उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

0
1085
उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय
उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो. प्रत्येक जण हे आपली तुलना इतर कोणाशी ना कुणाशी करत असते. जसे की आपली त्वचा देखील  इतरांप्रमाणे छान राहिली असती तर ? किंवा आपले ही कपडे इतरांप्रमाणे सुंदर असावे, तसेच आपली उंची देखील इतर इतरांप्रमाणे उंच असली असती तर ? म्हणजे प्रत्येक जण एकमेकांशी तुलना करत असतात. आणि उंचीच्या बाबतीत तर प्रत्येकालाच वाटत असते की आपण देखील उंच असावे. पुरुष असो अथवा स्त्री असो दोघांनाही उंची छान असेल तर शोभून दिसतात. कारण शरीराची योग्य उंची सौंदर्यात अजून भर पडत असते. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटत असते की, आपणही उंच असावेत व उंची वाढवण्यासाठी असंख्य प्रयत्न चालू असतात.

परंतु, बरेच जण हे उंच असतात. तर काहींची उंची ही खूप कमी प्रमाणात असते, तर काही मध्यम वर्गीय असतात. म्हणजेच प्रत्येकाची उंची ही समान नसते शारीरिकदृष्ट्या प्रत्येकाची वेगळी वेगळी उंची असते. म्हणून ज्या व्यक्तींची उंची ही कमी असते,ते या समस्येने ग्रस्त झालेले असतात. उंची बद्दल अनेक कारणे असू शकतात. म्हणजेच उंची कमी असण्याची कारणे कोणती असू शकतात ? याविषयी जाणून घ्यायला हवे तसेच उंची वाढवण्यासाठी आपण कोणते प्रकारचे  घरगुती उपाय करू शकतो ? याविषयी जाणून घेणे देखील आपला आवश्यक आहे.

तर मित्रांनो, आज आपण उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग उंची वाढण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उंची कमी असण्याचे कारण नेमके कोणते असू शकतात ?

      मित्रांनो, प्रत्येक जणांना असे वाटत असते की, आपणही सुंदर असावेत, आपली उंची देखील इतरांप्रमाणे उंच असावी. परंतु प्रत्येक व्यक्तीची उंची ही सर्व समान नसते. कुणाची उंची कमी असते तर कोणाची उंची मध्यम ते कोणी एकदमच उंच असतं. तर उंची कमी असण्याचे नेमकी कारणे कोणती असू शकतात याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • शरीराच्या कमी हालचाल केल्यामुळे उंची वाढण्यास अडथळे येत असतात.
  • उंची कमी असणे यासाठी कारणीभूत एक कारण म्हणजे अनुवंशिकता असू शकते. म्हणजेच घरातील एखादी व्यक्ती म्हणजेच आई-वडील किंवा आजी-आजोबा जर कमी उंचीचे असतील, तर त्यांची पुढची पिढी देखील कमी उंचीची निघू शकते. म्हणजेच पुढच्या पिढीवर कमी उंचीचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
  • नियमित योगासनांचा सराव न केल्यामुळे देखील उंची कमी असण्याचे एक कारण असू शकते. म्हणजेच उंची वाढण्यासाठी शारीरिक हालचाल करणे खूप आवश्यक  असते.
  • लहान वयापासून उंची वाढत असते. अगदी लहान वयापासून जर शारीरिक हालचाली कमी केल्यामुळे देखील उंची जास्त प्रमाणात वाढू शकत नाही.
  • तसेच नेहमीच्या आहारामध्ये पौष्टिक घटकांची तसेच पौष्टिक तत्वांची कमतरता असल्यामुळे, उंची कमी वाढण्यास कारणीभूत ठरतात.
  • उंची कमी वाढण्यासाठी मानसिक अस्वस्थता हे देखील एक कारण कारणीभूत ठरत असते. कारण मानसिक अस्वस्थता याचा परिणाम हा शरीरावर होत असतो.
  • त्याचप्रमाणे अगदी लहान वयापासून जर एखादे रोगाने ग्रस्त असल्यामुळे देखील उंची वाढण्यास अडथळा निर्माण होत असतो.
वाचा  वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

मित्रांनो, वरील प्रकारची सर्व कारणे ही उंची कमी वाढण्याची असू शकतात. तसेच उंची वाढण्यासाठी नेमके आपण कोणते उपाय करू शकतो? तसेच कोणते घरगुती उपाय करू शकतो? कुठली योगासने करू शकतो?हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

उंची वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो ?

