स्वप्नात शेण दिसणे शुभ की अशुभ

0
1103
स्वप्नात शेण दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात शेण दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. मित्रांनो स्वप्न ही दोन प्रकारचे असतात एक म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्ने आणि दुसरे म्हणजे झोपेच्या दरम्यान पडणारी स्वप्ने या दोघेही स्वप्नांमध्ये खूप फरक आहे उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांवर आपने बंधन असते ते आपल्या मनाच्या ठरवलेल्या कल्पना असतात. स्वप्नात शेण दिसणे हे स्वप्न दैनंदिन कामकाजाच्या नुसार मानले जाते.

     परंतु झोपेच्या दरम्यान पडणारी स्वप्ने ही फार वेगळी असतात ही स्वप्ने स्वच्छंदी असतात त्या स्वप्नांवर कुठल्याही प्रकारचे बंधन नसते. झोपेच्या दरम्यान जर आपला ब्रह्म मुहूर्त स्वप्न पडलेले असतील तर ही स्वप्न लवकरच खरी होत असतात असे देखील म्हटले जात असते. काही वेळा अशी स्वप्ने पूर्ण होत असल्याचा देखील अनुभव येत असतो. काहीच नाही स्वप्नामध्ये देवी देवता वगैरे दिसत असतात. तर कधी स्वप्नामध्ये वस्तू विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती प्राणी वगैरे दिसत असतात.

       मित्रांनो, आज आपण स्वप्नामध्ये शेण दिसणे शुभ असते की अशुभ असते या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो गाईच्या शेणाचा अनेक ठिकाणी आपल्याला उपयोग होत असतो. पूर्वीच्या काळी तर खेडोपाडी गायीच्या शेणाने ओटा सारला जात असे. आजही तुम्हाला खेडोपाडी असे बघावयास मिळेल. असे केल्यामुळे घरापासून अनेक बारीक किडे, कीटक दूर राहत असे. 

     मित्रांनो गाईच्या शेणापासून गवऱ्या देखील बनवल्या जात असतात. अनेक जण होळीसाठी याचा उपयोग करत असतात. गोमाता ही खूप पवित्र असते आणि शेणाचे देखील तेवढेच महत्त्व आहे. तर मित्रांनो, स्वप्नात शेण दिसणे याचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!

स्वप्नात शेण दिसणे शुभ की अशुभ.

     काही व्यक्तींना स्वप्नामध्ये गाईचे शेण वगैरे दिसत असते. जसे की, स्वप्नात तुम्ही शेणाच्या गवऱ्या बनवताना दिसणे? स्वप्नात तुम्ही शेण खाताना दिसणे? स्वप्नात तुम्ही सेनानी घराचा ओटा सारताना दिसणे? स्वप्नात तुम्ही शेण गोळा करताना दिसणे? वगैरे, स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपणाला खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शेण दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला शेण दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला अचानक लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा होणार आहे. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला उच्च पदावर स्थान मिळणार आहे तुमचा पगार वाढ होणार आहे. तुम्हाला चारही बाजूंनी खूप फायदा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही शेण गोळा करताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेण गोळा करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत लवकरच तुमचे कामे ही मार्गी लागणार आहेत. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमचा इतर लोक आदर करणार आहेत.

स्वप्नात तुम्ही शेण खाताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेण खाताना तुम्हाला दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तुमच्या हातूनच तुमचे काम बिघडण्याची शक्यता आहे समाजातील तुमचा मान सन्मान कमी होणार आहे इतर लोक तुमच्यावर चुकीच्या कामाचा आरोप घेणार आहेत तुमचा आदर कमी होणार आहे.

स्वप्नात तुमचा शेणावर पाय पडताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमचा पाय हा अचानक क्षणावर पडताना तुम्हाला दिसलेला असेल तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. तुमची सर्व कामे ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होणार आहे.

वाचा  स्वप्नात सुगंधी उटणे दिसणे शुभ की अशुभ 

स्वप्न तुम्हाला शेणाचे डोंगर दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला शेणाच्या डोंगर दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला खुशखबर मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समाधान मानसिक शांतता मिळणार आहे. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत व बळकट होणार आहे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही शेणावर चालताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेणावर चालताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्या जीवनामध्ये एक नवीन व्यक्ती येणार आहे म्हणजेच तुम्हाला जीवनसाथी मिळणार आहे तुम्हाला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही शेणाच्या गोवऱ्या बनवताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेणाच्या गोवऱ्या बनवताना तुम्हाला दिसलेली असेल तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या हातून कुठले तरी शुभ कार्य घडणार आहे. तुम्हाला गुप्तधन मिळणार आहे तुम्हाला अचानक धनसंपत्तीचा लाभ मिळणार आहे.

जर स्वप्नात तुम्ही शेणाच्या गोऱ्या विकताना दिसलेले असेल तरी या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या कामाबद्दल योग्य तो मानसन्मान दिला जाईल तुमची प्रशंसा केली जाणार आहे.

स्वप्नात तुम्ही शेणाच्या पाण्याने आंघोळ करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही सेनाच्या पाण्याने अंघोळ करताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अपमान सहन करावा लागणार आहे. इतर लोक तुमचा अनादर करणार आहेत.

स्वप्नात तुमच्या अंगावर शेण पडताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार,स्वप्नात तुमच्या अंगावर शेण पडताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमची मोठी प्रगती होणार आहे त्यामध्ये आर्थिक फायदा भरपूर होणार आहे. तुमचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला उच्च पदावर स्थान मिळणार आहे. तुमचा मान सन्मान, प्रशंसा केली जाणार आहे.

वाचा  स्वप्नात सायकल दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शेण फेकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेण फेकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही आजारी पडणार आहात असे स्वप्न पडल्यास तुम्ही पूर्वीपेक्षा तुमच्या घरातील सदस्यांची व तुमची स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे. पौष्टिक आहार घेतला पाहिजे. नियमित व्यायाम करण्याची सवय ठेवली पाहिजे.

       मित्रांनो, स्वप्नात शेण दिसणे शुभ असते की अशुभ असते? हे आपण बघितलेल्या स्वप्नांच्या स्वरूपावरून त्याचे शुभ व अशुभ संकेत आपल्याला मिळत असतात. याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here