दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो

0
2719
दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो
दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो

नमस्कार, हल्ली दाढ दुखी ची समस्या भरपूर बघावयास मिळत आहे. कारण आपण आपल्या दातांची काळजी घेत नाही. आपण आपले दात दोन वेळेस घासत नाही.  जेवण केल्यावर चूळ भरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दात दुखी, दाढ दुखी, तसेच दातांना कीड लागणे, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच थंड पदार्थ खाणे, कडक पदार्थ खाणे,  गोड पदार्थ खाणे, चॉकलेट खाणे, जास्त प्रमाणात थंड पाणी पिणे, यासारख्या पदार्थांमुळे आपल्या दातांवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या दातांना कीड लागते, आणि दात दुखतात. दाढ काढण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो, आपण आपल्या दातांची योग्य काळजी घेतली पाहिजे, ही गोष्ट पूर्वी लहान मुलांना सांगावी लागत होती.

पण आता ती मोठ्यांनाही सांगावी लागते, त्यामुळे आपण कृपा करून आपल्या दातांची योग्य काळजी घ्या. कारण दाताचे दुखणे फार कठीण असते, त्याच्या असह्य वेदना होतात, त्याच्या मुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो, डोळ्यांचे त्रास होऊ शकतात, तसेच डोकेदुखी सारख्या समस्या होऊ शकतात. मग अशावेळी दाढ काढणे, हाच पर्याय असतो. पण आपण घाबरतो, आपल्या मनात एक भीती असते, की आपल्याला सारखे सारखे दवाखान्यात जावे लागते, आणि तेथे दुखापत करून घ्यावी लागते. अशी भीती मनात घुसल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो, पण त्याच्या प्रभावी आपल्या दातांमध्ये व दाडचे दुखण्यामध्ये इन्फेक्शन, वाढून आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्याला डोकेदुखी डोळ्यांची आग होणे, तसेच गाल सुजणे, जबडा सुजणे, डोके दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण बघणार आहोत, दाढ काढायला किती खर्च येतो, व कशी काढतात.  कोणत्या वेळी काढतात, चला तर मग बघुयात ! 

दाढ काढण्याची कारणे ? 

अनेक कारणांमुळे दाढ काढावे लागू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • दाढ मध्ये असह्य वेदना होत असतील, तर दाढ काढावी लागतील. 
  • दाढी मध्ये कीड लागली असेल, अशा वेळी रूट कॅनल करता येत नसेल, तेव्हा  दाढ काढावी लागते. 
  • दाढ चे तुकडे – तुकडे असतील, अशावेळी तिला काढावी लागते. 
  • ज्यावेळी  कोपऱ्यातल्या दाढ वाढण्यासाठी, जागा मिळत नसेल, व ती तुमच्या हिरड्यांमध्ये घुसत असेल, अशा वेळी तिथे असह्य वेदना होतात, तेव्हा तिला काढावी लागते. 
  • दाढ च्या बाजूला जर प्रत्येक वेळी जेवण अडकत असेल, त्यावेळी हिरड्यानां सूज येऊन वेदना होत असेल, अशावेळी ती दाढ काढावी लागते. 
  • जर तुमची दाढ ही वाकडी असेल, आणि ती दुसऱ्या दातांना त्रास देत असेल, अशावेळी ती दाढ काढावी लागते. 
वाचा  केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय

दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो? 

अनेक वेळा लोकांना ऑपरेशन करायला भीती वाटते, त्यांना असे वाटते की घर बसल्या हा खर्च आहे, त्यावर ते काही घरगुती उपाय करतात, आणि ते उपाय करूनही त्यांना फरक पडत नसेल, अशा वेळी ते स्वतः डॉक्टरांकडे जातात. मग अशावेळी आपल्याला माहिती नसते, की दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो? व कोणत्या प्रकारे येतो? ते आज आपण जाणून घेऊया, चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • दाढ काढण्यासाठी येणारा खर्च हा आपल्या दाढ दुखण्यावर अवलंबून असतो. ते आपली दाढ बघतात, तिला ती खोलवर किड असेल, तर त्याप्रमाणे त्याचे शस्त्रसाठा साठी लागणारे साहित्य यांचा खर्च पकडून, आपल्याला त्याचे माहिती देतात. 
  • जर तुम्ही दाढ काढण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेले, तर तुम्हाला सहसा 0 ते 100  रुपये इतका खर्च येतो. पण त्या प्रोसिजर ला खूप वेळ लागतो. 
  • जर तुम्ही दंत महाविद्यालयामध्ये गेले, तर तुम्हाला तुमची दाढ मोफत काढून मिळते. 
  • दाढ काढण्याचा खर्च हा हॉस्पिटल सुविधांवर ही असतो. 
  • दाढ काढण्यासाठी तुम्हाला 0 ते 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. 
  • जर तुम्ही मोठ्या स्पेशलिस्ट तज्ञांकडे गेला, तर तुम्हाला खर्चाचे प्रमाण वाढेल. पण त्यांच्याकडून तुमचे दातांचे योग्यरीत्या ऑपरेशन केले जाईल, याची काळजी ते घेतात. 

दाढ काढण्यासाठी ऑपरेशन कसे करतात ? 

अनेक लोक दात व दाढ काढण्याचे च्या बाबतीत दवाखान्यात जायला खूप घाबरतात. पण तसे करू नका. दातांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास, तुम्हाला दातांमध्ये  दुखणे मध्ये इन्फेक्शन वाढण्याचे प्रमाण होते. अशावेळी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे दाखवावे, आणि ट्रीटमेंट करून घ्यावी. 

  • दाढ काढण्यासाठी तुम्हाला डेंटिस्ट च्या दवाखान्यात जावे लागते. 
  • तेथे गेल्यावर दाढ किती किडली आहे, किंवा कितपत तुम्हाला त्रास देते, हे त्याचे सर्वेक्षण केले जाते. 
  • त्यानंतर ते तुमच्या दाढ चा एक्स-रे काढतात. 
  • एक्स-रे मध्ये तुमची दाढ किती खोलवर आहे, ते दिसून येते. 
  • त्यानंतर जर तुमची दाढ कमी किडली असेल, तर तिथे रूट कॅनल हा पर्याय आहे. रूट कॅनल करून, मग तेथे क्याप बसवली जाते. 
  • दाढ काढायचे ठिकाणी तेथे, तुम्हाला भूल देऊन, दाढ हळू हळु काढण्याचा प्रयत्न करतात. 
  • जर तुमची दाढ किती खोलवर किडली असेल, आणि तिचे निघणे अशक्य असेल, त्यावेळी ते तुमच्या दाढचे तुकडे-तुकडे करून, ती बाहेर काढून टाकतात. 
  • दाढ निघत नसेल, तर ते तुमच्या हिरडी जवळचे हाड थोडें कापून, तेथे टाके पाडून ती दाढ काढली जाते. 
  • या संपूर्ण प्रक्रियेला एक तास तरी लागू शकतो. 
  •  दाढ काढलेल्या ठिकाणी जे टाके असतात, ते सात ते आठ दिवसानंतर काढले जातात. 
  • त्यानंतर ते तुमच्या तोंडातील लाळ ही कापसाच्या बोळ्याने पुसून, हळु बाहेर थुंकी काढावी. 
  • मग घरी आल्यावर तुम्ही तुमच्या दाढीची व दातांची योग्य काळजी घ्यावी. 
  • ही सर्जरी तुमची दवाखान्यात केली जाते. 
वाचा  लहान बाळाचे कान फुटणे

दाढ काढल्यानंतर घ्यावयाची काळजी ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की तुमची दाढ कोणत्या कारणांमुळे किडते, तसेच दाढ किडल्यावर तिची शस्त्रक्रिया कशी, व कोणत्या प्रकारे करतात, ते सांगितले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, की दाढ काढल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर, घरी आल्यावर कोणती काळजी घ्यावी, चला तर मग जाणून घेऊयात. 

  • शस्त्रक्रिया करून घरी आल्यावर, अर्धा ते एक तासाने तुमच्या दाढीला भूल दिलेली असते, ती उतरल्यावर फार वेदना होतात. अशावेळी तुम्ही घाबरून जाऊ नका. 
  • घरी आल्यावर तुम्ही दोन ते तीन तास काही खाऊ नका. 
  • डॉक्टरांनी दिलेले पिन किलर च्या गोळ्या वेळेवर घ्यावे. 
  • दोन ते तीन तासानंतर हळूहळू पाणी प्या. 
  • दाढ काढल्यानंतर तुमच्या जबडा हा चार ते पाच दिवस सुजलेला असतो, अशावेळी तुम्ही थंड पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने बाहेरील जबड्याला शेक द्यावा. 
  • दाढ काढल्यावर जो रक्तस्राव होतो, तो हळू तोंडातून बाहेर फेकून द्यावे, तो गिळू नये. 
  • जास्त बोलणे टाळावे. 
  • आहार घेताना अगदी पातळ पेज, सारखा आहार घ्यावा. 
  • चपाती, भाकरी खाऊ नका. त्याने तुमच्या दाड च्या दुखणयावर परिणाम होईल. 
  • थंड आईस्क्रीम खा. 
  • दूध हळद पिऊ शकतात. 
  • दाढ काढत असताना,  हिरड्या जवळील थोडे हाड काढून, ती दाढ काढावी लागते. अशा वेळी तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर जबड्याचा व्यायाम करावा. 
  • दोन दिवसानंतर कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. 
  • फळांचा ज्यूस घेऊ शकतात. 
  • अमली पदार्थांचं सेवन टाळावे. 
  • हिरव्या पालेभाज्यांचे सूप द्यावे. 

टीप:-  ज्यावेळी तुम्ही दाढ काढून येतात, त्यावेळेस तुम्हाला एक दिवस जास्तीत जास्त वेदना होतात. जर तुमच्या वेदना या तीन ते चार दिवसाचे वर प्रमाणात असेल, तर तुम्ही डॉक्टरांना ताबडतोब दाखवावे. तसेच तुमच्या दाढ मधून रक्त येण्याची क्रिया सतत सुरू असेल, तरीही तुम्ही डॉक्टरांना दाखवावे. शिवाय जर तुम्हाला डॉक्टरांचे औषधींचा त्रास होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना सांगून ते औषधी बदलून घेऊ शकतात. या सूचनांचे पालन करावे. 

वाचा  पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय काय आहे

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला दाढ कशी काढावी, कोणत्या कारणांमुळे दाढी ला कीड लागते, व दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो, ते सांगितले आहे. तसेच आम्ही तुम्हाला दाढ काढून, घरी आल्यावर काय काळजी घ्यावी, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here