सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे

0
1909
सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे
सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे. सफरचंद हे सगळ्यांनाच माहिती आहेत. फळांच्या मार्केटमध्ये आपण बघितले असेल. हिरवा, लाल, पिवळा या तीन कलर चे सफरचंद आपल्याला दिसतात. तर कधी कधी गुलाबी सफरचंद ही असते, गुलाबी सफरचंद हे थोडे महाग असते कारण ते परदेशातून आलेले असते. हिरवे, सफरचंद चवीला गोड- आंबट असते, तर  पिवळे आणि लाल कलरचे सफरचंद हे चवीला गोड आणि रवाळ असते. सफरचंदाची चव सगळ्यांनाच आवडते. आपल्याकडे आजारी पेशंटला आपण सफरचंद घेऊन जातो, जणू काही अशी प्रथाच आहे.

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, सगळ्यांना सफरचंद आवडते. तसेच सफरचंद पासून आपण जेली, फ्रूट सलाड, सफरचंदाचा ज्यूस, सफरचंद मिल्क शेक, तसेच मार्केटमध्ये आता हल्ली एप्पल साइडर विनेगर बनवले जाते. यासारखे पदार्थ बनवू शकतो. तसेच सफरचंद खाणे, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काही जणांचे आवडते फळ आहे. सफरचंद सफरचंद ची मागणी सगळ्या देशात होते. आपल्या भारतातही होते. सफरचंद खाल्ल्याने आपल्याला खूप फायदे होतात.

तसेच सफरचंद मध्ये भरपूर विटामिन्स चा स्त्रोत असल्यामुळे, आपल्याला फायदेशीर ठरते. त्याच्यामधील गुणधर्म आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा स्त्रोत बनतो. तर मित्रांनो आज आपण सफरचंद खाण्याचे नेमके फायदे कोणकोणते आहे? तसेच सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला कोणत्या प्रकारची तोटे होऊ शकतात? तर सफरचंद खाण्याची वेळ नेमकी असते का? या बाबतीत जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात ! 

वाचा  ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

सफरचंद मधील गुणधर्म :

मित्रांनो, सफरचंद आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ऑंटीॲक्सिडेंट, जीवनसत्वे, खनिजे, मिनरल्स, विटामिन्स, कार्बोदके, क्लोरिन, लोह, तांबे, फॉलिक ऍसिड, यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. 

अर्धशिशीचा त्रास यावर आराम मिळतो :

अर्धशिशीचा त्रास अगदी त्रासदायक असतो. त्यामुळे अर्ध डोकं दुखते. अशा वेळेस तुम्ही तुमच्या आहारामध्ये सफरचंद समावेश केला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला सलग सात दिवस सकाळी पाच वाजेच्या सुमारास सफरचंद कापून, त्यावर सैंधव मीठ टाकून, पूर्ण सफरचंद तुम्हाला खायचा आहे. असे सलग तुम्हाला कंटिन्यू सात दिवस करायचे आहे. बघा, तुम्हाला फरक जाणवेल. अर्धशिशीचा त्रास हा लवकरात लवकर कमी होऊन जाण्यास मदत मिळते. 

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

हो, मित्रांनो तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये नियमित सफरचंद खाल्ले, तर तुमच्या हृदयाचे आरोग्य सुरळीत राहण्यास मदत मिळते. कारण सफरचंद ही आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल बाहेर काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या हृदयाला रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोकाही टळतो. तसेच त्यामध्ये पोटॅशियम आणि फायबरचे गुणधर्म असल्यामुळे, तुम्हाला त्याचे फायदे होतात. 

कॅन्सरच्या पेशी पासून बचाव होतो :

सफरचंद मध्ये आवश्यक ते गुणधर्म असल्यामुळे, आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. आपल्या शरीरातील सगळी घाण डिटॉक्स होते. त्यामुळे शरीर शुद्ध राहते. त्यामुळे शरीरात तयार होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी पासून आपला बचाव होतो. तसेच बाहेरचे विषारी घटक आपल्या शरीरावर ताबा मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण निरोगी व स्वस्थ राहण्यास मदत मिळते. म्हणूनच त्यासाठी तुम्ही नियमित सफरचंद खायला हवेत, त्यामुळे तुमच्या कॅन्सरचा पासून तुमचा बचाव होतो. 

