चिंच खाण्याचे फायदे व तोटे

0
2126
चिंच खाण्याचे फायदे व तोटे
चिंच खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक फळाचे, प्रत्येक वस्तूचे काहीना काही महत्त्व असते. चिंच नाव घेताच तोंडाला पाणी सुटते नाही का ! चिंच ही आकाराने लांबट अशी असते. चिंच याची चव ही गोड आंबट प्रकारची असते. लहान मुले तर चिंचेचे झाड दिसताच चिंचेच्या झाडाला दगडे मारून फेकतात आणि चिंच खाली पडल्यात कि ते गोळ्या करण्यासाठी गर्दी करतात. मित्रांनो, चिंच खाण्याचे फायदे व तोटे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय, चिंचेची गोड -मधुर आणि आंबट चव ही सर्वांनाच आवडत असते.

चिंचेचा वापर आपण स्वयंपाक देखील करत असतो. तुरीची डाळ करायची म्हटली म्हणजेच वरण शिजवायचे म्हटले, तर फोडणी देण्यासाठी चिंचेचा देखील आपण त्यामध्ये वापर करत असतो. त्यामुळे वरण अजून स्वादिष्ट व पौष्टिक बनत असते. शिवाय  वरणाला छान वेगळ्या प्रकारची चव येत असते. गरोदरपणात तर चिंच सगळ्यांनाच खावीशी वाटत असते. एखादी महिला गरोदर असली तर तिच्या समोर चिंचेचे नाव जरी काढले, तरी तिच्या तोंडाला पाणी सुटत असते.

चिंचा यामध्ये जीवनसत्व क, आवश्यक घटक, आवश्यक पौष्टिक तत्वे यांचा समावेश असतो. चिंच खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय आपल्या स्वयंपाक घरात भाज्यांची चव वाढावी यासाठी देखील आपण चिंचेचा वापर करत असतो.

पिकलेली चिंच हे तर चांगले लागतेच शिवाय थोडी कच्ची-अर्धवट पीकलेली चिंच देखील खायला छान लागते. चीनचे मध्ये असलेले विटामिन सी हे आपल्या शरीरासाठी उत्तम ठरत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर आपण चीनचे पासून सरबत देखील बनवून त्याचे सेवन करू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसात आपण चिंचेचे सरबत बनवल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तसेच, चिंच खाल्ल्यामुळे अजून आपल्या शरीराला कोणत्या कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपणास माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण चिंच खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

चला, तर मग चिंच खाल्ल्यामुळे होणारे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

चिंच खाण्याचे होणारे फायदे:-

चिंच आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. तसेच चिंचेचा वापर आपण हा स्वयंपाक घरात देखील हमखास करत असतो भाज्यांना चव यावी तसेच, वरण बनवलेले असले तर त्याला चांगल्या प्रकारची चव यावी, यासाठी देखील आपण चिंचेचा वापर करत असतो. चिंच खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तर ते नेमके कोणते ? याबद्दल आपण आता जाणून घेऊयात!

  • चिंच मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते जे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे, चिंचे मध्ये पोटॅशियमचे प्रमाण व कॅल्शियम चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो.
  • जर कॅल्शियमचा पुरवठा आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे होत असला तर त्यामुळे आपल्या शरीराची हाडे देखील बळकट व मजबूत राहण्यास मदत होत असते. चिंचा खाल्ल्या मुळे तुम्हाला कॅल्शियमचा पुरवठा होत असतो.
  • चिंचेचे सेवन केल्यामुळे आपल्याला संधिवाताची समस्या देखील निर्माण होऊ शकत नाही. जर तुम्हाला संधिवाताची समस्या असेल तर तुम्ही चिंतेचे सेवन करावे. त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
  • चिंचेचे सेवन केल्यामुळे आपला बीपी हादेखील नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. शिवाय ज्या लोकांना बीपी ची समस्या येत असेल बीपीचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी चिंटूचे सेवन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे त्यांचा बीपी हा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
  • चिंच खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे पातळ होण्यास मदत होत असते. शरीरातील रक्त हे व्यवस्थित व योग्य प्रकारे असेल तर त्यामुळे शरीरातील इतर कार्य देखील व्यवस्थित सुरळीत राहण्यास मदत होते.
  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही चिंचेचे सरबत करून प्यायला, तर त्यामुळे देखील तुम्हाला फायदा होत असतो शिवाय, चिंचेचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण देखील व्यवस्थित राहते अतिरिक्त उष्णता वाढत नाही. चिंचेचे सरबत करण्यासाठी पिकलेल्या चिंचा व्यवस्थित स्वच्छ धुऊन त्या एका भांड्यात स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवाव्यात. चिंचा या व्यवस्थित दिल्यानंतर त्यांना व्यवस्थित चुरगळून त्यापासून रस वेगळा काढून घ्यावा. म्हणजेच चिंचेचा कचरा व चिंचोक्या या साईडला काढून घ्यावा वरच व्यवस्थित एका बाजूला काढावा. त्यामध्ये तुम्ही गुळ किंवा साखर मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्या. अशाप्रकारे तुमचे चिंचेचे सरबत तयार होते.
  • चिंच ही थंड या प्रकाराची असते. त्यामुळे, आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण चिंचेचे सरबत प्यायल्याने कमी होण्यास मदत होत असते.
  • जर तुमचे शरीराचे वजन हे अतिरिक्त प्रमाणात वाढलेले असेल. शरीराची चरबी जास्त वाढली असेल वजन जास्त वाढलेले असेल तर त्यासाठी तुम्ही चिंचेचे सेवन केल्यास तुमचे वजन हे कमी होण्यास मदत होऊ शकते. चिंचा यामध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराचे वजन हे कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • चिंच खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला देखील त्याचा फायदा होऊ शकतो आपल्या शरीराची त्वचा ही स्वच्छ राहण्यास मदत होत असते शिवाय चिंचेचा वापरतो मी चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून देखील करू शकतात. चिंचेचा वापर हा फेसपॅक प्रमाणे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग निघून जाण्यास मदत होऊ शकते शिवाय, एक वेगळी चमक देखील येऊ शकते.
  • बऱ्याच लोकांना डोळ्यांविषयी समस्या निर्माण होत असतात. जसे की डोळे आग करणे, डोळे जळजळ होणे, डोळ्यात लाल पणा येणे इत्यादी प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तर यासाठी देखील तुम्हाला चिंचेचे फायदे होऊ शकतात. चिंचा यामध्ये विटामिन A चांगल्या प्रकारे असते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
  • काही लोकांना कोलेस्ट्रॉल की समस्या ही उद्भवत असते. जर तुम्हाला तुमच्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण असावे असे वाटत असेल, तर तुम्हाला चिंचेचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. चिंचेचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
  • चिंचा यामध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते. चिंच खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रमाणे वाढण्यास मदत होते. शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या शब्दाने असल्यामुळे अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
  • चिंचेचे सेवन केल्यामुळे तसेच, चिंचेच्या झाडाच्या पानांचा, चिंचे मधील बियांचा या सर्वांचे गुणकारी फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात.
  • चिंच खाल्ल्यामुळे आपल्याला भुकेवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
  • चिंचा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचा पाचकरस हा देखील चांगला राहतो म्हणजेच आपल्या शरीराची पचनसंस्था काही सुरळीत चालण्यास मदत होते. खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचनास मदत होते.
  • चिंचा खाल्ल्या मुळे आपल्या हृदयासंबंधी चे कार्य हे देखील व्यवस्थित चालू राहण्यास मदत होते.
  • अनेकजणांना केसा संबंधीचे त्रास उद्भवत असतात. जसे की केसांची गळती होणे केसांची वाढ खुंटणे केस निस्तेज दिसू लागणे इत्यादी सारख्या समस्या येत असतात. जर तुम्ही चिंचेचे सेवन करत असाल तर चिंच खाल्ल्यामुळे केस गळणे देखील बंद होऊ लागतात. शिवाय, केसांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते.
वाचा  आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

चिंचा खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात शिवाय चिंचा खाल्ल्या मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या शब्दाने वाढण्यास मदत होते. तसेच भाज्या आमटी अथवा डाळीचे वरण बनवण्यासाठी आपण चिंचेचा वापर केला तर त्यामुळे त्यांना विशेष चव येत असते. ज्यामुळे जेवण अजून स्वादिष्ट व रुचकर पौष्टिक बनण्यास मदत होते.

चिंच खाल्ल्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा आपल्या शहराला होत असतात परंतु अति प्रमाणात चिंच खाल्ल्यामुळे शरीराला नुकसान देखील येऊ शकतात. तर चिंच खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे तोटे शरीराला होऊ शकतात, याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

चिंच खाण्याचे होणारे तोटे:-

चिंच नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. चिंचेची चव ही गोड आणि आंबट अशा प्रकारची असते. परंतु निसर्गनियमानुसार चिंच याचे सेवन आपण मर्यादित करणे उत्तम ठरते. जर चिंचेचे तुम्ही अति प्रमाणात वापर केला अति प्रमाणात चिंचेचे सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील होऊ शकते,तर ते कोणतेही आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • चिंच अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्याला खोकला लागण्याची समस्या येऊ शकते. तसेच जास्तीत जास्त चिंच खाल्ल्यामुळे आणि त्यावर पाणी मिळाल्यामुळे लवकर खोकला लागतो.
  • जास्तीत जास्त चिंच खाल्ल्यामुळे आपल्याला कशा संबंधित समस्या देखील येऊ शकतात जसे की,घसा खवखव करणे, घसा बसणे इत्यादी प्रकारचे समस्या येऊ शकतात.
  • अतिप्रमाणात चिंचा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम्लाची समस्या देखील निर्माण होऊ शकते. शरीरातील पित्ताचे प्रमाण देखील वाढू शकते.
  • अतिप्रमाणात चिंच खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेला सूज येण्याची समस्या देखील येऊ शकते शिवाय, त्वचेला एक प्रकारचे ऍलर्जी येऊ शकते.
  • चिंच ही जास्तीत जास्त खाल्ल्यामुळे महिलांना देखील अनेक समस्या येऊ शकतात. अति प्रमाणात चिंच खाल्ल्यामुळे मासिक धर्माच्या वेळी त्रास होण्याची शक्यता असते.
  • चिंच हे जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे श्वासाच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
वाचा  उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे

मित्रांनो, चिंच खाल्ल्यामुळे तर अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होतच असतात. शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या पटीने वाढण्यास मदत होत असते. परंतु, कुठल्याही गोष्टीचे आपण मर्यादितच सेवन करायला हवे. जर चिंचेचे तुम्ही जास्तीत जास्त अतिप्रमाणात सेवन केले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते. म्हणून चिंचेचा वापर हा तुम्ही मर्यादेतच करायला हवा.

तर मित्रांनो, वरील प्रकारे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here