      मित्रांनो, अनेक लोकांची उंची ही कमी प्रमाणात असलेली दिसून येते. उंची कमी असणे या समस्येला अनेक जण त्रस्त झालेले दिसून येतात. तर उंची वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. मित्रांनो, उंची वाढवण्यासाठी आपण शरीराला पुरेपूर विश्रांती देणे आवश्यक असते. म्हणजेच आवश्यक झोप घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण झोपेचा प्रभाव हा आपल्या उंची वाढण्यावर होत असतो. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा शरीराची वाढ ही जलद गतीने होत असते. झोपेत दरम्यान शरीरामध्ये अनेक नवीन जीव तयार होत असतात आणि यांचा प्रभाव आपल्या उंची वाढण्यावर दिसून येत असतो. म्हणून मित्रांनो नियमित आठ ते दहा तास झोप घेणे तुम्ही आवश्यक आहे कारण याचा प्रभाव हा उंची वाढण्यावर पडू शकतो.
  2. रोजच्या तसेच नेहमीच्या आहारात तुम्ही योग्य त्या पोषक तत्वांचा पोषक घटकांचा समावेश आवर्जून करावा. कारण आहारातून जे पोषकतत्वे पोषक घटक मिळतात ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यासाठी तुम्ही नेहमीच या आहारामध्ये दुधाचे सेवन अत्यंत करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा तसेच मांसाहारी पदार्थांचा समावेश जरूर करावा.
  3. तसेच नेहमीच्या आहार मध्ये मटन, अंडी, सोयाबीन युक्त पदार्थ आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश आवर्जून करावा यामुळे तुमची उंची वाढण्यासाठी मदत होऊ शकते.
  4. उंची वाढण्यासाठी दूध हे अत्यंत उपयोगी ठरू शकते. त्यासाठी तुम्ही एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन थेंब शिलाजीत टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि ते व्यवस्थित मिक्स यानंतर त्या दुधाचे सेवन करावे हा उपाय तुम्ही महिनाभर करून बघू शकता त्याने नक्कीच तुम्हाला उंची वाढणे मध्ये फरक जाणून येईल. 
  5. मित्रांनो उंची वाढवण्यासाठी तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचा देखील उपयोग करू शकतात. हा उपाय कसा करावा तर त्यासाठी हरभऱ्याची काळी डाळ पाण्यामध्ये भिजवून रात्रभर ठेवावी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या हरभऱ्याच्या डाळीची जी काळी साल आहे तिचे तुम्ही सेवन करावे असे तुम्ही महिनाभर केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्यातून तुम्हाला प्रोटिन्स मिळू शकतात, जे उंची वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.
वाचा  कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही साधे सोपे घरगुती उपाय करून बघा याने नक्कीच तुम्हाला तुमची उंची वाढण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासने देखील करावीत. योगासने केल्या मुळे देखील उंची वाढण्यासाठी मदत होऊ शकते. तर उंची वाढण्यासाठी नाही नेमकी कोणती योगासने करावीत या विषयावर खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उंची वाढवण्यासाठी कोणती योगासने करावीत ?

मित्रांनो, तुमची देखील उंची वाढावी यासाठी तुम्ही नियमित काही योगासनांचा सराव करणे आवश्यक ठरते. तर उंची वाढवण्यासाठी तुम्ही कोणती योगासने करू शकतात, हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. उंची वाढण्यासाठी तुम्ही भुजंगासन या आसनांचा नियमित सराव केला पाहिजे हे असं केल्यामुळे तुमची योग्य प्रमाणात उंची वाढू शकणार मदत होऊ शकते. भुजंगासन हे योगासनं केल्यामुळे उंची वाढण्या सोबत कंबर देखील बारीक होण्यास मदत होत असते म्हणून भुजंगासन हे योगासन तुम्ही नियमित करावे.
  2. मित्रांनो, उंची वाढण्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार या योगासनाचा नियमित सराव केला पाहिजे. सूर्यनमस्कार करताना एक प्रकारे संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. सूर्यनमस्कार करताना संपूर्ण शरीराची स्नायूंची हालचाल होत असते. शरीराची प्रत्येक अवयवांची हालचाल योग्य रीतीने होत असते त्यामुळे उंची वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार हा व्यायाम अगदी प्रभावी ठरू शकतो तसेच ज्यांना उंची वाढवायची असेल त्यांनी  सूर्यनमस्कार करण्याची क्रिया ही कमीत कमी दहा ते अकरा वेळेस तरी करावी याने नक्की फायदा होऊ शकतो.
  3. ताडासन हे योगासन देखील तुम्ही उंची वाढवण्यासाठी नियमित करू शकतात. ताडासन हे योगासन करताना दोन्ही हातांचा आणि दोन्ही पायांचा योग्य प्रमाणे व्यायाम होत असतो त्यामुळे उंची वाढण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.
  4. उंची वाढवण्यासाठी तुम्ही पश्चिमोत्तासन हे असं देखील नियमित करू शकतात. पश्चिमोत्तासन हे असं केल्यामुळे पायाचे पाठीचे आणि पोटाचे स्नायू ताणले जात असतात. त्यामुळे पश्चिमोत्तासन हे योगासन देखील उंची वाढवण्यासाठी आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे पश्चिमोत्तासन केल्यामुळे पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होऊ शकते.
वाचा  वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन कसे असावे

मित्रांनो, वरील प्रकारच्या योगासनांचा तुम्ही नियमित सराव केल्यामुळे तुमची उंची वाढण्यासाठी योग्य ती मदत होऊ शकते. तर वरील प्रमाणे योगासनांचा तुम्ही नियमित सराव करू शकतात.

        मित्रांनो, वरील प्रमाणे उंची वाढवण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो ? तसेच उंची वाढवण्यासाठी कोणते योगासने नियमित केली पाहिजेत ? उंची वाढावी यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत ? त्याचप्रमाणे आहारात कोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे ? याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

      

           धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here