पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय काय आहे

0
1469
पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय
पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय

  पोटावर खाज येणे                 

नमस्कार मित्रांनो. आपण काम करत असतो त्यामुळे थकवा तसेच घाम देखील येत असतो. तसेच अति उष्णतेमुळे देखील घाम येत असतो. तर बऱ्याच जणांना शरीरात वाढलेल्या हिट मुळे देखील घाम येत असतो. घाम आल्यामुळे बऱ्याच जणांना कसले ना कसले ऍलर्जी होत असते. अतिशय काम केल्याने तसेच कष्टाचे काम करणे घाम येणे हे तर स्वाभाविकच आहे. परंतु घाम आल्यामुळे ऍलर्जी येऊ शकते तसेच बऱ्याच जणांना घाम आल्यामुळे खाज देखील निर्माण होत असते. तर काहींना घाम आल्यामुळे पोटावर देखील खाज येत असते. तसेच गरोदर स्त्रियांना देखील पोटावर खाज येत असते. म्हणजेच गर्भावस्थे दरम्यान अनेक महिलांना पोटावर खाज येण्याची समस्या उद्भवत असते. गर्भावस्थेत दरम्यान पोटावर येणारी खाज ही सामान्य मानली जाते. परंतु ती फार मोठ्या प्रमाणात होत असते. ते बऱ्याच वेळा ती असहनीय समस्या बनते. पोटावर खाज येणे ही समस्या गर्भावस्थेच्या दरम्यान पूर्ण मुळतः जाऊ तर शकत नाही. परंतु काही गोष्टींची काळजी घेतली अथवा काही साधे सोपे घरगुती उपाय करून बघितले तर ही समस्या नक्कीच कमी होऊ शकते. तर मित्रांनो आज आपण पोटावर खाज येणे या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पोटावर खाज येणे याबद्दल खालीलप्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पोटावर खाज येण्याची कारणे कोणते असू शकतात?

      मित्रांनो अधिक काम केल्यामुळे, तसेच कष्टाचे काम केल्यामुळे घाम येणे हे स्वाभाविकच आहे. परंतु घाम आल्यामुळे देखील ऍलर्जी येऊ शकते परिणामी खाज येणे ही समस्या देखील उद्भवू शकते. तसेच बऱ्याच महिलांना गर्भावस्थे दरम्यान पोटावर खाज येण्याची समस्या उद्भवत असते. तर या दरम्यान पोटावर खाज येण्याची नेमकी कारणे कोणती याविषयी आपला जाणून घेणे गरजेचे आहे.

वाचा  कानातून आवाज येणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

         गर्भावस्थेत दरम्यान पोटाला खाज येते कारण पोटामधील बाळाची पूर्ण वाढ व्हावी यासाठी म्हणजेच पुरेशी जागा मिळण्यासाठी पोटावरील त्वचाही खेचले जात असते. त्यामुळे पोटावरची त्वचा ही खेचल्या मुळे पोटावर खाज सुटू लागते. तसेच पोटावरील त्वचा ही जास्तीत जास्त घेतली जात असते त्यामुळे त्या त्वचेतील जो ओलावा असतो तो नाहीसा होत जातो. परिणामी पोटावरील त्वचाही कोरडी पडत जाते . आणि पोटावरील तोच आहे कोरडे पडत गेल्यामुळे कालांतराने खूप खास सुटायला लागते. आणि खाज असहनीय असते. तसेच हार्मोन बदल झाल्यामुळे देखील अजून खाजवण्याची शक्यता असते. परंतु ही गर्भवती स्त्रियांनी बद्दल सामान्य समस्या मानली जाते आणि यामुळे कुठलाही त्रास होण्याची शक्यता नसते. म्हणजेच जास्त घाबरण्याचे कारण देखील नसते. यादरम्यान पोटावरील खाज येण्यापासून थांबवता येत नाही परंतु ही खाज जास्त येऊ नये यासाठी काही उपचार घरगुती उपचार करता येऊ शकतात. ते कोणतेही आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

पोटावरील खाज ही कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील?

