पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

0
2734
पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

 

                 आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे एक गोष्ट फार बघण्यास आली आहे. ती म्हणजे लहान वयामध्ये पांढरे केस होणे किंवा जसे जसे वय वाढत जाते तसे देखील केस पांढरे होत आहे. आपली जीवनशैली जबाबदार आहे का किंवा आपल्या शरीरातील हार्मोन्स देखील सतत बदलत असतात. म्हणून हेदेखील त्याला एक कारण असू शकते पण सतत शरीरामध्ये बदल होत असल्यामुळे त्याचा एक परिणाम केसांवर देखील दिसून येतो. मग अशावेळी प्रश्न पडतो जर आपले पांढरे केस काळे करण्यासाठी कोणते औषध आहे का जेणेकरून आपले केस पुन्हा काळे किंवा पूर्वीसारखे होतील. 

                  बाजारामध्ये खूप केस काळे करण्याच्या मेहंदी उपलब्ध आहे. पण बरेच मेहंदी केमिकल युक्त असतात आणि त्या लावल्यामुळे आपले केस तुटू लागतात केस गळू लागतात. मग केसांना अधिकच धोका होतो कारण मेंदी लावल्यामुळे ते तात्पुरता तर चांगले दिसतात पण त्यानंतर त्यावर होणारे परिणाम किंवा साईड इफेक्टमुळे केसांचे आयुष्य कमी होते. तर आपणास यावर चर्चा करणार आहोत की पांढरे केस काळे करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक औषध आहे का जेणेकरून आपण घरच्या घरी व घरगुती पद्धतीने आपल्या केसांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता केस काळे करू शकतो तर मग बघू या.

केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

कांद्याचा रस

                 जर तुमची केसं सतत पांढरे पडत असतील तर तुम्हाला केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय जाणून घ्यायचं असेल. तर सर्वात चांगला उपाय म्हणजे कांद्याचा रस तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कच्चा कांदा खाल्लास पाहिजे. जेणेकरून तुमच्या केसांचे आयुष्य सुरक्षित राहील. तसेच केस लवकर पांढरे होणार नाही शिवाय तुम्ही कांद्याचा रस केसांना लावायला सुरुवात केली तर कदाचित तुमचे पांढरे केस काळे होणार नाही. पण जर तुम्ही तो रस व्यवस्थित डोक्याच्या खोल भागापर्यंत लावला तर नवीन येणारे केस हळूहळू काळे होण्यास सुरुवात होईल. तसेच कांद्याचे रस लावून झाल्यानंतर साधारणता पंचवीस ते तीस मिनिटांनी केस स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावी व केसातून कांद्याचा वास येत असेल तर हर्बल शाम्पू लावून तुम्ही केस होऊ शकता जेणेकरून कांद्याचा वास तुमच्या केसांना येणार नाही.

वाचा  मणक्याच्या वेगवेगळ्या आजारावर व विविध समस्यांवर वेगवेगळे घरगुती उपचार :-

आवळा

                तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर करू शकतो मग त्यामध्ये तुम्ही आवळ्याचा रस काढून सरळ केसांवर लावू शकता. किंवा दोन चमचे आवळ्याची पावडर घेऊन त्यामध्ये नारळाचे टाकावे व तेलामध्ये आवळ्याची पावडर पूर्ण वितळे पर्यंत गॅस वर ठेवावे. एकदा का आवळ्याची पावडर आणि तेल एकत्र झाले की रोज रात्री झोपण्याआधी हे तेल डोक्याला व केसांना मसाज करून झोपावे आणि झोप देखील चांगले येईल व तुमच्या केसांमध्ये देखील चांगला फरक दिसून येईल.

पांढरे केस काळे करण्यासाठी 

कडू लिंबाची पाने व खोबऱ्याचं तेल

                  तर तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी आज पासून जर हे तेल वापरण्यास सुरुवात केली तर तुम्हाला लवकरच सकारात्मक फरक दिसून येईल. तेल बनवायचे कसे ते आपण बघूया तर आपण आपल्या घरातील शुद्ध नारळाचे तेल घ्यावे. साधारणता चार ते पाच चमचे शुद्ध नारळाचे तेल एका वाटीमध्ये घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये कडुलिंबाची पाणी टाकावे व कडुलिंबाचा अर्क त्यात तेलामध्ये उतरेपर्यंत ते तेल मंद आचेवर ठेवायचे आहे. एकदाका कडू लिंबाच्या पानांचा अर्क तेलामध्ये उतरला की ते तेल गाळून घ्यावे व रोज सकाळी ते तेल तुमच्या केसांच्या खोल भागापर्यंत लागेल याची काळजी घ्यावी तसेच तेल लावताना मसाज करत तेल लावावे.

एरंडाचे तेल

                तुमचे केस लवकरात लवकर काळे करण्यासाठी सहज व सोपा उपाय म्हणजे एरंडाचे तेल वापरावे तुम्ही तुमच्या घरांमध्ये केसांना कोणते तेल लावता त्याजागी एरंडाचे तेल लावावे. जेणेकरून तुमच्या केसांना हवे असलेले पोषण तत्वे देखील भेटतील व तुमचे केस लवकरात लवकर काळे होण्यास देखील मदत होईल.  

केस काळे करण्यासाठी घरगुती मेहंदी

                तर बरेच केसांना लावण्याची मेहंदी बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण बऱ्याच मेहंदी केमिकलयुक्त आहे. यामुळे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आपणास घरगुती पद्धतीने मेहंदी बनवणार आहे चला तर मग बघुया.

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene

मेहंदी बनवण्याची क्रिया व सामग्री

  1. इंडिगो पावडर
  2. दही
  3. कॉफी पावडर
  4. आवळ्याची पावडर
  5. चहा पावडर चे पाणी

                 चला तर मग आता मेहंदी कशी बनवावी हे आपण बघू आता सुरुवात पहिले आपण चहा पावडर चे पाणी बनवूया. आपण सुरुवातीस एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी घ्यावे. त्यानंतर ते पाणी खळखळ उकळावे त्यानंतर त्यामध्ये चहा पावडर टाकावी व हे पाणी थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर हे पाणी एका वाटीमध्ये काढून घ्या.

            दुसऱ्या बाजूस आपण लोखंडाची कढई घ्यावी. त्यामध्ये इंडिगो पावडर, कॉफी पावडर, आवळ्याची पावडर व दही या सामग्री टाकून मंद आचेवर हलवायचे आहे. त्यानंतर हळू हळू ते चहा पावडर चे पाणी आपण तयार केले होते ते पाणी त्यामध्ये टाकून थोडी पातळ मेहंदी होईल या अंदाजाने पाणी टाकावे. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर ढवळावे एकदा का त्या मेहंदीला काळा रंग आला त्यानंतर ती मेहंदी काढून घ्यावी. थोडी थंड झाल्यावर केसांवर लावावी आणि वीस ते तीस मिनिटानंतर केस स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावे अशा प्रकारे तुम्ही मेंदी घरच्या घरी बनवू शकता. 

केस काळे करताना कोणती काळजी घ्यावी

                     सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सामग्री दिली जाते ती सामग्री तंतोतंत पाळावी तसेच लहान मुलांना या मेंदी पासून दूर ठेवावे. मेहंदी लावल्यानंतर वीस ते तीस मिनिटांमध्ये धुऊन टाकावी. नाही तर त्याचा दुष्परिणाम आपल्या केसांवर होईल तसेच वारंवार मेहंदी लावू नये साधारणत महिन्यातून एकदा मेहंदी केसांवर लावली तर चालेल.

                 तर आपण आज केस काळी करण्याची माहिती घेतली तसेच यावर आयुर्वेदिक औषध देखील बघितले याच प्रकारे घरगुती मेहंदी देखील कशी बनवायची हे देखील जाणून घेतले. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी व सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here