चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे

0
695
चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे
चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आपल्या चेहऱ्याची त्वचा ही चांगली दिसावी,तसेच नितळ, स्वच्छ, मऊ व मुलायम असावी, यासाठी अनेक जण काही ना काही प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा चेहरा संदर्भात अनेक समस्या येत असतात. जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहरा काळवंडणे, चेहरा निस्तेज दिसू लागणे, चेहऱ्यावर अति प्रमाणात तेल येणे म्हणजे चेहरा तेलकट दिसणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आणि बर्‍याच वेळा उन्हाळ्यात तर उष्णतेचा प्रभाव हा चेहऱ्यावर देखील दिसून येत असतो. त्यामुळे अति घाम आल्यामुळे चेहरा तेलकट होणे यासारखे प्रॉब्लेम्स देखील येत असतात. त्यासाठी चारकोल पावडर चा वापर केला पाहिजे.

तरी त्यासाठी अनेक जण हे बाहेरील प्रोडक्स खरेदी करून ते स्वतःच्या चेहऱ्यावर त्याचा वापर करत असतात. परंतु अशा मुळे चेहऱ्याला फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही. शिवाय बाहेरील प्रोडक्ट यामध्ये केमिकल देखील असते. त्यामुळे, चेहऱ्याचे नुकसान देखील होऊ शकते. आणि बाहेरचे प्रॉडक्ट हे महागडे देखील असतात. म्हणजेच एक प्रकारे त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा देखील होऊ शकतो. तर काहीजण हे पार्लरमध्ये जाऊन चेहर्यासाठी उपाय करत असतात. परंतु मित्रांनो, आपण आपल्या चेहर्यासाठी काही घरगुती उपाय देखील करू शकतो. घरगुती उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या चेहर्यासाठी फायदा होऊ शकतो.

अनेक जणांची चेहऱ्याची त्वचा ही तेलकट असते. त्यामुळे चेहऱ्यावर सतत मुरूम येणे, चेहरा लवकर काळा पडणे, पिंपल्स येणे यांसारख्या समस्या येत असतात. तरी मित्रांनो, तुम्ही यासाठी म्हणजेच चेहरा जर तेलकट असेल तर तेलकट स्किन साठी तुम्ही चारकोल पावडरचा उपयोग करू शकतात. चारकोल हे तर सर्वांनाच ठाऊक असेल. चारकोल चा पाणी स्वच्छ करण्यासाठी देखील उपयोग केला जात असतो म्हणजेच एक प्रकारे चारकोल मध्ये सर्व प्रकारची घाण साचून आपल्याला शुद्ध पाणी मिळत असते. त्याचप्रमाणे चरकोल पावडरचा आपण आपल्या तेलकट त्वचेसाठी देखील उपयोग करू शकतो.

चारकोल पावडर पासून आपण फेस मास्क तयार करू शकतो. चारकोल पावडर पासून तयार केलेल्या फेस मास्क चा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा हा कमी प्रमाणात होऊ शकतो. शिवाय, आपला चेहरा स्वच्छ होण्यास देखील याने मदत होऊ शकते. तर मित्रांनो आज आपण चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर केल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ? तसेच चारकोल पावडर चा वापर हा कोणी केला पाहिजे? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर का करावा ?

बऱ्याच वेळा आपल्या चेहरा संदर्भात आपल्याला समस्या येत असतात. पिंपल्स येणे चेहऱ्यावर डाग पडणे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स तसेच व्हाइट हेड्स येणे, आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर अतिरिक्त तेल साचणे अशा एक ना अनेक समस्या येत असतात. तर त्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतात. तर मित्रांनो, तुम्ही यासाठी चारकोल पावडरचा उपयोग करू शकतात. चारकोल म्हणजेच आपण त्याला कोळसा असे बोलतो. कोळसा यामध्ये अतिरिक्त कचरा साचून घेतला जातो. बऱ्याच वेळा दूषित पाणी जरी असले तर ते कोळसाच्या मदतीने ते आपण स्वच्छ करू शकतो. म्हणजेच एक प्रकारे पाण्याचे शुद्धीकरण होत असते.

