रांजणवाडी घरगुती उपाय

0
2673
रांजणवाडी घरगुती उपाय
रांजणवाडी घरगुती उपाय

नमस्कार, जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या डोळ्याच्या आजूबाजूला पुळी यायची, मी खूप घाबरायची, रडायची, कारण ती फार दुखायची. त्यावेळी मला आजी सांगायची की, घाबरू नकोस, ती रांजणवाडी असते. तिला खिरपुळी म्हणतात. मग त्यावेळी मला आजी सांगायची की, जा गपचूप कोणाचे तरी दाराची कडी वाजवून ये, दरवाज्याची कडी घासून डोळ्याला लावून ये, असे काहीही उपाय सांगायची, पण तसे करू नका, हे पूर्वीचे म्हणणे होते. आत्ताच्या हल्लीच्या धावपळीमध्ये तसेच, उष्णतेचा त्रास होऊन, धुळीची ऍलर्जी होऊन, अनेक लोकांना डोळ्यावर पुळी येते, तिला रांजणवाडी असे म्हणतात. रांजणवाडी ला घाबरण्यासारखे नसते, पण तिचे दुखणे इतके असते, की आपल्याला अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. डोळे लाल होतात. यासारख्या समस्या व्हायला लागतात. ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांना उन्हाळ्यामध्ये डोळ्याला रांजणवाडी येतात. अशावेळी तुम्ही डोळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आणि डोळ्याला रांजणवाडी आली की, ती फोडायला नको पाहिजेत.आज आपण बघणार आहोत, की डोळ्याला रांजणवाडी नेमक्या कोणत्या – कोणत्या कारणामुळे येते? तर चला बघुयात रांजणवाडी घरगुती उपाय.

चला तर मग जाणून घेऊयात, डोळ्याला रांजणवाडी आल्यास कोणती कारणे आहे, व त्यावर कोणते घरगुती उपाय करायला हवेत?

डोळ्याला रांजणवाडी कोणत्या कारणामुळे येते?

डोळ्याला रांजणवाडी अनेक कारणांमुळे येते, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात!

  1. ज्यांना अति उष्णतेचा त्रास आहे, त्यांना डोळ्याला रांजणवाडी येते.
  2. ज्यांना खाण्यात कसली ॲलर्जी झाली असेल, तर डोळ्याला रांजणवाडी येऊ शकते.
  3. ज्या लोकांना मानसिक ताण तणाव असतो, अशांनाही डोळ्यावर रांजणवाडी होते.
  4. तसेच ज्यांचे हार्मोन इनबॅलन्स असतात, अशांनाही होते.
  5. पुरेशी झोप न झाल्यामुळे ही रांजणवाडी येते.
  6. योग्यरीत्या आहार न घेतल्यास डोळ्यावर रांजणवाडी होऊ शकते
  7. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना डोळ्यावर रांजणवाडी येते
वाचा  पोटावर झोपणे.

डोळ्यावरील रांजणवाडी ची लक्षणे?

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला रांजणवाडी कोणत्या कारणांमुळे ते सांगायचे आहे आता आपण त्याचे काही लक्षणे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया

  1. ज्यावेळी डोळ्याला रांजणवाडी येते, अशावेळी डोळ्यांची आग होते.
  2. डोळे लालसर दिसतात, डोळ्यातून पाणी येते.
  3. रांजणवाडी डोळ्याच्या वरच्या किंवा खालच्या भागावर येऊ शकते, आणि ती लालसर दिसते.
  4. डोळ्यांच्या बाजूला दुखते,
  5. डोळ्याच्या ज्या भागाला रांजणवडी येते, त्या भागाची पापणी सुजते.
  6. डोळ्यांचे आजूबाजूला खाज येते,
  7. पापणी हलवताना वेदना होतात,
  8. खाली वाकल्यावर डोळ्यांना त्रास होतो. जड पापण्या जड असल्यासारख्या वाटतात.
  9. तसेच डोळ्यावर रांजणवाडी ही पाच ते सहा दिवस असू शकते.

रांजणवाडी आल्यास घरगुती उपाययोजना

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला डोळ्यावर रांजणवाडी कोणत्या कारणांमुळे येते, तसेच तिची लक्षणे सांगितलेले आहेत.आज आपण डोळ्याला रांजणवाडी आल्यास, कोणते घरगुती उपाय करायला हवेत, ते जाणून घेऊयात.

गरम पाण्याने शेक द्या

डोळ्यांच्या बाजूला ज्यावेळी रांजणवाडी होते त्यावेळी डोळ्यांची अक्षरशः आग होते डोळे सुजतात, डोळ्याची पापणी जड होते अशा वेळी जर तुम्ही, गरम पाण्याने डोळ्यावर शेकल्यास, तुमच्या डोळ्यांची आग होणे, शिवाय या ठिकाणी सूज आली असेल, तर ती जाण्यास मदत मिळते.

