लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

0
3232

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय लहान मुलं हे निराळीच असतातच. म्हणूनच तर म्हणतात ना! 

“लहान मुले ही देवाघरची फुले” त्यांचे खेळणे, त्यांचे हसणे, त्यांचे वागणे, हे लोकांना अतिशय प्रिय असते. तुम्हाला कोणताही दिवसभराचा थकवा जरी असला, तरी तो त्यांच्याकडे पाहून ताबडतोब निघून जातो. त्यांचा निरागस चेहरा, त्यांची जिद्द, त्यांचे नखरे, त्यांचे रडणे, त्यांचे बोलणे, हे एकदम वेगळेच असतेच. मोठ्यांनाही जमणार नाही, असे ते वागतात. पण लहान मुलांना काही दुखणे आले, किंवा काही आजारी पण आले, की पोटात दुखते, यासारख्या काही समस्या झाल्या, की हा चेहरा एकदम कोमेजुन जातो. तसेच लहान मुले जिद्द खूप करतात. त्यांना जे हवे ते करायलाच लावतात. खायला मागतात, , हल्ली तर लहान मुले बाहेर उघड्यावरचे पदार्थ जास्त आवर्जून खायला मागतात. आपण जे नको सांगतो, ते जास्त आवर्जून करतात. त्याच्यामुळे त्यांना आजाराला आमंत्रण देणे होते, तसेच मुलांच्या पोटात जंत ही होतात. पूर्वीच्या काळी मला एक सवय होती, मी शाळेतील फळ्यावर चे खडू खाऊन जायची, पेन्सिल खायची, तसेच माती खायची, त्याच्यामुळे माझे सारखे पोटात दुखायचे. त्यावेळी मला समजायचे नाही, आणि शौचाच्या वेळी तिथून जंतू निघायचे, आळी दिसायची, तेव्हा मी खूप घाबरायची, त्यावेळी मला आई रागवायची आणि म्हणायची तुला नाही सांगते, तरी तू ऐकत नाही, काहीही खाते. त्याच्यामुळे तुला हा प्रकार होते. मग आई मला दवाखान्यातून डॉक्टरांकडून औषध आणून द्यायचे, तेव्हा माझ्या पोटात दुखणे, हे ताबडतोब थांबत होते. डॉक्टरांनी ही मला खूप समजून सांगितले होते की असे काहीही खायचे नाही, असे खडू वगैरे खाल्ल्याने, पोटात जंत होतात. त्यावेळी मला समजाचे नाही. पण आता मला माहिती पडते, म्हणूनच आज आपण बघणार आहोत, की लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची नेमकी कारणे कोणती? असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात! 

पोटात जंतू कोणत्या कारणांमुळे होतात?

लहान मुलांच्या पोटात जंतू कोणत्या कारणांमुळे होतात, ते जाणून घेऊयात! 

  • जर लहान मुलांनी गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने, पोटात जंत होऊ शकतात. 
  • चॉकलेट ही जास्त प्रमाणात खाल्याने, पोटात जंत होऊ शकतात. 
  • तसेच मुले खेळता खेळता माती खातात, माती पोटात गेल्यामुळे जंतू होतात. 
  • तसेच लहान मुलांची कोणतीही गोष्ट तोंडात घालायची सवय असते, तसेच खडू- पेन्सिल खाल्ल्याने, ही मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. 
  • तसेच शिळे पदार्थ दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने, ही मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. 
  • तसेच कुठलेही उघड्यावरचे पाणी पिणे, खराब पाणी पिणे, यामुळेही पोटात जंत होऊ शकतात. 
  • तसेच लहान मुले जर दूषित वातावरणात, अस्वच्छतेच्या भागांमध्ये, राहिल्यास त्यांच्या पोटात जंत होऊ शकतात. 
वाचा  डोळ्यांची जळजळ होणे उपाय

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, त्याची काय लक्षणे असतात?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची कारणे सांगितलेली आहेत. आता जर लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, त्याची कोणती लक्षणे आहेत, ते जाणून घेऊयात! 

  • मुलांच्या पोटात सारखे दुखते, 
  • त्यांना भूक लागत नाही, 
  • सारखे चिडचिड करतात, 
  • त्यांच्या पोटात जंत झाल्यास, त्यांच्या अंगावर पांढरे डाग पडतात. हातावर तोंडावर पायावर या सारख्या भागांवर त्यांच्या पांढरे डागचे चट्टे पडू शकतात. 
  • तसेच त्यांना अशक्तपणा जाणवतो, 
  • काही मुलांची पोट हे पुढे आल्यासारखे वाटते. 
  • काही मुलांना पातळ जुलाब होतात. 
  • तर काही मुलांना संडासला जावेसे वाटत नाही, 
  • पोटात मुरड आल्यासारखे वाटते, 
  • मळमळल्यासारखे वाटते, 

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, कोणते घरगुती उपचार करावेत?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण पोटात जंत होण्याची कारणे व त्यावर काही लक्षणे जाणून घेतली आहेत. आता आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊयात! 

ताक प्यायला द्या

हो, लहान मुलांच्या पोटात जंत होऊन, पोटात दुखत असेल, अशावेळी तुम्ही त्यांना ताक प्यायला द्यावे,  जंतूसाठी ताक हे फार फायदेशीर असते. त्यासाठी तुम्ही ताकामध्ये, काळे मिरेपूड, पुदिना, व कोथिंबीर चा अर्धा चमचा पेस्ट, व मीठ एकजीव करून, मुलांना प्यायला द्यावे. त्याने पोटातील जंत हे लवकर बाहेर निघण्यास मदत मिळते. 

हळद व वावडिंग यांचा वापर करून पाहा

हल्ली लहान मुलांच्या पोटात जंत हे बघायला मिळतात. त्यामुळे त्यांचे जेवण न करणे,पोट साफ न होणे, भूक न लागणे, यासारख्या समस्यां बघायला मिळतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना वावडिंग याची गोळी करून दिल्यास, मुलांच्या पोटातील जंत नाहीसे होतात. त्यासाठी तुम्हाला एक चमचा हळद, त्यात पाव चमचा वावडिंग ची पावडर, व त्यात गूळ एकत्र करून, त्याची गोळी बनवून घ्यायची, व ती सकाळ-संध्याकाळ मुलांना द्यायची, ती गोळी सलग तीन दिवस द्यावी. त्याने पोटातील जंत हे लवकरात लवकर कमी होतात. 

वाचा  पाय दुखणे ही समस्या व त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय

लसुन चा वापर करून बघा

लहान मुलांच्या पोटात कृमी, म्हणजे जंत झाल्यास, तुम्ही मुलांनवर लसुन चा वापर करायला हवा. हल्ली मुलं नखरे करतात. लसुन खायलाही नाक मुरडतात. भाजीमध्ये लसून आले, तर ते काढून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या पोटात जंत सारख्या समस्या होतात. तसेच तुम्ही ज्या मुलांना लसणाची रव्याची पातळशी पेज, तसेच लसुन चा जास्त वापर त्यांच्या जेवणात करायचा, मुले खात नाही म्हणून लसुनची पेस्ट त्यांच्या भाज्यांमध्ये टाकावीत. तसेच जर मुलांना तुम्ही लसूण तळून, त्यावर चिमूटभर मीठ टाकून, त्यांना खायला लावले, तर त्यांच्या पोटातील जंतू हे  लवकर बाहेर निघतात. 

मुलांना बडीशोप खायची सवय लावा

हल्ली लहान मुले आपण जसे वागतो, तसे आपले अनुकरण करतात. जर मुलांच्या पोटात जंत झाले, असेल अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी खास बडीशोप+ ओवा+ हिंग+ सैंधव मीठ यांचे मिश्रण एकत्र करून, ते एका डब्यात भरून ठेवावेत. आणि जेवण झाल्यावर तुम्ही खावे, म्हणजे त्यांनाही खावेसे वाटेल, आणि त्यांनाही जबरदस्ती खायला लावावेत, त्याने पोटातील जंतू  कमी होतात व मुलांची भूकही वाढते. ते खाल्ल्यामुळे लहान मुलांचे पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचे काम करते. 

मुलांना, योग्य भाज्यांचा व फळांचा आहार द्या

हल्ली मुलं भाज्या खायला नखरे करतात

 त्यांना बाहेरची पदार्थ फार आवडतात. बेकरीचे पदार्थ फार आवडतात. त्यामुळे त्यांची भूक मंदावते, त्यांना जेवण जात नाही, अशा वेळी जर तुम्ही मुलांना ते बाहेरचे पदार्थ बंद करून, रोजच्या रोज घरी भाज्या खाऊ घातल्या, तर मुलांच्या पोटातील जंत लवकर नष्ट होतात. शिवाय पोटात जंत ही होत नाहीत. त्यासाठी तुम्ही मुलांच्या आहारामध्ये कारल्याची भाजी, शेवग्याची भाजी, मेथीची भाजी, गाजर, डाळिंब, पपई , चिकू तसेच ताक , दालचिनी, सेंधव मीठ, हळद, कडीपत्ता  यासारखे पदार्थ त्यांना खायला द्यावे. त्यामुळे पोटातील कृमी हे लवकर बाहेर निघतात, व मुलांचे आरोग्यही सुधारते. 

वाचा  ऑलिव ऑइल याचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला वेगवेगळे बहुमूल्य फायदे !

ओवा चा वापर करा

जर मुलांच्या पोटात जंत असतील, त्यावेळी त्यांचे जेवण न करणे, शौचास साफ न होणे, पोटात दुखणे, यासारख्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही मुलांना ओवा खाऊ घातले, तर पोटातील जंत लवकर नष्ट होतात, व यासारख्या समस्येवर त्यांना त्वरित आराम मिळतो. त्यासाठी तुम्ही ओवांची पूड करून घ्यावी, व संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये, एक चमचा ओवा ची पूड त्यात+ गुळाचा खडा +चिमूटभर हळद यांचे मिश्रण करुन, मुलांना ते पाणी संध्याकाळी प्यायला द्यावे. व सकाळच्या वेळी त्यांचे पोट साफ होते, व पोटातील जंतू हळू बाहेर निघतात. 

डॉक्टरांना कोणत्या वेळी दाखवावे?

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, त्यांच्या पोटात सारखे दुखते. तसेच मुलांना जर जेवण थोडेसे ही जात नसेल, आणि आम्ही सांगितलेले उपाय करूनही, त्यांना फरक पडत नसेल. तसेच त्यांना चक्कर आल्यासारखे, अशक्तपणा सारखे जाणवत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडून औषधे घ्यावेत. डॉक्टर हे जंताचे  औषध देतात, ते एकाच वेळी संपूर्ण औषध द्यावे लागते, असे वर्षभरातून दोन वेळेस तुम्ही हे जंतू ची औषध डॉक्टरांकडून, नेहमी मुलांना घ्यावे. त्याने पोटातील कृमी हे नाहीसे होतात. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची कारणे, त्याची लक्षणे, व त्यावर काही घरगुती उपाय करायला हवे, ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही 

शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here