स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ

0
1148
स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर आपल्याला स्वप्ने पडत असतात. स्वप्ने ही आपण विविध प्रकारची बघत असतो. स्वप्नामध्ये अगदी काही घटना आपल्याला दिसू शकतात. जर आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार केलेला असेल, ज्या गोष्टी अनुभवले असतील, तर ते देखील आपल्या स्वप्नात दिसत असतात. ज्या गोष्टी आपण मनात साठवून ठेवलेल्या असतात, ज्या आपल्याला हव्याहव्याशा वाटत असतात, तर अशा प्रकारची स्वप्न देखील आपला पडत असतात. परंतु, मित्रांनो काही वेळा आपण ज्या गोष्टी बघितलेले नसतात,त्या गोष्टींचा विचारही केलेला नसतो, तर अशा प्रकारची स्वप्ने देखील आपल्याला पडत असतात. कदाचित अशी स्वप्ने पडण्या मागील एक कारण म्हणजे आपल्याला पुढच्या भविष्याबद्दल काहीतरी सूचना देणे असे असावे. काही जणांना वाईट स्वप्न पडत असतात. तर काही जणांना चांगले स्वप्न पडत असतात. स्वप्नांना कुठल्याही प्रकारच्या सीमा नसतात, मर्यादा नसतात.अनेक जणांना स्वप्नामध्ये घुबड दिसत असते. घुबड बघितल्यावर अगदी घाबरून ते उठत असतात आणि असे स्वप्न का पडले असावे असा विचार करत बसतात. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड दिसले असेल तर घाबरू नका. घुबडाला लक्ष्मीचा प्रतीकही मानले जात असते. खरंतर घुबड याला रात्रीचा राजा असे म्हणून देखील ओळखले जाते. घुबडाला चांगले व वाईट याविषयी आधीच पूर्वभास होऊन जात असतो. काही विशिष्ट जागा अशा असतात की ज्या ठिकाणी जर तुम्हाला घुबड दिसले धरते तुमच्यासाठी शुभ असते. परंतु काही विशिष्ट जागा अशा असतात समजा जर तुमच्या घरामध्ये घुबड आले तर हे अशुभ मानले जात असते यामुळे तुम्हाला संकटांना सामोरे देखील जावे लागू शकते अशी मान्यता आहे. तर मित्रानो, स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ तर ते तुम्हाला कोणत्या स्वरूपात असलेले असेल त्यावरून तुम्हाला शुभ व अशुभ संकेत करु शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

Table of Contents

स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ.

अनेक जण घुबडाला घाबरत असतात. कारण की अशी मान्यता आहे की, घुबड दिसल्यावर अशुभ घटना घडत असतात. परंतु काही ठिकाणी घुबड दिसणे शुभ मानले जात असते आणि जर घुबड  याने तुमच्या घरात प्रवेश केला असेल, तर अशुभ मानले जात असते. अनेक जण या गोष्टींना घाबरत असतात. परंतु मित्रांनो, काही ठिकाणी घुबड दिसणे देखील मानले जात असते. त्यामुळे तुमचा फायदाही होऊ शकतो. तर नेमके तुम्ही स्वप्नात त्याचे स्वरूप कोणत्या पद्धतीचे बघितलेले असेल? आणि त्याचे तुम्हाला कोणते फळ मिळू शकते? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात चाबुक दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात घुबड दिसणे .jpg
स्वप्नात घुबड दिसणे .jpg

स्वप्नात घुबड दिसणे : Swapnat Ghubad Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये घुबड बघितली असेल तर हे स्वप्न चांगले नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अनेक कठीण परिस्थितीला प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्हाला कष्टाची कामे करावी लागणार आहे. भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.

घुबड उडताना दिसणे : Ghubad Udatana Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये घुबड ही उडताना दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला कोणीतरी धोका देणार आहे तुमच्या सोबत एखादा वाईट प्रसंग घडणार आहे तुमच्यावर कोणीतरी आरोप करणार आहे त्यामुळे तुम्ही वेळेत सावध झाले पाहिजे.

घुबड झाडावर बसलेली दिसणे : Ghubad Jhadavr Basleli Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड ही झाडावर बसलेली दिसली असेल, तर हे अशुभ संकेत देणारी स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही आजारी पडणार आहात. तुमच्या शरीराला त्रास होणार आहे तुम्हाला एखादा आजार होणार आहे. तुम्हाला कष्ट सहन करावे लागणार आहे.

तुम्ही घुबड पकडताना दिसणे : Ghubad Pakdne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये घुबड पकडताना दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार आहे लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. तुमचा व्यवसाय मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे अचानक नोकरी मध्ये पगार वाढ होणार आहे.

पांढरा रंगाचा घुबड दिसणे : Pandhra Rangacha Ghubad Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाचा घुबड दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे तुम्ही संकटमुक्त होणार आहे. जर तुमच्या जीवनात काही त्रास चालू असेल अनेक संकटातून तुम्हाला जावे लागत असेल आणि जर अशाच मला स्वप्नामध्ये पांढरा रंगाचा घुबड दिसलेला असेल तर हे तुमच्यासाठी शुभ आहे लवकरच तुमचे सर्व त्रास  संपणार आहेत. तुम्हाला चांगले दिवस येणार आहे.

