नमस्कार, मैत्रिणींनो लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं ! किती सुंदर आणि गोंडस निरागस त्यांची चेहरे दिसतात, अगदी कुतुहूल वाटावी अशीच ! ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो, तेव्हापासून तर तो मोठा होईपर्यंत, तो आईला अगदी प्रिय असतो. त्याच्या हालचालीवर त्याचे आईचे लक्ष असते, तसेच त्याला काय हवे ? काय नको ? ते सगळं आपण लक्ष ठेवतो. लहान मुलांचा जन्म झाल्यावर त्यांना स्तनपान करणे हा अगदी सुंदर असा क्षण आहे. आईचे दूध हे बाळासाठी फार आरोग्यदायी असते. पण बाळाचे दूध बंद करणे एका वेळेनंतर गरजेचे असते.
लहान मुलांना वयाच्या वर्षापर्यंत तरी स्तनपान करायला हवे. सहा महिन्यापर्यंत लहान बाळाला कोणताही आहार देऊ नये. सहा महिने झाल्यानंतर बाळाला वरचा आहार सुरू करावा. तसेच वर्ष झाल्यावर मग त्याला संपूर्ण आहार थोडा थोडा द्यायला सुरुवात करावा. जेणेकरून तो त्याच्या अंगी लागेल व त्याची तब्येत बनेल. पण लहान मुलं फार जिद्दी असतात, त्यांना आईचे दूध प्यायला आवडते, वरचं जेवण करायला नाही म्हणतात. त्यामुळे ते बारीक होतात, शिवाय आपलीही तब्येत त्यामुळे कमी होते व आपल्याला त्रास होतो. त्यांना जेवनातील विटामिन घटक त्यांना मिळत नाही. अशा वेळी वर्षानंतर जर तुम्हाला बाळाचे दूध सोडायचे असेल, तर त्यासाठी काय घरगुती उपाय करावेत? या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की लहान बाळाचे दूध बंद करण्यासाठी काही घरगुती उपाय?
Table of Contents
लहान बाळाला स्तनपान किती वर्षापर्यंत करावे ?
हा प्रश्न खूप स्त्रियांना असतो, की लहान बाळांना स्तनपान हे नेमकी किती वर्षापर्यंत करावेत. तसेच जन्मल्याजन्मल्या लहान बाळाला आईचा पहिला चीक फार महत्त्वाचा असतो, कारण त्यामध्ये खूप गुणधर्म असतात. तर लहान मुलांना स्तनपान हे किमान वर्षभर तरी करावेत. कारण त्या मधील घटक द्रव्य मुलांना मिळते व ते त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण समजा तुम्हाला अंगावरील दूध कमी असेल, तर तुम्ही त्यांचा आहार सहाव्या महिन्यापासून सुरू करावा. तसेच डॉक्टर ही तेच सांगितात की लहान बाळांना सहाव्या महिन्यापासून वरचा आहार सुरू करावा. कारण लहान बलान्स वरचे अन्न व उशिरा दिल्यामुळे त्यांची वाढ व्हायला तक्रारी येतात, तसेच ते कुपोषणाचे आहारी जाऊ शकतात, बाळ अशक्त होते.
सहा महिन्यानंतर नेमका कोणता, वरचा आहार सुरू करावा ?
मैत्रिणींनो, लहान बाळाला सहा महिन्यापर्यंत आईचे दूध फार गरजेचे असते. त्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही लहान बाळाला ज्यावेळी पहिले वरचे भोजन देत असाल, अशावेळी तुम्ही त्याला अगदी हलका आहार द्यावा. अशी की मुगाच्या डाळीचे पाणी, हिरव्या भाज्यांचे सूप, पातळसा रवा, उपमा तसेच सफरचंदाचा गर, संत्री चा ज्युस, पिकलेले केळ, लहान बाळाला खाऊ घाला, तसेच नाचणीची पेज, तसेच तुम्ही मूग +डाळ +तांदूळ भाजून त्यामध्ये जिरे भाजून हे गिरणी मधून दळून आणावे, त्यानंतर त्याला चांगली शिजवून, त्यामध्ये मीठ+ साजूक तूप टाकून मुलांना ती पेज खाऊ घालावीत. ती त्यामुळे त्यांना त्यामधील घटक द्रव्य मिळते, शिवाय त्यांच्या तोंडाला ही चव लागते.
