नाचणी चे फायदे

0
1365
नाचणी चे फायदे
नाचणी चे फायदे

नमस्कार मित्रांनो, आपल्या आहाराच्या दृष्टीने आपण अनेक पदार्थ बनवत असतो. आपल्याला आहारातून सर्व प्रकारचे घटक पोषकतत्व विटामिन्स मिळावेत यासाठी यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. जर आपण पूर्ण आहार हा व्यवस्थित घेत असतो तेव्हा आपणास सर्व प्रकारचे विटामिन्स पोषकतत्व मिळत असतात. मित्रांनो पापड बनवणे ही तर फार जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे. पापड यांचे विविध प्रकार देखील असतात. जसे की तांदळाचा पापड, गव्हाचा पापड, उडदाचा पापड आणि नाचणीचा पापड अशा विविध प्रकारचे पापड आपण बनवत असतो. तसेच ते जेवणासोबत खाल्ल्याने रुचकर तर लागतातच शिवाय त्यातून अनेक पोषक घटक आपला मिळत असतात तर मित्रांनो नाचणीचे पापड हा तर अगदीच पौष्टिक असतो. नाचणी चे फायदे हि भरपूर आहेत.

यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात आणि त्याचे विशिष्ट प्रकारचे गुणधर्म देखील असतात. मित्रांनो, नाचणी हा प्रकार का सर्वांनाच माहित असेल. बरेच जण नाचणीची भाकरी देखील बनवून खात असतात. तसेच काही जणांना नाचणीचे पापड खायला आवडत असतात. नाचणीचे पापड बनवताना चे पीठ तयार करत असतात तरच काहीजण नाचणीचा घाटा असे देखील म्हणतात. तर हा नाचणीचा घाटा देखील खायला छान लागतो. नाचणीच्या घाटामध्ये काहीजण नमक चटणी आणि तेल टाकून खात असतात त्यामुळे, त्याची चव देखील छान लागते. तर मित्रांनो नाचणी खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात.

नाचणी हे पौष्टिक असते. अगदी लहान मुलांना देखील नाचणी सत्व दिले जात असते. नाचणी मुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. पूर्वीच्या काळी देखील अनेक जण नाचणीच्या भाकरी, नाचणीचे पदार्थ करून खात असे. आताही बरेच लोक नाचणी आवर्जून खात असतात. तर मित्रांनो आज आपण नाचणी चे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, नाचणी चे फायदे आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतात ? तसेच नाचणीचा आपण कशाप्रकारे आहारामध्ये समावेश करू शकतो? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

नाचणी चे फायदे

मित्रांनो, गहू, तांदूळ, ज्वारी, दादर, बाजरी अशा प्रकारचे धान्य तुम्हाला तर माहीतच असेल. शिवाय, त्यातीलच एक प्रकार म्हणजेच नाचणी होय. बरेच लोकं नाचणीची भाकर देखील खात असतात. तसेच आरोग्यासाठी देखील चांगले ठरत असते. तर मित्रांनो नाचणीचे अजून कुठल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आता जाणून घेऊयात !