लसुन चा वापर करून बघा

लसूण मध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात. जे तुमची फंगल इन्फेक्शन वर गुणकारी असतात. जर तुमच्या डोळ्याला खीरपुळी म्हणजेच रांजणवडी असेल, अशावेळी जर तुम्ही लसणाचा रस रांजणवाडी असेल, त्या जागेवर किंचित लावला, तर तुम्हाला ताबडतोब फरक पडेल. पण ज्यावेळी तुम्ही लसणाचा रस लावणार, त्यावेळी त्या जागेची खूप आग होते, पण ते गुणकारी आहेत.

कोरफड चा रस लावून बघा

कोरफड चा वापर हा पूर्वीच्या काळापासून केला जात आहे. जर तुमच्या अंगावर चेहऱ्यावर कुठेही फंगल इन्फेक्शन वगैरे असेल, अशावेळी जर तुम्ही कोरफडीचा वापर केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरेल. तर तुमच्या डोळ्यावर रांजणवाडी असेल, अशावेळी तुम्ही कोरफडचा जेल डोळ्याच्या वरच्या भागाला लावा, संभाळून डोळ्यात न जाता लावावा. त्याने तुमचे रांजणवाडी वरील दाह कमी होऊन, होऊन जाण्यात मदत मिळेल.

वाचा  पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

धन्याच्या पाण्याचा वापर करा

धणे हे थंड असते, ज्या वेळी तुमच्या डोळ्याला रांजणवाडी असते, अशावेळी तुम्ही जर धने पावडर करून ते पाण्यात टाकून, त्या पाण्याने डोळे धुतल्यास, तुमच्या डोळ्याची व पापण्यांची आग होणे कमी होईल. शिवाय ती सूज कमी होऊन, रांजणवाडी लवकर जाण्यास मदत मिळेल.

हळदीचा वापर करून बघा

हळदी अंटीबॅक्टरियल, अंटीसेप्टीक गुणधर्मांनी असते. हळदीचा वापर हा अनेक इन्फेक्शन वर केला जातो. जर तुमच्या डोळ्याच्या पापण्यांच्या वर किंवा खाली रांजणवडी असेल, अशावेळी जर तुम्ही हळद कोमट पाण्यात मिक्स करून, किंचित कोमट- कोमट डोळ्यावर व पापणीवर रांजणवाडी असलेल्या, ठिकाणी लावावे. डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. याने तुमची रांजणवडी ची व दाह कमी होऊन, तेथील सूजन कमी होऊन, इन्फेक्शन कमी होण्यास मदत मिळते.

डोळ्यावर रांजणवाडी आल्यास काय काळजी घ्यावी?

आज आपण जाणून घेणार आहोत, की तुमच्या डोळ्याच्या पापणीवर रांजणवाडी आल्यास, तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग जाणून घेऊयात! डोळ्यावर रांजणवाडी आल्यास, तेव्हा सारखा हात लावू नका.

  1. डोळ्याची रांजणवाडी फोडायचा प्रयत्न करू नका. कारण त्यातील पस, पु निघून इन्फेक्शन अजून वाढण्याची शक्यता असते.
  2. रांजणवाडी आल्यास डोळे नेहमी स्वच्छ ठेवावेत. बाहेरील वातावरणात जाऊ नका. आणि शक्यतो जावे लागले, तर डोळ्याला गॉगल लावावा.
  3. आंघोळ करताना कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी. जेणेकरून डोळ्यातील इन्फेक्शन वर कडू लिंबाचा रस लागून, ऑंटीसेप्टीक गुणधर्म त्याला मिळतील.
  4. जागरण करणे शक्यतो टाळावे.
  5. रांजणवाडी वर खाज आल्यास खाजू नये.
  6. धुळीच्या वातावरणात, तसेच केमिकलयुक्त वातावरणात जाणे टाळावेत.

जाणून घ्या : डोक्यात फोंड व गाठ येणे करणे व उपाय

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला डोळ्याच्या, पापणीवर रांजणवाडी नेमकी कोणत्या कारणांनी, तसेच त्याची लक्षणे व त्यावर काही घरगुती उपाय दिले आहेत. तसेच आम्ही डोळ्याच्या पापणीवर रांजणवाडी आल्यास कोणती काळजी घ्यावी, हेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपचार करून, जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात. तसे आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. अजून माहिती साठी येथे पाहू शकता.

वाचा  पोटातील आतडे दुखणे या समस्येवर विविध घरगुती उपाय

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here