नमस्कार मित्रांनो जेवण कोणाला आवडत नाही. तेही आपल्या आवडीचे असल्यावर, त्याच्यामध्ये पंचपक्वान्न असल्यावर, आपल्या मनावर ताबा राहत नाही. अश्या वेळी आपण हे खाऊ का ते खाऊ, कावरेबावरे होऊन जातो. तसेच एखादा पदार्थ आपल्याला चवीला चांगला लागला, की आपण त्याचं प्रमाण वाढवतो. पोटात जागा नसताना ही गरजेपेक्षा जास्त आहार घेतो , की अक्षरशः आपल्याला चालायला ही जमत नाही. तर कधी कधी कोणा मित्राच्या आग्रहामुळे, आपण पण जबरदस्ती खातो, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसेच लहान मुलांचे ही असते, त्यांना त्यांच्या जेवणाचा प्रमाण माहिती नसते.
त्यामुळे ते जास्त खाऊन घेतात, तसेच खातांना जाडसर खातात, बारीक न चावता खातात. त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो. तसेच माझे लहानपणी होते, आई माझी पुरणाची पोळी करायची, त्यावेळी मी इसके खायची, की मला अक्षरशः चालायला व्हायचे नाही. मग पोटात दुखायचे, जास्त खाल्ल्यामुळे पोटात दुखते. आपली पचनक्रिया बिघडते. यासारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणत्याही आहार हा नियमात असावा. गरजेपेक्षा जास्त गोष्ट खाल्ल्यामुळे, आपल्याला त्याचा त्रास होतो. तर मित्रांनो आज आपण याच विषयावर जाणून घेणार आहोत, की गरजेपेक्षा आहार जास्त खाल्ल्यामुळे, तुम्हाला कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते? चला तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने, होणाऱ्या समस्या ?
मित्रांनो गरजे पेक्षा जास्त आहार घेतला, की तुम्हाला यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर मग त्या नेमक्या कोणकोणत्या? चला तर मग जाणून घेऊयात.
वजन वाढीस कारणीभूत ठरतात :
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त आहार घेत असाल, तर तुम्ही संभाळून घ्या. कारण तो एक धोक्याचा इशारा आहे. कारण गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे, तुमचे वजन वाढवू शकते. हो तुम्ही तुमचा आहार नियंत्रणात घ्यायला हवा. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने शरीरात पोटावर, मांड्यांवर, हाताखाली चरबीचे प्रमाण इतके वाढते, की आपल्याला खूप सार्या व्याधींना सामोरे जावे लागते. कारण तुम्ही व्यायाम ही करत नसाल, जेवण केल्यावर लगेच झोपत असाल तर या समस्या तुम्हाला होतात. तसेच वजन वाढल्यामुळे, तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी तुम्ही तुमचा आहार नियंत्रणातच घ्यायला हवा.
पचनाशी निगडित समस्या होतात :
हो, जर तुम्ही सारखे- सारखे खात असणार, तसेच प्रमाणाबाहेर खात असणार, तर तुम्हाला पचनाची निगडित समस्या होतात. कारण आपले अन्न पचायला वेळ मिळत नाही, आणि तुम्ही सारखे खाल्ल्यामुळे तुमच्या जठराग्नी मध्ये बिघाड होतो. ओव्हर लोड खाल्ल्यामुळे पचायला वेळ लागतो, अन्न पचन क्रिया ही मंदावते. अशावेळी तुम्हाला पोटात गॅसेस होणे, ढेकर येणे, पोट गच्च भरल्या सारखे वाटणे, ऍसिडिटी, पित्त यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तुम्ही तुमचा आहार नियंत्रणात घ्यावा. तुम्ही तुमचा आहार घेताना अगदी हलका व पचण्यास योग्य असा घ्यावा.
तुम्हाला कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही :
मित्रांनो कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ल्यास, आपल्याला त्याचे फायदे खूप होतात. पण त्याचे प्रमाण वाढले किंवा त्याचा जास्त वापर केला गेला, तर आपल्याला खूप साऱ्या समस्या होतात. तसेच आपले शरीर ही आहेत. त्याला कोणतीही गोष्ट प्रमाणात द्यायची. तुमच्या पोटात जेवढी जागा, तेवढेच, तुम्ही खायला हवे. एकदाचा जेवताना ढेकर आला, की तुमचं जेवण तिथेच थांबाववावे. पण जर तुम्ही जास्त खाल आणि त्याचे ओवरलोड झाले, तर तुमच्या शरीरात सुस्ती येते, आळस येतो, थकल्यासारखे वाटते, सारखे झोपावेसे वाटते. या गोष्टी तुमच्या होतात. व तुम्हाला कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. तुम्ही अगदी निरुत्साही बनून जातात. अशा वेळी तुम्ही तुमचा आहार घेताना तुमच्या पोटाला पुरेल इतकच घ्यावा.
स्त्रियांनी ही काळजी घ्यावी ?
मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या बाबतीत ही गोष्ट जास्त घडते. स्त्रियांची एक सवय असते, स्वयंपाक करताना जर जास्त प्रमाणात झाला, की तो संध्याकाळी शिळा खावा लागेल, या कारणाने ते जबरदस्ती खातात. तसेच फ्रीजमधले पदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ, मुलांचे ताटातले उष्टे काढून ते स्वतः खातात. त्यामुळे त्यांना वजन वाढीच्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. ओव्हरलोड पदार्थ खाल्ल्यामुळे स्त्रियांच्या शरीरात चरबीचे प्रमाण खूप दिसून येते, तसेच जेवण करताना ते त्यांच्या आहारात, फ्रीजमधले शिळे पदार्थ जास्त खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होते, त्यामुळे स्त्रियांनी त्यांचा आहार नेहमी योग्यरीत्या घ्यायला हवा. तुम्ही अन्नपदार्थ मोजकेच करायला हवेत. जास्त पदार्थ करून, ते जर तुम्ही, रात्री शिळे खायला लागायच्या धाकाने जास्त प्रमाणात खात असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर घातक ठरू शकतो.
चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की गरजेपेक्षा जास्त प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, तुम्हाला कोण कोणते त्रास होऊ शकतात. जर तुम्हाला खायचे असेल, तर गरजेपेक्षा जास्त न खाता, तुम्ही दिवसातून थोड-थोड खाल्ल्याने, तुम्हाला त्याचे फायदे होतील. पण ओवर लोड खाल्ल्याने तुम्हाला खूप समस्या होतात. तसेच स्त्रियांनीही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही एकदा डॉक्टरांनाही विचारून घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !