स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ

0
499

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. कुठल्याही प्रकारची स्वप्न आपण बघू शकतो. असे म्हणतात की सकाळच्या ब्रह्मा मुहूर्तावर आपल्याला जे स्वप्न पडते, ते खरे होते आणि जर तुम्हाला स्वप्न त्यावेळी पडत असेल, तर ते तुम्हाला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देत असतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात चंद्र दिसणे. मित्रांनो, चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एक ग्रह आहे. तसेच चंद्राची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. खास करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रामध्ये दूध ठेवले जाते आणि संकष्टीला चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडावा लागतो. तर मित्रांनो, चंद्राचे वेगवेगळे रूप असतात, जसे की पौर्णिमा, ईद चा चंद्र, कोजागिरीचा चंद्र, चंद्रग्रहण वेगवेगळे प्रकारे असतात. तसेच लहान मुले ही चंद्राला चंदा मामा असे म्हणतात. आपण चंद्राची पूजा करतो आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये चंद्र दिसत असेल, तुमच्या मनात निर्णय प्रश्न निर्माण होतात की, मला चंद्र का बर दिसला असेल? स्वप्नामध्ये चंद्र दिसण्यामागे काय कारण असू शकते? तसेच ते शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात! 

स्वप्नात चंद्र दिसणे
स्वप्नात चंद्र दिसणे

स्वप्नात चंद्र दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात चंद्र दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये चंद्र कसा दिसला? कुठे दिसला? कशा अवस्थेत दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात स्वामी तारक मंत्र ऐकणे शुभ की अशुभ!

स्वप्नात चंद्र दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये चंद्र दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनात  सुखी- समाधानी  जीवन जगणार आहे. तसेच तुम लवकरच तुम्हाला काहीतरी आनंददायी गोष्टी कळणार आहेत, व तुमचे भाग्योदय उजळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात चंद्रग्रहण दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला चंद्रग्रहण दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही जे कार्य करत आहेत किंवा ज्या कामगिरीमध्ये तुम्ही आहेत त्यामध्ये तुम्हाला अडथळे येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती ही तुमची बिघडणार आहेत. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात लालचंद्र दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला चंद्र लाल दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ मानला जातो की, तुमच्या घरामध्ये वाद विवाद होणार आहेत. भांडणे होणार आहेत, किंवा मतभेद होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला तणावजनक स्थिती बघावी लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कोजागिरीचा चंद्र दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला कोजागिरीचा चंद्र दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुमचे आयुष्य वाढणार आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहेत. तसेच घरात धनलक्ष्मीचा वर्षाव होणार आहे. सुख, शांती लाभणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दोन चंद्र दिसणे 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दोन चंद्र दिसणे हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, हे स्वप्न नकारात्मकतेच्या दृष्टीने तुम्हाला दर्शवत आहे. म्हणजे तुमची कोणासोबतही वाद होऊ शकतात, भांडणे होऊ शकतात. किंवा घरामध्ये अडचणींचा काळ तुम्हाला जाणवू शकतो. कर्ज घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात प्राणी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात करवा चौथ चा चंद्र दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला करवा चौथ चा चंद्र दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या पतीचे आयुष्य हे दीर्घायुषी होणार आहे आणि जर समजा पुरुषांनी हे स्वप्न बघितले, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने संसार करणार आहे. सुखी समाधानी आयुष्य जगणार आहे. तसेच घरात काहीतरी गोड आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात पौर्णिमेचा चंद्र दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही पौर्णिमेचा चंद्र बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, ते आता लवकरच पूर्ण होणार आहेत. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठे पद किंवा मोठे स्थान मिळणार आहेत. तसेच तुम्हाला मानसन्मानाचे योग ही संभवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अर्धा चंद्र दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये अर्धा चंद्र दिसणे, हे स्वप्न मिश्र स्वरूपाचे मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे, पण जर तुम्ही चिकाटीने आणि हिमतीने त्या गोष्टींना तोंड दिले, तर भविष्यामध्ये मोठ्या स्थानावर तुम्ही जाणार, असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये आम्ही तुम्हाला स्वप्नामध्ये चंद्र दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                        धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here