पनीर खाण्याचे फायदे

0
1114
पनीर खाण्याचे फायदे
पनीर खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत पनीर खाण्याचे फायदे, दूध व दुधापासून बनवलेले  पदार्थ इतके स्वादिष्ट आणि चविष्ट असतात, की विचारायलाच नको. दुधापासून दही, लस्सी, श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर, ताक, तूप तसेच अनेक मिठाईमध्ये ही त्याचा वापर होतो, यासारखे अनेक पदार्थ आहेत. त्यामध्ये आज आपण पनीर विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. पनीर इतके सुंदर आणि अप्रतिम लागते, की विचारायलाच नको, तसेच पनीर पासून बनवलेला रसगुल्ला तर कोलकत्याचा फेमस आहे.

तसेच पनीर खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. कमाल आहे ना!  दुधापासून किती प्रकार बनतात, आणि त्याच्या पासून किती निरनिराळे फायदे आपल्या शरीराला होतात. जे लोक व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी पनीर आवर्जून खावेत. कारण तुम्ही जर अंडे खात नसाल, तर पनीर खाल्ल्यावर तुम्हाला त्याचे गुणधर्म मिळू शकतात.  हो खरचं! पनीर खाल्ल्याने तुम्हाला कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यासारखे गुणधर्म मिळतात, तसेच हॉटेल मध्ये तर पनीर हा त्यांचा किंग असतो. कारण पनीर-ग्रेव्ही, पनीर-टिक्का, शाही-पनीर, बटर-पनीर, मटर-पनीर, काजू-पनीर, पालक-पनीर, तसेच पनीर-भुर्जी ला तर अंड्याची चव येते.

अजून किती निरनिराळ्या प्रकारे पनीरची भाजी तुम्ही करू शकतात. विचारायलाच नको! पनीर घालून खूप सारे पदार्थ तुम्ही बनवू शकतात. लहान मुलाला आवडत नसेल, तर त्यांना तुम्ही आवर्जून खायला लावा. कारण त्या मधील घटक लहान मुलांना मिळतात. तसेच तुम्ही लहान मुलांना पनीर-पकोडे सुद्धा करून देऊ शकतात. नवलच आहे ना! किती सारे पदार्थ या पनीर पासून आपण करू शकतो. 

चला तर मग या बहुगुणी पनीर खाल्ल्याने, तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? ते आज आपण जाणून घेणार आहोत, तसेच काही लोकांना पनीर बनवायची पद्धत ही माहिती नसते, ते कसे बनवतात? ते ही आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

पनीर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला होतात इतके सारे फायदे!

पनीर खाल्ल्याने, तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. मग ते नेमके कोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  पनीर फुल चे फायदे

तुमची हाडे मजबूत होतात

पनीर खाल्ल्याने, त्यातील आवश्यक घटक तुमच्या शरीराला मिळतात. तसेच जसे जसे वय वाढते, तसे तसे तुमची हाडे ठिसूळ होतात, दुखतात, चालताना, उठताना, बसताना त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात पनीर खाल्ले, तर तुम्हाला त्यातून खूप सारे फायदे मिळतात. कारण पनीर मध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची गरज असते. जर तुम्ही पनीर नियमितपणे खाल्ले, तरीही कॅल्शियमची कमी भरून निघेल. शिवाय वयस्कर लोकांनी त्यांच्या आहारात पनीरचा वापर करावा. त्याने त्यांना फायदे होतील. 

तुमचे वजन कमी होते

बदलत्या वातावरणामुळे, अवेळी खानपान मुळे, तसेच बाहेरचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे, वजन वाढीच्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशावेळी जर तुम्ही पनीर खाल्ले, तर तुम्हाला फरक पडेल. खूप लोकांचा गैरसमज असतो, दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते, पण दुग्धजन्य पदार्थ हे गोड नसायला हवेत. कारण गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही नियमित तुमच्या आहारात पनीरचा वापर करावा. कारण पनीरमध्ये फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर्स ची मात्रा असते. तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय पनीर खाल्ल्याने तुम्हाला भूक लागत नाही. तुमचे भुकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे वजन वाढीची समस्या होतच नाही. तुम्ही नियमित तुमच्या आहारात 100 ग्रॅम पनीर जरी खाल्ले, तरी तुम्हाला वजन वाढीच्या समस्यावर आराम मिळेल. तसेच पनीर हे प्रमाणातच खावे जास्त पनीर खाल्ल्यामुळे, तुमचा कोलेस्टेरॉल वाढू शकतो. तसेच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, त्यावेळी जर पनीर खात असाल, तर ते फायदेशीर ठरतेच, पण तरीही तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

तुमच्या मासंपेशी मजबूत होतात

हो, पनीर खाल्ल्याने तुमच्या मासं पेशी म्हणजेच मसल्स मजबूत होतात. म्हणूनच तर तुम्ही डायट प्लान मध्ये बघा, किंवा जिम मध्ये बघा, तसेच काही खेळाडूंना बघा, त्यांच्या आहारात पनीरचा आवर्जून वापर केला जातो. कारण पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, शिवाय प्रोटीन्सचे स्रोत,  आहेत. त्यामुळे पनीर खाल्ल्याने तुमच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच बॉडीबिल्डिंग फूड्स मध्येही पनीरचा वापर करू शकतात. त्याने तुमची बॉडी सुडौल राहते. तसेच पनीर खाल्ल्याने, तुमच्या शरीरातील स्नायूंना बळकटी येते. नवीन उत्साह येतो, तुम्ही ताकतवर होतात. 

वाचा  स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे

मधुमेहासाठी फायदेशीर ठरतात

जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात पनीर खाल्ले तर, तुम्हाला मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. तसेच ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांची शुगर नियंत्रणात राहते. हो पनीर खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या डायबिटीस वर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पनीर खाल्ल्याने तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक तसेच ओमेगा-3  यासारखे गुणधर्म मिळतात, व तुमच्या शरीरात फॅट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे तुमचा डायबेटिस हा कंट्रोल मध्ये राहतो. शिवाय शुगर लेवल ही कमी होत जाते. 

तुमच्या दातांना मजबुती मिळते

दुधाचे पदार्थ, तसेच पनीर जर तुम्ही नियमित खाल्ले, तर तुमचे दात हे मजबूत होतात. शिवाय दातांशी निगडित समस्या कमी होतात. जर तुम्ही नियमित पनीर खाल्ले, तर तुमच्या दातांना व हिरड्यांना फॉस्फरस व कॅल्शिअमचा स्त्रोत मिळतो. पनीर मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ते दातांसाठी फायदेशीर ठरते. 

तुमची मेटाबोलिजम सिस्टीम सुधारतो

बऱ्याच वेळी खुप जणांच्या या सारख्या समस्या असतात, की ते खातात ते पचत नाही. सारखे ढेकर येतात, अपचन झाल्यासारखे वाटते, अजीर्ण झाल्यासारखे वाटते. त्याला कारणीभूत म्हणजे, तुमची पचन संस्था आहे. जर तुमचे पचन संस्थेचे कार्य सुरळीत राहिले, तर तुम्हाला यासारख्या समस्या कमी होतात. पनीर खाल्ल्याने तुमचा मेटाबोलिजम सिस्टीम सुधारतो. कारण पनीर मध्ये फायबर चे प्रमाण असल्यामुळे, तुमच्या अन्नपचनाची, व चयापचयाची क्रिया सुधारते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात पनीर नियमितपणे खाल्ले, तर तुम्हाला अजीर्ण सारख्या समस्यावर आराम व अन्नपचन सुरळीत होते. 

पनीर खाल्ल्यामुळे होणारे नुकसान

पनीर खाल्ल्यामुळे नुकसान जास्त प्रमाणात होतच नाहीत. पण पनीर हे नेहेमी प्रमाणातच खावे, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ल्यावर त्याचे फायदे आपल्याला होतात. जर तुम्ही त्याचे प्रमाण वाढवले, किंवा प्रमाणाच्या बाहेर खाल्ले, तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. तसेच पनीरचे ही आहेत. पनीर जास्त प्रमाणाच्या बाहेर खाल्ले, की तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढते, तसेच त्याच्यात प्रोटीन ची मात्रा भरपूर प्रमाणात असते, जर तुम्ही जास्त प्रमाणात पनीर खाल्ले, तर तुम्हाला जुलाब, मळमळ सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 

वाचा  स्वप्नात शाळा दिसणे शुभ की अशुभ

पनीर बनवण्याची पद्धत व किती प्रमाणात खावे?

पनीर बनवण्याची पद्धत, अगदी साधी आणि सोपी आहे, पनीर बनवण्यासाठी दूध हे फाटवणे फार गरजेचे असते. त्यासाठी

  • तुम्हाला एक लिटर दूध घ्यावयाचे आहे. दूध चांगले गरम करून, नंतर त्यामध्ये तुम्ही निंबु पिळू शकतात. तसेच दूध फाटवण्यासाठी, सायट्रिक ऍसिडचा वापर करू शकतात.  याने दूध फाटते,
  • त्यानंतर एका सुती कपडाच्या कापड घेऊन, त्यामध्ये फाटलेले दूध  टाकावे. नंतर त्यामध्ये जो चोथा तयार होतो, त्यालाच पनीर असे म्हणतात.
  • तो चोथा घट्ट पिळून, त्याचे घरगुती पनीर तयार होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, घरच्या घरी पनीर बनवू शकतात.

तसेच रोजच्या रोज जर तुम्ही शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर खाल्ले, तर तुम्ही हेल्थी होतात. तसेच तुमच्या ते चेहऱ्यावर त्याची तेज येते, तुम्ही तंदुरुस्त राहतात. शिवाय निरोगी राहतात, तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही दररोज पनीर खाल्ले, तर दिवसभर तुम्हाला, पोट भरल्यासारखे जाणवते व तुमचे वजन वाढत नाही. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पनीर पासून, होणारे फायदे व तुम्ही त्याचा वापर कशाप्रकारे करू शकतात, व ते कसे तयार करावे, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद

बदाम खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here