स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे शुभ की अशुभ!

0
287

 

नमस्कार मित्रांनो. स्वप्नशास्त्रानुसार आपण बघितलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये जे विचार करत असतो, ज्या व्यक्तींना भेटलेला असतो अथवा आपल्या सोबत एखादी घटना घडलेली असेल तर अशा स्वरूपाचे स्वप्न आपल्याला झोपेची दरम्यान पडत असतात. काही स्वप्ने ही आपल्याला शुभ फळ देणारी असतात, तर काही स्वप्ने ही आपल्याला अशुभ फळ देणारी असतात.कधी तर अशी स्वप्ने देखील पडतात, की ज्याबद्दल आपण कधी विचार देखील केलेला नसतो.अशी स्वप्ने ही आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटने बद्दल संकेत देण्याचे काम करत असतात.मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे या स्वप्नाबद्दल सांगणार आहोत.

आजच्या काळात मैदानी खेळ खेळणे या कडे मुलांचे दुर्लक्ष झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी आपण लहान मुलांना मोबाईल खेळतानाच बघितलेले असणार. मोबाईल मध्ये अनेक गेम खेळता येतात, त्यामुळे हल्ली मुलांचे मैदानी खेळ खेळण्याकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे.  मित्रांनो, विटी दांडू  हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जातोय. ग्रामीण भागातील मुले हा खेळ खेळणे खूप पसंद करतात. विटी दांडू हा खेळ पारंपारिक खेळ आहे. हा खेळ खेळण्यात देखील खूप मजा वाटते. हिंदीमध्ये याला  गिल्ली दंडा असे देखील म्हटले जाते. दांडूसाठी लाकडाची थोडी मोठी काठी वापरली जाते आणि विटी साठी छोट्या लाकडाचा तुकडा घेऊन दोघं साईडने टोक काढली जाते. जर दिवसभरामध्ये तुम्ही हा खेळ खेळला असेल अथवा या खेळाविषयी माहिती वाचली असेल किंवा टीव्हीवर हा खेळ खेळताना तुम्ही कोणाला बघितलेले असेल, तर या स्वरूपाचे स्वप्न तुम्हाला पडू शकते. मित्रांनो, या स्वप्नाचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल देखील आपण जाणून घेतले पाहिजे. चला तर मग, स्वप्नात विटी दांडू खेळताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene
स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे
स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे

स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे, शुभ की अशुभ!

    काही व्यक्तींना स्वप्नात विविध प्रकारचे खेळ दिसत असतात. जसे की, स्वप्नात ते विटी दांडू खेळताना दिसणे, विटी दांडू खेळ खेळण्यासाठी टीम जमवताना दिसणे, स्वप्नात विटी दांडू तयार करताना दिसणे, स्वप्नात विटी दांडूचे दुकान दिसणे, स्वप्नात खूप सारे विटी दांडू दिसणे, स्वप्नात विटी दांडू खेळामध्ये हरताना दिसणे, स्वप्नात विटी दांडू खेळ जिंकताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू खेळताना तुम्हाला दिसलेले असेल तर, या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नवनवीन कामे हाती घेणार आहात. कामे करताना तुम्ही अगदी विचारपूर्वक करणार आहात. अगदी पद्धतशीर काम केल्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात चांगले यश मिळणार आहे. तुमचा आर्थिक फायदा देखील चांगला होणार आहे.

स्वप्नात तुम्ही विटीदांडू खेळ खेळण्यासाठी टीम जमवताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू खेळ खेळण्यासाठी टीम जमवताना दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही कुठलेही काम करताना टीमवर्कने करणार आहात. त्यामुळे तुम्हाला अगदी कमी वेळेत मोठे यश मिळणार आहे. तुमचा भरपूर मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

वाचा  स्वप्नात कडुलिंब दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही विटीदांडू तयार करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू तयार करताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमची जी कामे बिघडलेली होती, ती चांगली होणार आहेत. म्हणजेच तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन पुन्हा तुमची काम मार्गे लागणार आहे. तुम्ही तुमच्या कार्याबद्दल नवनवीन योजना आखणार आहात. जर तुमची इतरांशी मतभेद झालेले असतील, तर तेही लवकर दूर होणार आहेत. वरिष्ठ मंडळीं तुमच्या कामावर खुश होणार आहे.

स्वप्नातून विटीदांडूचे दुकान दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला विटी दांडूचे दुकान दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरात लवकर तुम्हाला एक मोठी खुशखबर मिळणार आहे. लवकरच तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणार आहे.

स्वप्नात तुम्ही विटीदांडू खरेदी करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू खरेदी करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यक त्या गोष्टींची खरेदी करणार आहे. अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करणे टाळणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही विटीदांडू विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसारजर स्वप्न तुम्ही विटी दांडू विकताना दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही विटीदांडू हा खेळ जिंकताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू हा खेळ जिंकताना दिसलेले असाल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्हाला मोठे यश मिळणार आहे तुमच्या कार्याबद्दल कौतुक केले जाणार आहे. तुमची प्रशंसा केली जाणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान केला जाणार आहे.

वाचा  स्वप्नात वटवाघळू दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही विटीदांडू हा खेळ हरताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही विटी दांडू हा खेळ हरताना दिसलेले असाल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. अगदी आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे. अनेक जण तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करणार आहेत, परंतु तुम्ही त्याला न घाबरता जिद्दीने तुमचे काम पूर्ण केले पाहिजे, तुमच्या कामात तुम्ही वरिष्ठ मंडळींचे सल्ले देखील घेतले पाहिजे.

     मित्रांनो स्वप्नात विटी दांडू खेळताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here