वाचा  ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

त्याचप्रमाणे, जर आपण चारकोल पावडर चा आपल्या चेहऱ्यावर उपयोग केला तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरची साचलेली घाण हे निघून जाण्यास मदत होत असते. शिवाय ज्यांना त्वचेवर तेल येण्याची समस्या येत असेल तर अशा व्यक्तींसाठी देखील चारकोल पावडर लावणे फायदेशीर ठरू शकते. आज-काल बाजारामध्ये चारकोल फेस वॉश देखील मिळत असतो. तसेच चारकोल फेस मास्क पॅकेट हे देखील मिळत असते. तर यांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता त्यामुळे देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजेच आपला चेहऱ्यावर अतिरिक्त तेल असलेले ते काढून टाकण्यासाठी शिवाय चेहरा स्वच्छ होण्यासाठी आपण चारकोल पावडरचा उपयोग करू शकतो.

चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे :- 

अनेक वेळा आपल्या चेहऱ्या संदर्भात समस्यांना सामोरे जावे लागत असते. प्रत्येक जण आपला चेहरा मऊ, मुलायम, डाग विरहित, पिंपल्स विरहित असावा, यासाठी काही न काही प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल यासाठी देखील काही ना काही प्रयोग करत असतात तर मित्रांनो यासाठी तुम्ही चारकोल पावडरचा उपयोग देखील करू शकतात. तर चारकोल पावडर चा वापर कशा प्रकारे करायला हवा? व त्याचे कोणते प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

चारकोल पावडरचा फेस मास्क :-

मित्रांनो, आपण घरगुती पद्धतीने चारकोल पावडर पासून फेस मास्क तयार करू शकतो. सर्वप्रथम तुम्ही एका वाटीमध्ये दीड ते दोन चमचे चारकोल पावडर टाकून घ्या. आता चारकोल पावडर भिजण्या इतके  तुम्ही त्यामध्ये गुलाबजल टाकून घ्या. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मध टाकून घ्यावे. तसेच, त्यामध्ये तुम्ही टी ट्री ऑइल चे 2 ते 3 थेंब तेल देखील टाकू शकतात. ही सर्व पेस्ट व्यवस्थित एकत्रित करून घ्या. आणि चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाकावा. त्यानंतर ही पेस्ट ब्रश च्या साह्याने चेहऱ्याला सर्वत्र ठिकाणी लावून घ्यावी. आणि चारकोल पावडर सुकल्यानंतर चेहरा हा थंड स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. आणि मॉइश्चरायझर देखील चेहऱ्याला लावायला हवे. त्यासाठी तुम्ही कोरफडीचा रस देखील मॉइस्चरायझर म्हणून लावू शकतात.

वाचा  थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात?

चारकोल पावडर चा फेस मास्क लावण्याचे फायदे :-

मित्रांनो, चारकोल पावडर पासून आपण घरगुती पद्धतीने फेस मास्क कशा पद्धतीने तयार करून शकतो, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तसेच हा फेस  मास्क चेहऱ्याला लावण्याचे फायदे, हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया. 

  • चारकोल पावडरचा फेसमास्क चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील साचलेली घाण निघून जाण्यास मदत होत असते. अगदी खोलवर साचलेली घाण देखील यामुळे निघून जाण्यास मदत होत असते.
  • बऱ्याच वेळा चेहऱ्यावरील रोम छिद्र हे मोठे झालेले असतात. जर तुम्ही चारकोल पावडरचा फेस मास्क तुम्ही चेहऱ्याला लावल्यामुळे रोम छिद्रे हे छोटे होण्यास देखील मदत होत असते. शिवाय आपली चेहऱ्याची त्वचा हे देखील टवटवीत व व्यवस्थित प्रकारे होत असते.
  • चारकोल पावडर पासून फेस मास्क तयार करून चेहऱ्यावर लावल्यामुळे ओईली त्वचा ही व्यवस्थित प्रकारे होत होऊ शकते.
  • ज्यांची त्वचा ही तेलकट असेल तर त्यांनी चारकोल पावडरचा फेसमास्क लावणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच चारकोल फेस मास्क लावल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होत असते. ज्यामुळे लवकर पिंपल्स देखील येत नाहीत.
  • चारकोल पावडरचा फेस मास्क चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड्स हेदेखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे तुमचा चेहरा अगदी स्वच्छ होण्यास मदत होत असते.
  • चारकोल पावडरचा फेसवास चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील अनेक आजारांपासून देखील आपण दूर राहू शकतो.
  • चेहऱ्यावरील बऱ्याच वेळी रोम छिद्रे हे मोठे मोठे होत जात असतात. त्यामुळे चेहरा हा वेगळाच वाटू लागतो. एक प्रकारे चेहऱ्यावरील रोम छिद्रे बंद करण्यासाठी चारकोल पावडर चा फेस मास्कचा वापर आपण करू शकतो.
  • चारकोल पावडर चा फेसमास्क  चेहऱ्याला लावल्यामुळे एक प्रकारे चेहऱ्याचा रंग देखील उजळण्यास मदत होऊ शकते. शिवाय चेहऱ्याची त्वचा ही टाईट देखील होण्यास मदत होऊ शकते.
  • आज-काल बाजारामध्ये चारकोल फेस वॉश  देखील सहज रित्या उपलब्ध होत असते. तर हा फेस वॉश देखील तुम्ही वापरू शकतात. यामुळे देखील तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होत असते शिवाय चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते आणि चेहरा उजळण्यासाठी देखील मदत होऊ शकते.

