स्वप्नात अक्षय तृतीया सण साजरा करताना दिसणे

0
244
स्वप्नात अक्षय तृतीया सण साजरा करताना दिसणे
स्वप्नात अक्षय तृतीया सण साजरा करताना दिसणे

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे पडू शकतात. मग आपण स्वप्नामध्ये सण,  वार, आपल्या आवडत्या व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, किंवा आपल्या मनातील चित्र- विचित्र आकृत्या आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात.  भविष्य काळामध्ये आपल्याला कसे सावध राहावे, याबद्दल सांगतात. स्वप्नात अक्षय तृतीया सण साजरा करताना दिसणे हे एक शुभ स्वप्न मानले जाते.

. तर मित्रांनो, या स्वप्नाच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये अक्षय तृतीया दिसणे, किंवा अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना दिसणे. मित्रांनो खूप जणांना या प्रकारचे स्वप्न पडू शकतात. अक्षय तृतीया सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. तसेच हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला हा सण साजरा केला जातो. म्हणूनच त्याला अक्षय तृतीया असे म्हणतात.

या दिवशी खूप दिवसभर कोणतेही काम कोणत्याही वेळी करू शकतो. दिवसभर त्याचा शुभ मुहूर्त राहतो आणि त्या दिवशी दान, धर्म, पुण्य, पूजा, पाठ, हवन, विधी केल्या जातात. तसेच त्या दिवशी पितरांनाही नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी काहीजण सोने ही खरेदी करतात. तर काहीजण गंगा स्नान करतात. तसेच या दिवशी काहीजण गृहप्रवेश देखील करतात.

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये अक्षय तृतीया दिसत असेल, किंवा अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना दिसत असेल, तर ते शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. त्याचे समाधानकारक उत्तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. चला, तर मग मित्रांनो, जाणून घेऊयात स्वप्नामध्ये अक्षय तृतीया दिसणे? शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात अक्षय तृतीया सण दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये अक्षय तृतीया दिसणे हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये अक्षय तृतीया हा सण कसा दिसला? कशाप्रकारे दिसला? आणि तुम्ही काय करताना दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांच्या अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात लाल मिरची दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात अक्षय तृतीया सण दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला अक्षय तृतीया सण दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात चाललेले ताण-तणाव, नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे. तुम्ही सकारात्मक दृष्टीने पुढे जाणार आहे आणि काहीतरी शुभ वार्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात अक्षय तृतीयेच्या सणाची पूजेची तयारी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला अक्षय तृतीया सणाची पूजेची तयारी करताना तुम्ही बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्हाला खूप मोठी जबाबदारी किंवा मोठी कामगिरी मिळणार आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवसायामध्ये गुंतणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे. मानसन्मान मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही अक्षय तृतीयेला दानधर्म करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही अक्षय तृतीय सणाला दानधर्म करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार दानधर्म ही एक सेवा आहे, तसेच इतरांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहेत. मित्रांनो, जर तुम्ही हे कर्तव्य निभवताना दिसत असाल, तर ते अत्यंत सुखी आणि समाधानी आयुष्य तुम्ही जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अक्षय तृतीयेच्या सण साजरा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काहीतरी गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. किंवा घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, किंवा एखाद्या शुभ कार्य होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही अक्षय तृतीयेला घराची पूजा करताना दिसणे

मित्रांनाे, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही अक्षय तृतीयाला घराची पूजा करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्हाला तुमच्या इच्छापूर्ती होणार आहे. म्हणजे तुमचे घराचे स्वप्न अपूर्ण असेल, तर ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि घर असेल तर एखाद्या वास्तूचे स्वप्न तुमचे लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात शेपूची भाजी दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताना दिसत असाल, तर ती शुभ स्वप्न मानले जाते. कारण हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो, जर या दिवशी सोने खरेदी केले, तर आपल्याकडे अक्षयचा वास राहतो आणि तुम्हाला जर अशी स्वप्न पडत असेल, तर असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. किंवा व्यापारामध्ये वृद्धी होणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना नैवेद्य देताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर अक्षवृतीयेच्या दिवशी तुम्ही पितरांना नैवेद्य देताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्यावर पितरांची कृपा राहील. मित्रांनो पौराणिक काळापासून असे म्हटले जाते की, आपले वाड-वडील, पितृ हे खुश राहिले, तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य लाभते.

जर तुम्हाला अशी स्वप्न पडत असेल, तर त्याचा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या पितरांची सेवा करायला हवी, त्यामुळे प्रगतीच्या दिशेने तुम्ही जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये अक्षय तृतीया दिसणे, किंवा अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here