मन मोकळे करणे का गरजेचे असते ?

0
985
मन मोकळे करणे का गरजेचे असते
मन मोकळे करणे का गरजेचे असते

नमस्कार मित्रांनो. हल्लीच्या धावपळीच्या जगात सर्वजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये इतके गुंतून गेले आहेत की त्यांना स्वतःचे मन देखील जपायला होत नाहीये. हल्लीच्या या जगामध्ये सर्वजण कामाच्या मागे हात धूऊन लागलेले असतात. काम केले नाही तर मग कनवणार कसे, खाणार कसे म्हणून काम करणे हे तर सगळ्यांना भागच आहे. मग काम हे कुठले असो बाहेरील कुठले तरी असो नाहीतर ऑफिसमधले असो, प्रत्येक ठिकाणी कामाचा ताण तणाव हा वाढत असतो. तसेच कामाच्या अति लोडामुळे व्यक्तीला स्वतःसाठी देखील वेळ देता येत नसतो. म्हणजेच कामाच्या अति लोडमुळे बऱ्याच व्यक्तींची जीवनशैली ही तणावपूर्ण बनलेली आहे. आणि यात तणावपूर्ण जीवनशैलीमुळे त्याचा परिणाम हा व्यक्तीच्या मनावर तसेच डोक्यावर होताना देखील दिसून येत असतो. म्हणून मन मोकळे करणे गरजेचे असते.

सतत काम काम करत राहणे सहज कामाचा विचार करणे यामुळे व्यक्तीच्या मनात ते सर्व साठून राहते. बऱ्याच वेळा घरातील प्रॉब्लेम्स नाहीतर बाहेरील प्रॉब्लेम्स यामुळे देखील व्यक्ती हा तणावपूर्ण असताना दिसून येतो. परंतु मित्रांनो सतत मनामध्ये कुठला न कुठला विचार करत राहणे, सतत कामाचा अति लोड घेत राहणे, सतत स्वताचा विचार न करता फक्त कामच करत राहणे, कामाचाच विचार करत राहणे या कारणांमुळे व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. व्यक्ती हा जर सतत कामाच्या तनावा मध्ये राहिला किंवा त्याने मन मोकळे न करता मनामध्ये  अनेक गोष्टी साठवून ठेवल्यात, तर त्या सर्वांचा हा त्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होताना देखील दिसून येत असतो. आणि बरेच जण अशा मुळे डिप्रेशनमध्ये देखील जाण्याची शक्यता असते.

मन हे नेहमी अशांत राहिल्यामुळे, मनामध्ये प्रत्येक गोष्टी साठवून ठेवल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या स्वतःच्या शरीरावर होत असतो. अशावेळी आपण आपले स्वतःचे मन हे हलके करायला हवे. म्हणजेच मन मोकळे करायला हवे. मनामध्ये आपण सतत काही गुंता न गुंता साठवून ठेवली तर याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून मनामध्ये कुठल्याही प्रकारची गुंता असायला नको. मित्रांनो, मन मोकळे करणे गरजेचे असते. मन हे नेहमी अशांत राहिले तसेच मनात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या तर शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार जडण्याची शक्यता असते.

कुठलेही कामाचा आपण अति टेन्शन घेतलं किंवा सतत कुठल्या ना कुठल्या विचारात राहिलो तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून मन हे जेवढे मोकळे राहील तितके आपण शांत राहू शकतो. तर मित्रांनो, आज आपण मन मोकळे करणे का गरजेचे असते या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर मनात सतत काही ना काही विचार असले तर किंवा आपण मन मोकळे केले नाही तर कुठल्या प्रकारच्या व्याधी शरीरात जडू शकतात, याबद्दल देखील आपण आज जाणून घ्यायला हवे. चला, तर मग मित्रांनो “मन मोकळे का गरजेचे असते” याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

मन मोकळे न झाल्यास कोणते परिणाम शरीरावर होताना दिसून येतात ?