वाचा  स्वप्नात अद्रक दिसणे शुभ की अशुभ

घुबड तुमच्याकडे टक लावून बघणे : Ghubad Tak Lavun Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये घुबड हा तुमच्याकडे टक लावून बघत असेल असे तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे तुमच्या जीवनात आनंद लहरी येणार आहेत.

घुबड हा तुमच्या उजव्या बाजूला दिसणे : Ghubad Ujavya Bajula Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये घुबड हात मला तुमच्या उजव्या साईडला बघायला मिळालेला असेल तर याचा अर्थ चांगला मानला जातो तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते लवकरच कमी वेळेत पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे तुमचा फायदा देखील त्यामध्ये होणार आहे.

घुबड तुमच्या डाव्या बाजूला दिसणे : Ghubad Davya Bajula Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नांमध्ये जर घुबड हा तुमच्या डाव्या बाजूला दिसला असेल तर हे स्वप्न अशुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही कार्य हाती घेतलेले आहे ते मध्येच बिघडणार आहे तुम्हाला अनेक अडथळा निर्माण होणार आहे तुमच्यासोबत काहीतरी अशुभ घटना घडणार आहे.

मोठ्या सिंगचा घुबड दिसणे : Mothya Singcha Ghubad Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मोठ्या सिंगचा घुबड दिसला असेल तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते अगदी कमी वेळेत पूर्ण होऊन, तुम्हाला त्यात यश प्राप्त होणार आहे. त्यात फायदा होणार आहे. तुम्हाला विरोधक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, तुम्ही विरोधकांवर भारी भारी पडणार आहात  त्यांना तुम्ही हरवणार आहात. तुमचे सर्व काम हे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

स्वप्नात  घुबड चे पिल्लू दिसणे : Ghubadche Pillu disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये घुबडाचे पिल्लू दिसलेली असतील, तर हे शुभ व अशुभ दोघंही संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, जर स्वप्नामध्ये घुबडाचे पिल्लू यांना त्यांची आई खाऊ घालताना दिसलेली असेल, तर तुम्हाला लाभ होणार आहे. अचानक लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. आणि जर स्वप्नामध्ये तुम्हाला घुबडाचे पिल्लू दिसलेले आहे आणि त्यांची आई ही त्यांच्यापासून दुरावलेली दिसलेली असेल, तर याचा अर्थ असा कि, तुम्हाला हानी होणार आहे. अचानक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

वाचा  स्वप्नात मामी दिसणे शुभ की अशुभ

पिवळ्या रंगाचा घुबड दिसणे : Pivlya Rangacha Ghubad Disne

स्वप्नशास्त्रनुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये पिवळ्या रंगाचा गोड दिसलेला असेल तर हे अतिशय अशुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागणार आहे. हे स्वप्न मृत्यूचे संकेत देणारे मानले जाते. तुमच्या सोबत एखादी दुर्घटना घडणार आहे. असे स्‍वप्‍न पडले तर, तुम्ही देवाची आराधना केली पाहिजे. नियमित भक्ती भावाने देवाची पूजा केली पाहिजे.

घुबडाचे चित्र बघणे : Ghubdache Chitr Bghne

स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये घुबडाचे चित्र दिसले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्यावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव झालेला आहे. नकारात्मक घुबडाचे चित्र बघितल्यामुळे तुम्ही आमच्याकडून नकारात्मक दृष्टीचे म्हणजेच, चुकीचे काम होणार आहेत. तुम्ही चुकीच्या मार्गाला लागणार आहात. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

ग्रे कलरचा घुबड दिसणे : Grey Colourcha Ghubad Baghne

स्वप्नशास्त्रानुसार ग्रे कलरचा घुबड जर तुम्हाला स्वप्नात दिसलेला असेल तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे मानले जाते. ग्रे रंगाच्या घुबड हा माता लक्ष्मीला प्रिय असतो. या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला धनप्राप्ती योग आहेत तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. अनेक माध्यमांनी मार्गाने तुम्हाला पैसा उपलब्ध होणार आहे अगदी कमी वेळेत तुमचे प्रगती होणार आहे.

लाल रंगाचा घुबड दिसणे : Lal Rangacha Ghubad Pahne

स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नामध्ये लाल रंगाचा खूप बघितलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. लाल रंग म्हणजेच भडक, भयानक मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, कोणीतरी तुमच्यावर नकारात्मक शक्तींचा तोडगा करत आहे तुमच्यावर तंत्र मंत्र टोटके केले जात आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

निळ्या रंगाचा घुबड दिसणे : Nilya Rangacha Ghubad Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये निळ्या रंगाचा घुबड दिसलेला असेल, तर हे शुभ संदेश देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे पुढील जीवन हे अगदी शांतता मय सुख समृद्धीने भरलेले आहे. तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागणार नाही. तुमची आर्थिक संपत्ती ही चांगली राहणार आहे. तुमचे कार्य हे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

तर मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला घुबड दिसलेला असेल, तर घाबरून जाऊ नका. फक्त तुम्हाला घुबड हा नेमका कोणत्या स्वरूपात दिसलेला आहे, त्यावरून तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात,  हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे.

 मित्रांनो वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here