आल्याचे फायदे

0
854
आल्याचे फायदे
आल्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्या स्वयंपाक घरात असे पदार्थ असतात की, आपल्याला त्याचे एक ना अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. आपली थोडी जरी तब्येत बिघडली तरी आपण बाहेरून औषधे आणि पसंत करत असतो. परंतु काही शारीरिक समस्यांवर आपल्या स्वयंपाक घरातील वस्तूंचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्याचे पदार्थ मध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असे  असतात की, आपण त्यांचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. चला तर मग बघुयात आल्याचे फायदे.

काही पदार्थ असे असतात की ते बाराही महिने आपल्या घरात उपलब्ध असतात. आणि ज्यांचा उपयोग हा आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरतो. हो मित्रांनो, ज्या पदार्थाविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहे तो पदार्थ म्हणजेच आलं. आलं हे सर्वांनाच ठाऊक असते. शिवाय आल्याचे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. आल्याचे भरपूर गुणधर्म आहेत. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आल्याचे महत्त्व म्हटले तर आलं हे अधिकच लाभदायक असते.

आल्याचे बहुगुणी अनमोल फायदे आपल्याला आपल्या शरीरासाठी करून घेता येतील. आलं हे प्रत्येक भाजीसाठी वापरत असतो. त्यामुळे भाज्यांना देखील चांगली चव येत असते. आल्याचा एक ना अनेक प्रकारे आपण फायदा करून घेऊ शकतो. बऱ्याच लोकांना केसान संदर्भात देखील समस्या असतात. तर केसांसाठी देखील आपण आल्याचा रसाचा वापर करून शकतो. आपल्याला साधे सर्दी-पडसे जरी झाले तरी आपली आई आपल्याला आल्याचा चहा करून देत असते. अगदी जुन्या काळापासून आल्याचा उपयोग होताना दिसून येत आहे. आल्याचे विविध प्रकार देखील असतात. आल्याचे विविध रूपे नुसार त्याचे महत्त्व देखील तेवढेच आहे.

म्हणजेच रोजच्या दिनचर्येत आपण आल्याचा उपयोग करू शकतो. आल्याचे बहुगुणी उपयोग होत असल्यामुळे आपण त्याचा औषधी म्हणून देखील वापर करू शकतो. रोजच्या या बनवणाऱ्या चहामध्ये आपण आलं हे हमखास टाकले पाहिजे. तसेच पाण्यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होत असते. घरातल्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी या किती बहुगुणी असतात याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण आल्याचे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत. चला, तर मग आल्याचे फायदे कोणत्या प्रकारचे असू शकतात ? आल्याचा  कसा आपण  उपयोग करून घेऊ शकतो? याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

त्वचा सुंदर होण्यासाठी आल्याचे फायदे

आपली त्वचा सुंदर असावी असे कुणाला वाटणार नाही बरे. प्रत्येकालाच वाटत असते की आपली त्वचा हे सुंदर व नितळ असावी. तर तुमच्या त्वचेला खासकरून चेहऱ्याची त्वचा सुंदर होण्यासाठी तुम्ही आल्याचा उपयोग करून घेऊ शकतात. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाण्यामध्ये आल्याचे तुकडे करून ते उकळून घ्यावे. उकळलेले पाणी कोमट झाल्यावर रिकाम्यापोटी ते प्यावे. असे केल्यामुळे तुमचे त्वचा हे सुंदर व नितळ होण्यास मदत होऊ शकेल. तसेच तुमच्या त्वचेवरील डाग जाण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. तर सुंदर व नितळ त्वचा बनवण्यासाठी आल्याचा फायदा होऊ शकतो.

वाचा  गळू पिकण्यासाठी उपाय

डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी आल्याचे फायदे

मित्रांनो,ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी त्यांचे डायबिटीस नियंत्रणात राहावे यासाठी आल्याचा उपयोग करून घेऊ शकतात. सकाळी उठल्यावर आल्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे डायबिटीस वर नियंत्रण राहू शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते त्यावर आले नियमित सेवन केल्यामुळे नियंत्रण राहू शकते. जर तुम्ही आल्याचे नियमित सेवन करत असाल तर डायबिटीस पासून तुम्ही दूर राहू शकतात.

वजन कमी करण्यासाठी आल्याचे फायदे

तुम्ही आल्याचे नियमितपणे सेवन करत असाल तर तुमचे वजन हे नियंत्रित राहू शकते. बऱ्याच वेळा  जेवण झाल्यावर आपल्याला अन्न अपचनाचा त्रास होत असतो. जर तुम्हाला तुमचे वजन हे नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही आल्याचे नियमितपणे सेवन करायला  हवे. आल्याचे सेवन केल्यामुळे पचन क्रिया ही वाढत असते. आणि आपण जे काही जेवण करत असतो त्याचे चरबीमध्ये रूपांतर होऊन होता, व्यवस्थित अन्नपचन होऊन जाईल. आलं हे तुम्ही चहा मध्ये टाकून घेऊ शकतात. किंवा रिकाम्या पोटी सकाळी एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी प्यायला हवे. यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतील.

केसांची गळती रोखण्यासाठी आल्याचे फायदे

बऱ्याच लोकांना केस गळतीची समस्या येत असते. तर गणेश गळतीची समस्या यासाठी देखील आल्याचा रसाचा उपयोग होऊ शकतो. तुमचे देखील केस गळती होत असेल तर ती रोखण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल कोमट करून त्या तेलामध्ये आल्याचा रस मिक्स करून घ्यावा. आणि आला जरस मिक्स केलेले तेल तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांशी लावून घ्यावे. त्याने दहा मिनिटे किंवा पाच मिनिटे तरी केसांना मसाज द्यावा. यामुळे केसातील त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते. आणि एक तासानंतर केस स्वच्छ पाण्यात धुऊन टाकावेत. असे आठवड्यातून तुम्ही तीन वेळा करू शकतात. असे केल्यामुळे तुमच्या केसांची गळती थांबण्यास मदत होईल. आणि केस केसांची वाढ देखील चांगल्या रीतीने होण्यास मदत होऊ शकेल.

वाचा  लहान मुलांना सतत उचकी लागणे या समस्या वर घरगुती उपाय

मासिक पाळी मध्ये आल्याचे फायदे

मासिक पाळी मध्ये महिलांचे पोट हे फारच प्रमाणात दुखत असते. तसेच डोके दुखी कंबर दुखी पाय दुखी एक प्रकारे या कालावधीमध्ये पूर्ण अंग दुखत असते. आशाबाई 1 ग्लास पाण्यामध्ये आल्याचे तुकडे करून ते व्यवस्थित पाणी उकळून घ्यावे. आणि हे पाणी कोमट झाल्यावर पिऊन घ्यावे. यामुळे बऱ्याच प्रमाणात दुखण्याचा त्रास थांबतो. तसेच पोट दुखी पासून देखील आराम मिळतो. तसेच तुम्ही आलं सावन देखील खाऊ शकतात त्यामुळे देखील लवकर आराम मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

सर्दी पडसे झाल्यास व खोकला लागल्यास आल्याचे फायदे

घरात कोणाला सर्दी-पडसे झाले तर आई आल्याचा चहा करून देत असते. त्यामुळे लवकर बरे वाटते. आणि खोकला लागला तरीदेखील आई आल्याचा रस मधामध्ये टाकून ते मिश्रण चाटायला देत असते. असे केल्यामुळे लवकर आराम मिळतो. आणि खोकला लवकर बरा होण्यास देखील मदत होत असते. जर सर्दी-पडसे झाले असेल तर तुम्ही आल्याचा नक्कीच उपयोग करू शकतात. त्यासाठी तुम्ही गवती चहा तुळशीची पाने आणि आले यांचा काढा देखील घेऊ शकतात त्यामुळे सर्दी पडसे व खोकला जाण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तसेच खोकल्यासाठी आल्याचा रस मधामध्ये मिक्स करून ते चाटण चाटल्याने घशाला आराम मिळतो. आणि खोकला लवकरात लवकर बरा देखील होत असतो.

हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आल्याचे फायदे

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही आल्याचे तुकडे दातामध्ये चावून खायला हवे. यामुळे तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो. तसेच शरीरातील हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील आल्याचा भरपूर प्रमाणात फायदा होत असतो. आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित रित्या ठेवण्यासाठी आल्याचा रसाचा फायदा होत असतो. शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालू राहावे यासाठी तुम्ही आले दातामध्ये चावून खाल्ले पाहिजे अथवा रिकाम्यापोटी आले उठून त्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. यामुळे  तुमच्या हृदयाचे कार्य हे व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहण्यास मदत होऊ शकेल. तर नक्कीच तुम्ही तुमच्या शरीराच्या फायद्यासाठी आल्याचे सेवन करायला हवे.

वाचा  पोटातील आतडे दुखणे या समस्येवर विविध घरगुती उपाय

कॅन्सर सारखे रोग दूर ठेवण्यासाठी आल्याचे फायदे

जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत आल्याचे आवर्जून सेवन करत असाल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आजारांपासून नक्कीच दूर राहू शकतात. तसेच कॅन्सर यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही आल्याचे नियमित सेवन करायला हवे. आल्या मध्ये भरपूर प्रकारचे गुणधर्म असतात तसेच, आलं हे अँटीबॅक्टरियल असते. शरीरामध्ये कॅन्सर होण्यासाठी ज्या पेशी कारणीभूत ठरतात तर त्या आल्याचा रस सेवन केल्यामुळे नष्ट होत असतात. यासाठी तर तुम्ही नियमित पणे आल्याचे तुकडे चावून खायला हवे. तसेच, आल्याच्या पाण्याचे सेवन करायला हवे. तर तुम्ही कॅन्सरसारख्या रोगाने पासून नक्कीच दूर राहू शकतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आल्याचे फायदे

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर नक्कीच तुम्ही आल्याचे सेवन करायला हवे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये आल्याचे सेवन करायला हवे. भाजी बनवताना भाजीमध्ये आल्याचा वापर केलेला असावा. त्यामुळे भाजीची चव ही वाढते आणि आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही रोज चहा पीत असाल तर चहा मध्ये आल्याचे तुकडे आवर्जून टाकायला हवे. तर काहीजण हे दुधा मध्ये आल्याचे तुकडे टाकून व ते उकळून त्याचे सेवन करत असतात.

यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. आल्याचे पाणी उकळून ते पाणी रिकामे पोटी घ्यायला हवे. नाहीतर, आल्याचे तुकडे तरी चावून खायला हवे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढू शकते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती जर चांगली असेल, तर आपण कुठल्याही आजारांपासून दूर राहू शकतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बळकट राहण्यासाठी आल्याच्या रसाचे नक्कीच सेवन करायला हवे.

आपल्या रोजच्या दिनचर्येत आल्याच्या रसाचे किती फायदे होऊ शकतात हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये आल्याचे आवर्जून सेवन करायला हवे यामुळे एक ना अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात. पाण्याचे सेवन केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून आपल्या शरीराचा बचाव करू शकतो.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती ते मला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here