नमस्कार मित्रानो, तर आज आपण राईच्या तेलाचे बद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत की नक्की राईच्या तेलाचे आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. तुम्हाला राईचे तेल माहित असेल तसं तुम्ही काही लोक घरामध्ये हे राईचे तेल वापरत देखील असाल. काही लोकांची तक्रार असते की त्यांना राईच्या तेलाचा वास सहन होत नाही.
तो सहन न झाल्यामुळे ते लोक राईचे तेल हे आपल्या जीवनामध्ये आहारामध्ये वापरत नाही. पण हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही जर राईच्या तेलाच्या वासात मुळे राईच्या तेलाचे सेवन करणार नसाल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतील. तुम्ही बघत असाल तर जे लोक बनारस या भागाचे असतात ते लोक राईच्या तेलाचा वापर आपल्या प्रत्येक आहारामध्ये प्रत्येक जेवनामध्ये करतात आणि म्हणून त्यांची तब्येत आणि स्वस्त देखील चांगले झाले असते.
पण आपल्या इथले लोक राईच्या तेलाचा वापर करत नाही आणि त्याच्या जागी आपले लोक हे सुर्यफुलाचे किंवा इतर तेल वापरतात. पण आज आपण काही असे फायदे बघणार आहोत जेणेकरून ते तुम्ही फायदा जर समजून घेतले तर तुम्ही आजपासून तुमच्या आहारामध्ये राईच्या तेलाचा समावेश कराल. चला तर मग जाणून घेऊया की नक्की कोण कोणते फायदे आपल्या शरीरावर होतात चला तर मग बघुया.
Table of Contents
राईच्या तेलाचा वास कसा घालवावा ?
चला तर मग आता आपण आपल्या एक महत्त्वाच्या मुद्याकडे वळूया की काही लोकांना राईच्या तेलाचा वास आवडत नाही. तर तो आपण कोणत्या प्रकारे दूर करू शकतो ते आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया.
बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की त्यांना राईचे तेल आपल्या आहारामध्ये वापरायचे आहे. पण त्या राईच्या तेलाचा वास येत असल्यामुळे त्या गृहीनी हे तेल आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये वापरत नाही. तसेच लहान मुलांना देखील राईच्या तेलाचा वास आवडत नाही. यामुळे लहान मुले देखील या तेलामध्ये बनलेली खाद्य पदार्थ देखील खाणे टाळतात.
मग तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही राईच्या तेलाचा वास दूर करू शकतात. आणि गृहिणी त्यांच्या आहारामध्ये राईच्या तेलाचा वापर पुन्हा सुरू करतील. तर आपण सुरुवातीस आपण एक कढई घ्यावी आणि त्यामध्ये राईचे तेल टाकावे. त्यानंतर गॅस चालू करून तेल गरम होण्यास ठेवावे. हळूहळू तेल गरम होऊ द्यावे त्यानंतर जर तुम्ही अर्धा लिटर राईचे तेल कढईमध्ये घेतले असेल तर एक आख्खा लसूण सोलून त्या राईच्या तेलामध्ये टाकावे. आणि त्या राईचे तेल गरम झाल्यावर आपण जो लसुन त्याकडेही मध्ये टाकला आहे. तो लसूण थोडा ब्राऊनिष होईपर्यंत तेल गरम करावे.
एकदा का लसून हे चॉकलेटी रंगाचे झाले की त्यानंतर लसुन काढून घ्यावे आणि तेल थंड होण्यासाठी ठेवावे. या पद्धतीने तुम्ही राईच्या तेलाचा वास हा कमी करू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने राईच्या तेलाचा वास कमी झाल्यानंतर तुम्ही राईचे तेल हे आनंदाने तुमच्या आहारामध्ये तुमच्या जीवनामध्ये वापरू शकतात आणि लहान मुलांना देखील या तेलाचा वास येणार नाही.
राईच्या तेलाचे फायदे :
चला तर मग आता आपण जाणून घेऊया की राईच्या तेलाचा आपण आपल्या शरीराला कोणकोणते व कोणकोणत्या प्रकारे फायदे होतात हे आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया.
