सब्जा चे उपयोग आणि फायदे

0
839
सब्जा चे उपयोग आणि फायदे
सब्जा चे उपयोग आणि फायदे

नमस्कार, मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सब्जा चे उपयोग आणि फायदे. तुळशी सगळ्यांच्या घरात असते. तुळशी आपल्या दारात आरोग्याचं स्थान आहे. प्रत्येकाच्या घरात तुळशी असल्यामुळे, तुम्ही निरोगी व सुदृढ राहण्यास मदत मिळते. कारण तुळशी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तसेच जर तुम्ही तुळशीमधील मंजुळा बिया म्हणजेच, सब्जा तुम्ही बघितला असेलच, काळा रंगाचा बारीक गोलसर असतो. सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया होय. तुळशीला ज्या मंजुळा येतात, त्या मंजुळा मधील बियांना सब्जा असे म्हणतात. सब्जा चा वापर अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जात आहे. सब्जा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.

तुळशी मधील घटक द्रव्य बियांमध्ये असल्यामुळे, आपल्याला खूप बहुगुणी फायदे त्यामुळे होतात. तसेच सब्जा चा वापर आपण फालुदा, ज्यूस, पुडिंग मध्ये करतो. तसेच दुधामध्ये  मध्ये सब्जा चा वापर केला जातो. तसेच सब्जा घालून तुम्ही जेवणा नंतर चा आहार करू शकतात. तो म्हणजे बडीशोप, ओवा, तीळ, सब्जा घालून तुम्ही खाऊ शकतात. तसेच जेवणानंतर जर तुम्ही नियमित सब्जा खाल्ला, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात. पण मित्रांनो सब्जा खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात, हे अनेक जणांना माहिती नसते. तर आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की सब्जा खाल्ल्याने तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात ! 

सब्जा खाल्ल्याने होणारे फायदे ? 

मित्रांनो सब्जा खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात तर मग ते नेमके कोणकोणते चला तर मग जाणून घेऊया !

वाचा  चिडखोर मुलांना कसे हाताळावे

सब्जा मधील गुणधर्म :

मित्रांनो, अनेकांना समजा मधील गुणधर्म हे माहिती नसतात. हे आपल्या आरोग्यासाठी आहे, हे नक्की आहे. सब्जा मध्ये कॅल्शियम, फायबर, मॅग्नीज, प्रोटीन, मॅग्नेशियम, ओमेगा फॅटी ऍसिड, फॉस्फरस विटामिन्स, अल्फा-लिनोलेनिक, लोह यासारखे गुणधर्म असल्यामुळे, ते आपल्या शरीरासाठी फार प्रभावशाली व गुणकारी आहेत. त्यामुळे तुम्ही नियमित तुमचे आहारामध्ये सब्जा चा वापर करावा. 

वजन कमी होण्यास मदत मिळते :

सब्जा हा तुमच्या वजन कमी करण्यासाठी मदत करतो. खरच हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. सतत बैठे कामामुळे वजन वाढीची समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळत आहेत. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित सब्जा खाल्ला, तर तुमचे वजनावर त्याचा परिणाम होतोच. शिवाय वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण सब्जा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर ची मात्रा असते, आणि सकाळी जर तुम्ही सब्जा खाल्ला, तर तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे त्याचा परिणामी तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

सब्जा मधील घटक द्रव्य, आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण सब्जामध्ये फायबर व प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस ची मात्रा असते, तसेच त्याच्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड, तसेच अल्फा-लिनोलेनिक, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी ते फायदेशीर ठरतात. त्यासाठी जर तुम्ही नियमित सब्जा खाल्ला, तर तुम्हाला फायदे मिळतील. तसेच सब्जा मधील आवश्यक घटक द्रव्ये आपल्या शरीराला मिळाल्यामुळे, आपल्याला हृदयविकाराचा धोका टळू शकतो. 

आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात :

सब्जा नियमित खाल्ल्यामुळे, आपल्या हाडांचे आरोग्य हे फायदेशीर राहते. कारण सब्जा मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रोटिन्स ची मात्रा असल्यामुळे आपल्याला हाडांशी संबंधित तक्रारी होत नाही. त्यामुळे तुम्ही नियमित सब्जा खायला हवा. 

मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, सब्जा मध्ये आवश्यक ते गुणधर्म असल्यामुळे, ते मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरते. कारण सब्जा मधील गुणधर्म हे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील इन्शुलिनची लेव्हल सुरळीत राहते, व मधुमेहींसाठी त्याचा फायदा होतो. त्यासाठी रोज सकाळी त्यांनी भिजवलेला सब्जा दुधामध्ये टाकून खाऊ शकतात, तसेच तुम्ही एकदा डॉक्टरांना विचारूनही घेऊ शकतात. 