वजन कमी होण्यास मदत मिळते :

सतत बैठे काम, अवेळी जेवणे, जागरण, पुरेशी झोप न होणे, तसेच बाहेरचे जंकफूड खाणे, याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे तुमचे वजन वाढते. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद समावेश करायला हवा. सफरचंदामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपल्या शरीराला आवश्यक ते घटक द्रव्ये मिळतात. तसेच जर तुम्ही रोज नियमित सकाळी एक सफरचंद खाल्ले, तर तुमच्या तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे जाणवते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच हल्ली मार्केटमध्ये एप्पल साइडर विनेगर मिळते, ते तुम्ही एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घालून, ते पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय अतिरिक्त चरबी असेल, तर जाण्यास मदत मिळते. 

वाचा  लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे

तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळते :

सारखा आजारी पडणे, सारखे सर्दी- खोकला, शिंका येणे, तसेच वायरल फ्लू होणे, याला कारणीभूत म्हणजे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद समावेश करायला हवा. सफरचंद मध्ये ऑंटी एक्सीडेंट चे गुणधर्म असतात. तसेच त्यामध्ये आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म असल्यामुळे, आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, सफरचंदामध्ये कॅल्शियम चा स्त्रोत मुबलक प्रमाणात असतो. तसेच आपल्या शरीरातील हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते, त्यासाठी जर तुम्ही नियमित सफरचंद खाल्ले, तर तुमच्या दातांचे आरोग्य सुरळीत राहते. शिवाय हाडांचा ठिसूळपणा लवकर येत नाही. त्यामुळे हाडांची मजबुती राहते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो :

सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्या शरीरातील पचन संस्थेचे मधील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. शिवाय ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांना सफरचंद खाल्ल्याने फायदा मिळतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आहारात नियमित सफरचंद खायला हवे. 

शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते :

 जर तुम्ही नियमित सफरचंद खाल्ले, तर तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे कमतरता दूर होण्यापासून बचाव होतो. कारण सफरचंदामध्ये लोह, आयर्न, झिंक याचे गुणधर्म असल्यामुळे, आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते व तुम्ही निरोगी राहतात. 

सफरचंद खाल्ल्यास होणारे तोटे ? 

मित्रांनो, सफरचंद हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते, हे आम्ही तुम्हाला वरील दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेले आहेतच. पण म्हणतात ना ! कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खावीत, प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. तसेच सफरचंदाचे हि आहे! जर तुम्ही सफरचंद प्रमाणाच्या बाहेर खाल्ले, किंवा जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुम्हाला पोटात गॅसेस, पोट फुगणे यासारख्या समस्या होऊ शकतात. तसेच काही जणांना फळांपासून ऍलर्जी असते, अशावेळी तुम्ही सफरचंद खाण्यापूर्वी डॉक्टरांना विचारूनच खावेत. तसेच सफरचंद खाण्याचे प्रमाण वाढले, तर तुमच्या शरीरात रक्तात साखरेचे प्रमाणही वाढू शकते, त्यामुळे ते प्रमाणात खावेत. 

वाचा  संत्री खाण्याचे फायदे व तोटे

सफरचंद खाण्याचे नियम :

सहसा सफरचंद हे सकाळच्या वेळी नाश्त्यात, तसेच दुपारी ही खाऊ शकतात. संध्याकाळी शक्यता सफरचंद खाणे टाळावेत. तसेच सफरचंद खाताना ते अगोदर स्वच्छ धुवावेत. कारण त्यावर किटकनाशकांची फवारणी केलेली असते, तुम्ही     न धुता सफरचंद खाल्ले, तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते. तसेच सफरचंद खात असताना, तुम्ही सैंधव मीठ किंवा काळीमिरी पूड पावडर टाकून खाऊ शकतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सफरचंद खाण्याचे फायदे, तसेच तोटेही सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले माहितीमध्ये जर तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच सफरचंद खावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती तुम्हाला आवडली असेल, व आम्ही दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here