पनीर फुल चे फायदे

0
1987
पनीर फुल चे फायदे
पनीर फुल चे फायदे

नमस्कार, मित्रांनो पनीर फूल म्हणजे नेमके काय? तर पनीर हे साधे खाण्याचे पनीर नसून, पनीर फुल ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. पनीर फुल आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदिक वनस्पती मध्ये पनीर फुलाचा वापर केला जात आहे. पण अनेकांना त्याचे फायदे माहिती नाहीत. पनीर फुलला ऋष्यगंधा असे झुडूप म्हणून त्याचे नाव आहे. पनीर फुलाने आपल्या शरीरिक समस्येवर आराम मिळतो. मित्रांनो आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, कि पनीर फुल तुमच्या शरीरासाठी कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरते ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

पनीर फुलाचे आपल्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, पनीर फुलाचा वापर केल्याने, तुमच्या शरीराला फायदे होतात. चला, तर मग जाणून घेऊया की कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. 

मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते :

मित्रांनो, पनीर फुलाच्या वापराने तुमच्या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. कारण मधुमेहावर इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवता येऊ शकते. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यावेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये पनीर पुलाचा वापर करावा. तसेच शरीरातील साखरेचीपातळी नियंत्रणात आल्यामुळे, मधुमेह कमी होण्यास  मदत मिळतेच. म्हणूनच आयुर्वेदिक औषधांमध्ये पनीर फुलांचा वापर मधुमेहाच्या औषधांमध्ये केला जात आहे. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते :

बदलती जीवनशैली, तसेच बैठे काम, तसेच जंक फूड खाणे, बेकरी युक्त पदार्थ, फास्ट फूड खाणे, तसेच तेलकट पदार्थांचा वापर, व्यायामाचा अभाव यामुळे तुमचे वजन वाढते. अशा वेळी जर तुम्ही पनीर फुलाचा वापर केला, तर तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण पनीर फुल हे आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे, त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म सिस्टीम सुधारतो. शिवाय वजन कमी करण्यास तो प्रभावशाली ठरतो. म्हणून पूर्वीच्या काळापासून, आयुर्वेदिक औषधांमध्ये पनीर फूलाचा वापर केला जातो. 

वाचा  नाकावर फोड येणे या समस्या वर घरगुती उपाय

सर्दी सारखे व्हायरल इन्फेक्शन मध्ये फायदा मिळतो :

हो, सर्दी-पडसे यासारखे इन्फेक्शन मध्ये, पनीर फूलाचा वापर केला, तर तुम्हाला फायदा मिळतो. शिवाय पनीर फूलाचा वापर केल्यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुमच्या इन्फेक्शन वर तुम्हाला मात करण्याची क्षमता मिळते. 

त्वचेवरील काळे डाग वगैरे जाण्यास, पनीर फुल फायदेशीर ठरते :

बदलत्या प्रदूषणामुळे, वाढत्या तापमानामुळे, तसेच किशोर वयात येताना, काही जणांच्या चेहऱ्यावर फुटकुळ्या चे काळे डाग, तसेच चेहरा काळवंडते, यासारखा समस्या होतात, अशावेळी जर त्यांनी पनीर पुलाचा वापर केला, तर त्यांना फायदे होतील.  त्यासाठी त्यांना पनीर फुल, पाण्यामध्ये भिजवून त्याचा पाण्याने तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे. त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील काळपटपणा जाण्यासाठी मदत मिळते. शिवाय पनीर फुल भिजवून वाटून त्याची पेस्ट करून तुम्हाला चेहऱ्यावरील डागांवर लावायची आहे, ते जाण्यास मदत मिळते. 

पनीर फुलाचा वापर कसा करायचा असतो ? 

हा, प्रश्न अनेक जणांना पडतो, की पनीर फुल चा वापर कसा करायचा, तर पनीर फुलाची ही पावडर मिळते. ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकून प्यायची आहे. आणि तुमच्या शरीरात समस्येवर, त्यामुळे आराम मिळतो. तसेच तुम्हाला जर पावडर मिळाली नाही, आणि पनीर फुल मिळाले, तर तुम्हाला पाण्यामध्ये एक ते दोन तासांसाठी ते भिजवून ठेवायचे. व सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ते पाणी प्यावेत. त्यामधील घटक द्रव्य तुमच्या शरीराला मिळतात व शारीरिक समस्या वर तुम्हाला फायदा मिळतो. 

पनीर फुलाच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम :

कोणतीही गोष्ट प्रमाणाच्या आतच घ्यावी, असा आयुर्वेदिक औषधांचा तसेच निसर्गाचा नियम आहे. जर त्याचे प्रमाण वाढले, तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. तसेच पनीर फुलाचे ही आहे, तूम्हाला त्याचा वापर हा प्रमाणातच करायचा आहे. प्रमाणाच्या बाहेर घेतल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर जाणून घेऊयात ! 

  • गर्भवती महिलांनी पनीर पुलाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांना विचारून घ्यावे. 
  • तसेच पनीर फुलाचा अति वापर केल्यामुळे, तुम्हाला उलटी मळमळ होणे, सारखे वाटू शकते. 
  • पनीर फुलाचा चुकीच्या वेळी वापर केल्यामुळे, तुम्हाला अपचन गॅस, एसिडिटी यासारख्या समस्या होऊ शकतात. 
  • तसेच तुम्हाला पोटात गडबड होणे, जुलाब होणे, यासारख्या समस्या असेल, तर पनीर फूलाचा वापर शक्यतो टाळावा. 
  • तसेच तुम्हाला पनीर फुलाचा, शारीरिक समस्येवर उपाय करायचा असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. 
वाचा  नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पनीर फुल तुमच्या आहारात, कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, सांगितलेले आहेतच. तसेच त्याचा वापर करण्यापूर्वी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडत असेल व आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here