नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया दुधासोबत काय खाऊ नये. दूध प्यायला कोणाला आवडते, दूध प्यायला लहानांपासून तर सगळ्यांनाच आवडते, पण काही जणांना आवडत नाही, ज्यांना आवडत नाही, त्यांनी दूधात वेलची वगैरे टाकून प्यावे. काहीजणांना दुधाचा वास येतो, त्यामुळे त्यांना ते आवडत नाही. पण तुम्ही दुधात वेलची टाकल्याने त्याचा वासही जातो आणि चवही छान लागते.
दूध हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. दूध पिल्याने तुमच्या शरीराचे आरोग्य सुधारते. तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होतात. कारण दुधामध्ये कॅल्शियमचा स्त्रोत मुबलक प्रमाणात असतो. तसे दुधातील गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही मुलांना रोज सकाळी एक ग्लास दूध प्यायला दिले, तर त्यांच्या शरीरात ऊर्जा येते इम्यूनयुनिटी पावर वाढते. तसेच संध्याकाळी झोपताना ही तुम्ही दूध पिले, तर तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळते. तसेच काही लहान मुलांना दूध आणि चपाती मोडून खायला आवडतो, चपातीचा काला त्याच्यामध्ये दूध आणि साखर टाकून खायला आवडते, तर काही जणांना दूध-भात आवडतो, तर काही जणांना दुधामध्ये काजू, बदाम टाकून प्यायला आवडते.
दूध हे तुम्ही निरनिराळ्या प्रकारे होऊ शकतात, पण दुध खाण्याची एक पद्धत असते, आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत. की, दूध सोबत काय खावे? काय खाऊ नयेत? तसेच दुधासोबत कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्याला त्याचे दुष्परिणाम बघावयास मिळतात? ते आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात!
Table of Contents
दुधा सोबत काय खाऊ शकतात ?
मित्रांनो, दुधा सोबत काय खावे? तसेच कसे खावे? हे आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात.
दुधासोबत आंबट-चिंबट फळे खाऊ नयेत :
मित्रांनो, सहसा करून आपण फळांचे ज्यूस करतो, त्यामध्ये दूध हे टाकतो. तसेच दुधाचे प्रमाण टाकल्यामुळे, त्या फळांचा ज्यूस ला चवही येते. पण आपण असे काही फळ आहे, ज्यामध्ये दुधाचा वापर करू नयेत. जसे की संत्री, मोसंबी, लिंबू, यासारख्या फळांमध्ये विटामिन सी चे प्रमाण असते. त्यामुळे दूध फुटण्यासाठी प्रभावशाली ठरते. सहसा करून दूध फाटवण्यासाठी सायट्रिक ऍसिड युक्त तसेच लिंबूचा वापर केला जातो. तसेच या फळांचे मिश्रण एकजीव करून, आपण जर पिल्यास त्याच्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. शिवाय आपल्या पचनक्रियेवर ही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही फळे दुधासोबत खाऊ नयेत.
दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नये :
दूध हे सगळ्यांना आवडते. तसेच दुधा सोबत काही जणांना बिस्किटे खायला आवडतात, अशावेळी तुम्ही खारे बिस्कीट दुधासोबत खाऊ नका. तसेच दुधासोबत खारट पदार्थ तुम्ही खाऊ नका. कारण त्यांचं कॉम्बिनेशन हे विरुद्ध असते, त्यामुळे तुमच्या पचनक्रियेवर आघात करतो. त्यामुळे दुधासोबत असे पदार्थ खायला शक्यतो टाळावेत.
दुधासोबत नॉनव्हेज पदार्थ खाऊ नये :
नॉनव्हेज पदार्थ म्हणजे चिकन मटण अंडी मासे यासारखे पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत. सहसा करून दुधासोबत नॉनव्हेज पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत. किंवा नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्या बरोबर लगेच दूध पिऊ नयेत. तसेच नॉनव्हेज पदार्थांमध्ये प्रोटिन्स जास्त प्रमाण असते, तसेच दुधामध्ये ही प्रोटीन असते, त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट लवकर होतो. शरीराला अति प्रोटीन हे घातक ठरते. त्यासाठी तुम्ही दुधासोबत शक्यतो, नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळावेत. कारण त्याचे नाही तुमची पचनक्रियेवर परिणाम होतो.
दुधा सोबत दही खाऊ नये :
दुधापासून दही बनवलेली असते, परंतु ते दुधा सोबत खाणे शक्यतो टाळावे. कारण तिला आपण आंबवतो, म्हणजे आंबवण्याची क्रिया एक प्रकारे होते. त्यामुळे दूध आणि दही एकत्र खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीरामध्ये त्याचे परिणाम होतात. त्यामुळे पोटात अपचन, गॅसेस सारखे परिणाम होतात. तसेच काहीजणांना त्यामुळे पोटदुखीचे समस्या ही होऊ शकतात. म्हणून शक्यतो दूध आणि दही एकत्र खाणे टाळावे.
दुधा सोबत लोणचे खाऊ नये :
लोणचं हे सगळ्यांनाच आवडते. त्याची चटपटी असते. त्यामुळे तोंडाला ही चव येते. पण लोणचं हे दुधा सोबत खाऊ नये. कारण त्याच्या विरुद्ध कॉम्बिनेशन होते, त्यामुळे ते खाणे शक्यतो टाळावेत. तसेच लोणचे आणि दूध एकत्र खाल्ल्यामुळे तुम्हाला त्वचेवर पांढरे डाग पडण्याची समस्या होऊ शकते. त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो या दोघांचे एकत्र खाणे टाळावे.
दुधासोबत उडदाची डाळ खाऊ नये :
दुध शरीरासाठी फायदेशीरच असतेच. पण दुधासोबत उडदाची डाळ आणि दुध शक्यतो खाणे टाळावेत. कारण उडदाची डाळ ही पचायला जड असते आणि त्यासोबत जर तुम्ही दूध खाल्ले, तर दूध पिल्याने पोट भरल्यासारखे वाटते. या दोघांचे एकत्र सेवनामुळे तुम्हाला पोट गच्च झाल्यासारखे वाटते. याशिवाय या दोघांचे एकत्र सेवनाने तुमच्या पोटात गॅसेस चे प्रमाण वाढते. तसेच पोटात दुखण्याचे समस्या ही होऊ शकते.
दुधासोबत या दोन गोष्टी करू नका :
मित्रांनो दुधासोबत कारले आणि फणस या दोन गोष्टी खाऊ नका. कारण दुधासोबत या दोन गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला त्वचाविकार होण्याची समस्या होऊ शकते, तुमच्या त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात. त्यामुळे शक्यतो दूध आणि फणस तसेच दूध आणि कारले यांचे कॉम्बिनेशन विरुद्ध असल्यामुळे, या दोघी गोष्टी दुधासोबत खाणे शक्यतो टाळावे.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दुधासोबत कोणते पदार्थ खाणे शक्यतो टाळावे, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये जर तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेला माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद !