स्वप्नात पाऊस दिसणे शुभ की अशुभ

0
1650
स्वप्नात पाऊस दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात पाऊस दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर आपला विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात. मित्रांनो खरंतर स्वप्न ही आपल्या आयुष्याशी निगडित असतात. आपल्या आयुष्यात जर काही पुढे चांगले अथवा वाईट घटना घडणार असतील, तर त्याचे संकेत देण्याचे काम हे स्वप्न आपल्याला करत असतात. प्रत्येक स्वप्नाच्या मागे एक अर्थ लपलेला असतो. एक संकेत लपलेला असतो. जर आपण स्वप्नाचा अर्थ समजून घेतला, तर येणाऱ्या काळातील घडणाऱ्या घटने बद्दल आपल्याला आधीच समजू शकते आणि आपण त्यावर मार्ग देखील काढू शकतो. काहीजणाना स्वप्नामध्ये देवी-देवता दिसत असतात, तर काहीजणांना स्वप्नामध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी, व्यक्ती, विचित्र आकृत्या वगैरे दिसत असतात. तर मित्रांनो, काहीजणांना तर स्वप्नामध्ये पाऊस पडताना देखील दिसत असतो. फार मोजकेच लोक असे असतात की, ज्यांना असे स्वप्न पडत असेल असे लोक खूप भाग्यवान समजले जात असतात. आपल्याला जीवन जगण्यासाठी पाण्याची गरज असते. पाण्यापासून आपण जीवन जगू शकत नाही. मित्रांनो, पाण्याचे खूपच महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. जर तुम्हाला स्वप्नात पाऊस दिसलेला असेल तर हे चांगले स्वप्न मानले जात असते. परंतु, तुम्ही हे स्वप्न कशा स्वरूपात बघितले होते? त्यावरूनच तुम्हाला त्याचे संकेत कळू शकतात. पावसाळा म्हटला की, लहान मुलांना खूप आनंद होत असतो. अगदी पावसाळ्यात त्यांना ओले व्हायला,भिजायला आवडत असते. पावसाच्या जमणाऱ्या पाण्यात त्यांना उड्या मारायला आवडत असतात. पावसाळ्याच्या पाण्यात भिजण्याची त्यांना मजा वाटत असते, मनसोक्त ते आनंद लुटत असतात. तर काही जणांना पावसाळा लागला, तर गरमागरम भजी खाण्यास आवडत असते. पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र ठिकाणी हिरवळ पसरलेली असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेक जण पर्यटन स्थळी भेट द्यायला जात असतात. स्वप्नात पाऊस दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्नात पाऊस दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

स्वप्नात पाऊस दिसणे शुभ की अशुभ.

मित्रांनो, स्वप्नात पाऊस दिसणे जसे की, स्वप्नात आपण पावसात भिजताना दिसणे, नाचताना दिसणे, स्वप्नामध्ये अगदी मुसळधार पाऊस पडताना दिसणे, वगैरे अशा प्रकारचे स्वप्न अनेकांना पडलेले असतात. तर या स्वप्नाचा नेमका अर्थ काय असू शकतो? तर या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात चपाती दिसणे शुभ की अशुभ !
स्वप्नात पाऊस दिसणे
स्वप्नात पाऊस दिसणे

स्वप्नात पाऊस दिसणे : Swapnat Paus Disne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला पाऊस दिसला असेल, तरी शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसात अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला शांतता आनंद मिळणार आहे. तुम्ही जे काही कार्य हाती घेतलेले असेल, त्या कार्यात तुमची प्रगती होणार आहे. येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे.

तुम्ही पावसाच्या पाण्यात नाचताना दिसणे : Pavsachya Panyat Nachtana Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही पावसाच्या पाण्यात तुम्हाला नाचताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे सुखी होणार आहेत. तुमचा व्यापार व्यवसाय हा फायदेशीर ठरणार आहे. नोकरीमुळे तुम्हाला पगार वाढ होणार आहे. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

अगदी मुसळधार पाऊस दिसणे : Agadi Musaldhar Paus Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला अगदी मुसलधार पाऊस दिसलेला असेल, अगदी मुसळधार पावसाच्या धारा पडताना दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणार काळ हा तुमच्यासाठी वाईट परिस्थितींचा असणार आहे. अचानक तुम्हाला धनहानी होऊ शकते. तुमच्यावर छोटे-मोठे संकट येणार आहेत.

तुम्ही पावसात चालताना दिसणे : Pavsat Chalne

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्ही पावसात चालताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुम्ही इतरांच्या भरोशावर आहात. तुम्हाला असे वाटते की, ते तुमची मदत करतील, परंतु असे तुम्ही इतरांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला कुठलीही व्यक्ती मदत करणार नाही. तुमचे काम हे तुम्ही स्वतः केले पाहिजे. नाहीतर तुम्ही भविष्यात एकटे पडू शकतात. त्यामुळे तुम्ही इतरांच्या भरोशावर न राहता स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे. त्यामुळे असे स्वप्न बघणे चांगले मानले जात नाही.

वाचा  स्वप्नात पालक दिसणे शुभ की अशुभ!

पावसाच्या पाण्यात गारा पडताना दिसणे : Pavsachya Panyat Gara Padne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला पावसाच्या पाण्यात गारा पडताना दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमचे कुठले तरी मोठे नुकसान होणार आहे. अनावश्यक ठिकाणी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे. अचानक तुम्हाला धनहानी होणार आहे.

 तुम्हाला ढगफुटी होताना दिसणे : Dhagfuti Hone

स्वप्न शास्त्रनुसार, स्वप्नात तुम्ही ढग फुटी होताना दिसलेली असेल, अगदी मुसळधार पाऊस पडताना तुम्हाला दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, अचानक तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. धनहानी होणार आहे. तुमचे मोठे नुकसान होणार आहे.

तुम्हाला काळे ढग दिसणे : Kale Dhag Pahne

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला काळे ढग दिसलेले असतील, काळया ढगातून पाऊस पडताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

तुम्हाला हळूहळू पाऊस पडताना दिसणे : Haluhalu Paus Padne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला हळूहळू पाऊस पडताना दिसलेला असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचे सर्व कार्य संपन्न होणार आहेत. अनेक छोट्या-मोठ्या कार्यातून तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे.

घराच्या छतावर पावसाचा आवाज येणे : Gharachya Chatavr Pavsacha Aawaj Yene

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला घराच्या छतावर पावसाचा आवाज आलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी चा वास होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे.

वाचा  स्वप्नात गौतम बुद्ध दिसणे हे शुभ असते की अशुभ असते ? 

घरामध्ये पावसाचे पाणी पडताना दिसणे : Gharamdhe Pavsache Pani Pdne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमच्या घरामध्ये पावसाचे पाणी पडताना तुम्हाला दिसलेले असेल अथवा तुमच्या घराच्या भिंतीतून पावसाचे पाणी लिक होताना तुम्हाला दिसलेले असेल आणि हे जर पाणी स्वच्छ असेल, तर असे स्वप्न शुभ मानले जाते. जर हे लिक होणारे पाणी जर खराब असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते.

तुम्ही पावसाच्या पाण्यात चिंब भिजलेले दिसणे : Pavsachya Panyat Chimb Bhijane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही पावसाच्या पाण्यामध्ये चिंब भिजलेले तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की,   येणारा काळ हा तुमच्यासाठी सुखद असणार आहे. अचानक तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

स्वप्नात पाऊस दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here