लहान मुलांना कोरडा खोकला घरगुती उपाय

0
550
लहान मुलांना कोरडा खोकला घरगुती उपाय
लहान मुलांना कोरडा खोकला घरगुती उपाय

आज काल लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या या समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण आता लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती फारच कमी झालेली आहे. म्हणून आजकाल असे आजार मुलांना सहज लागतात. तर लहान मुलांना कोरडा खोकला हे फारच सामान्य आहे. कारण कोणत्याही प्रकारचे तेलकट पदार्थ खाल्ले तर लगेच मुलांना कोरडा खोकला होतो.तसेच घसा दुखतो या समस्या आजकाल खूप सामान्य झाले आहेत. पण वेळीच त्यावर उपचार नाही केला तर ही एक गंभीर बाब ठरू शकते. तसं बघायला गेलं तर लहान मुलांना 1,2 महिन्यामध्ये कोरडा खोकला किंवा ओला खोकला होतोच.

पण बऱ्यादा कोरड्या खोकल्याचे प्रमाण अधिक असते आणि कोरडा खोकला मुळे कशाला डोकं देखील दुखू लागतो. तसेच कोणत्या कामामध्ये लक्ष देखील लागत नाही आणि आज-काल वातावरण देखील इतकी खराब आहेत की बाहेरच्या वातावरणामुळे देखील आपल्याला कोरडा खोकला होऊ शकतो. याला कुठे ना कुठे तरी माणूसच जबाबदार आहे. त्याच्यामुळेच आज पर्यावरणाची ही अवस्था आहे. पण या दूषित वातावरणाचा परिणाम सर्वात पहिले आपल्या लहान मुलांवर होतो. म्हणून या वातावरणापासून त्यांचा बचाव करणे फार गरजेचे आहे. जर तुमच्या मुलाला कोरडा खोकला असेल तर आपण आज काही उपाय बघणारा आहोत जे उपाय तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या मुलाला कोरडा खोकला पासून मुक्त करू शकता. चला तर मग जाणून घेऊया नक्की यावर उपाय कोणती तसेच कोरडा खोकला येण्याची कारणे कोणती.

कोरडा खोकला का येतो ?

आपण कोरडा खोकला बद्दल थोडीशी माहिती बघितली आता आपण जाणून घेऊया की नक्की कोरडा खोकला का येतो चला तर मग बघुया.

वाचा  झोपेत ठसका लागणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

वातावरणामुळे :

आपण कुठे बाहेर जातो किंवा धुळीचे वातावरणामध्ये गेलो तर ते धुळीचे कण आपल्या श्वासनलिकेत वाटते आपल्या शरीरामधील जातात. बऱ्याच वेळेस यामुळेच आपल्याला कोरडा खोकला येतो. तर कधीही बाहेर जाताना आपल्या तोंडावर रुमाल बांधावे किंवा मास्कचि वापर करावा तसेच प्रदूषित व धुळीच्या वा वातावरणामध्ये जाणे टाळावे.

तेलकट तुपट खाल्ल्याने :

आपला आपल्या जिभेवर ताबा नसतो आणि आपण फास्टफूड किंवा तेलकट तुपकट पदार्थ खातो. तर तेलकट पदार्थ खाणे आधी याचा विचार करावा की हे नक्की तेल कोणत्या प्रकारचे वापरत आहे. तसेच हे खाल्ल्याने माझ्या शरीराला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. कारण बऱ्याचदा तेलकट-तुपकट खाल्ल्याने आपल्या घसा पकडतो आणि तिथूनच सुरुवात होते कोरडा खोकला येण्याची म्हणून अति तेलकट पदार्थांचे सेवन करू नये.

कोरडा खोकला येण्याची लक्षणे :

तर आता आपण जाणून घेऊया की कोरडा खोकला येण्याची लक्षणे कोणती कोणती आहेत म्हणजेच आपण ही लक्षणे ओळखून त्वरित याच्यावर उपाय करू शकतो चला तर मग जाणून घेऊया.

सतत शिंका येणे :

बऱ्याच वेळेस आपल्याला वारंवार शिंका येतात आणि जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील तर तुम्ही समजावे की तुम्हाला कदाचित कोरडा खोकला किंवा ओला खोकला असू शकतो. तसे बघायला गेले तर कोरडा खोकला चे प्रमाण अधिक असते. पण तरीदेखील जर तुमच्या शिंका थांबतच नसतील तर तरी ते लक्षणे ओळखून योग्य तो सल्ला घ्यावा.

घशामध्ये खवखव होणे :

आपण बघतो की कधीकधी आपल्या घशामध्ये खवखव सुरू होते आणि घशामध्ये काहीतरी टोचल्यासारखे वाटते. ही एक सुरुवातीची पायरी असू शकते कोरड्या खोकल्याची. तुम्हाला थोड्या वेळा करतच असे वाटू शकते की घशामध्ये खवखव आहे. पण त्यानंतर ती खवखव बंद झाल्यावर तुमचा कोरडा खोकला चालू होऊ शकतो. या दोन्ही प्रकारांमध्ये घशाला मोठ्या प्रमाणात इजा पोहोचते. म्हणून जर वेळीच लक्षणे ओळखून योग्य तो उपाय करावा.

वाचा  चाकवत भाजी चे फायदे

मुलांना कोरडा खोकला झाल्यास घरगुती उपाय :

तर आपण कोरडा खोकला बद्दल माहिती बघितली त्याची लक्षणे बघितली त्याची कारणे देखील आपण जाणून घेतली. आता आपण महत्त्वाचे मुद्दे जवळ योग्य म्हणजेच कोरडा खोकला झाला असेल तर त्यावर आपण कोणत्या प्रकारचे उपाय करू शकतो.

आल्याचे तुकडे तोंडात ठेवा :

बऱ्याच वेळेस कोरडा खोकला मध्ये आपल्या घशाला मोठ्या प्रमाणामध्ये इजा पोहोचते व कोरडा खोकला थांबला नाही तर आपले डोके देखील दुखायला लागते. तुम्हाला तात्काळ कोरडा खोकला थांबवायचा असेल तर तुम्ही ताज आलं घ्या व त्याचे छोटे छोटे तुकडे करावे आणि तो तुकडा तोंडामध्ये ठेवावा. जोपर्यंत तो आल्याचा तुकडा तुमच्या तोंडामध्ये आहे तुम्हाला कमीत कमी खोकला येईल. तसेच तुमच्या घशाला देखील तात्काळ आराम मिळेल. हा उपाय सलग दोन-तीन दिवस तुम्ही करू शकता कारण आल्यामध्ये असे घटक असतात कि जे तुमच्या गळायला आराम पोहोचू शकता.

तुळशीचा काढा :

कोरड्या खोकल्यावर सर्वात मोठा रामबाण उपाय म्हणजे तुळशीचा काढा. तुम्ही जर तुळशीचा काढायचे सेवन करत असाल तर मुख्यता तुम्हाला खोकला येणारच नाही. पण जर का तुम्हाला कोरडा खोकला आला असेल तर रोज सकाळ-संध्याकाळ गरम गरम तुळशीचा काढा प्यावा. हा उपाय एक आठवडाभर तुम्ही करू शकता. तुळसला आयुर्वेदामध्ये फार मोठे स्थान आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच तुळशीमध्ये काही असे गुण आहेत ज्या तुमच्या कशाला तात्काळ आराम देऊन तुमचा खोकला बंद करतील.

ज्येष्ठमध :

जर तुमचा मुलगा चार वर्षाखालील असेल तर तुम्ही त्याला जेष्ठमध पावडर न देता ज्येष्ठमध पावडर व साजूक तूप एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्या. त्या गोळ्या थोडा थोडा वेळाने त्या मुलाला चगळ्याला द्याव्या. जेणेकरून लहान मुलांचा खोकला थांबेल व तुमच्या मुलाच्या गळ्याला आराम मिळेल.

हळदीचे दूध :

तुम्ही जर तुमच्या मुलाला कोमट गरम केलेल्या हळदीचे दूध दिले तर त्याचा खोकला थांबण्यास मदत होईल. त्याला झोपदेखील चांगली लागेल याच बरोबर हळदीमध्ये काही आयुर्वेदिक गुण असतात जेणेकरून तुमची पाचन क्रिया देखील चांगली होईल.

वाचा  सतत आळस येणे.

मध द्या :

 मध किती आयुर्वेदिक आहे हे काही नव्याने सांगायला नको. तसेच जर तुमच्या मुलाला कोरडा खोकला लागला असेल तर त्यांना दिवसातून तीन ते चार वेळा एक एक चमचा मध द्यावे. मध घेतल्यानंतर साधारण दहा मिनिटे तरी कोणाशीही बोलू नये खोकला आपस कमी होईल.

लहान मुलांना खोकला होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

लहान मुलांना प्रमाणाच्या बाहेर फास्टफूड देऊ नये याच प्रकारे कोणताही प्रकारे बाहेरच एकदम खाद्यपदार्थ खाऊ देऊ नये. कारण त्यामध्ये कोणत्या प्रकारचे तेल वापरले गेले आहे हे आपल्याला माहिती नसते. बऱ्याचदा बाहेरच खाद्य पदार्थांमुळे मुलाला कोरडा खोकला होऊ शकतो. शक्यतो घरगुती जेवणच मुलाला द्या. प्रदूषित वातावरणामध्ये मुलाला जाण्यापासून थांबवा. मुलाला आठवड्यातून एकदातरी तुळशीचा काढा द्यावा व बाहेर जाताना मास की व रुमाल तोंडावर ठेवावा अशा अनेक प्रकारची काळजी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या मुलाला कोरडा खोकला होणार नाही.

तर मित्रांनो आज आपण बघितले की मुलांना कोरडा खोकला का होतो? तसेच याची लक्षणे कोणती? त्याचबरोबर यावर कोणते घरगुती उपाय आहे? जे आपण घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here