पायाच्या नखांचे रंग व आजार

0
1690
पायाच्या नखांचे रंग व आजार
पायाच्या नखांचे रंग व आजार

नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. आपल्या शरीरातील सर्व अवयव हे चांगले असतील तर आपली शारीरिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. सौंदर्याच्या बाबतीत म्हटले तर ज्याप्रमाणे घनदाट, लांबसडक, काळेभोर व चमकदार केस तसेच नरम व चमकदार त्वचा हे ज्याप्रमाणे जास्तीत जास्त महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या पायाची व हाताची नखे हीदेखील स्वच्छ व सुंदर असायला हवीत. आपल्या हातांची पायांची नखे जर चांगले असतील तर त्यामध्ये अजून म्हणजे सौंदर्यामध्ये अजून भर पडत असते. अनेक व्यक्तींची नक्की ही स्वच्छ दिसायला आकर्षित आणि लांब देखील असलेली दिसून येतात. आणि अशी नखे आपले देखील असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. चला तर मग जाणून घेऊयात पायाच्या नखांचे रंग व आजार.

नखे हे फक्त सौंदर्या पुरताच मर्यादित नसतात तर नखांचा संबंध हा आपल्या आरोग्य संबंधी देखील निगडित असतो. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने देखील आपण आपल्या नखांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरत असते. आपली नखे जर ही नेहमी स्वच्छ आणि छान असली तर आपले आरोग्य चांगले आहेत असे समजावे. आणि जर नखांचा रंग हा वेगळा म्हणजेच बदलत गेला किंवा नखे सारखे सारखे तुटत असतील किंवा नखे ही वाढतच नसतील तर त्याचा संबंध आरोग्याशी जोडला जात असतो. कारण सुंदर स्वच्छ नखे असणे म्हणजेच आरोग्य चांगले असणे असे मानले जाते. म्हणून आपण आपले नखांची जेवढे आरोग्य तेवढे आपले आरोग्य देखील चांगले राहील.

मित्रांनो, नक्की ही जोपर्यंत सुंदर स्वच्छ असतील परंतु आपले आरोग्य चांगले आहे असे समजावे परंतु जेव्हा नखांचा कलर हा बदलत जाईल म्हणजेच नखे ही काळी अथवा पिवळ्या रंगाची होत असतील किंवा निळ्या रंगाचे होत असतील तसेच नखे वाढण्याचा संबंधित समस्या येत असतील किंवा नखे ही अर्ध्यातूनच सारखे सारखे तुटत असतील तर आरोग्या मध्ये काहीतरी बिघाड झाला आहे असे समजायला हवे. मग नखे हि हाताची असो अथवा पायांची असोत, दोघांची नखे जपणे फार अत्यंत आवश्यक असतात.  तर नखांचा कलर हा का बदलत असेल? यामागची नेमकी कारणे कोणती असतील? याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण पायाच्या नखांचे रंग आणि आजार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग पायाच्या नखांचे रंग व आजार याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

पायाच्या नखांचे रंग का बदलतात?

मित्रांनो, नखे सुंदर स्वच्छ व आकर्षक असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडत असतात. त्याचप्रमाणे, आपले आरोग्य देखील आपल्याला नखांमुळे समजत असते. म्हणजेच आपल्या हातांची आणि पायांची नखे ही सुंदर स्वच्छ व लांब असतील तर आपले आरोग्य चांगले आहेत असे मानले जाते. आणि जर आपल्या हाताच्या अथवा पायाच्या नखांचा रंग हा जर बदलत गेला म्हणजेच काय निळे पडत गेली अथवा पिवळी पडत गेली तर आपल्या आरोग्य मध्ये कुठेतरी बिघाड झालेला आहे असे समजून घ्यावेत. तर आपल्या पायांच्या नखांची रंग का बदलतात याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात.

वाचा  सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे

जर तुमच्या नखांचा रंग हा तपकरी झाला असेल तर ?

आपल्या शरीरामध्ये कसली ना कसली तरी कमतरता आढळून आल्यास आपल्या नखांचा रंग हा बदलत जात असतो. म्हणजे शरीरामध्ये एखाद्या घटकाचा अभाव असल्यामुळे आपल्या नखांचा रंग बदलतो. जर नखांचा कलर हा तपकिरी झाला असेल अथवा काळपट डार्क झाला असेल तर आपल्या शरीरामध्ये थायरॉईडची समस्या असेल असे समजून घ्यावे. बऱ्याच जणांना थायरॉईडची समस्या असल्या कारणामुळे त्यांच्या नखांमध्ये वेगळा रंग दिसून येत म्हणजेच त्यांची नक्की ही तपकिरी रंगाची अथवा गडद रंगाची झाल्याची दिसून येतात. तसेच आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांची, पोषक घटकांची कमतरता झाली असेल तर त्यामुळे आपल्याला नखांचा रंग हा तपकिरी रंगाचा अथवा गडद रंगाचा होऊ शकतो. म्हणजेच जर आपल्या नखांचा रंग जर बदलला तर समजून घ्यावे की, आपल्या शरीरामध्ये कुठल्यातरी घटकाची कमतरता असेल.

जर नखांवर काळया रंगाच्या लाइन्स उमटत असतील तर ?

जर नखांवर या काळया रंगाच्या रेघा उमटत असतील तर आपल्या पोटामध्ये कुठल्यातरी बिघाड झाल्यामुळे नखांवर काळया रंगाच्या रेघा येत असतात. जर आपल्याला पोटासंबंधी त्रास होत असेल तर याचा परिणाम हा आपल्या नखांवर देखील दिसून येत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच जणांच्या अंगठ्यावर काळया रंगाच्या रेघा उमटलेल्या दिसून येत असतात. मग तो अंगठा पायाचा असो अथवा हाताचा असो किंवा दोघांवरही दिसून येत असतात. तेव्हा असे समजून घ्यावे की आपल्या पोटामध्ये कुठलीतरी समस्या निर्माण झाली असेल ज्यामुळे आपल्या नखावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

जर तुमच्या नखांचा रंग हा पिवळ्या रंगाचा झाला असेल तर ?

जर आपल्या नखांचा रंग हा फिकट पिवळसर किंवा डार्क पिवळसर रंगाचा झाला असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठलातरी अथवा कशाचातरी संसर्ग झाला आहे असे समजून घ्यावे. डायबिटीज असल्या कारणामुळे देखील नखांचा रंग हा पिवळसर होऊ शकतो. ज्या व्यक्तींना डायबिटीज असतो अशा बऱ्याच व्यक्तींची नक्की ही पिवळसर रंगाची असल्याचे दिसून येतात. बऱ्याच व्यक्तींना थायरॉईड संबंधित समस्या येत असते. जर थायरॉईडची समस्या शरीरामध्ये निर्माण झाले असेल तर त्यामुळे देखील नखांचा रंग हा पिवळसर होऊ शकतो. तसेच फुफुसा संबंधित आजार असतील तर त्यामुळे देखील नखांचा पिवळा कलर होत असतो. म्हणजेच एखाद्या गंभीर स्वरूपाचा आजार झाला असल्यास नखांचा रंग हा पिवळसर किंवा डार्क पिवळसर होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर एक शरीरामध्ये कुठल्यातरी गोष्टीची अलर्जी अथवा संसर्ग झाला असेल तर त्यामुळे देखील नखांचा रंग हा पिवळा पडण्याची शक्यता असते.

वाचा  मन मोकळे करणे का गरजेचे असते ?

जर तुमच्या नखांचा रंग हा निळपट झाला असेल तर ?

जर आपल्या नखांचा रंग हा निळपट झाला असेल, तर आपल्या नखांवर एखादी जड वस्तू पडल्यामुळे असा कलर होण्याची शक्यता असते. किंवा नखांचे बोट हे कुठेतरी अडकल्यामुळे देखील नखांचा रंग निळपट होऊ शकतो. बऱ्याच वेळा लहान मुले खेळता खेळता सारखे सारखे पडत किंवा खेळता-खेळता एखादी वस्तू अथवा दगड वगैरे पायावर पडल्यामुळे देखील पायाची नखे निळ्या रंगाची अथवा काळपट रंगाचे होत असतात. त्याचप्रमाणे, जर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा हा फार कमी प्रमाणात होत असेल तर या कारणामुळे देखील नखांचा निळपट रंग होऊ शकतो. किंवा जर एखाद्या व्यक्तीला फुप्फुसा संबंधित त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीच्या नखांचा रंग हा देखील निळा रंगाची होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला देखील तुमच्या नखांचा रंग हा नीळपट झालेला आढळून आला असेल तर तुम्हाला देखील ऑक्सिजनचा त्रास अथवा फुफ्फुस संबंधित आजार असू शकतील असे समजून घ्यावे.