लहान बाळाला दूध सोडण्यासाठी काही उपाय !
लहान बाळाला दूध सोडण्यासाठी, काही घरगुती उपाय !
कोरफडचा गर लावून पहा :
जर लहान मुलगा वर्षाचा झालाय, तरीही वरचे काही खायला नखरे करत असेल, अशा वेळी तुम्ही तुमच्या स्तनाच्या निपल वर कोरफडचा गर लावून ठेवावा. त्यामुळे बाळ जेव्हा दूध प्यायला येईल, तेव्हा त्याला त्याचा कडवट चव लागेल, आणि तो दूध प्यायला नकार देईल, थोडा चिडचिड करेल पण भूक लागल्यामुळे तो दुसरा आहार ही घ्यायला तयार राहील.
कारल्याचा रस लावा :
ज्या वेळी लहान बाळा तुमच्याकडे दूध प्यायला येईल, अशा वेळी तुम्ही तुमच्या स्तनाला कारल्याचा रस लावा, त्यामुळे त्याच्या तोंडाला कडवटपणा लागेल आणि तो दुध प्यायला नकार देईल. अशा वेळी तुम्ही त्याला लगेच दुसरा आहार द्यावा किंवा गोड पदार्थ खाऊ घालावा, त्यामुळे त्याच्या तोंडाला चव लागेल येते, व ते खायला तयार राहील.
त्यांच्या मन वळवण्याचा प्रयत्न करावा :
ज्यावेळी लहान मुले सारखे-सारखे त्रास देत असतील, सारखे दूध प्यायला मागत असतील, चिडचिड करत असतील, अशा वेळी तुम्ही त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न करावा. जसे की त्यांना बाहेर घेऊन जावा, किंवा काहीतरी खेळणे खेळायला दाखवा, किंवा कोणासोबत तरी गप्पा करा. दुसऱ्या कोणत्यातरी खेळण्यांमध्ये त्याला गुंतवा, त्यामुळे त्याचे लक्ष त्यातून जाते, तो खेळण्याच्या नादात गुंतुन जातो, तसेच त्यांना खेळता-खेळता तुम्ही त्याला दुसरा आहारही देऊ शकतात. त्यामुळे त्याचे त्यांचे पोट भरते व ते दुध प्यायला नाकार करतात.
बाळाला बाटलीची सवय लावा :
लहान बाळाला जर तुम्ही लवकर बाटलीची सवय लावली, तर ते दुध प्यायला मागत नाही. अशावेळी तुम्ही बाटलीमध्ये त्यांना गाईची दूध तसेच, भाज्यांचे सूप यासारखे पदार्थ टाकून देऊ शकतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळी चव लागल्यामुळे, त्यांचा वरचा आहार घेण्याची सवय लवकर प्रमाणात होते. शिवाय त्यांचे पोट भरलेले राहते. जर बाळाचे पोट भरलेले नसेल, तर ते सारखे चिडचिड करतात आणि आपल्याला सारखी अंगावरच्या दूधाची मागणी करतात. त्यामुळे तुम्ही सतत त्यांना वरचा आहार दिवसातून थोडा थोडा खाऊ घालतच राहावा.
तुमच्या बाळाला सांगा की मला लागले आहे :
लहान मुले दुध प्यायला जिद्द पणा करत असतील, अशा वेळी तुम्ही स्तनाच्या निपल लाल गेरू चा कलर लावा, आणि त्यांना सांगा, की मला लागले, मला हाबु झालाय, तसेच ते त्या वेळी घाबरतात, त्यांना वाटतं की आईला रक्त आले आणि नंतर दूध प्यायला नाही म्हणतात.
चला तर मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की बाळाचे दूध बंद करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय योजना करावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, जर तुम्हाला आवडली असेल, तर आम्हाला आमच्या या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावेत.
धन्यवाद !