Table of Contents
घाम येण्यामागचे कारण नेमके काय ?
नमस्कार मित्रांनो, घाम येणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अनेक जणी नियमित व्यायाम करत असतात. व्यायाम केल्याने देखील घाम येत असतो परंतु तो आरोग्यासाठी चांगला असतो. उन्हाळ्यात आपण काम करत असतो तसेच वर्क-आऊट करत असतो हे करत असताना देखील आपल्याला घाम येत असतो. कुठले काम करत असो, वर्क-आऊट करत असो हे करत असताना घाम येणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. अनेकांना तर कामाचे धावपळीमुळे देखिल घाम येत असतो. काम करत असताना घाम येणे चांगले मानले जाते. परंतु काही लोकांना तर कुठलेही काम न करता कुठलीही धावपळ न करता कुठलाही वर्क आउट न करता देखील अतिशय घाम येत असतो.
पण मित्रांनो, कुठले काम न करता जर तुम्हाला घाम येत असेल तर हि एक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. घाम येणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आणले जाते परंतु, कुठल्याही पद्धतीचे काम न करता देखील अतिशय घाम येणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अधिक प्रमाणात घाम येणे याला हायपर हायड्रोसीस असे म्हणतात. ही स्थिती अशी आहे ज्यात आपण जास्त घाम गाळतात. म्हणून मित्रांनो काम केल्यामुळे घाम येत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु काहीही न करता घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही काम न करता येत असेल तर यामागे काय कारणे असतात तर ती कारणे नेमकी कोणती हे आता आपण जाणून घेणार आहोत.
जेवण करताना घाम येण्याची कारणे कोणती ?
मित्रांनो सहाजिकच आहे कोणतेही काम करताना घाम येणे चांगले मानले जाते. परंतु काहीही काम न करता काम जर येत असेल तर ते आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. काहीही काम न करता घाम येण्याची काही कारणे असू शकतात तर ती नेमकी कारणे कोणती हे खालील प्रमाणे जाणून घेऊया.
- विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम येऊ शकतो.
- हृदयाच्या झडपा मध्ये जळजळ यामुळे देखील घाम येऊ शकतो.
- हाडांची संबंधित संक्रमणे यामुळे देखील अतिप्रमाणात घाम येऊ शकतो.
- एचआयव्ही संसर्गामुळे देखिल घाम येतो.
- तणाव चिंता आणि भीती मुळे देखील अतिप्रमाणात घाम येत असतो.
- उपाशी राहून त्यानंतर खाल्ल्यानंतर साखरेची पातळी अचानक वाढते त्यामुळेदेखील घाम येतो.
- शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता तसेच रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यासही जेवताना घाम येतो.
- हायपर हायड्रोसिल ग्रस्त लोकांमध्ये घाम ग्रंथी अतिशय सक्रिय असतात. त्यामुळे, त्यांना अधिक प्रमाणात घाम येत असतो.
- जास्त वजनामुळे देखील घाम येतो.
- तसेच धूम्रपान केल्यास सुद्धा.
- गर्भधारणेमुळे, कॅफिन समृद्ध वस्तूंचा वापर जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे देखील घाम येतो.
- तेलकट अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने देखिल अधिक प्रमाणात घाम येत असतो.
मित्रांनो, वरील सर्व कारणांमुळे जर तुम्हाला सुद्धा जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका यासाठी योग्य ते उपचार तुम्ही घ्यायला हवेत. नाम हे जास्त प्रमाणात देऊ नये म्हणून काही उपचार केले पाहिजे तर हे उपचार नेमके आपण कोणत्या प्रकारे करू शकतो या विषयात आपण जाणून घेणार आहोत.
जेवताना घाम आल्यास काय करावे ?
घाम येणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. परंतु काही न करता, कोणतेही काम न करता किंवा जेवण करताना जर काम अतिशय घाम येत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घेतले पाहिजे. योग्य त्या पद्धतीने अवलंबिले पाहिजे. अतिप्रमाणात घाम येणे धोकादायक ठरते. कारण यामुळे शरीरातील जलतत्त्व व क्षार झपाट्याने कमी होऊन प्रचंड थकवा, अंग गळून जाणे चक्कर क्वचितप्रसंगी बेशुद्धी सुद्धा येऊ शकते. जर तुम्हाला देखील जास्त प्रमाणात घाम येत असेल तर तुम्ही यासाठी काय केले पाहिजे या विषयात आपण जाणून घेऊया.
- तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करा.
- जर तुम्हाला हार्मोनल बदल झाल्यामुळे तसेच गर्भधारने दरम्यान अधिक घाम येत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा व योग्य तो उपचार घ्या.
- साधा टोमॅटोचा रस, ग्रीन टी, गहू व ज्वारी खा या मुळे जास्त घाम येणे कमी होते.
- तुम्ही उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या.
- उन्हाळ्यात भरपूर पाणी पिल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणार नाही.
- आहारात तेलकट व जास्त तूप पदार्थांचा वापर करणे टाळावे.
- उन्हाळ्यात सुती कपडे घाला जेणेकरून घाम सहज शोषला जाऊ शकेल.
- लिंबू पाणी नियमित पिले पाहिजे.
- या शरीरात मिठाचा अभाव नाही शरीराच्या त्या भागात जास्त घाम येतो. तर अशा ठिकाणी बटाट्याचे तुकडे घासून घ्या.
- दररोज एक कप ग्रीन टी प्या.
- अधिक स्निग्ध असलेल्या गोष्टी खा.
- आहारात द्राक्षे, स्ट्रॉबेरी, बादाम यांचा नियमित समावेश करा.
- याशिवाय आंघोळीचे वेळी अनंत, ज्येष्ठमध, चंदन, वाळा इत्यादी शीतल व सुगंधी द्रव्ये मिश्रित उटणे किंवा तयार सन मसाज पावडर यांचा वापर करून बघा. नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला जाणवून येईल.
तर मित्रांनो काम न करता जर घाम येत असेल तर तुम्ही वरीलप्रमाणे उपाय करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात विटामिन ची कमतरता पूर्ण करणारे आहार यांचा समावेश केला पाहिजे. फळांचा देखील समावेश केला पाहिजे. लिंबू पाणी नियमित घेतले पाहिजे. तसेच शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित केली पाहिजे. पण मित्रांनो जर जास्तच घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घाम येणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु,कुठले ही काम न करता घाम येणे तसेच जेवताना घाम येणे हे आरोग्यासाठी हानीकारक ठरते. यासाठी तुम्ही नक्की उपचार घेतले पाहिजेत. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद !