स्वप्नात सूर्योदय दिसणे शुभ की अशुभ!

0
742

 

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, आपण बघितलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट अर्थ असतो. मित्रांनो, स्वप्न हे आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. काही स्वप्न ही चांगली असतात, तर काही स्वप्न ही वाईट देखील असतात. काही स्वप्ना ही अशी असतात की, जी आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून, आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल वेळीच सावध होऊ शकतो. प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळ्या स्वरूपाची वेगवेगळ्या प्रकारची असतात. मित्रांनो, काही जणांना स्वप्नामध्ये सूर्य देखील दिसत असतो. हिंदू धर्मातील अनेक लोकांची सुरुवात सूर्यनारायणाच्या पूजेने होत असते. म्हणजेच हिंदू धर्मातील अनेक लोक हे सकाळी उठल्यावर स्नान वगैरे करून प्रथम सूर्यदेवताला अर्ध्य देत असतात. म्हणजे स्नान करून सूर्य देवाला जल अर्पण करून पूजा करून दिवसाची सुरुवात करत असतात. सूर्यदेवतेची अनेक नावे आहेत  जसे की, भास्कर, दिनकर, आदित्य, प्रभाकर,रवी वगैरे. नियमित न चुकता सूर्यदेवाला अर्ध्य देणे हे फार पूर्व काळापासून चालत आलेले आहे, अनेक जण आजही नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करत असतात. या पृथ्वीवर सूर्य हा प्रकाश देण्याचे कार्य करत असतो. नाहीतर, सूर्यप्रकाशा शिवाय या पृथ्वीवर फक्त अंधकारच उरला असता. धान्य योग्य वाढीसाठी विकण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात सूर्य दिसलेला आहे का? सूर्योदय होताना दिसलेला आहे का? जर तुम्ही असे स्वप्न बघितलेले असेल, तर त्याचा काय अर्थ असू शकतो? हेही तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु, तुम्ही हे स्वप्न नेमके कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसार, तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. जसे की स्वप्नात सूर्योदय दिसणे, स्वप्नात सूर्यास्त होताना दिसणे, स्वप्नात सूर्यप्रकाश दिसणे, स्वप्नात तुम्ही सूर्याला जल अर्पण करताना दिसणे, स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात सुनामी होताना दिसणे swapnat sunami disane
स्वप्नात सूर्योदय दिसणे
स्वप्नात सूर्योदय दिसणे

स्वप्नात सूर्योदय दिसणे.  

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला सूर्योदय दिसलेला असेल, तर हे अत्यंत शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग मिळणार आहे. तुमचे आयुष्य हे एक नवीन वळण घेणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. तुमचा समाजात मानसन्मान वाढणार आहे. तुम्हाला आदर मिळणार आहे.

स्वप्नात लाल रंगाचा सूर्य दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार तर स्वप्न तुम्हाला लाल रंगाचा सूर्य दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातील क्रोध वाढणार आहे. तुम्ही इतरांशी वादविवाद करणार आहात. तुमचे इतरांशी मोठे भांडण होणार आहे. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात तुम्हाला दोन सूर्य दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला दोन सूर्य दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचे इतरांशी मोठे भांडण होणार आहे. तुमचा स्वभाव अगदी क्रोधित होणार आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही तुमच्यातील क्रोध कमी केला पाहिजे. तुमच्यातील अहंकार काढला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला सूर्याची किरणे दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला सूर्याची किरणे दिसलेली असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला एक नवीन दिशा मिळणार आहे. एक नवीन मार्ग मिळणार आहे. तुम्ही सुखी, समाधानी होणार आहात. तुमच्या घरात शांतता नांदणार आहे. तुमचे आरोग्य तुमचे स्वास्थ्य चांगले राहणार आहे.

वाचा  स्वप्नात तांदूळ दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात सूर्य जळताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला सूर्य जळताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होणार आहेत. तुमच्यावर संकट येण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला काळया रंगाचा सूर्य दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार स्वप्न तुम्हाला काळया रंगाचा सूर्य दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. येणाऱ्या दिवसात तुम्ही खूप निराश होणार आहात. तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडणार आहे. तुमची होणारी कामे अपूर्ण राहणार आहेत.

स्वप्नात सूर्यास्त दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला सूर्यास्त दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक संधी चालून येणार आहेत. परंतु, तुम्हाला त्या संधीचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या कार्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला सूर्यग्रहण दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमची तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून अथवा नातेवाईकांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात मोठ्या आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही सावध राहिले पाहिजे.

स्वप्नात सूर्य ढगांमागे लपलेला दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तर तुम्हाला सूर्य ढगांच्या मागे लपलेला दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला अनेक छोटे मोठे लाभ मिळत राहणार आहे. तुमच्या कार्यात तुम्ही प्रगती करणार आहात. तुम्हाला यश मिळणार आहे.    

      मित्रांनो, स्वप्नात सूर्योदय होताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.     

वाचा  स्वप्नात कोंबडा दिसणे शुभ की अशुभ

          धन्यवाद……

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here