चिकू खाण्याचे फायदे व तोटे

0
1367
चिकू खाण्याचे फायदे व तोटे
चिकू खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया चिकू खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. चिकू हा सगळ्यांनी बघितला असेलच, वरून तपकिरी रंगाचा आतमध्ये बदामी रंगाचा, गोडसर अशी फळ आहे. त्यामध्ये काळ्याबिया असतात. चिकू हा अगदी लहानांपासून सगळ्यांना आवडतो. हल्ली मार्केटमध्ये निरनिराळे फळ तुम्ही बघतात, त्यात अगदी छोटासा आणि चवीला गोड असून फळ म्हटले, की चिकू दिसणार! चिकू मध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे, तो सगळ्यांना फायद्याचा ठरतो. तसेच चिकू खाल्ल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते.

चिकू मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे तो आपल्या शरीरात फायदेशीर ठरतो. चिकू हे फळ अमृतासमान आहे. त्यामध्ये रसदार गोडवा आहे, चिकू पासून आपण जॅम, सलाड, तसेच फ्रूट सलाड, तसेच चिकू चा ज्यूस, चिकू चा मिल्क शेक, तसेच चिकूचे पावडर बनवून त्या त्याचा आयुर्वेदिक औषध मध्येही वापर केला जातोय. तर मित्रांनो आज आपण चिकू खाल्ल्याने तुमच्या शरीराला नवीन नेमके कोणकोणते फायदे होतात? ते जाणून घेणार आहोत. तसेच चिकू खाल्ल्याने कोणते तोटे होतात? तेही जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, की चिकू खाल्ल्याने होणारे फायदे? 

चिकू खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, चिकू खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. पण ते अनेकांना माहिती नसतात. तर चला जाणून घेऊया, त्यामुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे? 

चिकू मधील गुणधर्म :

मित्रांनो, चिकू मध्ये अ जीवनसत्वाचा स्त्रोत खूप मोठ्या प्रमाणात असतो. तसेच चिकू मध्ये विटामिन्स, मॅग्नेशियम, पोटेशियम, कॅल्शियम, लोह, तांबे, झिंक, फॉस्फरस, प्रथिने, तसेच पिष्टमय पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे, ऑंटीबॅक्टरियल, तसेच ऑंटीॲक्सिडेंट, फोलेट्स, सेलेनियम, फ्रुक्टोज व सुक्रोज हे ऊर्जा देणारे घटक द्रव्य असल्यामुळे, आपल्या शरीराला ते फायद्याचे असते. 

वाचा  स्वप्नात वांगे दिसणे शुभ की अशुभ!

चिकू खाल्ल्याने तोंडाला चव येते :

जे व्यक्ती दीर्घ आजारातून बाहेर निघालेले आहेत, तसेच  तापातून बाहेर निघाले आहेत, अशा वेळी त्यांना कोणतेही अन्न पदार्थ रुचकर लागत नाही. अशा वेळी त्यांना चिकू फळाचे सेवन करायला दिले, तर त्यांच्या तोंडाला चव येते. शिवाय ते त्यांच्यासाठी पौष्टिक गुणधर्म असतात. 

पचनाची संबंधित तक्रारी दूर होतात :

चिकू हा पाचक असतो. त्याच्यामध्ये फायबरचे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्हाला अन्नपचनास संबंधित तक्रारी दूर होतात. ज्या लोकांना सारखे अजीर्ण, ॲसिडीटी यासारख्या समस्या होतात, त्यांनी त्यांच्या आहारात समावेश करावा. चिकू खाल्ल्याने त्यांची पोट साफ होते, व त्यांना यासारख्या तक्रारी दूर होतात. 

चिकू खाल्ल्याने सर्दी-पडशाचा त्रास कमी होतो :

सर्दी-पडशाचा त्रास हा सहसा डोकेदुखीच आहे. सर्दी झाली, की ती मोकळी निघत नाही. छातीत कप अडकून राहतो. अशावेळी तुम्ही चिकूचा समावेश तुमच्या आहारात केला, तर तुम्हाला फायदा होईल. कारण चिकू हा श्वसन मार्गातील तसेच छातीतील कफ कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुमची सर्दी-पडशावर तुम्हाला आराम मिळतो. 

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते :

मित्रांनो चिकू मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर्स, यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात असतो. आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची पुरवठा फायदेशीर ठरतो. ज्या लोकांच्या हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला असेल, तसेच गुडघेदुखीचा त्रास असेल, अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात सेवन करायला हवा. त्यामुळे त्यांचे यासारख्या तक्रारी दूर होतात. 

डोळ्यांसाठी फायदेशीर राहते :

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटामिन अ ची गरज असते, आणि चिकू मध्ये विटामिन अ चा स्त्रोत मुबलक प्रमाणात असतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही नियमित तुमच्या आहारामध्ये चिकू खायला हवा. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

चिकू मध्ये ऑंटीॲक्सिडेंट तसेच ऑंटीबॅक्टरियल तसेच ऑंटी व्हायरल इन्फेक्शन वर मात करण्याची  गुणधर्म असते. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये त्याचे फायदे होतात. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये चिकू या फळाचा समावेश केला, तर तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे तुम्ही कोणत्याही आजारावर मात करू शकतात. विशेष म्हणजे चिकू खाल्याने तुमच्या शरीरात उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते. 

वाचा  राईच्या तेलाची माहिती

चेहर्यासाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे, चेहरा काळवंडणे, त्यावर पिंपल्सचे डाग होणे, यासारख्या समस्या असतील, त्यावेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये चिकूचा वापर करायला हवा. चिकू खाल्ल्याने तुमचे चेहऱ्यावरही त्याचा प्रभाव पडतो. तसेच तुम्ही चिकूचा गर काढून कुचकरून तुमच्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे मसाज केल्यास तुमच्या चेहऱ्यावर मुलायमपणा येईल. म्हणजे तुमच्या घरगुती नॅचरल स्क्रब होईल, तसेच तुम्ही चिकूचा गर त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून, तुमच्या चेहऱ्यावर पण 20 ते 25 मिनिटे लावून, चेहरा थंड पाण्याने धुवावेत. तुमच्या चेहऱ्यावर काळपटपणा आला असेल, तर त तो जाण्यास मदत मिळते. 

अशक्तपणा दूर होतो :

चिकू मध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे यासारखे गुणधर्म असल्यामुळे,  तुम्हाला अशक्तपणा येणे, थकवा येणे, यासारख्या समस्या दूर होतात. चिकू खाल्ल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा व उत्साह निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही निरोगी राहतात. 

चिकू खाल्ल्याने काय काळजी घ्यावी? कोणते दुष्परिणाम होतात? 

मित्रांनो, चिकू खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, हे आम्ही तुम्हाला वरील दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेच आहेत. पण चिकू घेताना नेहमी चांगला निवडून घ्यावा. तसेच चिकू हा कच्चा असेल तर तो पिकू द्यावे, मगच खावेत. कारण कच्चा चिकू खाल्ल्याने, तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कारण त्यात चीक चे प्रमाण असते. त्यामुळे तुम्हाला तोंडात फोड, तसेच अल्सर यासारख्या गोष्टी होऊ शकतात. 

तसेच कच्चे चिकूचा चिक तुमच्या ओठांच्या  बाजूला  लागला, तर तुम्हाला तिथे लालसर येऊ शकते. पण कच्च्या चिकूचा चिक त्वचेला उभारतो. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला चिकू खाण्याचे, तुमच्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच.  तसेच चिकू पासून तुम्हाला ऍलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच खावेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत?

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here