मित्रांनो, आजकालचे हे धावपळीचे जग आहे. आणि या धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली ही तणाव पूर्ण बनलेली बघायला मिळते. प्रत्येक व्यक्ती हा सतत काही ना काही कामात गुंतलेला दिसून येत असतो. चांगले जीवन जगायचे असेल तर हाती पैसा असायला हवा म्हणून, काम ही केलीच पाहिजे असे प्रत्येकाचे चाललेले आहे. त्यामुळे बरेच जण हे कामाच्या अति लोड मुळे तणावपूर्ण असलेले दिसून येतात. का मग बाहेरच्या सो आमचे असो अथवा कुठलेही असो प्रत्येक जाणा कामाचे टेन्शन हे येतच असते. तसेच घरातील वेगळी टेन्शन असे एक ना अनेक टेंशन प्रत्येकाला असते. तसेच मन हे नेहमी अशांत असते. बऱ्याच जणांचा मनामध्ये आहे एक ना अनेक विचार घोळत असतात. मनामध्ये सतत कामाचे टेन्शन घेत राहणे, अशांत जीवन शैली, आपल्या जीवन संबंधित प्रत्येक गोष्टीची काळजी मनामध्ये करत बसणे यामुळे मन हे नुसतं शांत राहते आणि याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होताना दिसून येत असतो.

वाचा  अचानक ओठ सुजणे कारण व उपाय

परिणामी व्यक्तीच्या शरीरातील तापमान हे कमी-जास्त होणे, कमी रक्तदाब होने, उच्च रक्तदाब होणे तसेच डोके दुखी आणि डिप्रेशन या गोष्टींना सामोरे जावे लागत असते. या सर्वांचा परिणाम हा आपल्या शरीरावर जास्त होताना दिसून येत असतो. मन हे अशांत राहील तेवढा त्याचा त्रास हा आपल्या शरीराला होत असतो. म्हणून तुम्ही तुमचे मन हे जेवढे मोकळे कराल तेवढे तुमचे शरीर चांगले राहण्यास मदत होऊ शकते. जेवढे तुम्ही तणावरहित जीवनशैली जगाल तेवढे तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहू शकते. आणि काही काम बच्चे ताण-तणाव तुमच्या मनामध्ये साठवून राहिले किंवा अनेक गोष्टी तुमच्या मनात साठवून राहिल्या तर तुम्ही त्या मोकळा करायला हव्यात. तुम्ही स्वतःचे मन जेवढे मोकळे कराल तेवढे तुम्ही आनंदी राहाल. तर मित्रांना मन मोकळे कशाप्रकारे करायला हवे याबद्दल घ्यायला आपल्याला जाणून घ्यायला हवे. तर मन मोकळे करण्यासाठी आपण काय करायला हवे कुठल्या पद्धतीने आपण मन मोकळे करायला हवे याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

मन कसे मोकळे करायला हवे ?

प्रत्येक व्यक्ती ही कामाच्या धावपळीत असताना दिसून येते. तसेच मनामध्ये सतत काही ना काही विचार करत बसणे एका ठिकाणी बसल्याबसल्या देखील मनामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसणे, मन हलके न ठेवता सतत मनामध्ये कुठला न कुठला विचार करत राहणे, कामाचं टेन्शन घेत राहणे यामुळे मन हे अशांत राहते. आणि मन हे जितके अशांत राहील तितक्या त्या व्यक्तीच्या शरीराला व्याधी जडण्याची शक्यता असते. म्हणून मन हे नेहमी मोकळे करायला हवे. तर मित्रांनो मन मोकळे करण्यासाठी ते नेमके कसे करायला हवे याबद्दल आपण जाणून घेऊयात.

हिरव्या नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मन म्हणून मोकळे करा :

बरेच व्यक्ती हे नेहमी तणावरहित असताना दिसून येत असतात. सतत कामाचा अति लोड घेणे, घरातील वेगळेच टेन्शन, बसले जागे देखील मनात काही न काही विचार घोळत बसणे यामुळे व्यक्ती ही डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते. नाहितर त्या व्यक्तीच्या शिरायला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे मन हे नेहमी मोकळे करायला हवे. तर तुम्ही तुमचे मन मोकळे करण्यासाठी एखाद्या हिरव्या नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन ते मोकळे करायला हवे.

वाचा  पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

निसर्ग हा येवढा नयनरम्य आणि सुंदर असतो की तिथे गेल्यावर मन हे एकदम शांत होऊन जाते. आपल्या मनामध्ये जेवढे काही विचार असतील ते नाहीसे होण्यास मदत होत असते. निसर्गा मध्ये जाऊन तेथील सुंदर हिरवीगार झाडे, ते निरागस उडणारे पक्षी, रंगीबिरंगी फुलपाखरू, शांतपणे वाहणारी नदी अशी सुंदर दृश्य बघितल्याने मन हे एकदम शांत होण्यास मदत होत असते. तेथील शुद्ध ताजी आणि थंडगार हवा ही शरीरास मिळत असते त्यामुळे मन अजून शांत होण्यास मदत होत असते. म्हणून तुम्ही तुमचे मन मोकळे करण्याची जागा शोधत असाल तर निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन नक्कीच तुमचे मन मोकळे करायला हवे. तुम्ही तुमचे मन मोकळे करण्यासाठी स्वतासाठी वेळ खर्च करायला हवा.

तुमच्या एखाद्या जिवलग मित्राकडे मन मोकळे करा :

बराच वेळा तुम्ही जर एकदम तणावरहित असाल घरातील टेन्शन असतील तर तुम्ही घरात या लोकांना सांगू शकत नाही अशा वेळी तुम्ही तुमच्या एखाद्या जिवलग मित्रा कडे तुमच्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगून बघा. तुम्ही जर तुमच्या एखाद्या जिवलग मित्राकडे मनातील सर्व गोष्टी सांगितल्या तर त्यामुळे तो तुम्हाला काहीतरी सुचवू शकेल आणि तुमचे मन देखील मोकळे होण्यास मदत होऊ शकते.

तसेच मित्रासोबत वेळ घालवल्यामुळे मनातील सर्व साचलेले निघून जाण्यास मदत होऊ शकते. तुम्ही जर तुमच्या मित्रा मुखडे प्रत्येक गोष्ट शेअर केली तर तुम्हाला तो त्यातून योग्य मार्ग सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो आणि यामुळे तुमचे मन देखील हलके होण्यास मदत होत असते. जेव्हा तुम्हाला तुमचे मन हे गुंतागुंतीचे झालेले वाटत असेल किंवा एकदम तणावरहित वाटत असेल त्या तुम्ही तुमच्या एखाद्या जिवलग मित्राकडे मन मोकळे करायला हवे जेणेकरून तुम्हाला देखील बरे वाटेल. कारण चांगल्या मनास्ठीतीसाठी मन मोकळे करणे गरजेचे असते.

पुरेपूर झोप घ्यायला हवी :

हल्लीच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच कामाचे अति टेन्शन घ्यावे लागत असते. म्हणजेच सतत मनामध्ये कामाचं टेन्शन घेत राहणे कामाचा ती लोड घेत राहणे सतत काही ना काही चिंता करत बसणे यामुळे व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जेवढे तुमचे मन शांत ठेवा तेवढ्या तुमची प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. जोड तुम्ही मन अशांत तुला माहित याचा वाईट परिणाम देखील शरीरावर होताना दिसून येत असतो.

तुम्हाला तुमचे मन शांत ठेवण्यासाठी पुरेपूर झोप घेणे अत्यंत आवश्यक ठरते. मन अशांत राहिल्यामुळे चिडचिड होणे, तसेच डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि अशावेळी जर तुम्ही पुरेपुर विश्रांती घेतली तर तुमचे मन देखील शांत होण्यास मदत होऊ शकते. आणि पुरेपूर झोप घेतल्यामुळे तुम्हाला उठल्यावर देखील ताजेतवाने वाटू शकते. म्हणून तुम्ही तुमचे मन शांत राहण्यासाठी पुरेपूर झोप घ्यायला हवी.

मन शांत ठेवण्यासाठी व्यायाम व मेडिटेशन करायला हवे :

तुम्हाला तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा सराव केला पाहिजे. म्हणजेच नेहमीच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही व्यायामाची भर घालायला हवी. व्यायाम केल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू ताणले जात असतात. व्यायाम केल्यामुळे फ्रेश वाटण्यास मदत होत असते. कामाच्या अति लोडमुळे आपण नकारात्मक विचार देखील करत असतो. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे नक्कीच यासाठी मदत होऊ शकते. तसेच तुम्ही तुमचे मन शांत राहण्यासाठी मेडिटेशन देखील करायला हवे. मेडिटेशन केल्यामुळे तुमचे मन हे शांत राहण्यास मदत होऊ शकते.

तुम्ही तुमचे डोळे बंद करून 15 ते 20 मिनिटे शांत बसायला हवे. आणि डोळे बंद असताना कुठलाही विचार करायला नको. 15 ते 20 मिनिटे डोळे बंद केल्यावर मनामध्ये कुठले विचार होऊ देऊ नका. मन हे अगदी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे मन हे शांत होण्यास मदत होऊ शकते. अन डोळे खुलताना हातांचे तळवे ही गरम होईपर्यंत एकमेकांना कसा आणि हळुवारपणे तुमच्या डोळ्यांवर ठेवून डोळे सावकाश खोला. यामुळे तुम्हाला तुमचे मन अगदी शांत झाल्यासारखे वाटेल.

वाचा  जेवण न जाण्याची कारणे व उपाय

तुमचे एखाद्या आवडत्या कलेमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवा :

तुम्हाला तुमचे अशांत मन हे शांत करण्यासाठी तुम्ही एखाद्या तुमच्या आवडत्या कलेमध्ये स्वतःला गुंतवायला हवे. जर तुम्हाला एखादी गायनाची आवड असेल तर त्या तुम्ही स्वतःला गुंतवून घ्या. अथवा एखाद्या खेळाची आवड असेल किंवा नवनवीन कृती करून त्यातून काहीतरी निर्माण करण्याची आवड असेल तर यामध्ये स्वतःला झोकून द्या. यामुळे तुमचे मन त्या कार्यामध्ये गुंतले जाईल. आणि स्वतःचे मन हे एखाद्या आवडता कार्यामध्ये गुंतवले तर तुमच्या मनामध्ये साठवून ठेवायला अनेक गोष्टी निघून जाण्यास मदत होऊ शकते. तुमची ज्यामध्ये आवड असेल ते कार्य तुम्ही हाती घ्यायला हवे यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचारांपासून तुम्ही दूर राहण्यास देखील मदत होऊ शकते. म्हणून तुमचे मन मोकळे करण्यासाठी तुम्ही स्वताला तुमच्या आवडत्या कलेमध्ये गुंतवून घ्या. जेणेकरून तुम्हाला देखील फ्रेश वाटेल.

तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे :

सततची धावपळ सतत कामाचे टेन्शन घेत असणे सतत मनामध्ये कुठले ना कुठले विचार करत बसणे यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होताना दिसून येत असतो. तुम्ही तुमचे मन जेवढे मोकळे कराल तेवढे तुम्ही आनंदी राहू शकाल. तसेच तुमच्या अशांत मनाचा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये सर्व पोषक घटकांचा, तत्त्वांचा, विटामिन्सचा पुरेपूर समावेश करायला हवा. जेणेकरून तुमचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होऊ शकेल. तसेच तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिण्यावर देखील भर घातली पाहिजे. जेणेकरून तुमचे शरीराचे  डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होऊ शकेल. म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये पोस्टीक आहाराचा समावेश आवर्जून करायला हवा आणि जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.

तर मित्रांनो,वरील प्रमाणे आपण मन मोकळे करण्यासाठी काय करायला हवे मन कशाप्रकारे मोकळी करायला हवे आणि मन मोकळे न केल्यास शरीराला कुठल्या प्रकारच्या व्याधी जडू शकतात याबद्दल जाणून घेतलेले आहे. मन हे नेहमी अशांत राहील यामुळे व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाण्याची देखील शक्यता असते. तसेच मन हे अशांत राहिल्यामुळे त्या व्यक्ती मधला आत्मविश्वासाची कमी होऊन जाते, ती व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार देखील करू लागत असते, अशांत मन असणारी व्यक्ती मध्ये एकाग्रतेची कमी देखील भासू शकते आणि अशा व्यक्तीला नेहमी थकवा जाणवत असतो.

म्हणून तुम्ही जेवढे जास्तीत जास्त तुमचे मन मोकळे कराल स्वताला तुमच्या आवडत्या एखाद्या कलेमध्ये कोण ठेवून घ्याल किंवा तुम्ही स्वतः चे मन तुमच्या एखाद्या जिवलग मित्राकडे मोकळी करायला हवे जेणेकरून तुम्ही तुमचे मन हे शांत ठेवण्याचा प्रयत्न करू शकाल. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे मन शांत ठेवण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी भेट द्यायला हवी. जेणेकरून तुमचे अशांत मन हे शांत होऊ शकेल आणि तुमच्या आवडत्या ठिकाणी भेट दिल्यामुळे तुम्हाला अनेक नवनवीन अनुभव देखील येऊ शकतील. म्हणून तुम्ही तुमचे मन शांत ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून तुमच्यावर वेळ खर्च करायला हवा. जेणेकरून तुमचे शरीर फास्ट देखील चांगले राहू शकेल.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

  

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here