  • नाचणीची भाकर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. जर शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असेल तर अशा वेळेस नाचणीची भाकरी खाणे उपयुक्त ठरत असते.
  • जेवण करण्यावरही नाचणीचे पापड देखील आवर्जून खायला हवा यामुळे देखील अनेक पोषक घटक तत्त्व आपल्याला यातून मिळत असतात.
  • लहान मुलांना देखील नाचणी सत्व दिले पाहिजे. यामध्ये कॅल्शियम चे प्रमाण चांगले असते मुलांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळाल्यामुळे त्यांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होऊ लागतो म्हणून तुम्ही लहान मुलांना नाचणी सत्व आवर्जून खायला द्यायला हवे.
  • नाचणीचा घाटा खाल्ल्याने देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. नाचणी ही पचायला जड नसते. तर ती एकदम हलक्‍या स्वरूपाची असते. अनेक लोकांना अशक्तपणा येत असतो. म्हणजेच कुठलेही काम करायला गेले तरी लवकर थकवा येत असतो. तर अशा लोकांनी नाचणी चा समावेश त्यांच्या आहारात जरूर करायला हवा. यामुळे, त्यांचा अशक्तपणा व थकवा जाण्यास मदत होऊ शकते.
  • अनेक लहान मुलांना कांजण्या, गोवर यांसारख्या समस्या येत असतात. तर अशावेळी तुम्ही लहान मुलांना नाचणीची भाकरी किंवा नाचणी युक्त पदार्थ खाऊ घालायला हवेत. यामुळे त्यांच्या शरीराचा थकवा जाऊन त्यांच्या शरीराची कमजोरी भरून निघत असते.
  • नाचणीची भाकरी तुम्ही आहारामध्ये खाल्ल्यामुळे तुमचे अतिरिक्त वाढलेले वजन देखील कमी होण्यास मदत होत असते. नाचणीमध्ये असे उपयुक्त घटक असतात की ज्यामुळे आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी जी असेल ती मित्र होण्यास मदत होत असते.
  • नाचणी खाल्ल्यामुळे वजन देखील नियंत्रीत राहत असते. आपल्या शरीरातील पचन संस्था ही सुरळीत चालू राहते जेणेकरून आपल्या वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होत असते.
  • अनेक लोकांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो तसेच पित्त देखील होत असतात. तर तुम्ही नाचणी ची भाकरी आहारामध्ये घेतली पाहिजे. नाचणी ही थंड प्रकाराची असते. ज्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी सारखी समस्या येणार नाही.
  • बऱ्याच लोकांना पोटात गॅस होणे पोट दुखणे या समस्या अपचनामुळे होत असतात. तर तुम्ही नाचण्याची भाकरी तुमच्या आहारामध्ये खाल्ली पाहिजे जेणेकरून तुम्हाला यासारख्या समस्या उद्भवणार नाही शिवाय पचन देखील व्यवस्थित रित्या होण्यास मदत होऊ शकते.
  • नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यामुळे आपणा योग्य त्या प्रमाणात पोषकतत्व मिळत असतात शिवाय,कॅल्शियमचे प्रमाण देखील मिळत असते. त्यामुळे आपल्या शरीराची हाडे ही बळकट राहण्यास मदत होत असते. तसेच आपले शरीराची कमजोरी देखील निघून जाण्यास मदत होत असते.
  • नाचणी युक्त पदार्थ आहारामध्ये समावेश केल्यामुळे तसेच नाचणीची भाकर खाल्ल्यामुळे डायबिटीस सारख्या आजारापासून देखील दूर राहू शकतो. तसेच आहारामध्ये नाचणीचे पापड तसेच भाकरी खाल्ल्यामुळे डायबिटीस नियंत्रित राहण्यास मदत होत असते.
  • नाचणी ही अँटीऑक्सीडेंट यांसारख्या गुणधर्मांनी संपूर्ण असते. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा अधिक फायदा होत असतो. नाचणीचा आपल्या आहारात समावेश केल्यामुळे आपण डोकेदुखीपासून देखील दूर राहू शकतो शिवाय नाचणीमध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होत असते.
  • सध्या कामाच्या अतिताणामुळे नाव जास्तीची कामे करणे यांसारख्या समस्यांमुळे अनेकांना बीपीचा त्रास होत असतो. जर तुम्ही तुमच्या आराम मध्ये नाचणीचा पुरेपूर उपयुक्त समावेश करत असाल, तर तुम्ही बीपी सारखे समस्यांपासून देखील दूर राहू शकतात.
  • नाचणी खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेला देखील त्याचा अधिक फायदा होत असतो. आपली त्वचा ही मुलायम व चमकदार बनण्यास मदत होत असते. त्याच प्रकारे नाचणीचा आपण फेस पॅक बनवण्यासाठी देखील उपयोग करू शकतो त्यामुळे देखील आपली त्वचा हे मऊ मुलायम होण्यास मदत होत असते तसेच नैसर्गिक चमक चेहऱ्याला येऊ शकते. तसेच सुरकुत्या देखील लवकर पडत नाहीत.
  • बाळंतीण बाईला देखील नाचणी सत्व खायला दिले पाहिजे. यामुळे, बाळंतिणीच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण देखील वाढत असते. तसेच, नाचणी सत्व खाल्ल्यामुळे बाळाला देखील त्याचा फायदा होत असतो. कारण, आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते आणि दुधामार्फत बाळाला ते सर्व घटक मिळत असतात.
  • नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला झोप देखील शांत लागण्यास मदत होत असते. आणि झोप शांत लागल्यामुळे आपण ताण तणाव यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो.
  • नाचणीची भाकरी किंवा नाचणी सत्व तसेच, नाचणी युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते तसेच आणि कागदांपासून देखील आपण दूर राहू शकतो.
वाचा  विड्याचे पान खाण्याचे फायदे

नाचणीचे सेवन केल्यामुळे आणि प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात तर नक्की मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीचा आवर्जून समावेश करायला हवा. त्यामुळे भरपूर प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतील.

नाचणीची भाकरी कशी खावी ?

मित्रांनो, नाचणीची भाकरी आहारात खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे पोषक तत्व त्यापासून मिळत असते. बऱ्याच जणांना नाचणीची भाकरी कशी बनवावी याबद्दल माहित नसते. तर मित्रांनो नाचणीचा रंग हा तपकिरी प्रकारचा असतो. नाचण्याची भाकरी केल्यामुळे नाचणीच्या भाकरी चा कलर देखील वेगळाच असतो. नाचणीची भाकरी करण्यासाठी नाचणीचे थोडेसे पीठ हे एका परातीत घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यावे. मीठ आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून भाकरीचे पीठ मळून घ्यावे. आणि परातीत थोडेसे पीठ टाकून त्यावर भाकर थापटून घ्यावी. भाकरी ही व्यवस्थित गोलाकार था पडल्यानंतर गरम-गरम त्यावर तशीच टाकावी.

पिठाचा पांढरा बघा तव्याच्या वरच्या दिशेने असायला हवा आणि त्यानंतर थोडेसे हातात पाणी घेऊन त्या भाकरीच्या वरच्या पिठावर पसरवून घ्यावे. तसेच भाकरीचे खालची बाजू शेकल्यावर वरची बाजू देखील व्यवस्थित प्रकारे शेकून घ्यावी. अशा सोप्या पद्धतीने आपण नाचणीची भाकरी बनवू शकतो. नाचणीची भाकरी ही भाजी सोबत खावी. तसेच प्रत्येकाच्या आवडीनुसार ते भाकरी खात असतात. तर मित्रांनो नाचणीची भाकरी ही बनवायला तर सोपी आहे शिवाय खाल्ल्यामुळे देखील तिचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया देखील चांगले होण्यास मदत होत असते. तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी खाऊन बघा. नक्की तुम्हाला फायदा जाणवून येईल.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे नाचणी खाल्ल्याने आपल्या शरीराला कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात, हे आपण जाणून घेतले आहे. तसेच, नाचणीची भाकरी अथवा नाचणी सत्व खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे घटक, विटामिन्स हे आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश करून बघू शकतात त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतील.

वाचा  आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

 मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here