हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात?

0
487
हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात?
हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात?

नमस्कार मित्रांनो. या धावपळीच्या जगामध्ये अनेक जण कामाच्या धावपळीमुळे घाई गडबडीने घराच्या बाहेर पडत असतात. कुठलेही काम जर आपण अगदी सावध रीतीने केली तर अनेक प्रकारच्या दुर्घटनांपासून समस्यांपासून आपण दूर राहू शकतो परंतु काही वेळा नकळतपणे अचानक दुर्घटना होत असतात. कामाच्या धावपळीत वेळेच्या आधी पोहोचण्यासाठी गाडीचा स्पीड हा फास्ट असेल तर यामुळे अनेक दुर्घटना होत असतात अपघात होत असतात आणि यामुळे काही जणांचे हाडही फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तर कधी कधी लहान मुले देखील अगदी खेळता खेळता किंवा सायकल चालवता चालवता पडल्यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तर कधी मुका मार लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण व्यवस्थित काळजीने कुठलेही कार्य केले पाहिजे आणि तेही घाई गडबड न करता. जेणेकरून आपण या दुर्घटनांपासून या अपघातांपासून आपला बचाव करू शकतो. एखादी दुर्घटना झाल्यामुळे किंवा खाली पडल्यामुळे मुका मार लागण्याची शक्यता असते शिवाय ज्या ठिकाणी लागलेले आहे त्या ठिकाणी जागा प्रचंड दुखू लागते परंतु हाड फ्रॅक्चर झाले आहे की नाही हे देखील ओळखले पाहिजे जेणेकरून वेळेस आपला उपचार घेता येऊ शकतो. मित्रांनो, आज आपण हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात? आणि त्यावरील उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

हाड फ्रॅक्चर झालय, हे कसे ओळखतात? हाड फ्रॅक्चर होणे म्हणजे नेमके काय?

निष्काळजीपणामुळे, एखादा कामाच्या धावपळीत असल्यामुळे अनावधाने अपघात झाल्यामुळे अनेक प्रकारच्या कारणामुळे हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते हार्ड फ्रॅक्चर होणे म्हणजेच हाड मोडणे असे आपण म्हणू शकतो. एखादी दुर्घटना झाल्यामुळे अपघात झाल्यामुळे जर शरीराच्या एखाद्या ठिकाणी मार लागलेला असेल आणि त्या ठिकाणची जागा ही अत्यंत दुखत असेल, वेदना होत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांना दाखवले पाहिजे. काही वेळा आपण मुका मार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु, जर आपण योग्य वेळेस त्याकडे लक्ष देऊन त्याची तपासणी केली पाहिजे. हाय फ्रॅक्चर याचे तर अनेक प्रकार असतात. जसे की, कंपाउंड फ्रॅक्चर, क्लोज्ड फ्रॅक्चर, कॉम्प्रेशन फ्रॅक्चर, इम्पॅक्ट फ्रॅक्चर, ग्रीनस्टिक फ्रॅक्चर, एवलशन फ्रॅक्चर, कमिटेड फ्रॅक्चर, सर्पिल फ्रॅक्चर, बकली फ्रॅक्चर, ट्रान्सवर्स फ्रॅक्चर अशाप्रकारे वेगवेगळे प्रकारचे फ्रॅक्चरचे प्रकार आढळून येतात.

वाचा  लवंगाचे तेलाचा वापर केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे

मित्रांनो, फ्रॅक्चर हे नेमकं झालंय का, हे कसे ओळखावे? तर ज्या ठिकाणी मार लागलेला आहे त्या ठिकाणी जागाही अगदी दुखू लागते वेदना होऊ लागतात अगदी त्या जागेची हालचाल ही केली जात नाही तर अशा वेळेस आपण तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन मदत घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी दुखत आहे तर त्या ठिकाणी भाग डॉक्टर हे व्यवस्थित तपासणी करतात आणि खरंच फ्रॅक्चर आहे हे समजल्यास एक्स-रे देखील करायला सांगतात. जर दुखापत ही गंभीर स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर येणार आहे किंवा सिटीस्कॅन देखील करायला सांगू शकतील. म्हणून आपण वेळेत तपासणी करून घेतलेली बरी आणि त्यावर उपचार घेतलेले बरे.

हाड फ्रॅक्चर झालंय?
हाड फ्रॅक्चर झालंय?

हाड फॅक्चर झाल्यास दिसणारी लक्षणे:- Had Fracture Jhalyas Disnari Symptoms

हाड फ्रॅक्चर झालेले असल्यास त्यामुळे काही लक्षणे दिसून येतात जसे की,

  • त्या भागाची हालचाल करता येत नाही.
  • असाह्य या वेदना जाणवू लागतात.
  • त्या ठिकाणी जागेला सूज येऊ लागते.
  • ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणच्या सांध्यांमध्ये आवाज होऊ लागतो.
  • काही वेळा मळमळ होऊ लागते.
  • चक्कर येऊ लागतात.
  • जर ओपन फ्रॅक्चर असेल तर त्या ठिकाणाहून रक्तस्त्राव देखील होऊ शकते.

तर अशा प्रकारची हार्ड फॅक्चर झाल्यास लक्षणे दिसून येत असतात.

यावरील उपचार:- Yavril Upchar

हाड फ्रॅक्चर झाल्यास ते पूर्ववत होण्यास थोडा कालावधी लागत असतो. जर हाड हे अगदी गंभीर स्वरूपाचे फ्रॅक्चर झालेले असेल तर त्यावर ताबडतोब सर्जरी केली जात असते. हार्ड फ्रॅक्चर हे नेमके कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार त्यावर सर्जरी प्रक्रिया केली जात असते. सर्जरीनंतर तुम्हाला हात जुडण्यास काही कालावधी द्यावा लागतो. हाडाचे फ्रॅक्चर जोडल्यानंतर तुम्ही काही घरगुती प्रकारे उपचार देखील करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. जसे की हालचाल करणे वगैरे. मित्रांनो खरं तर हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर हाड जोडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. हलक्या स्वरूपाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्यास त्यावर पाटा देखील बांधला जात असतो. तो काही कालावधी पुरता ठेवला जातो जेणेकरून हाड हे नैसर्गिक रित्या जोडले जाते.

वाचा  कांद्याच्या रस चे फायदे

हाड फ्रॅक्चर झाले असल्यास अनेक प्रकारच्या सर्जरी या केल्या जात असतात. जसे की, हाडे जास्त प्रमाणात फ्रॅक्चर झालेले असल्यास त्यासाठी तुटलेले हाड हे स्क्रू व मेटल प्लेटच्या साह्याने जोडण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर कधी कधी तुटलेल्या हाडां ऐवजी बोन ग्राफ्टिंग देखील केली जातात.

जर हाताची बोट फ्रॅक्चर झालेली असतील तर त्यामध्ये धातूच्या हाडांचा रोड टाकला जातो किंवा बारीक तारांचाही यामध्ये वापर केला जातो. हाड फ्रॅक्चर झाल्यास सर्जरीनंतर ते पुन्हा पुरवत होण्यास जुळण्यास खूप कालावधी हा लागत असतो. शिवाय प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांचे हाड जुळण्याचा कालावधी हा देखील कमी अधिक प्रमाणे असू शकतो.

मित्रांनो, हाड फ्रॅक्चर होऊ नये, यासाठी आपण वेळीच काळजी घेतलेली बरी. शिवाय, कुठलेही कार्य आपण सावधगिरीने केलेले बरे. जेणेकरून, अशा अपघातांपासून दुर्घटना पासून आपण दूर राहू शकतो.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here