जर तुमच्या नखांचा रंग पांढरा झाला असेल तर ?

बऱ्याच वेळा हातांच्या अथवा पायांच्या नखांवर पांढरे डाग पडण्याची शक्यता असते. किंवा नखे ही पांढरा रंगाचे होत असतात. जर आपल्या शरीरामध्ये पोषक घटकांची पोषक तत्वांची कमतरता होत असेल तर या कारणांमुळे, आपल्या नखांवर पांढरे लाईन्स उमटण्याची शक्यता असते. तर एखाद वेळेस नखे ही पांढरे देखील होत असतात. तसेच जर शरीरामध्ये हृदय संबंधित समस्या उद्भवत असेल, किंवा स्वादुपिंडाचा संबंधित समस्या येत असेल, तर या कारणामुळे देखील नखांचा रंग पांढरा होण्याची शक्यता असते. जर तुमच्या देखील नखांचा रंग हा पांढरा होत असेल तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हृदया संबंधित समस्या येत असेल असे समजून घ्यावे. त्याचप्रमाणे, जर शरीरामध्ये काही पोषक तत्त्वांची कमी उणीव असल्यास देखील नखांचा रंग होण्याची शक्यता असते.

वाचा  तोंडली खाण्याचे फायदे

जर तुमच्या नखांची चमक गेली असेल तर ?

आपल्या पायाची हाताची नखे असो ही जर सुंदर आकर्षक असतील तर आपण आजारांपासून दूर आहोत असे समजून घ्यावेत. परंतु जर आपल्या नखांचा जो मूळ नैसर्गिक रंग आहे तो जर कमी होत गेला असेल अथवा आपल्या नखांची चमक ही नाहीशी होत असेल, तर आपल्या शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी विटामिन्स अथवा पोषक घटकांची पोषक तत्वांची कमतरता आहे असे समजून घ्यावे. आपल्या नखांची चमक जाऊ नये यासाठी आपण आपल्या आहारामध्ये सर्व घटकांचा समावेश आवर्जून करायला हवा जेणेकरून आपल्या न कांची चमक कायम टिकून राहील. आपल्या शरीरामध्ये जर आपल्या विटामिन ची कमतरता असेल तर यामुळे देखील आपल्याला नखांची चमक जाण्याची शक्यता असते. म्हणून जर तुमच्या नखांची चमक केली असेल तर तुमच्या शरीरामध्ये आवश्यक पोषक घटकांची पोषक तत्वांची तसेच व्हिटॅमिनची कमतरता असेल असे समजून घ्यावे.

तर काही जणांना त्यांची नखे ही जाड झाल्यासारखी वाटत असतात. बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींना डायबिटीज झाले असते त्या व्यक्तींची नखे ही पिवळ्या रंगाची तसेच जाड झालेली देखील दिसून येत असतात. तुम्हाला देखील तुमच्याशी नक्की ही जाड झालेली दिसून येत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवायला हवे.

जाणून घ्या : मासिक पाळी येण्यासाठी उपाय 

तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या नखांचा रंग हा बदललेला वाटत असेल म्हणजेच तुमच्या नखांचा रंग हा पिवळट, काळपट निळा, तपकिरी रंगाचा अथवा पांढरा यापैकी कुठला एक रंगाचा झालेला असेल तर वरील प्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या शरीराबद्दल काहीतरी समस्या असू शकते असे समजून घ्यावे. तसेच जर तुम्हाला देखिल  वरील प्रमाणे समस्या येत असेल तर नक्कीच तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे दाखवायला हवे. कारण नका संबंधित समस्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्हाला देखील तुमच्या नखांचा कलर हा बदललेला जाणवून येत असेल तर त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यायला हवा.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

      धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here