एरंडेल तेलाचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
748
एरंडेल तेलाचे फायदे
एरंडेल तेलाचे फायदे

 

नमस्कार मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जणांना कसल्या ना कसल्या समस्या उद्भवत असतात. कामाच्या धावपळीमध्ये शरीराचे स्वास्थ्य जपले जात नाही. त्यामुळे आपल्या शारीरिक नुकसान होऊ शकते. म्हणून शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून आपण आपले स्वतःचे जेवढे जास्तीत जास्त काळजी करू तेवढे आपण आपले शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवू शकतो. मित्रांनो अनेक जणांना केसां संदर्भात समस्या येत असतात. केसां संदर्भात समस्या म्हटल्या म्हणजे केस गळती होणे अकाली केस पांढरे होणे केसात कोंडा होणे केस निस्तेज दिसू लागणे अशा एक ना अनेक समस्या असतात. म्हणजेच आपला आपल्या शरीराबद्दल कुठल्या ना कुठल्या समस्या येत असतात. बऱ्याच वेळा अनेकांना पोटदुखीचा त्रास होत असतो तसेच पोट साफ न होण्याचा देखील त्रास होतो. परंतु या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी उपाय देखील असतो. निसर्गाची रचना एवढी सुंदर आहे की या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टी आहेत त्याचा फायदा आपल्याला होत असतो.आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रकारचे झाडे आढळून येतात. आणि अनेक झाडे ही आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असतात. त्यातीलच एक म्हणजे एरंडेल. एरंडेल याचे तेल बहुगुणी ठरत असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने एरंडाचे तेल खूपच महत्वपूर्ण ठरत असते. एरंडेल तेल मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. एरंडेल तेलाचा आपण आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी देखील उपयोग करून घेऊ शकतो.

       एरंडेल तेलामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्या त्वचेला खूप फायदा होत असतो. एरंडेल तेलाचे एक ना अनेक वैशिष्ट्ये आपल्या सांगता येतील. एरंडेल तेलाचा उपयोग हा अनेक ठिकाणी होत असतो. जसे की यापासून साबण मसाज ऑइल बनवली जाते त्याशिवाय याचा उपयोग औषधी म्हणून देखील होत असतो. सौंदर्याच्या दृष्टीने देखील आपण एरंडेल तेलाचा उपयोग करून घेऊ शकतो. तर मित्रांनो आज आपण एरंडेल तेलाचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग एरंडेल तेलाचे फायदे आपण कशाप्रकारे करून घेऊ शकतो? तसेच, एरंडेल तेलाचा उपयोग आपण कशाप्रकारे करायला हवा? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

एरंडेल तेल नेमके काय असते?

मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरात एक ना अनेक प्रकारचे झाडे आपल्याला आढळून येत असतात. प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य देखील वेगवेगळे प्रकारचे असते. त्यातलेच एक झाड म्हणजेच एरंडेल. आयुर्वेदाच्या दृष्टीने एरंडेल झाड हे खूपच उपयोगी मानले जाते. एरंडेल झाडाच्या पानांचा, त्याच्या बियांचा तसेच त्याच्या मुळांचा म्हणजे संपूर्ण झाडाचा उपयोग आयुर्वेदाच्या दृष्टीने बहुगुणी आहे. अनेक जण एरंडेल तेल वापरत असतात. एरंडेल तेलाचे एक ना अनेक फायदे आपल्याला होत असतात. तरी या झाडापासून एरंडेल चे तेल तयार केले जाते. आपल्या शरीराच्या अनेक समस्यांसाठी आपण एरंडेल तेलाचा उपयोग करू शकतो. आणि ज्यांना वात होण्याची समस्या येत असते. तरी यासाठी देखील एरंडेल तेलाचा फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणजेच हे आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच बहुगुणी मानले जाते.

वाचा   गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी

एरंडेल तेलाचे कोणत्या प्रकारचे फायदे होतात?

