स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ

0
1143

 

नमस्कार मित्रांनो. झोपल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात. झोपल्यानंतर आपले मन हे नियंत्रित नसते. झोपेच्या दरम्यान मन हे इकडे तिकडे भटकत असते. त्यामुळे, अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात. खरंतर स्वप्न ही चार नंतर जास्तीत जास्त पडत असतात. सकाळची झोप ही साखर झोपते आणि या काळात जास्तीत जास्त प्रकारचे स्वप्न देखील आपल्याला पडत असतात. असे म्हटले जाते की, पहाटे बघितलेली स्वप्न ही खरी होत असतात. तर काही जणांना या गोष्टीचा अनुभवही आलेला आहे. काही स्वप्नही चांगली संकेत देणारी असते तर काही स्वप्नही वाईट संकेत देणारी देखील असू शकतात प्रत्येकाची स्वप्न ही विभिन्न प्रकारची असतात.मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका विशिष्ट स्वप्ना बद्दल माहिती देणार आहोत. स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत.

कामाला जाताना अथवा बाहेर कुठेतरी जाताना आपला अनेक भिकारी दिसून येत असतात मित्रांना भिकारी म्हणजेच काय की ज्या व्यक्तीची परिस्थिती ही अगदी गरिबीची आहे ज्या व्यक्तीला पैसा कमावण्यासाठी साधने नाही अथवा जी व्यक्ती ही अपंग आहे तर आणि रस्त्यावर जर ते पैसे मागत असतील, अथवा कपडे, खाण्यासाठी पदार्थ मागत असतील, तर अशा आपण व्यक्तींना भिकारी म्हणत असतो. जर दिवसभरामध्ये तुम्ही एखादा भिकारी बघितलेला असेल तर तुम्हालाही अशा प्रकारचे स्वप्न पडू शकते चला तर मग, स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात भिकारी दिसणे
स्वप्नात भिकारी दिसणे

स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ!

   काही जणांना स्वप्नात भिकारी दिसत असतो जसे की, स्वप्नात तुम्ही स्वतः भिकारी अवस्थेत दिसणे.स्वप्नात तुम्ही इतरांना भीक मागताना दिसणे, स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक भिकारी दिसणे, स्वप्नात तुम्ही भिकारीशी बोलताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ !

स्वप्नात भिकारी दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला भिकारी दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळणार आहे. तुम्ही जे काही काम केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही.

स्वप्नात तुम्हाला भिकारी भिक मागताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला भिकारी भीक मागताना तुम्हाला दिसलेला असेल, तर या स्वप्नाचा संकेत असा की, येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मदत करणार आहात. तुमच्या मित्रांना तुम्ही कामी येणार आहात. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते. इतरांना मदत करण्याचे, सहकार्याचे कार्य तुम्ही करणार आहात.

स्वप्नात तुम्ही भिकारी ला पाठ दाखवताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही भिकारी ला पाठ दाखवताना तुम्हाला दिसलेले असेल, जर भिकारी तुम्हाला भीक मागत असेल आणि तुम्ही जर देत नसेल त्याला पाठ दाखवत असाल तरअसे स्वप्न दिसले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्या कार्यामध्ये कोणतीतरी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक भिकारी दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक भिकारी दिसलेले असतील आणि तुम्हाला जर ते भीक मागत असतील, असे दिसलेले असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होणार आहात. गरजवंतांना मदत करणार आहात अनेकांना कामे देण्याची मदत करणार आहात. तुमच्याकडे मदत मागणाऱ्याला कधीही तुम्ही खाली हात जाऊ देणार नाहीत.

स्वप्नात तुम्हाला एकदा लहान मुलगा अथवा वृद्ध व्यक्ती भीक मागताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला एखादा लहान मुलगा अथवा एखादा वृद्ध व्यक्ती हा भीक मागताना दिसलेला असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे घेतलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होणार आहात. तुमची प्रगती होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. जर तुम्ही आजारी असेल आणि तेव्हा असे स्वप्न पडले असेल तर लवकरच तुम्ही आजार मुक्त होणार आहात.

वाचा  स्वप्नात पादुका दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही भिकारीशी बोलताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही भिकारी शी बोलताना तुम्हाला दिसले असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की,जर भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, तर येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या चुका सुधारणार आहात.

स्वप्नात तुम्ही स्वतः भीक मागताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही स्वतः भीक मागताना दिसलेले असेल, इतर लोक तुम्हाला कपडे, पैसे अथवा अन्न-पाणी देताना दिसलेले असतील तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात इतर लोक तुमच्या कार्याबद्दल तुमची प्रशंसा करणार आहेत. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव, नांदणार आहेत. समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे.

स्वप्नात तुम्ही भिकारी ला हकलताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही भिकारीला हकलताना दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही आलेल्या संधीचा फायदा न घेता त्या तिथेच सोडून देणार आहेत. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही भिकारी ला मारताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही भिकारी ला मारताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमची कार्य ही पूर्ण होत होता मध्येच थांबण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसाय मध्येच बंद पडण्याची शक्यता आहे.  

     मित्रांनो स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here