वाचा  गळू पिकण्यासाठी उपाय

वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते :

ज्या लोकांना दिवसभर वारंवार भूक लागत असेल, अशा लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, असे असते. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये सब्जा खाल्ला, तर त्यांना वारंवार भूक लागण्याचे समस्येवर आराम मिळतो. कारण सब्जा मध्ये प्रोटीन की मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे, तुम्हाला तुमचे भुकेवर नियंत्रण ठेवता येते. तसेच आपल्या शरीरातील प्रोटीनची मात्रा मिळाल्यामुळे, आपल्या स्नायूंना निरोगी राहण्यास मदत मिळते. 

शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत मिळते :

मित्रांनो सब्जा मध्ये लोह, आयर्न यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत मिळते. तसेच लोह असल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे, तेही भरून निघण्यास मदत मिळते. त्यासाठी जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात सब्जा खाल्ला, तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. तसेच तुम्हाला शंका वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना ही विचारून घेऊ शकतात. 

रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळते :

तुळशी ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच तिच्या बियांमध्ये हे गुणधर्म असतात. तुळशीच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये विविध आजारांना तोंड देण्यास मदत मिळते. कारण तुळशीच्या बियांचा वापर म्हणजे सब्जा, आपण खाल्ला, तर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीला चालना मिळते व आपण अनेक आजारांवर मात करू शकतात. त्यासाठी नियमित तुम्ही सकाळ-संध्याकाळ भिजवलेला सब्जा तुमच्या आहारात घ्यावा. तसेच तुम्हाला भिजवलेला आवडत नसेल, तर तुम्ही त्याला न भिजवता, किंवा दुधात ही खाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला फायदे होतातच. 

शरीराला थंडावा मिळतो :

ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी त्यांच्या आहारात सब्जा खाल्ला, तर त्यांना त्याचे खूप सारे फायदे मिळतात. कारण सब्जा हा थंड असतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता शोषून घेण्याचे काम तो करतो, कारण सब्जा मध्ये विटामिन्स, फायबर, ओमेगा थ्री, कार्बोहायड्रेट्स, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीराला थंडावा मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये सब्जा हा जास्त प्रमाणात वापरला जातो. तसेच सब्जा तुम्ही फालुदा मध्ये टाकूनही खातात, तसेच तुम्ही त्याला दुधामध्ये टाकूनही खाऊ शकतात. 

वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

युरिन इन्फेक्शन वर आराम मिळतो :

मित्रांनो, नियमित सब्जा चे सेवन केल्यामुळे, तुम्हाला युरिन इन्फेक्शन वर आराम मिळतो. जर तुम्हाला युरीन करताना जळजळ व आग होत असेल, अशावेळी तुम्ही दिवसातून तीन वेळेस भिजवलेला सब्जा हा खायला हवा, त्यामुळे शरीरातील घाण निघण्यास मदत मिळते. व युरिन इन्फेक्शन वर आराम मिळतो, व आग होणे, जळजळ होणे कमी होते. तसेच जर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये सब्जा भिजवून मध टाकून खाल्ले, तरी तुम्हाला फरक पडेल. 

सब्जा खाल्ल्याने होणारे नुकसान नक्की कोण कोणते ? 

मित्रांनो, कोणतीही ही गोष्टही प्रमाणातच खावी, हा आपल्याला निसर्गाचा नियम आहे.  जर तिचे प्रमाण वाढले, ते आपल्या शरीराला त्रास होतो. तसेच सब्जाचे ही आहे, सब्जा खाताना नेहमी प्रमाणातच खावा, अति प्रमाणात खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटात बिघाड होण्याची समस्या होतात. तसेच सब्जा जास्त खाल्ल्यामुळे, त्यामध्ये फायबर असते, त्यामुळे तुम्हाला पचनाची संबंधित तक्रारी होऊ शकतात. तसेच ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या असेल, त्यांनी त्यांच्या आहारात सब्जा डॉक्टरांना विचारूनच खावा.

कारण सब्जा मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे, सब्जा चे सेवन रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला कमी रक्‍तदाबाचा त्रास आहे, तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम बघायला मिळू शकतात. तसेच सब्जा जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या घशामध्ये तो अडकू शकतो, त्यामुळे तुम्हाला श्वसन मार्गात समस्या येऊ शकतात, तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये सब्जा खाण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकतात. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सब्जा चे फायदे व तोटे सांगितलेले आहेतच. तसेच सब्जा खाण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. कारण तुम्हाला जर ऍलर्जी असेल, तर तुम्ही ते डॉक्टरांना विचारून घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल, तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here