नमस्कार, अनेक लोकांना असा होते की, कोणाचा फोन येतो आणि मनात एकदम भीती वाटते, की काय असेल? कशाबद्दल असेल? त्यामध्ये काय वाईट बातमी तर नाही ना ? असा विचार करून करून मनात धडकी भरते, तसेच छातीत धडधड होते. तसेच काही लोकांना कुठे बाहेर जायचे आहे, अशा वेळी घाई – घाई मध्ये ही त्यांच्या छातीत धडकी भरते. तसेच कोणाकोणाला, रात्री झोपताना जीव घाबरतो, असे वाटते की, त्यांना कोणी कोंडून ठेवले. दाबून ठेवले. तसेच विद्यार्थ्यांचाही परीक्षेला जाताना छातीत धडकी भरते, अजून कॉलेजला किंवा कोणत्याही इंटरव्यूला जाताना, ही अनेक जातानांही हाच प्रकार समोर येतो, या गोष्टी कोणत्या कारणामुळे होत असतील, याचे आपल्याला माहित नसते. आज आपण जाणून घेणार आहोत, छातीत धडधडणे म्हणजे नेमके काय? कोणत्या कारणांमुळे छातीत धडधड होते? आणि त्यावर आपण काही उपाय करू शकतो का ? चला तर मग जाणून घेऊयात.
Table of Contents
छातीत धडकी का भरते ?
बऱ्याच वेळेला मनात जर तुम्ही एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, आणि तुम्ही मनात या गोष्टीचे घर करून ठेवले असेल, अशावेळी तो विचार करून – करून, तशाच जर घटना घडायला लागल्या, तर मनात एक धडकी भरते. त्यामुळे छातीत धडधड होणे, जीव घाबरणे, कोंडल्यासारखे वाटणे, यासारख्या समस्या आपल्याला व्हायला लागतात.
खासकरून स्त्रियांना हा त्रास जास्ती संभवतो, कारण त्यांच्या मनात सतत विचारांचे घोळ फिरत असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचे कामांमध्ये व विचारांमध्ये त्यांचा दिवस जातो, ऑफिसला जाणाऱ्या बायका असतील, तर कसे होईल? हे काम पटकन आवरून, ऑफिसला केव्हा निघेल, बस भेटेल की नाही, आणि भेटली तर पोहोचेल की नाही, परत ऑफिस झाल्यावर घरी लवकर पोहोचेल का, परत जाऊन स्वयंपाक करायचाय, ह्या भीती त्यांच्या मनात राहतात.
तसेच, हाऊस वाइफचे ही तसेच असते. घरी राहिल्यावर नवऱ्याला ऑफिसला जाई पर्यंत, मुलांना शाळेत गेल्या पर्यंत, ते घरी येईपर्यंत, तिच्या मनात विचार असतात, की जेवले की नाही, घरी अजून आले नाही, किती वेळ झाला, आज काय भाजी करू यासारखे चिंता व भीती त्यांच्या मनात राहतात. त्यांच्यामुळे त्यांना छातीत धडधडणे, जीव घाबरल्यासारखे समस्या होऊ शकतात.
तसेच विद्यार्थ्यांचेही तसेच असते, ते परीक्षेचे इतके टेन्शन घेतात, की परीक्षेला जाण्याआधी त्यांच्या मनात एक भीती असते, की पेपर कसा जाईल. मी पास तर होईल ना? यालाच म्हणतात, छातीत धडकी भरणे.
तसेच जर तुम्ही कोणत्या उंच ठिकाणी जात आहेत, व त्या ठिकाणी जायला, तुमच्या मनात एक भीती वाटत असेल, वर जातानाही तुमचा जीव घाबरतो. की मी जाऊ शकेल की नाही? यालाच म्हणतात, छातीत धडकी भरणे. याचा अर्थ आहे की,
भय, चिंता, भीती, जीव घाबरणे कोंडल्यासारखे वाटणे, ही कारणे आहेत. त्यालाच पॅनिक अटॅक असे म्हणतात. तसेच कोणाला जिना उतरताना, चढताना, त्यांचा जीव घाबरतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या सोबत कोणालाही ठेवावे. एकटे जाऊ नये.
छातीत धडकी भरते त्यावेळची लक्षणे ?
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला छातीत कोणत्या कारणामुळे धडकी भरते. ते सांगितले आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत, की छातीत धडकी भरल्यास, तुम्हाला कोण कोणते लक्षणे होऊ शकतात.
- तुमच्या छातीत जोरात धडधडते,
- श्वासोच्छ् श्वास जोरात चालू होतो, किंवा कोणाकोणाला श्वास घ्यायलाही त्रास होतो.
- तुम्हाला थंड घाम येतो,
- तुमचा जीव घाबरतो, कोंडल्या सारखे वाटते.
- कधी कधी कोणाला छातीत धडकी भरल्यावर, जुलाब ही चालू होतात.
- तसेच अस्वस्थ असल्यासारखे वाटते.
- असे वाटते की कुठेतरी मोकळ्या हवेत, बागेत, किंवा शांत ठिकाणी जाऊन बसावे.
- तसेच काही लोकांचे तोंड कोरडे पडते.
- भीती वाट, ते
- छातीत धडकी भरल्याने, काही लोकांना छातीत कळा यायला लागल्या, छाती दुखायला लागली, तर त्यामुळे काही जणांना, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
छातीत धडधड कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत ?
