नमस्कार, आज आपण बघुयात दारासमोर रांगोळी काढण्याचे फायदे. मित्रांनो, रांगोळी काढणे, हे अगदी पूर्वीच्या काळापासून प्रथा आलेली आहे. ही प्रथा अगदी पूर्वीच्या काळापासून त्यांच्या अंगणामध्ये काढायचे, रांगोळी काढणे म्हणजे एक शुभचिन्ह होय, प्रसन्नता होय, मनाला मोहून जाणारे होय, रांगोळी काढल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो, असे पूर्वज म्हणायचे. तसेच रांगोळी काढल्याने नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव आपल्या घरामध्ये पडत नाही, असे ते म्हणायचे. रांगोळी काढल्याने घरात शुभसंकेत येतात, असे म्हणायचे.
रांगोळी काढल्याने एखादा सण अगदी शोभुन दिसेल, असा असते. तसेच कोणतेही सणवार, कार्यक्रम, असल्यास रांगोळी काढल्याने, त्याला न्यारी शोभा येते. हल्ली वेगवेगळ्या डिझाइन्स निघालेले आहेत. रांगोळीचे वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत, हल्ली आर्टिफिशियल रांगोळी, पाण्यातील रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, तसेच रांगोळी ची मेहंदी मधील डिझाईन, फुलांचे डिझाईन, झाडांची डिझाईन, निरनिराळ्या प्रकारे रांगोळीचे प्रकार आहेत, आणि त्यांना कलर भरून त्याचा शोभा वेगळी येते. तर आज आपण रांगोळी काढल्याने, आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात? त्या बाबतीत जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
रांगोळी कुठे कुठे काढतात ?
मित्रांनो रांगोळी काढणे म्हणजे शुभ चिन्ह होय. तसेच रांगोळी अगोदर आपल्या देव घरापासून सुरुवात होते, देवघरामध्ये रांगोळी काढल्याने प्रसन्नता राहते. तसेच नंतर दरवाजाच्या उंबरठ्यावर रांगोळी काढतात. उंबरठा नंतर दाराबाहेर गायीच्या पावलांनी रांगोळी ची सुरुवात करतात. नंतर तुळशीजवळ रांगोळी राहते. तसेच काही जण बाहेर मोठ्या अंगणात काढतात. त्यामुळे घराला घरपण येते. तसेच कोणतेही शुभ कार्य असो, त्यामध्ये रांगोळी काढतात. मंदिरांच्या बाहेर रांगोळी काढतात. तसेच कोणत्या पालखीचे आगमन होते, त्यावेळी पालखीच्या पाय वाटेत रांगोळीने त्यांचे स्वागत करतात.
तसेच कोणी पुढारी नेते येतात, तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही रांगोळी काढली जाते. तसेच महीला वर्गाचा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम राहिल्यास, अंगणामध्ये मोठी रांगोळी काढली जाते. तसेच नवीन बाळाचे आगमन ज्यावेळी घरी होते, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते. रांगोळी वेगवेगळ्या कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, प्राकृतिक, कार्यक्रमांसाठी काढली जाते.
रांगोळी कशी तयार करतात ?
रांगोळी ही एका दगडापासून तयार होते. त्या दगडाला डोलोमाइट, शिरगोळे असेही म्हणतात. या दगडाला अगोदर एका मोठ्या भट्टी मध्ये जाळतात. त्यानंतर त्याला बारीक कुटतात, त्यानंतर त्याला चाळणीच्या सहाय्याने किंवा वस्त्रगाळ कापडाने गाळून घेतात. अशाप्रकारे रांगोळी तयार होते. तसेच ती पांढरा रंगाचे असते. त्यानंतर तिच्या मध्ये कलर टाकून, तिला कलरफुल रांगोळी तयार करतात.
रांगोळीचा इतिहास :
मित्रांनो, रांगोळीचा इतिहास हा पूर्वीच्या काळापासून आहे. रांगोळीचा इतिहास हा रामायण, महाभारत, तसेच वेद, या ग्रंथांमध्ये केलेला आहे. त्यावेळी ते कोणतेही सण, पुजा, अभिषेक, देवतांचे जन्म, तसेच देवतांच्या जेवणाच्या ताटाभोवती, देवतांच्या स्वागतासाठी, फुलांनी रांगोळी काढायचे. म्हणजे फुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम करून, देवांचे स्वागत करायचे. तसेच राज्यांची राज्याभिषेक राहायचे, त्या वेळी संपूर्ण राहत राजवाडा हा फुलांनी सजवायचे.
तसेच देवतांची विवाह व्हायचे, तेव्हा सगळीकडे फुलांच्या, धान्यांच्या वेगवेगळ्या पाकळ्यांच्या रांगोळीने शोभा करायचे. तसेच होमहवन असल्यास, फुलांनी वेगवेगळ्या प्रकारे डिझाइन्स करून, सखी हे देवांची स्वागत करायचे. तसेच ते वेगवेगळ्या प्रकारचे धान्य घेऊन, नक्षीकाम करून देवांसमोर रांगोळी मांडायचे. त्यामुळे त्यांच्या मनाला एक प्रसन्नता वाटायची.
पूर्वी लोक रांगोळी कशी काढायचे ?
पूर्वीचे लोक रांगोळीही अंगणात काढायचे, त्यावेळी ते अंगणामध्ये पाण्याचा सडा मारायचे, त्यानंतर गायीच्या शेणाने अंगण शुद्ध करायचे, ते सुकल्यावर ते रांगोळी काढायचे. तसेच लाल कलरचा गेरू येतो, त्या गेरूने ते अंगणना मधील रांगोळी ची जागा गेरू ने सारवायचे. मग त्याच्यावर पांढरा कलरची रांगोळी काढायचे. त्यामुळे रांगोळी अगदी शोभून दिसायची. तसेच पूर्वीचे लोक हे मातीच्या घरामध्ये राहायचे, त्या वेळी ते घरालाही शेणाने सारवायचे, तसेच गेरू कापसाच्या बोळ्याने लावायचे आणि घराच्या भिंतींवर पांढरे रांगोळीच्या डिझाईन, भिंतींवर काढायचे. त्यामुळे घर अगदी सुशोभित दिसायचे.
पण आता हल्ली नवीन नवीन प्रकारचे स्टाईल्स मार्केटमध्ये आलेले आहे, मग आपण त्या स्टाइल्स वर रांगोळी काढण्यापूर्वी, लाल गेरूने सारवून, त्यावर रांगोळी काढली, तर तुमच्या रांगोळीला शोभा येईलच. पण तुम्हाला गेरू आवडत नसेल, तर तुम्ही पांढरी रांगोळी काढून, त्यावर कलर भरल्यासही शोभा येते.
रांगोळी काढण्याचे प्रकार :
रांगोळी काढण्याचे प्रकार खूप निरनिराळे आहेत, पूर्वीचे लोक रांगोळी ही फुलांच्या पाकळ्यांचा डिझाईन मध्ये काढायचे, त्यानंतर देवांचे प्रतीक, स्वस्तिक, ओम, लक्ष्मीचे पादुका, देवतांच्या पादुका, तसेच सरस्वती, गाईचे पाऊल, शंख, शिवलिंग, त्रिशूल, चांदणी, टिळा, नवग्रह रांगोळी, तसेच वेगवेगळे ग्रह, गणपती, यासारख्या वेगवेगळ्या प्रकाराने रांगोळी काढायचे. आता संस्कार भारती रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारे काढले जाते.
तसेच मेंदीचे डिझाइन्स मध्येही रांगोळीचे प्रकार काढले जातात, तसेच पाण्यामध्ये रॉकेल टाकून त्यावर रांगोळी काढली जाते, तसेच काही जण गालिचा च्या स्वरुपात रांगोळी काढतात. तर काही जण उगवता सूर्य उगवता, निसर्ग, यासारखी रांगोळी काढतात. तर काहीजण आता हळदी कुंकाचे डिझाईन्समध्ये रांगोळी काढतात, मंगळसूत्राची रांगोळी काढतात. तसेच कमळाचे फुलांचे वेगवेगळ्या रांगोळी काढतात. तसेच कार्टून्स, एखाद्या नेत्याचे, अभिनेत्याचे, थोर व्यक्तींचे, थोर स्त्रियांचे, प्रकार रांगोळी मध्ये काढतात.
वास्तुशास्त्राप्रमाणे रांगोळी काढल्याने होणारे फायदे ?
मित्रांनो, वास्तुशास्त्राप्रमाणे घरासमोर तसेच दारासमोर घरात रांगोळी काढणे, अत्यंत शुभ मानले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार रांगोळी काढणे म्हणजे घरात सुखाचे आगमन होय. तसेच घरात लक्ष्मीचा वास होय. रांगोळी काढल्याने दुःख, पीडा या नाहीशी होतात. तसेच रांगोळी काढल्याने मन आनंदी होते. तसेच रांगोळी काढल्याने प्रसन्नता वाटते. तसेच दारासमोर रांगोळी काढल्याने बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव घरामध्ये येत नाही.
त्यामुळे घरात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, नांदू, लागते. तसेच दारात रांगोळी काढल्याने जर कोणी बाहेरून येणाऱ्याच्या मनात वाईट विचार असले, आणि घरात प्रवेश करताना, रांगोळी नजर गेल्यास, त्यांच्या मनातील विचार ते निघून जातात. तसेच ज्या घरात रांगोळी दारासमोर नियमित काढले जाते, त्या घरात सुखाचा वर्षाव होत राहतो.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दारासमोर रांगोळी काढल्याने, तुम्हाला कोणत्या प्रकारची फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेला लेख तुम्हाला आवडला असेल, व आम्ही सांगितलेल्या लेखामध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर मित्रांनो तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये, जरूर कळवावेत.
धन्यवाद !