     मित्रांनो, एरंडेल तेलाचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. एरंडेल तेल हे अंतीबॅक्टरियल गुणधर्मांनी भरपूर असते. तसेच एरंडेल तेलामध्ये विटामिन ई चा समावेश असतो. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो एरंडेल तेलाचे कुठल्या प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात.

एरंडेल तेलाचे त्वचेसाठी होणारे फायदे:-

        अनेक लोकांना त्वचेच्या संदर्भात समस्या येत असतात. काहींची त्वचाही कोरडी पडत असते आणि ह्या वयात हा त्रास जास्त होत असतो. अशा वेळी आपल्याला एरंडेल तेल याचा उपयोग होत असतो. एरंडेल तेल हे चिकट स्वरूपाचे असते. कारण त्याच्यामध्ये विटामिन चे प्रमाण असते. तसेच हे तेल घट्ट प्रकारचे देखील असते. एरंडेल तेलाचा आपण आपल्या त्वचेसाठी उपयोग केल्यामुळे आपली त्वचा ही मऊ व मुलायम होण्यास मदत होत असते. तसेच बऱ्याच जणांची त्वचा ही निस्तेज दिसत असते. तर एक प्रकारे नैसर्गिक चमक आणण्यासाठी देखील आपण एरंडेल तेलाचा उपयोग करून घेऊ शकतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेलाचे चार ते पाच थेंब घेऊन त्यामध्ये थोडेसे एलोवेरा जेल मिक्स करावे. आणि जास्त फायदेशीर होण्यासाठी त्याच्यामध्ये विटामिन ई कॅप्सूल चे एक दोन थेंब टाकून घ्यावे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचा उपयोग आपण नाईट क्रीम प्रमाणे करू शकतो. तसेच ते चेहऱ्यावर लावल्यावर पाच मिनिटे चेहऱ्याचा मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. हा उपाय  तुम्ही नियमित केल्यामुळे तुमची त्वचा हे डाग रहित दिसण्यास मदत होऊ शकेल. त्याचप्रमाणे निस्तेज दिसणारी त्वचा देखील चमकदार दिसू लागेल. आणि चेहर्‍यावर जे सुरकुत्या पडत असतील त्या सुरकुत्या देखिल नाहीशा होतील आणि दीर्घकाळापर्यंत चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडणार नाहीत. तर एरंडेल तेल लावण्याचे एक ना अनेक फायदे आपल्या त्वचेला होऊ शकतात.

वाचा  स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

एरंडेल तेलाचे केसांसाठी होणारे फायदे:-

    मित्रांनो अनेक जणांना केसांच्या संदर्भात समस्या येत असतात. त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे केस गळती होणे. हो मित्रांनो केस गळतीसाठी एरंडेल तेलाचा फार महत्वपूर्ण उपयोग होत असतो. कारण यामध्ये विटामिन ई जास्त प्रमाणात असते. ज्यांना केस गळतीची समस्या असेल त्यांनी एरंडेल तेलाचा उपयोग करायला हवा. यामुळे तुमच्या केसांची होणारी गळती थांबण्यासाठी मदत होईल. एरंडेल तेल हे चिकट असते त्यामुळे ते डायरेक्ट केसांना लावू नये. तर हे तेल लावण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत नारळाचे तेल दोन ते तीन चमचे घ्यावे. नंतर त्यामध्ये एरंडेल तेलाचे दीड ते दोन चमचे तेल टाकून घ्यावे. तेलाचं प्रमाण हे तुमच्या केसांच्या लांबीवर अवलंबून असते. जर केस छोट असतील तर  आम्ही सांगितलेले, प्रमाण तुम्ही घेऊ शकतात. आणि जर केस लांब असतील तर तुम्ही त्याप्रमाणे तेलाचे प्रमाण घ्यायला हवे. तसेच नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिक्स केल्यावर ते तेल कोमट करून घ्यावे. आणि नंतर त्या मध्ये विटामिन ई च्या दोन कॅप्सूल टाकून घ्याव्यात. आणि या रीतीने तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांच्या मुळाशी मालिश करावी. आणि दुसऱ्या दिवशी केस हर्बल शाम्पूने स्वच्छ करून घ्यावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा किंवा चार वेळा करु शकतात. याच्या नियमित उपयोग केल्यामुळे तुमचे केसांची गळती थांबण्यासाठी मदत होईल तसेच तुमचे केस मुलायम होण्यासाठी देखील मदत होईल. तुमच्या केसांना नैसर्गिक चमक देखील येऊ लागेल. शिवाय तुमचे केस हे लांब सडक होण्यास देखील मदत होईल. अशा प्रकारे तुमच्या केसांना एरंडेल तेलाचे फायदे होत असतात.

एरंडेल तेलाचे पोट साफ होण्यासाठी फायदे:-

अनेक जणांना अपचनाचा त्रास होत असतो. आणि अपचन झाले तर त्यामुळे पोट साफ न होण्याचा देखील त्रास होऊ लागतो. शरीरातील पचनक्रिया अतिसुलभ न झाल्यामुळे शरीरातील अन्नाचे हे चरबीमध्ये रूपांतर होऊ लागते. परिणामी आपल्या शरीराचे वजन देखील वाढू लागते. तर या सर्व कारणांमुळे अनेक जणांना ॲसिडिटीची समस्या देखील होत असते. तर या सर्व समस्यांसाठी एरंडेल तेलाचा उपयोग होत असतो. त्यासाठी तुम्ही उपाशीपोटी एरंडेल तेलाचे सेवन केले तर या सर्व समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकतात. एरंडेल तेल पोटातून घेतल्यामुळे पोट लवकर साफ होण्यास मदत होते. तसेच, अपचनाची समस्या देखील होत नाही. ॲसिडिटीची ही समस्या दूर होऊ शकते. तसेच, पोटातील गॅस  होण्याची समस्या ही पण नाहीशी होते. म्हणजे एरंडेल तेलामुळे एवढे सर्व फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतात.

वाचा  राईच्या तेलाचे फायदे

एरंडेल तेलाचे वजन कमी करण्यासाठी होणारे फायदे:-

   बरेच लोक वजन वाढल्यामुळे चिंतेत असतात. वजन कमी करण्यासाठी एक ना अनेक प्रकारचे उपायदेखील शोधत असतात. तर मित्रांनो एरंडेल तेलाचा वजन कमी करण्यासाठी देखील एक प्रकारे फायदा होत असतो. शरीरातील अपचन वाढल्यामुळे अन्नाचे चरबीत रूपांतर होत असते. परिणामी चरबी वाढल्यामुळे वजन वाढू लागते. एरंडेल तेलाचा उपयोग तुम्ही केल्यास तुमचे वजन नियंत्रित होऊ शकते. त्यासाठी त्यांनी एक ग्लास पाणी व करून घ्यावे. आणि त्यामध्ये एरंडेल तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून त्याचे सेवन करावे. अथवा ग्रीन टी मधून देखील तुम्ही एरंडेल तेलाचे सेवन करू शकतात. असे तुम्ही नियमित केल्या मुळे तुमचे वजन हे कमी होऊ लागेल. तसेच पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी एरंडेल तेल कोमट करून त्या तेलाने पोटावर मालिश करावी. असे तुम्ही नियमित केल्यामुळे देखिल चरबी कमी होऊ लागेल. म्हणजेच तुमच्या शरीराचे वजन कमी होण्यासाठी एरंडेल तेलाचे फायदे तुम्हाला होऊ शकतात.

         तर मित्रांनो एरंडेल तेलाचे किती प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. एरंडेल तेल त्वचेवर लावल्याने देखील आपली त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होत असते तसेच एरंडेल तेलाचे केसांसाठी देखील अनेक प्रकारचे फायदे आपला होत असतात. तसेच एरंडेल तेल हे पोटातून घेतल्यामुळे देखील आपण अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहू शकतो. परंतु, एरंडेल तेल पोटातून घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायला हवा.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवू शकतात.

 

            धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here