        मित्रांनो, अनेक स्त्रियांना गर्भावस्थेत दरम्यान पोटावर खाज येण्याची शक्यता असते किंवा पोटावर खाज येत असते. बाळाची वाढ होण्यासाठी पोटावरील त्वचा ही ताणली जात असते, त्यामुळे पोटावर खाज येण्याची समस्या उद्भवते. येणारे खास नाईस इतर करता येत नाही परंतु ती थोडा फार कमी प्रमाणात व्हावी यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात, आणि ते कोणते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. गर्भावस्थेत दरम्यान पोटावर खाज येत असते त्यासाठी, तुम्ही ओटमील त्या पाण्याने अंघोळ करू शकतात. ओटमील च्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आंघोळीचे पाणी गरम करून कोमट करून घ्या आणि त्यामध्ये अर्धा किंवा एक कप ओटमील टाकून मिक्स करा. आणि या ओटमिल मिश्रित पाण्याने अंघोळ करा. या ओटमिल मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या पोटावरची खाज जाण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच पोट मिलते पाणी हे त्वचे संदर्भात एक रामबाण उपाय म्हणून देखील वापरला जात असते.
  2. पोटावरची खास जाण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल देखील वापरू शकतात. यासाठी तुम्ही नारळाचे तेल यामध्ये थोडे एप्पल साइडर व्हीनेगर मिक्स करून घ्यावे. आणि पोटावर च्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी हळुवारपणे लावून घ्यावे. तसेच त्याचा एक नैसर्गिक बॉडीलोशन म्हणून देखील वापर करता येत असतो. हे तेल तुम्ही पोटाला आल्यामुळे नक्कीच मला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच तेथील त्वचा देखील मुलायम होण्यास मदत होऊ शकते.
  3. तसेच पोटावरील खाज जाण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या कोमट पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाकून त्याने आंघोळ करा.असे केल्यामुळे लगेच फरक जाणवून येईल. तसेच तुम्ही कोमट पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये देखील टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात तसेच त्यामुळे होणारी जळजळ देखील कमी होऊ शकते.
  4.  कोरफड ही सर्व त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून उपयोगात येत असते. पोटावर खाज येत असेल तर तुम्ही कोरफडीचा रसाचा देखील वापर करू शकतात आंघोळ झाल्यानंतर तुम्ही पोटावर ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा रस हळुवारपणे लावा व त्याची थोडी हळुवारपणे मालिश करावी. असे केल्यामुळे पोटावरील होणारी जळजळ कमी प्रमाणात होऊ शकते तसेच एक प्रकारे थंडावा देखील मिळत असतो. तसेच त्या ठिकाणची त्वचा ही मऊ आणि मुलायम देखील होऊ शकते.
  5. गर्भावस्थेत दरम्यान पोटावर खाज येणे ही समस्या अगदी मुळासकट जाऊ शकत नाही परंतु ती कमी करता येऊ शकते त्यासाठी काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी असते जसे की आंघोळ करताना एकदम गरम पाण्याचा वापर करता अगदी कोमट पाण्याचा वापर करून आंघोळ करावी.
  6. तसेच एकदम घट्ट कपडे घालू नयेत तर सुती व स्वच्छ कपडे घालावे. ओले कपडे अजिबात घालू नये कारण याने पोटावरील खाज अजून जास्त प्रमाणात वाढू शकते.
  7. जास्त एसीचा वापर शक्यतो टाळावा कारण की एसीमध्ये त्वचाही कोरडी पडत असते आणि त्यामुळे खाज पाण्याची अजुन जास्त दाट शक्यता असते.
  8. तसेच पोटावरील खाज जाण्यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या पाण्याचा वापर देखील करू शकतात त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने चांगली उकळून घ्यावीत व ते पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने अंघोळ करावी, असे केल्याने देखील फायदा होऊ शकतो.
  9. तसेच उन्हामध्ये देखील जास्त जाणे शक्यतो टाळावे कारण उन्हामध्ये त्वचाही कोरडी पडत असते आणि त्वचा कोरडी पडल्यामुळे देखील पोटावर खाज येण्याची जास्त समस्या उद्भवू शकते.
  10. त्याचप्रमाणे त्वचा ही कोरडी होणे यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे त्यामुळे त्वचा डीहायड्रेट होण्यापासून बचाव होतो.
वाचा  कांद्याची पात याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे

वरील प्रमाणे, सर्व प्रकारची काळजी घेतल्यामुळे पोटावरील खाज कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला देखील पोटावर अधिक जास्त प्रमाणात खाजवत असेल तर हे वरील प्रमाणे उपाय करून बघू शकतात आणि याने देखील फरक पडत नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा.

         मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here