डोक्यात फोड व गाठ येणे कारणे व उपाय

0
8418
डोक्यात फोड व गाठ येणे कारणे व उपाय
डोक्यात फोड व गाठ येणे कारणे व उपाय

 

नमस्कार, हल्ली धावपळीच्या युगात आपण आपल्या स्वतःकडे व आपल्या केसांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे, केमिकल्सचा वातावरणात राहिल्यामुळे, धुळीमुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. जसे की डोक्यात फोड येणे, खाज येणे, खुजली होणे, फोड होऊन ते फुटणे, डोक्यात लालसरपणा येणे, यासारख्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात. डोक्यात फोड येणे याला फॉलिक्युलायटीस असेही म्हणतात. त्यामुळे तुमच्या डोक्यात गाठ होऊन फोड होतात, आणि त्या जागेवर होते जळजळ होते. मग डोक्यात फोड व गाठ होणे, हे कोणत्या कारणांमुळे होते ? ते आपण जाणून घेऊयात ! 

डोक्यात फोड व गाठ येण्याची काही कारणे

आता आपण डोक्यात फोड व गाठ येण्याची काही कारणे, जाणून घेऊयात! 

  •  अति केमिकलस युक्त हेअर प्रॉडक्ट, चा वापर केल्यामुळे, 
  • धुळीमुळे, प्रदूषणामुळे, 
  • जर तुमची त्वचा ही कोरडी असेल, त्यामुळे हे डोक्यात फोड व गाठ होते. 
  • अति सुगंधित ऑइलचा वापर केल्यामुळे, ही केसांमध्ये फोड आणि गाठी होण्याच्या समस्या होऊ शकतात. 
  • तेलकट, मसालेदार पदार्थ जास्त, खाल्ल्यामुळे. 
  • डोक्यात फोड व गाठ होण्याची समस्या, हिवाळ्यात जास्त प्रमाणात होते. कारण थंड हवेचा परिणाम आपल्या , केसांवर आणि डोक्याच्या स्किन वर होतो.    
  • केसांमध्ये अतिप्रमाणात डँड्रफ झाल्यामुळे, ही डोक्यात खाज व गाठी होतात.      
  • केसांमध्ये उवा झाल्याने, जास्ती प्रमाणात डोके खाल्ल्यामुळे, नख लागून डोक्याला इजा पोहोचून, डोक्यात गाठ होण्याच्या समस्या होतात. 
  • तसेच तुम्हाला खाण्यामध्ये कशाची ऍलर्जी असेल, तर यासारख्या समस्या होऊ शकतात. 
  • हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण शरीरात कमी झाल्यामुळे, ही डोक्यात खाज खुजली होऊ शकते. 
  • ज्यांना सोयरासिस चा त्रास आहे, अशा लोकांना ही डोक्यात फोड व गाठ होऊ शकते. 
  • तसेच त्वचेचा कॅन्सर मुळे, ही डोक्यात फोड गाठ होतात. 
वाचा  स्वप्नात सत्यनारायण पूजा दिसणे शुभ की अशुभ

डोक्यातील फोड व गाठ जाण्यासाठी काही घरगुती उपाय

आता आपण वरील दिलेल्या माहितीमध्ये, डोक्यात फोड व गाठ का येतात? याची कारणे सांगितलेले आहेत. आता त्यावर काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात ! 

डोक्यातील फोड व गाठ जाण्यासाठी

हळदीचा वापर करून बघा :

हळदी मध्ये अँटीबॅक्टरियल, अँटीव्हायरस ऑंटीसेफ्टीक गुणधर्म असतात. जर तुमच्या डोक्यात फोड व गाठ होऊन जखमा होत असतील, अशा वेळी तुम्ही कोमट पाण्यात हळद घेऊन, ती गरम करून थोडी कोमट झाल्यावर, केसांमधील गाठ व फोड्या भागावर लावावे. त्याने तुमच्या जखमा लवकर भरून निघतात. 

डोक्यातील फोड व गाठ जाण्यासाठी

खोबरेल तेलाचा वापर करून बघा :

हिवाळ्यामध्ये डोक्याची स्किन ही कोरडी पडते. मग डोक्यात कोरडेपणा आल्यामुळे, डोक्यात खाज व फोड येण्याच्या समस्या होतात. मग अशावेळी जर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला, तर तुम्हाला फायदा होईल. खोबरेल तेल हे तुम्हाला रात्री झोपताना कोमट करून, डोक्यावर फोड व गाठ असलेल्या ठिकाणी, त्याने मसाज करायचा आहे. पाच ते दहा मिनिटात हळूवारपणे मसाज करून, सकाळी कोमट पाण्याने केस धुवावेत. असे तुम्ही दोन ते तीन हप्ते केल्यास, तुम्हाला फरक जाणवेल. 

डोक्यातील फोड व गाठ जाण्यासाठी

कडुलिंबाची पाने वापरून बघा :

 कडुलिंब हा आयुर्वेदिक वनस्पती आहे. ज्या वेळी तुमच्या शरीरावर, तसेच डोक्यात कसलेही इन्फेक्शन झाले, अशा वेळी जर तुम्ही कडूलिंबाची पाने ही गरम पाण्यात उकळून, त्या पाण्याने अंघोळ केली. तर तुम्हाला कोणत्याही फंगल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता मिळते. तसेच जर तुमच्या डोक्यात गाठ असतील, अशा वेळी जर तुम्ही कडू लिंबाच्या पानांचा लेप करून डोक्याला लावला, तर तुम्हाला यासारख्या समस्या वर मिळेल. लेप  कसा तयार करावा, तर कडूलिंबाची पाने + त्यात चिमूटभर हळद हे मिक्सरमध्ये दळून, त्याची पेस्ट तुमच्या डोक्यात गाठ व  पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावावे, असे तुम्ही हप्त्यातून दोन वेळेस ट्राय करू शकतात. बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल, अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. 

वाचा  पडवळचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

अँटीबॅक्टरियल सोप वापरून बघा :

हो, जर तुमच्या डोक्यात गाठ व खुजली व फोड यासारख्या समस्या असतील. अशा वेळी जर तुम्ही अंतीबॅक्टरियल सोप वापरला. तर तुम्हाला त्याने फायदा होईल. पण जर तुम्ही अंतीबॅक्टरियल सोप घेणार, तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे, त्याने तुम्हाला फरक जाणवेल. 

कापूर चा वापर करून बघा :

ज्यावेळी तुमच्या केसांमध्ये उवा व लिखा असतील, अशा वेळी जर तुम्ही कापूर आणि खोबरेल तेल  कोमट करून, केसांच्या मुळाशी लावल्यास, केसांमधील उवा व लिखा नष्ट होण्यास मदत मिळते. जर तुमच्या केसांमध्ये उवा आणि लिखा असतात, अशावेळी तुम्ही डोक्यात सारखे सारखे खाजवून खाजवून तुम्हाला गाठ व फोड यासारख्या समस्या होतात. म्हणून जर तुम्ही खोबरेल तेल व कापूर चा वापर हा हप्त्यातून दोन वेळेस केल्यास, तुम्हाला फरक जाणवेल. 

कोरफडचा गर वापरून बघा :

हो, कोरफड ही प्रत्येकाच्या घराघरात तसेच दारात राहतेच. कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड चा वापर हा अगदी पूर्वीच्या काळापासून होतोय. कोरफड मध्ये औषधीय गुणधर्म भरलेले आहेत, ज्या वेळी तुमच्या डोक्यात खाज, खुजली तसेच कोंडा यासारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही कोरफडचा गर हा केसांना लावला, तर तुम्हाला त्याने अधिक फायदा होईल. शिवाय तुमच्या डोक्याची त्वचा ही मुलायम होईल, व केस ही मजबूत होतील. अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा. 

टी ट्री ऑइल चा वापर करून बघा :

टी ट्री ऑइल हे नैसर्गिक ऑइल आहे, जे तुमच्या केसांमधील कोरडेपणा तसेच फोड येऊन खाज व खुजलि येणे यासारख्या समस्यांवर त्वरित आराम देतो. त्यासाठी तुम्ही रात्री झोपतेवेळी डोक्याला टी ट्री ऑइल मसाज करा, त्याने तुम्हाला फरक जाणवेल. 

या व्यतिरिक्त तुम्ही कोणते तेल डोक्याला लावू शकतात :

जर तुमच्या डोक्यात गाठ फोड कोंडा खुजली, यासारख्या समस्या होत असेल, तर अशा वेळी अनेक जणांना प्रश्न पडतो, की डोक्याला कोणते तेल वापरावे? तर आम्ही तुम्हाला काही तेलांची नावे सांगितलेले आहेत, ते जाणून घ्या. 

  • खोबरेल तेल
  • निलगिरीचे तेल
  • लवंगाचे तेल
  • टी ट्री ऑइल
  • जास्वंदीच्या फुलाचे तेल
  • ओनियन ऑइल
  • राईचे तेल
  • ऑलिव्ह ऑइल
  • एरंडेल तेल
वाचा  बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे व उपाय

यासारख्या तेलाने जर तुम्ही तुमच्या डोक्याला मसाज केला, तर तुमच्या डोक्यातील स्किन ही कोरडी राहात नाही, व गाठ फोड येण्याच्या समस्यांवरही तुम्हाला आराम मिळू शकतो. 

  चला, तर मग आज आम्ही तुम्हाला डोक्यात गाठ येण्याची काही कारणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही जर तुमच्या डोक्यात अशा समस्या असतील, त्यावर कोणते तेल लावावे, ते ही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपचार करूनही, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील. तर आम्हाला आमच्या कमेंट मध्ये जरूर कळवावे. 

 

                         धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here