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की छातीत धडधडणे, याची कारणे, व लक्षणे, आता आपण जाणून घेणार आहोत, की जर तुमच्या छातीत धडधड होत असेल, तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात, चला तर मग जाणून घेऊयात !
विटामिन सी युक्त प्या, किंवा गोळी खा :
बरेच वेळा असे होते की, आपल्याला कोणतीही गोष्ट ऐकल्यावर मनात एक भीती घुसते, छातीत धडधडते, छातीत धडधडणे म्हणजे चिंता करणे होय. तुम्हाला असे वाटत असेल, की तुम्हाला छातीत धडधडते, जिव घाबरतोय, अशावेळी तुम्ही विटामिन सी युक्त पेय प्यावे. म्हणजेच कोणते?
तर लिंबू सरबत, मोसंबीचा ज्युस, संत्री चा ज्युस, पायनॅपल चा ज्यूस, उसचा रस, यासारखे पेयजल तुम्ही पिऊ शकतात. तसेच तुम्हाला घाबरल्यासारखे वाटत असेल, अशा वेळी लिमलेटच्या गोळ्या खावे, हल्ली मार्केटमध्ये कुठेही मिळतात. त्या तोंडात चघळत रहाव्यात. त्यामुळे एनर्जी मिळेल, व तुमचे त्यात लक्ष जाऊनया भीतीतून मुक्तता मिळेल.
पाणी पीत राहावे :
सतत मनात विचार करून, छातीत धडधडणे, यासारख्या घटना होतात. अशा वेळी तोंड कोरडे पडते, अशावेळी तुम्ही पाणी पीत राहावे. तुम्ही घोट – घोट पाणी पिल्याने, ही तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
मेडिटेशन करा :
कसलेही विचार मनात केल्यामुळे, मनात भीती घुसते, अश्यावेळी तुम्ही दिवसभरातून एकदा, सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, पंधरा ते वीस मिनिटे मेडिटेशन करायला हवेत. तसेच आता टीव्ही, मोबाईल, युट्युब वर ही मेडिटेशनच्या पद्धती असतात. ते लावून तुम्ही 15 ते 20 मिनिटे मेडीटेशन केल्याने, तुमच्या मनातील भीती ही हळूहळू निघत जाईल, व तुमचे मन एकदम साफ राहील.
व्यायाम करा :
जर तुम्ही रोजच्या रोज स्वतःसाठी अर्धा तास दिला, आणि व्यायाम केलेत, तर तुमच्या मनात जे काही घोळ चालू असतात, ते बाहेर निघण्यास मदत मिळते. रोजच्या रोज तुम्ही सूर्यनमस्कार करा. तसेच ओम चा उच्चारण करा, कपालभारती करा, भद्रासन करा, या व्यायामाने मनात भीती चालू असतात, त्या बाहेर निघण्यास मदत मिळते. व तुमचे शरीर व आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तसेच व्यायाम केल्याने, तुमच्या श्वासच श्वास क्रियाही सुधारतात. त्यामुळे जीव घाबरणे, यासारख्या समस्या व ही तुम्हाला आराम मिळेल.
मोकळ्या हवेत फिरायला जा :
अनेक जणांना जीव घाबरतो, कोंडल्यासारखे वाटते, गुदमरल्यासारखे वाटते, दुसऱ्या काही लोकांनी आपल्याला पकडून ठेवले असे वाटते, अशा वेळी त्या व्यक्तींना तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला घेऊन जावे. यामुळे त्यांच्या मनातील भीती ही हळू कमी होईल, आणि छातीत धडधडणे ही कमी होईल.
मधुर संगीत ऐका :
हो, आता तुम्ही म्हणाल, इथे माझा जीव घाबरतोय, भीती वाटते आहे, आणि हे कुठे मला मधुर संगीत ऐकायला लावत आहे, तर नाही खरचं! मधुर संगीत ऐकल्याने मनातील भीती ही बाहेर निघते, आणि आपले मन त्या गाण्यांमध्ये वाढते, तसेच मधुर संगीत ऐकल्याने तुमचे शरीर ही त्या गाण्याच्या मध्ये राहते. तसेच तुम्ही एखादे भक्तीगीत किंवा एखाद्या नामाचे जप ऐकल्याने, तुमचे मन त्या मध्ये गुंतून, तुमच्या मनातील भीती सारख्या समस्या वर तुम्ही त्वरित दूर करू शकतात.
डॉक्टरांकडे केव्हा जावे ?
बहुतेक वेळा मनात एक भीती राहते, मनात या गोष्टीविषयी घर करून राहते, त्यालाच पॅनिक अटॅक असे म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमचा जीव फार घाबरतोय, तुम्हाला अस्वस्थ वाटते, तसेच तुम्हाला मळमळल्यासारखे ही वाटते, छातीत कळा येतात, तर त्या गोष्टी हृदयविकाराच्या ही असू शकतात, अशा वेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे, आणि त्यावर उपचार करून घ्यावे.
चला, तर मग मित्रमंडळींनो, आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की छातीत धडकी भरणे, म्हणजे काय, छातीत धडधड का करते, कोणत्या कारणांमुळे करते, त्याची काही लक्षणे, व त्यावर काही उपाय, आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !