तळपायाला घाम येणे

0
1781
तळपायाला घाम येणे
तळपायाला घाम येणे

नमस्कार, मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे, प्रदूषण यामुळे, अनेक जणांना त्याचा त्रास होतोय. तसेच आताचे वातावरण हल्ली खूप वेगळे झाले आहे. आता कधीही पाऊस येतो, कधीही गरम होते, तर कधीही थंडी वाजते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तसेच काहींना उष्णतेचा त्रास होतो. त्यामध्ये त्यांना तळ हाताला, तळपायाला घाम येणे, या समस्या होऊ शकतात. आज आपण बघणार आहोत, की तळपायाला घाम कोणत्या कारणांमुळे येतो, व का येतो तसेच तळपायाला घाम आल्यास, त्यावर तुम्ही कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो? हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

तळपायाला घाम येण्याची कारणे ? 

अनेक लोकांना तळपायाला घाम येणे, तळ हाताला, घाम येतो. पण ते नेमके कोणत्या कारणामुळे असेल, हे त्यांना माहित नसते, चला तर मग जाणून घेऊया त्याची कारणे ! 

  • जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, तर तुमच्या तळ पायाला हाताला घाम येण्याची शक्यता आहे. 
  • तुमच्या पायात दिवसभर मोजे राहिलेत, तर तुमच्या तळपायाला घाम येतो. 
  • तसेच काही लोकांना खूप घाम येतो, अक्षरशः  त्यांचे कपडे ओले होतात, आणि त्यांच्यात तळ पायाला आणि हाताला ही खूप घाम येतो. 
  • पायामध्ये दिवसभर बूट घातल्याने, त्यांच्या तळपायाला घाम येतो व त्या घामाचा वास येतो. 
  • तसेच अनुवांशिक गुण, असल्यामुळेही तळपायाला घाम येतो. 
  • ज्यांना धूम्रपानाची सवय असते, अशा लोकांना ही तळपायाला घाम येऊ शकतो. 
  • तसेच काही जणांना तिखट, मसालेदार पदार्थ, गरम पदार्थ खाण्याची सवय असते. अशा लोकांना तळपायाला घाम येऊ शकतो. 
  • काही लोकांना थायराइड तसेच हार्मोनची इनबॅलेन्स निगडित काही समस्या असली, तर त्यांना तळपायाला घाम येऊ शकतो. 
  • तसेच  ज्यांचे वजन जास्त आहे, अशा लोकांना काहीही काम केले, की ते घामेघूम होऊन जातात. त्यांना घामाचा त्रास होतो, व खूप घाम येतो. 
  • जास्त गरम कपडे, उबदार कपडे घातल्यामुळे, ही तुम्हाला घाम येण्याची समस्या होते, तसेच तळहाताला घाम येण्याची समस्या होऊ शकतात. 
वाचा  चेहऱ्यावर पिंपल्स होणे किंवा मुरूम निर्माण होणे या समस्या वर घरगुती उपाय

तळपायाला घाम येत असल्यास, कोणते घरगुती उपाय करावेत? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला लगेच हाता-पायांना घाम कोणत्या कारणांमुळे येऊ शकतो, ते सांगितले आहेत. आता आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

लिंबू पाणी चा वापर करा :

काही जणांना तर पायाला हाताला खूप घाम येतो, त्यामध्ये अशक्तपणा हेही कारणीभूत असू शकते. अशा वेळी जर तुम्ही लिंबू पाणी सतत पीत राहिले, तर तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते. शिवाय तुम्हाला घाम येण्याची समस्या कमी होते. 

टमाटर वापर करा :

जर तुम्हाला तळपायला अंगाला शरीराला घाम येण्याची समस्या फार असतील, तर अशा वेळी तुम्ही टमाट्याचा रस चा वापर केला, तर तुम्हाला फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला टमाटर चा रस काढून, घ्यायचा आहे, आणि टमाट्याचा रस तुम्ही तर पायाला हातांनाच लावायचा आहे, त्याने तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर निघेल, तसेच तुम्हाला  हाताला घाम, पायाला घाम येण्याचे समस्येवर त्वरित आराम मिळेल. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळेस दर महिन्याला करायचा आहे. 

गुलाब जल चा वापर करून बघावे :

जर तुम्हाला तर पायाला हाताला घाम येत असेल, तसेच घामाचा घाण वास येत असेल, अशावेळी जर तुम्ही गुलाब पाण्याने तुमचे पाय स्वच्छ केले, हात स्वच्छ केले, तर तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल. 

बेकिंग सोड्याचा वापर करा :

काही जणांच्या घामाचा फार दुर्गंधी येते. अक्षरशः त्याच्या बाजूला बसावे, असे वाटत नाही. अशा वेळी जर त्यांनी बेकिंग सोडा च्या पाण्याने त्यांचे अंग पुसले, तर त्यांच्या घामाचा दुर्गंधी जाते. शिवाय तळपायांना घाम येतो, बुटांमध्ये ही त्या घामाचा वास असतो, त्यासाठी जर त्यांनी कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकून त्या पाण्यात पाच ते दहा मिनिटे त्यांचे पाय भिजवून, नंतर कोरडे गेले, तर त्यांच्या तळपायांच्या घाण वास येण्याची समस्या कमी होते. 

वाचा  झोपेत घोरणे ही समस्या बंद करण्यासाठी घरगुती उपाय

योग्य आहार घ्या :

जर तुम्ही तुमच्या शरीरात योग्य आहार घेतलात, तर तुम्हाला तळपायाला व अंगाला घाम येण्याची समस्या कमी होतील. मग तो नेमका कोणता आहार, घ्यायला हवा. तर तुम्ही प्रोटिनयुक्त, कॅल्शियमयुक्त, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आहार घ्यायला हवा. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा, यासारख्या समस्या होणार नाही. शिवाय तुम्हाला अंगाला व हातापायाला, तळपायाला घाम येण्याची समस्या कमी होईल. 

भरपूर प्रमाणात पाणी प्या :

तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवेत. कारण जर तुम्हाला शारीरिक थकवा आला, तर तुम्हाला अशक्तपणा जाणवतो, व तुम्हाला घाम येतो, आणि घाम आल्यामुळे, तुमच्या शरीरातील पाणी हे कमी होत जाते. अशा वेळी तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्या होतात. त्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. त्यामुळे तुमच्या घामाचा वास ही येत नाही. 

स्वच्छतेची काळजी घ्या :

तुम्ही तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी, खूप लोकांच्या अस्वच्छता असल्यामुळे घाम येतो, आणि त्यांच्या घामाचा वास येतो. त्यासाठी त्यांनी डेटॉल च्या पाण्याने आंघोळ करायला हवी. तसेच तुम्ही कडूलिंबाचे पाने, पाण्यामध्ये उकळून, त्या पाण्याने अंघोळ केल्याने, तुमच्या अंगाची दुर्गंधी येत नाही. शिवाय तुम्ही नैसर्गिक कडूलिंबाच्या पाण्याने, अंघोळ केल्यामुळे, तुम्हाला नैचुरल मुलायमपणा शरीराला मिळतो. तसेच तुम्ही दिवसातून दोन वेळेस आंघोळ करायला हवी. तसेच तुम्ही  (सॉक्स) पाय मोजे घालतात, ते कॉटनचे असायला हवेत, आणि कामाच्या ठिकाणी दिवसभर बूट न घालता, थोडावेळ बूट काढून ठेवावेत. त्याने तळपायाला घाम  येणार नाही, शिवाय पायाचा वास येत नाहीत. तसेच लेदर्सचे, चामड्याचे बुट ते क्लीन करूनच, पायात घालावेत. तसेच घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ साबणाने धुवून घ्यावेत. ही स्वच्छतेची काळजी तुम्ही घ्यावी. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की तुमच्या तळपायाला घाम येणे म्हणजे काय आणि तळपायाला घाम कोणत्या कारणामुळे येतो. तसेच पायाला घाम येत असल्यास, तुम्ही काय काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेतच. जर तुम्हाला तर पायाला घाम जास्त प्रमाणात येत असेल, जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही  डॉक्टरांना दाखवू शकतात. तसेच सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

वाचा  कपाळावर गंध का व कुठे लावायचे ?

 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here