तर मित्रांनो, चारकोल पावडर फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावण्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला होऊ शकतात. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील चारकोल पावडर फेस मास्क तयार करून चेहऱ्याला लावू शकतात. तसेच चार्कॉल कावळ्याचा फेस मास्क चेहऱ्याला कोणी लावावे व कोणी लावू नये? याबद्दल देखील आपल्याला माहिती असायला हवी. तर याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  फुटाणे खाण्याचे फायदे

चारकोल पावडरचा वापर कोणी करावा व कोणी करू नये ?

चारकोल पावडर चा वापर चेहर्यासाठी करणे फायदेशीर ठरू शकते. शिवाय चारकोल पावडर पासून फेस मास तयार केल्याने चेहऱ्यावरची अतिरिक्त साचलेले घाण हे निघून जाण्यास मदत होत असते. हल्ली आता बाजारात चरकोल पील ऑफ मास्क हे रेडीमेड पॅकेट स्वरूपात मिळत असते. तर या मिळणाऱ्या चारकोल पील ऑफ मास्क चा वापर देखील तुम्ही करू शकतात. चारकोल फेस मास्क चेहऱ्याला लावल्यावर तो काढताना आपल्या चेहऱ्याची त्वचा ही ताणली जात असते.ज्यांची चेहऱ्याची त्वचा ही तेलकट असते त्यांनी चार्कॉल पील ऑफ मास्क वापरणे खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होत असते शिवाय चेहरा हा उजळण्यास देखील मदत होत असते.

ज्यांची चेहऱ्याची त्वचा हे खूपच नाजूक असते, म्हणजेच एकदमच मुलायम स्वरूपाचे असते की त्यांनी काही वापरले तरी त्यांना एलर्जी होत असते तर अशा लोकांनी चारकोल फेस मास्क चा वापर करणे शक्यतो टाळावे. कारण चारकोल फेस मास्क चेहऱ्याला लावल्यानंतर त्वचा ही चांगली जात असते आणि ज्यांची चेहऱ्याची त्वचा ही खूपच नाजूक असते तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. तर अशा लोकांनी चारकोल फेस मास्क लावणे टाळायला हवे.

ज्यांच्या चेहऱ्याची त्वचा ही कोरड्या स्वरूपाची असते, म्हणजेच कोरडी त्वचा असते तर अशा लोकांनी देखील चारकोल फेस मास्क चेहऱ्याला लावणे शक्यतो टाळावे. कारण जर कोरड्या त्वचेवर चारकोल फेस मास्क लावले तर त्यामुळे चेहर्‍याची त्वचा अजूनच कोरडी होऊ शकते. म्हणजेच चेहरा अजून जास्त कोरडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याला खाज देखील येऊ शकते. कारण कोरड्या त्वचेला ओलावा निर्माण करण्याची गरज असते. म्हणजेच कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर लावणे अत्यंत गरजेचे असते. ज्यांच्या चेहऱ्याची त्वचा जर कोरडी असेल तर त्यांनी चारकोल फेस मास्क चेहऱ्याला लावणे शक्यतो टाळायला हवे.

तर मित्रांनो, चारकोल  फेसमास्क चेहऱ्याला लावण्याचे जरी अनेक फायदे असले, परंतु जर चारकोल फेस मास्क चेहऱ्याला सूट होत नसेल अथवा त्यामुळे चेहरा लाल होण्याची शक्यता असेल तर अशा वेळेस तुम्ही चेहऱ्याला चारकोल फेस मास्क लावणे टाळायला हवे. आणि कोरड्या त्वचेसाठी तर चारकोल फेस मास्क लावणे शक्यतो टाळायला हवे. शिवाय ओईली त्वचा साठी तर चारकोल फेस मास्क लावणे अत्यंत फायदेशीर ठरत असते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी  वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

    

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here