नमस्कार, अक्कलदाढ म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसते, तसेच अक्कलदाढ ही केव्हा येते, हे ही माहीत नसते. बघा ना देवाने माणसाच्या शरीराची रचना किती छान प्रकारे केली आहे ना! की त्याच्यात एकेक गोष्टीं बारकाईने निर्माण केली आहे. त्या शरीररचनेत अक्कलदाढ ही माणसाला येते. पूर्वी मी लहान होती, तेव्हा मला असे वाटायचे की, अक्कल दाढ येणे, म्हणजे आपल्याला अक्कल येते. हा माझा गैरसमज होता. पण जेव्हा मोठी झाली, तेव्हा माहित पडले की, आपल्याला एकूण 32 दात असतात, आणि जेव्हा आपण वयाच्या 25 ते 26 व्या वर्षी असतो, त्यानंतर आपल्या दातांच्या बाजूला दाढ असतात, आणि त्या दाढ च्या बाजूला शेवटी अक्कलदाढ येते, यालाच अक्कल दाढ असे म्हणतात. अक्कल दाढ कशी व केव्हा येत? हे आम्ही तुम्हाला सांगितले (Home Remedies For Wisdom Tooth Pain In Marathi). आता त्या किती येतात व कशाप्रकारे येते, ते जाणून घेऊयात!
Table of Contents
अक्कलदाढ कधी व कशी येते?
आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की अक्कल दाढ 25 ते 26 वर्षानंतर येते, तसेच कोणाला 17 व्या वर्षानंतर ही येऊ शकते. जशी शरीर रचना तसे त्यांची दाढ येऊ शकते. अक्कलदाढ ही दातांच्या सगळ्यात शेवटी येते, मग वर दोन आणि खाली दोन अशा चार दाढ येऊ शकतात. पण कधी कधी कोणाला अक्कल दाढ येतच नाही, आणि समजा आली आणि तुमच्या दातांची जागा जास्त असल्यामुळे, तिला यायला जागा नसेल, तर तिचे उगवणे, फार त्रासदायक असते. त्यावेळी आपल्याला खूप दुखते, आणि दाढ चे दुखणे अतिशय कठीण असते, मग आपण डॉक्टर कडे जाऊन ती दाढ काढू शकतो. शेवटी हाच पर्याय असतो, आणि काहींची अक्कलदाढ चांगल्या प्रकारे येतात, पण त्यामध्ये कीड लागू शकते, आणि त्यांना त्रास होऊन, ती अक्कल दाढ काढावी लागू शकते. तर मग कोणत्या कारणामुळे, अक्कल दाढ ला कीड लागू शकते, ते जाणून घेऊयात!
कोणत्या कारणांमुळे अक्कलदाढ ला कीड लागते
अक्कलदाढ ला कीड लागल्यावर, त्याच्या वेदना या कठीण असतात मग त्या कोणत्या कारणामुळे होतात, ते जाणून घेऊयात,
- गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे, त्याचे कण दातात अडकून कीड लागते.
- जेवणानंतर चूळ जर नाही भरली, तर यांना पदार्थ दातात, अडकून कीड लागते.
- कडक पदार्थ दाढ मध्ये अडकल्यामुळे,
- अक्कलदाढ च्या बाजूच्या दाताला जर कीड लागली असेल, तर त्याचे परिणाम अक्कल दाढीवर ही होतो आणि ती कीड दोघ दात पोखरून टाकते.
- ब्रश करताना आपल्या ब्रश शेवटच्या दाता पर्यंत पोहोचत नाही, अशा वेळी त्यामध्ये कॅव्हिटी होऊन कीड लागते.
- तंबाखूचं सेवन केल्यामुळेही दातांना कीड लागू शकते.
अक्कलदाढ ला कीड लागल्यावर काही घरगुती उपचार
आपण वरील दिलेल्या माहितीमध्ये, कोणत्या कारणांमुळे तुमच्या अक्कलदाढ ला कीड लागते, ते बघितले. ज्यावेळी तुमच्या दातांना व दाढी अक्कलदाढ ला कीड लागली असेल, अशावेळी तुम्ही नेमकी कोण कोणते घरगुती उपचार करावे? ते बघूयात.
