पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

0
1016
पित्ताशयातील खडे घरगुती उपाय
पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत पित्ताशयातील खडे यावर घरगुती उपाय. हल्लीच्या काळात आपण फास्ट फूड खाणे जास्त पसंत करत असतो. आपले शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा पोषक घटकांचा विटामिन चा समावेश करायला हवा. त्याचप्रमाणे आपण नेहमी सुकामेवा याचे सेवन देखील करायला हवे. यांमधून देखील आपणा प्रोटिन्स व्हिटॅमिन्स यांचा पुरवठा होत असतो. त्याचप्रमाणे नियमित आपण एक ग्लास दुधाचे सेवन करायला हवे जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता भासणार नाही.

आपल्या नेहमीच्या दिनचर्येत आपण फळांचा समावेश देखील आवर्जून करायला हवा. कमीत कमी रोज एक फळ तरी खाल्ले पाहिजे. जेणेकरून, आपल्याला विटामिन्स चा पुरवठा होऊ शकतो व आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. परंतु, हल्लीच्या काळातील लोक घरगुती जेवण ऐवजी बाहेरील पदार्थ खाणे जास्त पसंत करायला लागलेले आहेत. बाहेरील जंकफूड खाणे शरीराला हानिकारक देखील ठरू शकते. त्यामध्ये कुठल्या प्रकारचे विटामिन्स आपल्या शरीराला मिळत नसतात शिवाय मैदा युक्त पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीराची चरबी देखील त्यामुळे वाढू शकते. आणि जर आपल्या शरीराची चरबी वाढत असेल तर लठ्ठपणा शरीराला प्राप्त होत असेल, तर यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असते. चुकीच्या खान पणामुळे आपल्याला पित्ताचा त्रास देखील होण्याची शक्यता असते.

बऱ्याच जणांना खाण्याच्या चुकीच्या सवयी मुळे तसेच सतत बाहेरील पदार्थ खाण्यामुळे ऍसिडिटी, पित्ताचा त्रास होत असतो. बाहेरील चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरांमध्ये विषारी द्रव्य देखील जमू शकतात.त्यामुळे देखील अनेक आजारांना निमंत्रण मिळत असते. जर आपल्या शहरांमध्ये पित्ताचे प्रमाण वाढले तर त्यामुळे आपल्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय आपले पोट देखील अधिक प्रमाणात दुखू लागते. बरेच जण पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असतात परंतु पित्ताच्या त्रासाकडे जेवढे दुर्लक्ष कराल तेवढा त्रास हा जास्त वाढत जातो आणि पोटदुखीचे प्रमाणदेखील वाढत जाते.

आपल्या शरीरामध्ये जर पित्ताचा जास्त त्रास झाला तर त्यामुळे उलट्या होण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. म्हणून त्यासाठी आपण डॉक्टरांना लवकर सांगायला हवे शिवाय काही घरगुती उपाय केल्यामुळे देखील आपल्या पित्ताचा त्रास कमी करता येऊ शकतो. तर मित्रांनो आज आपण पित्ताशयातील खडे या वरील घरगुती उपाय या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला,तर मग पित्ताशयातील खडे यावरील घरगुती उपाय आपण नेमके कोणते करू शकतो याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पित्ताशयातील खडे हा त्रास कशामुळे होऊ शकतो ?

सध्या अनेक लोक हे पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. पालेभाज्यांचे, फळांचे, सुकामेवा याकडे दुर्लक्ष करून बाहेरील खानपानाकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आपलाच आवश्यक ती प्रोटिन्स विटामिन्स त्या पदार्थात मधून मिळत नाही शिवाय, सतत बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे, तसेच मैदा युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराचा लट्ठपणा वाढत जातो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील पित्ताशय व ऍसिडिटी यांचे प्रमाण देखील वाढत जाते. तर आपल्याला पित्ताशयातील खडे हा त्रास निर्माण होऊ शकतो. शरीरातील जर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढले तर हा त्रास आपणा होऊ शकतो. शिवाय शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण हे अचानक जास्त वाढणे यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.

वाचा  केस गळती वर जास्वंदीचे फूल व त्याच्या वापर कसा करावा ? जाणून घ्या

ज्या व्यक्ती या जास्त जाण आहेत म्हणजेच ज्या व्यक्तींना लठ्ठपणा आहे त्या व्यक्तींना हा त्रास लवकर होऊ शकतो. तसेच पित्ताशय हा त्रास घरातील व्यक्तींना असेल तर त्यांच्या पिढीला देखील हा त्रास होण्याची शक्यता असते याचा पण आनुवंशिकता हे देखील म्हणू शकतो. जे व्यक्ती सतत तळलेले पदार्थ आवडीने खातात शिवाय कचोरी समोसा यांसारखे पदार्थ खाणे पसंत करतात तर अशा लोकांना देखील लवकर पित्त होण्याची समस्या उद्भवत असते. वयानुसार देखील हा त्रास वाढत जात असतो. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या स्वतःची काळजी घेऊ तेलकट पदार्थ खाण्याकडे दुर्लक्ष करू तितके आपण या त्रासापासून वाचू शकतो. जर तुम्हाला पित्ताशयाचे खडे हा त्रास होत असेल? तर तुम्ही खालील प्रमाणे घरगुती उपाय देखील करून बघू शकतात. तर ते कोणते हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया!

पित्ताशयातील खडे यावर काही घरगुती उपचार :-

आपल्या नेहमीच्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे, सतत बाहेरील जंकफूड खाणे, आहारामध्ये पौष्टिक घटकांचा, पोष्टिक तत्त्वांचा समावेश न करणे यामुळे, आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर त्यावर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतात त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

दुध – हळदीचे सेवन करणे :

जर तुम्हाला पित्ताशयाचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही रोज एक कप अथवा ग्लास दूध हळद याचे सेवन करायला हवे. दुधी आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते. शिवाय हळदीमध्ये देखील औषधी गुणधर्म आढळून येतात. पित्ताशयातील खडे हा त्रास झाल्यामुळे पित्ताशयाला सूज येत असते. त्यामुळे तुम्ही दूध हळद घेणे आवश्यक ठरते दूध हळद त्यामुळे पित्ताशयाची सूज कमी होऊ शकते शिवाय त्यापासून आराम देखील मिळत असतो. हळदीमध्ये अनेक बेटर गुणधर्म आढळून येतात जे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त ठरत असतात. म्हणून तर मी रोज रात्री झोपण्याआधी दूध हळद याचे सेवन करायला हवे त्यामुळे तुमच्या पित्ताशयातील खडे हे कमी होण्यास मदत होत असते हा उपाय तुम्ही काही दिवस करायला हवा जेणेकरून तुमच्या पित्ताशयातील खडे जाऊ शकतील.

वाचा  जांभूळ पावडर चे फायदे

कोरफडीच्या रसाचे सेवन करणे :

चुकीच्या खानपान पद्धत यामुळे आपल्याला पित्ताशयाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास देखील जाणवत असतं. पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे उजव्या साईडला पोट दुखण्याची समस्या येत असते. त्यासाठी कमी कोर्ट विचार असतात एक रुपयात करू शकतात कोरफळे मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. पित्ताशयातील खडे जाण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकतात. कोरफडीच्या रसामध्ये तुम्ही थोडेसे मत मिसळून देखील त्याचे सेवन करू शकतात यामुळे तुमच्या पित्ताशयाचा त्रास हा कमी होऊ शकतो. आजकल कोरफडीच्या रसापासून आयुर्वेदिक औषध देखील उपलब्ध होत आहे ते देखील तुम्ही घेऊ शकतात. परंतु, तुम्ही त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

विरेचन क्रिया करणे :

पंचकर्म यातील विरेचन ही क्रिया तुम्ही करू शकतात. विरेचन क्रिया केल्यामुळे तुमच्या पित्ताशयातील खडे जाण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी तुम्ही पंधरा दिवसांनी गरम पाण्यातून दोन तीन चमचे तुपाचे सेवन हे सलग तीन दिवस करायला हवे. आणि त्यानंतर पित्ताशयाचे खडे बाहेर पडण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने जुलाबाच औषध घ्यायला हवे. असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्ताशयातील खडे जाण्यास मदत होऊ शकते. विरेचन क्रिया केल्यामुळे पित्ताशयातील खडे लवकर विरघळण्यास मदत होते. आपला आराम मिळू शकतो.

रोज व्यायामाची सवय ठेवणे :

आपल्या शरीरामधील लठ्ठपणा तसेच, सतत तेलकट-तुपकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचे चरबीचे प्रमाण वाढत जाते. आणि यामुळे पिताशय हा त्रास लवकर जास्त प्रमाणात उद्भवू शकतो. त्यामुळे पित्ताशयाचे खडे निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणून तुम्ही नियमित व्यायामाची सवय ठेवायला हवी. रोज नियमित व्यायामाचा सराव केल्यामुळे तुमच्या शरीराचा लट्ठपणा कमी होऊ शकतो. शिवाय शरीरातील प्रत्येक अवयवाची हालचाल व्यवस्थित झाल्यामुळे पचनाची क्रिया देखील वाढत जाते. आणि नियमित व्यायामाचा सराव केल्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास देखील होऊ शकत नाही. शिवाय तुम्ही आंबवलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे त्यामुळे देखील तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकत नाही.

वाचा  मनरेगा योजना - जाणून घ्या रोजगार योजने बद्दल

एप्पल साइडर विनेगर चे सेवन करणे :

पित्ताशयातील खडे हे वीरघळण्यासाठी तुम्ही एप्पल साइडर विनेगर चा उपयोग देखील करू शकतात. एप्पल साइडर विनेगर चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया ही सुलभ होण्यास मदत होऊ शकते. आणि आपल्या शरीराची पचनक्रिया सुलभ रीतीने सुरू असेल तर आपल्या पित्ताशयाचा त्रास होऊ देत नाही. ज्यामुळे तुम्ही तेलकट परतले पदार्थांचे सेवन केले असेल तर त्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये एप्पल साइडर विनेगर मिक्स करून त्या पाण्याचे सेवन करायला हवे. त्यामुळे तुमची पचन क्रिया ही व्यवस्थित होऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला पित्ताशयाचा त्रास देखील होणार नाही. मी तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही एप्पल साइडर विनेगर चे सेवन करायला हवे जेणेकरून तुमची पचन क्रिया ही सुलभ रीतीने चालू राहू शकते व पित्ताशयाचा त्रास देखील होणार नाही.

तर मित्रांनो, पित्ताशयातील खडे या वरील घरगुती उपाय आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. शिवाय, तुमच्या शरीरातील पचनक्रिया सुलभ रीतीने सुरळीत असेल, तर त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. यासाठी, तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्ही शक्यतो तेलकट पदार्थ खाणे, मैदा युक्त पदार्थांचे सेवन जितके टाळाल तितके तुमचे आरोग्य चांगले राहू शकेल. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here