गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी

0
869
 गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी
 गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी

गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी

नमस्कार मित्रांनो. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची म्हणजेच येणाऱ्या बाळाची चाहूल लागलेली असते. म्हणून गर्भवती महिलेची म्हणजेच येणाऱ्या बाळाच्या आईची सर्वजण खूप काळजी घेत असतात. गर्भवती महिलेची, तसेच तिच्या नेहमीच्या आहाराची तिला काय हवं काय नाही याची सर्व प्रकारे काळजी घेतली जात असते.  त्याचप्रमाणे, तिच्या आरोग्याबद्दल देखील काळजी घेतली जात असते. गरोदरपणामध्ये तिने काय करायला हवे? काय करू नये? तसेच कुठल्या प्रकारचे व्यायाम करावे याबद्दल देखील बरेच जागृत असणारे लोक खूप काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे गरोदरपणात प्रवास करावयाचा की नाही याबद्दल देखील काळजी करायला हवी. बऱ्याच गर्भवती महिलांना हा प्रश्न पडत असतो की गरोदरपणामध्ये प्रवास करावा? की करू नये? तसेच गरोदरपणामध्ये प्रवास करणे योग्य ठरेल का? असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात. प्रेग्नेंसी हा कोणत्याही स्त्रीचा आनंदाचा क्षण असतो. म्हणजेच गरोदरपणामध्ये आईच्या पोटात बाळाची वाढ होत असते त्यामुळे अशावेळी आपण प्रवास करणे योग्य ठरते की नाही याबद्दल अनेक प्रश्न गर्भवती महिलेला सतावत असतात. गर्भावस्थेत दरम्यान आपण प्रवास करणे आपल्या बाळाला इजा तर काही होणार नाही ना? असे देखील प्रश्न पडत असतात. बऱ्याच वेळा कुठल्या न कुठल्या कामानिमित्त बाहेर पडावेच लागत असते आणि अशा वेळी गर्भवती महिलेला बाहेर प्रवास करण्यासाठी खूप काळजी घेणे आवश्यक ठरते. तर गर्भवस्थेत दरम्यान प्रवास करताना कुठल्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे, हे देखील जाणून घेणे गरजेचे असते. तर मित्रांनो आज आपण गरोदरपणामध्ये प्रवास करताना घ्यावयाची काळजी या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो गरोदरपणामध्ये प्रवास करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

गरोदरपणामध्ये प्रवास करावा की नाही?

   आई होणे हा स्त्रीच्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे आपलं बाळ सुरक्षित राहावं आपण आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी गरोदरपणामध्ये घेतली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि अशावेळी जर अर्जंट कुठे जावे लागत असेल किंवा कामानिमित्ताने बाहेर जावे लागत असेल तर आपण गरोदर असताना प्रवास करावा की नाही? गरोदर असताना आपण प्रवास करणे योग्य आहे का? हा प्रश्न बरेच गरोदरपणात असलेल्या स्त्रियांना पडलेला असतो. जास्त महत्त्वाचे कामं असतील म्हणजेच अर्जंट काही कामं असतील तर तुम्ही गरोदरपणामध्ये जितका प्रवास टाळा तितके तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी चांगले राहील. परंतु गरोदरपणामध्ये जरा महत्त्वाचे कामे करण्यासाठी बाहेर जावे लागत असेल तर प्रवास करताना योग्य त्या प्रकारचे काळजी घेऊनच प्रवास करणे योग्य ठरते. तसेच गरोदरपणामध्ये एकटीने प्रवास न करताना सोबत कोणालातरी असू द्यावे जेणेकरून तुमची चांगली काळजी घेतली जाईल. अगदीच महत्त्वाची कामे असतील तर तुम्ही गरोदरपणामध्ये प्रवास करू शकतात परंतु योग्य ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याच प्रमाणे गरोदर असताना सुरुवातीचे तीन महिने तरी प्रवास करणे शक्यतो टाळणे गरजेचे असते. कारण सुरुवातीचे तीन महिने काळजी घेण्याचे असतात आणि अशा वेळी जर तुम्ही प्रवास केला तर गर्भपात होण्याची देखील संभावना असते. शेवटचे तीन महिने देखील तुम्ही प्रवास करणे शक्यतो टाळावे.  कारण शेवटच्या तीन महिन्यात देखील केव्हाही डिलिव्हरी होण्याची संभावना असते त्यामुळे या काळात देखील प्रवास करणे टाळले पाहिजे.

वाचा  जांभूळ खाण्याचे फायदे व तोटे

गरोदरपणात प्रवास करताना कुठल्या प्रकारचे काळजी घेणे आवश्यक ठरते?

    अगदीच ममहत्वाची कामे असतील किंवा कामानिमित्ताने बाहेर जावे लागत असेल तर गरोदर पणात प्रवास करताना योग्य त्या पद्धतीची काळजी घेणे आवश्‍यक ठरत असते यामुळे होणारे बाळ व बाळाची आई हे व्यवस्थित राहतील. तर गरोदरपणात प्रवास करताना कुठल्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक ठरते तसेच कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी याविषयी आपण चखालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • गरोदर महिलेने प्रवास करण्याआधी एकदा तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाऊन यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्रवास करावा.
  • गरोदरपणामध्ये प्रवास करताना तुम्ही प्रदूषित ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे कारण प्रदूषणामुळे गरोदर महिलेची तब्येत घडू शकते परिणामी पोटातल्या बाळाला देखील त्रास होऊ शकतो.
  • गरोदरपणामध्ये प्रवास करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला अवश्य घ्यावा.कारण गरोदर पणात प्रवास करण्यासाठी डॉक्टर सूचना देतात त्या सूचनांचे पालन करूनच प्रवास केला पाहिजे.
  • गरोदरपणात गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असेल, ताप असेल किंवा चक्कर येत असतील तर उपवास करणे आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • प्रवास करताना तुम्हाला ज्या मार्गाने जावयाचे असेल तो मार्ग हा ओबडधोबड नसावा किंवा खड्डेयुक्त नसावा कारण तसा मार्ग असला तर तुमच्या पोटात दुखण्याची समस्या उद्भवत असते त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यावी.
  • गरोदरपणात प्रवास तुम्हाला करावयाचा असेल तर तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागणार असेल त्या तुमच्या सोबतच राहू देणे आवश्यक ठरते.
  • गरोदरपणात प्रवास करताना तुमच्याकडे मोबाईल जरूर ठेवा कारण आपत्कालीन काळामध्ये मदत घेण्यासाठी मोबाईलचा उपयोग होऊ शकतो.
  • गर्भवती महिलेने जास्तीत जास्त दुरचा प्रवास करावयाचा असेल तर तो टप्प्याटप्प्याने केला पाहिजे.
  • तसेच प्रवासादरम्यान गोळ्या औषधीय सोबत ठेवल्या पाहिजेत.
  • बऱ्याच वेळा गर्भवती महिलांना प्रवासादरम्यान उलटी होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे सोबत कॅरीबॅग असू द्यावी.
  • गर्भावस्थेत  भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक असते त्यामुळे प्रवासादरम्यान पाण्याच्या बॉटल सोबतच असू द्याव्यात.जेणेकरून डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होईल.
  • गर्भावस्थेत दरम्यान प्रवास करताना बाहेरील खाणे शक्यतो टाळावे.
  • गर्भवती महिलेने प्रवास करताना सोबत खाण्याच्या वस्तू ठेवाव्यात जेणेकरून बाहेरचे पदार्थ  खाणे टाळता येईल.
  • जर तुम्ही बस मध्ये बसून प्रवास करत असाल तर खालची सीट बुक करावी. कारण, वरची सीट बुक केल्यामुळे सारखं सारखं खालीवर करावे लागत असते त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • गर्भवती महिलेने प्रवास करण्या दरम्यान सैल कपडे घालावेत जास्त घट्ट कपडे घालू नये.
  • गर्भवती महिलेने प्रवासादरम्यान जड बॅगा उचलल्या शक्यतो टाळावी. यासाठी कोणातरी सोबत राहू द्यावे.
  • जर जास्तच लांबचा प्रवास करावा लागत असेल तर मधून मधून थोडं ऊठ-बस केली पाहिजे ज्यामुळे तुम्हाला बरं वाटेल.
  • जखमी ट्रेनमध्ये प्रवास करणार असाल तर शक्यतो रिझर्वेशन आवश्यक करावे. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित बसण्यासाठी जागा मिळेल.
  • गर्भवती महिलेने प्रवासादरम्यान होणाऱ्या व्हायरल संक्रमणापासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक ठरेल. यासाठी तुम्ही रुमालाचा वापर करावा नाहीतर  मास्क तरी घालून जावा.
  • गर्भवती महिलेने डिलीवरीची तारीख बघूनच प्रवास करणे योग्य ठरते कारण डिलिव्हरी कधी होण्याची संभावना असते.
  • गर्भवती महिलेने प्रवास करण्यासाठी व्यवस्थित जागा बसण्यास आहे का हे आधी बघून घ्यावे आखडलेल्या परिस्थितीमध्ये बसू नये तसेच व्यवस्थित पोझिशनमध्ये बसावे पाय ठेवण्यासाठी योग्य जागा  आहे का नाही हे देखील बघून घ्यावे.
  • प्रवास हा जर जास्त लांबीचा असेल तर वरूनच जेवण बनवून आणावे कारण बाहेरचे पदार्थ खाणे शरीराला हानिकारक ठरू शकतात.
  • गरोदर महिलेने दुचाकीवरून प्रवास करणे शक्यतो टाळावे. प्रवास करण्यासाठी तुम्ही बसच्या कारचा अथवा ट्रेन चा वापर करू शकतात.
  • गरोदर महिलेने  कारचा प्रवास करताना सीट बेल्टचा वापर जरूर करावा. आणि ज्या ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे असतील अशा ठिकाणी योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
  • जर तुम्ही गर्भावस्थेत दरम्यान विमानाने प्रवास करत असाल तर तुम्ही तुमचे रिपोर्ट सोबतच असू द्यावे.
  • त्याच प्रमाणे प्रवासादरम्यान प्रवास करताना चढ-उतार करताना जास्तीची घाई अजिबात करू नका. सावकाश चढायला हवे. आणि उतरताना देखील सावकाश उतरावे.
वाचा  थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात?

गर्भवती महिलेने प्रवास करण्या साठी वरील सर्व गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. प्रवास करणे जर महत्त्वपूर्ण नसेल तर तुम्ही प्रवास करणे शक्यतो टाळावे परंतु महत्त्वाचे काम असतील तर तुम्ही प्रवास करताना वरील प्रमाणे सर्व प्रकारची काळजी घ्यायला हवी जेणेकरून तुमचा बाळ आणि तुम्ही सुखरूप राहाल. त्याच प्रमाणे प्रवास करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पाहिजे. प्रवास करण्या दरम्यान तुम्ही डॉक्टरांचे सल्ल्यानुसार व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे.प्रवास करताना तुम्ही जेवढी तुमची स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्याल तेवढे तुमच्या बाळासाठी योग्य ठरेल.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here