तुळशीचा रस वापरून बघा
हो, ज्यावेळी तुमची अक्कल दाढ ला कीड लागते, त्यावेळी तुळशीचा रस वापरून बघा. कारण तुळशीचा रसात ऑंटीसेप्टीक गुणधर्म असतात. जर तुम्ही तुळशीचा रस आणि त्यात कापूर मिक्स करून, तुमच्या अक्कल दाढी वर लावला, तर तुमचे दुखणे हे कमी होऊ शकते.
तुरटी चा वापर करून बघा
तुरटी, जर तुमच्या अक्कलदाढ मध्ये कीड लागली असेल, ती काढण्याचा मदत करते. कारण तुरटी ही जंतू नाशक आहे, ज्या वेळी तुमच्या अक्कलदाढ ला कीड लागलेली असते, आणि त्यामध्ये जंतुसंसर्ग झाला असेल, त्यावेळी जर तुम्ही कोमट पाण्यात तुरटीची पावडर टाकून गुळण्या केल्यास, तर त्यामधील जंतू लवकर बाहेर निघतात. शिवाय तुमच्या दाढीचे दुखणेही कमी होते, व दाढी मध्ये इन्फेक्शन झाले असेल, तर ते कमी होण्यास मदत मिळते.
लवंग वापरून बघा
लवंग मध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात. तुमची अक्कल दाढ दुखते, आणि त्यामध्ये वेदनाही होतात, आणि त्यामध्ये कीड लागली असेल, त्यावेळी तुम्हाला लवंग ही फार फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्ही लवंग चा तुकडा हा दाढी मध्ये फक्त गच्च धरून ठेवावा. त्यामुळे तुमच्या दाढीचे दुखणेही कमी होते, शिवाय आता मार्केटमध्ये लवंगाचे तेल ही मिळते, ते तेल आणून तुम्ही कापसाच्या बोळ्यावर धरून दाढ दुखत असेल, अशा ठिकाणी लावल्यास, त्या वेदना ही हळू कमी होतात.
आवळा वापरून बघा
दाढीचे दुखण्यावर आवळा हा फायदेशीर ठरतो. जर तुमची दाड दुखत असेल, हालत असेल, अशावेळी जर तुम्ही आवळा गरम पाण्यात किसून त्या पाण्याने जर चूळ भरली, तर तुमचे दुखणे कमी होते. आणि दाढ हालत नाही. शिवाय त्यामधील जे इन्फेक्शन व कीड असेल, ती बाहेर निघण्यास मदत मिळते.
बर्फाचा वापर करून बघा
अक्कल दाढीचे दुखणे असह्य असते. ज्यावेळी तुमची अक्कल दाढ दुखते, त्यावेळी तुमचे गाल ही सुजतात, अशावेळी जर तुम्ही बर्फ एका कापडात गुंडाळून, तुमच्या गालावर फिरवला, तर त्यामुळे गालावरची सूजही कमी होते. शिवाय अक्कलदाढ चे दुखण्यामुळे, हिरड्यांची सूज कमी होते.
पेरूची पाने खा
हो तुम्हाला आश्चर्य वाटेल! पण खरंच पेरू चे पान हे दाढीचे दुखणे कमी करण्यासाठी फार प्रभावशाली आहे. अक्कलदाढ किंवा कोणत्याही दाढ दुखत असतील, तर अशावेळी जर तुम्ही पेरूची पाने चाऊन खाल्ली, तर तुमच्या दातांमधील इन्फेक्शन लवकर बाहेर निघते, व दुखणे कमी होते. फक्त तुम्ही ज्यावेळी पेरूची पाने खाल, त्यावेळी तुमच्या तोंडात जी लाळ येईल, ती तुम्हाला बाहेर थुंकायची आहे. कारण त्या द्वारे तोंडातले इन्फेक्शन सगळे बाहेर निघते, खरंच करून बघा. फार प्रभावशाली उपाय आहे.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला अक्कलदाढ म्हणजे काय? आणि ती कशी व कोणत्या वयात येते? ते सांगितले आहे. तसेच आम्ही तुम्हाला अक्कल दाढ ला कीड कोणत्या कारणामुळे लागते, व त्यावर कोणते घरगुती उपचार तुम्ही करायला हवेत, ते आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले, घरगुती उपचार करूनही जर तुम्हाला फरक जाणवत नसेल, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आणि आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. अजून माहिती साठी येथे पाहू शकता.
धन्यवाद !!