ली बदलत्या वातावरणामुळे, केसांना फाटे फुटण्याच्या समस्या भरपूर बघायला मिळतात.मग अश्या वेळी जर तुम्ही मध आणि दही चा वापर केला, तर त्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. त्यासाठी तुम्ही केस धुवायचे एक तास अगोदर मध आणि त्यात दही मिक्स करून डोक्याला लावावे, त्यामुळे तुमचे केस सॉफ्ट, मुलायम व फाटे फुटण्याची समस्याही कमी होईल, अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा.
कोरफड वापरून बघा :
कोरफड ते घरोघरी असते. कोरफड ला आयुर्वेदात श्रेष्ठ स्थान आहे. ही नॅचरली आयुर्वेदिक औषध आपल्या घराघरात आहे. तुम्ही कोरफड कापून, त्याचा गर काढून केसांना लावावे, कोरफडचा गर केसांना लावल्यामुळे तुमचे केस काळे होण्यासाठी मदत होते, तसेच डोक्यातील त्वचा कोरडी असेल, त्यावरही मदत होते, तसेच खाज खुजली ची समस्या किंवा डोक्यात फोड येत असेल, त्या समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. तुमची केस मुलायम होऊन फाटे फुटण्याच्या समस्याही कमी होतील.
शिकेकाई रिठा आवळा ने केस धुवा :
हल्ली बाजारात शिकेकाई आणि रिठा आवळा कुठेही मिळेल, तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पावडर करून ठेवा. ज्यावेळी तुम्ही केस धुवायचे त्याच्या अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा, त्याने केस धुवा, तुम्हाला हा नॅचरली शाम्पू होईल, आणि तुमची केस चमकदार होईल. तसेच तुम्ही शिकेकाई पावडर व रिठा पावडर, आवळा पावडर, दही मिक्स करून त्याचा लेप तुम्ही केस धुण्याच्या अर्धा तास आधी डोक्याला मुळापासून लावा, आणि कोमट पाण्याने धुवा बघा तुम्हाला लक्की फरक जाणवेल.
भरपूर प्रमाणात पाणी प्या :
पाणी हे आपल्या शरीरात अत्यावश्यक गोष्ट आहे. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि असे झाल्यास आपले केसांनाही त्याचा परिणाम होतो, अकाली, केस गळणे तुटणे, केसांना फाटे फुटणे च्या समस्या होऊ शकतात. यासाठी तुम्ही दिवसातून किमान सात ते आठ लिटर पाणी प्यायला हवे.
अंड्याचा वापर करून बघा :
अंडे हे आपल्या केसांसाठी फायद्याचे ठरेल, अंड मध्ये प्रोटीन की मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपले केसांना योग्य पोषण मिळते. त्यासाठी तुम्ही अंड्याचा बलक काढून, त्यात खोबरेल तेल किंवा बदाम तेल + मध मिक्स करून त्याचा लेप केसांना लावावे. तुमच्या केसांना नैसर्गिक शाईन, मुलायमपणा व फाटे फुटण्याचे समस्यांवर आराम मिळू शकतो.
फाटे फुटलेले केस घालून थोडे पार्लरमध्ये जाऊन कापून घ्या :
हल्ली केस रुक्ष होने, केसांना फाटे फुटणे आणि फाटे फुटल्यावर अर्ध्यातून तुटणे, ही समस्या आपल्याला बघावयास मिळते. त्यावेळी आपण जर केसांना फाटे फुटले असतील, तर त्यावेळी तुम्ही पार्लरमध्ये किंवा घरी केस कापून घ्या.
खोबरेल तेलाचा वापर करून बघा :
हल्ली तर कोणाला तेल लावायलाही आवडत नाही, लहानांपासून तर मोठे म्हणतात, की ते लावले की आपण चिपकु दिसतो, लहान मुलं सुद्धा म्हणतात, नको बाई मी नाही लावणार तेल. मग त्यावर तो उपाय नाही ना, त्याच्यामुळे आपले केस हे कोरडे होतात, गळतात, केसांना फाटे फुटतात.
पूर्वीच्या काळी तर लोक अक्षरशः डोक्यातून तेल गळेपर्यंत तेल लावायचे. त्यामुळे त्यांचे केस काळेभोर व मजबूत होते. पण हल्लीच्या काळात केस गळणे, तुटणे, रुक्ष होणे, या समस्या आपल्याला भरपूर बघावयास मिळतात. अशावेळी तुम्ही हप्त्यातून दोन ते तीन वेळेस केसांना तेल लावा.
जर तुम्हाला बाहेर केसांना तेल लावून जायला, थोडे अवघडल्या सारखे वाटत असेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी झोपताना केसांना खोबरेल तेलाने मालिश करून बघा, फक्त केसांना खोबरेल तेल लावते वेळी कोमट करून लावा, खरच खोबरेल तेल हे नॅचरल तेल आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून सुद्धा त्याचा वापर होत येत आहे.
हिरव्या पालेभाज्या विटामिन्स युक्त फळे खा
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला हिरव्या पालेभाज्या खायला आणि निवडायला कंटाळा येतो. त्यामुळे आपल्या शरीराला पोषक विटामिन्स, प्रोटिन्स, कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळत नाही. तसेच आपल्या जेवणाचा टाईम चुकल्यामुळे, ही आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. तसेच आपल्या शरीरात योग्य आहार न गेल्यामुळे, बाहेरील जंग फ्रूट खाल्ल्यामुळे, तेलकट, मसालेदार पदार्थ, खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवर व शरीरावर होतो. मग अशावेळी आपल्या आहारात आपण योग्य तो आहार, हिरव्या पालेभाज्या, विटामिन युक्त फळे खायला हवेत. आपल्या शरीराला त्याची गरज आहे, जर तुम्ही तुमचा आहार योग्य रित्या घेतल्या तर, तुम्हाला केसांना फाटे फुटणे ची, केस गळतीचे समस्यांवर लवकर आराम मिळेल.
जाणून घ्या :केस दाट होण्यासाठी काय खावे
चला, तर आज आम्ही तुम्हाला केसांना फाटे फुटण्याची कारणे व त्यावर कोणते घरगुती उपचार करावेत, ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. अजून माहिती साठी तुम्ही येथे पाहू शकता.
धन्यवाद