एलर्जी कमी होते :
तुम्हाला त्वचेच्या निगडित कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर राईच्या तेलाने मसाज केल्याने ती ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या शरीरावर किंवा त्वचेवर एलर्जी जास्त झाली असेल आणि त्याच प्रकारे तिचा ऍलर्जी ओली असेल तर तुम्ही जर राईच्या तेलाने त्वचेवर हळूहळू मसाज केली तर त्वचेवरची एलर्जी कमी होण्यास मदत होईल. पण मसाज करणे आधी एलर्जी कोणत्या प्रकारचे आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच या तेलाने त्या त्वचेचा ऍलर्जीवर मसाज करावी.
पचनास संबंधित समस्यांचे समाधान :
जर तुमच्या पचन क्रियेमध्ये कोणत्या प्रकारचा बिघाड झाला असेल तर तुम्ही राईचे तेल तुमच्या आहारामध्ये वापरण्यास सुरुवात केली तर तुमच्या पचन क्रिया संबंधित समस्यांचे समाधान होईल. राईचे तेल हे पचनासाठी हलके असते आणि त्याचबरोबर राईचे तेल आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपली पचनक्रिया देखील चांगली राहण्यास मदत होते. याच प्रकारे एकंदरीत आपल्या पचनाच्या कोणत्याही प्रकारची समस्या असतील तर त्या कमी होण्यास देखील आपल्याला मदत होते.
गुडघे दुखी किंवा सांधे दुखी कमी करते :
जर तुम्हाला गुडघेदुखी सांधेदुखी अशा शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या दुखापत किंवा मुका मार लागला असेल तर त्यावर राईच्या तेलाने मसाज केल्याने तुमची वेदना बऱ्यापैकी कमी होते. त्याच बरोबर तुम्ही राईच्या तेलाने मसाज करताना त्यामध्ये थोडासा बाम हा मिक्स करून ज्याठिकाणी मुका मार लागला आहे किंवा सांधेदुखी गुडघेदुखी होत आहे त्या ठिकाणी मसाज करावी तुम्ही या तेलाने मसाज ही एक दिवसाआड करू शकता.
एक उत्तम स्त्रोत :
राईच्या तेलाचे अनेक फायदे आहेत हे अनेक फायदे आपल्या शरीराला अनेक प्रकारे होतात. पण राईचे तेलामध्ये विटामिन ई ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये कोणते काम करण्याची ऊर्जा मिळते. याच प्रकारे तुमची हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते आणि एकंदरीतच तुमची शारीरिक वाढ सुदृढ होते.
डोळ्यांसाठी चांगले :
आज काल आपण बघतो की लहान लहान मुलांना देखील चष्मा लागत आहे. आज बऱ्याच लोकांना नजरेच्या संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणजेच त्यांची नजर खूप कमी वयामध्ये कमजोर होत आहे. या समस्या वर एक रामबाण उपाय म्हणजे जर तुम्ही राईच्या तेलाचे सेवन तुमच्या आरामध्ये तुमच्या आहारामध्ये चालू केले तर तुमच्या डोळ्याच्या संबंधित समस्या समाधान होऊ शकते. तसेच तुमची दृष्टी देखील वाढण्यास मदत होते.
चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त :
जर तुमचे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही त्यावर जर राईच्या तेलाने मसाज केली तर तुमची त्वचा कोरडी पडणार नाही. तसेच मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्यात मधील रक्तपुरवठा देखील सुरळीत होण्यास मदत होईल. हे एक प्रकारे तुमच्या चेहऱ्याला मॉइस्चराइजर ठेवण्याचे काम करते. याच बरोबर तुम्ही राईच्या तेलामध्ये एलोवेरा जेल देखील मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर लावले तर तुमच्या चेहऱ्याला त्याचा फायदा होईल. तसेच तुमच्या चेहऱ्याचा रंग देखील उजळण्यास मदत होईल.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की राईच्या तेलाचे फायदे आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारे होतात. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !