अचानक ओठ सुजणे कारण व उपाय

0
5513
अचानक ओठ सुजणे कारण व उपाय
अचानक ओठ सुजणे कारण व उपाय

नमस्कार, आपली शरीराची रचना ही देवाने एकदम छान पद्धतीने निर्माण केलेली आहे. तसेच आपल्या शरीर रचनेत आपले सौंदर्य हे आपल्या ओठांवर असते. आणि जर आपल्या ओठांवर काही दुष्परिणाम दिसून आला किवा अचानक ओठ सुजणे असे काही झाले, तर आपण अगदी नाराज होऊन जातो. जसे की ओठ सुजणे, ओठ फाटणे, ओठातून रक्त येणे, व काळे पडणे, ओठांवर जर येणे, यासारख्या समस्या झाल्या की आपण घाबरून जातो, की काय झाले असेल? कोणता आजार तर नाही ना? अशा शंका, आपल्या मनात यायला लागतात.

मग आपण आपला  मोबाईल, पुस्तक काढतो, आणि नेटवर हे सर्च कर, ते सर्च कर, पण आपल्या मनासारखा उपाय आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळी आपण काय करायला हवे? कोणत्या कारणामुळे सुजतात? त्याची नेमकी कारणे कोणकोणते आहेत? हे आपल्याला माहित नसतात, चला, तर मग जाणून घेऊया, की ओठ सुजण्याची कारणे नेमकी कोणती आहे, 

ओठ सुजण्याची कारणे ?

अचानक ओठ सुजणे यामागे अनेक कारणे असतात, मग ती नेमकी कोणती आहे, चला तर मग बघुयात ! 

  • जर तुम्हाला बाहेरील प्रदूषणाची धुळीची ॲलर्जी असेल, त्यावेळी तुमचे ओठ सुजतात. 
  • केमिकलयुक्त लिपस्टिकचा अति वापर केल्यामुळे, ओठ सुजू शकतात. 
  • जर अंगात ताप असेल, अशा वेळीही ओठ सुजू शकतात. 
  • तुमच्या खाण्यात कशाची ऍलर्जी, झाल्यामुळे ही सुजतात. 
  • शरीरात विटामिन ची कमतरता आल्यामुळे, ही ओठ सुजतात. 
  • वायरल इन्फेक्शन मध्ये, ओठ सुजतात. 
  • जर तुमची इम्युनिटी पावर कमी झाली, तरीही ओठ सुजतात. 
  • ओठांवर जर मुक्कामार लागला, तरी ओठ सुजतात. 
  • औषधांचा ओव्हरडोस झाल्याने, ओठ सुजतात. 
वाचा  नाकातून घाण वास येणे

ओठ सुजल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे ? 

ज्यावेळी तुमच्या अचानक ओठ सुजणे सारख्या समस्या उद्भवतात, त्यावेळी आपले सगळे लक्ष त्यातच लागून राहते. मग आपण ऑनलाईन ही क्रीम सर्च करतो, ते औषध सर्च करतो.  तरीही फरक पडत नाही. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय दिलेले आहेत, ते करून बघा. 

कोरफड वापरून बघा :

हो, कोरफडी अंतीबॅक्टरियलआहे. तुमच्या चेहऱ्यावर किंवा ओठांवर सूज असेल, किंवा काळे डाग किंवा रक्त येत असेल. अशावेळी जर तुम्ही कोरफडीचा वापर केला, तर त्याने तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला कोरफड ही घेऊन, त्याचा गर काढून, त्यात चिमूटभर हळद टाकून, तो गर तुम्हाला तुमच्या ओठांवर 15 ते 20 मिनिटांसाठी राहू द्यायचा आहे, असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या ओठंवरील सूज ही हळू कमी होऊन, तुमचे ओठ गुलाबी व मुलायम दिसण्यास मदत मिळेल. 

मध आणि लिंबू वापरून बघा :

लिंबू मध्ये विटामिन सी असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच ठरते, लिंबू मधील गुणधर्म या आपल्या ओठांवर फायदेशीर ठरतात. त्यासाठी तुम्ही मध आणि नींबू यांचा एकत्र मिश्रण करून तुमच्या ओठांवर सुजलेल्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटे लावावेत, त्यानंतर थंड पाण्याने धुवावे. तुम्हाला फरक पडेल, करून बघा. अगदी साधा सोपा उपाय आहे. 

हळद वापरून बघा :

हळदी अँटीसेप्टीक असते, जी फंगल इन्फेक्शन वर लवकर सावरण्यास मदत करते. जर तुमच्या ओठांवर सूज येऊन, दुखत असेल. अशा वेळी जर तुम्ही हळद ही पाण्यामध्ये मिक्स करून, कोमट करून तुमच्या सुजलेल्या ओठांवर लावली, तर तुमच्या ओठांची सूज कमी होण्यास, मदत मिळेल. आणि तुम्हाला लवकर फरक पडेल. असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस केल्यास, तीन ते चार दिवसात तुमचे ओठांवरील सूज कमी होईल. 

त्रिफळा चूर्ण वापरून बघा :

ओठांवर जर सूज येते, अशा वेळी तिथे आग, जळजळ होते, आणि ते आपल्याला सहन होत नाही. अशा वेळी जर तुम्ही त्रिफळाचूर्ण वापरले, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्ही त्रिफळा हे कोमट पाण्यात गरम करून, अलवार कोमट-कोमट तुमच्या ओठांवर लावावेत, त्याने तुमच्या ओठांवर इन्फेक्शन न होता, ती सूज कमी होण्यास मदत मिळेल. 

वाचा  डोळा फडफडणे या समस्या ची लक्षणे आणि उपाय

विटामिन बी युक्त पदार्थ खा :

जर शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता आली, तसेच जर तुमच्या शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता आली, तर त्याचा परिणाम तुमच्या ओठांवर दिसून येतो. त्यावेळी तुमचे ओठ काळे पडतात, सुजतात,  त्यातून रक्त येते,  जर तुम्ही विटॅमिन  बी 12 युक्त पदार्थ खाल्ले, तर तुमची ओठांच्या समस्या दूर होतील. मग ते नेमके कोणते, जसे की अंडे, मच्छी, दूध, चीज, बटर यासारखे पदार्थ आपल्या ओठांसाठी फायदेशीर ठरतात. याचा समावेश तुमच्या आहारात नक्की घ्यावे. 

पाणी प्या :

जर तुमच्या शरीरात पाण्याची ची कमतरता आली, तर तुम्हाला थकवा, अशक्तपणा येऊन डीहायड्रेशन सारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, आणि असे झाल्यास तुमच्या शरीरावर व चेहऱ्यावर ही त्याचे परिणाम दिसून येतात. मग त्यावेळी तुम्हाला डोळ्याखाली काळी वर्तुळे, तर ओठांवर सूज, अचानक ओठ सुजणे, ओठ कोरडे पडणे, यासारख्या समस्या बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही दिवसातून तुमच्या शरीरासाठी, व स्वतःसाठी तीन ते चार लिटर पाणी पिले, तर तुमच्या शरीरात कोणताही तांत्रिक बिघाड होणार नाही. शिवाय तुमचे रूप हे फुलेल. अगदी साधे सोपे घरगुती उपाय असतात. करून बघायला काय हरकत नाही. 

आईस पॅड चा वापर करून बघा :

तुमच्या ओठांवर सूज येऊन, तेथे दाह, आग होत असेल, अशा वेळी जर तुम्ही आईचा पॅड चा वापर केला, तर तुम्हाला थोडा फरक पडेल. त्यासाठी तुम्ही आईस पॅड एका कापडात गुंडाळून तुमच्या ओठांवर अलगद हळुवार फिरवावा, त्याने तुमच्या ओठा ची दाह ही कमी होईल, आणि थोडी सूज कमी होण्यास मदत मिळेल. 

खोबरेल तेल वापरून बघा :

ओठांवर सूज येते, त्यावर तडा जाऊन रक्त येण्याचे समस्याही होऊ शकतात. अश्यावेळी जर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्ही शुद्ध खोबरेल तेल हे घ्यायचे आहेत, आणि ते ओठांवर तुमच्या हळूवार त्याने मसाज करायचा आहे. असे तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस केल्यास  तुमच्या ओठ ची सूज कमी होण्यास मदत मिळेल, व दाह ही होणार नाही. 

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

एप्पल साइडर विनेगर वापरून बघा :

हो, ओठांवर जर सूज आली असेल, अशावेळी तुम्ही एप्पल साइडर विनेगर ही वापरू शकतात. कारण त्यामध्ये एप्पल साइडर व्हिनेगरमध्ये प्रोटिन, एंजाइम्स आणि फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, जे तुमच्या ओठांवरील सुजन कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही एप्पल साइडर विनेगर एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन तुमच्या ओठांवर हळूवार लावावे. त्याने ओठांची सूज कमी होते त्यातील  बॅक्टरिया कमी होऊन, ओठ एकदम छान व मुलायम होतात. असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस करायचे आहे. दोन ते तीन आठवड्यात तुमच्या ओठांवर सूज कमी होऊन, तुमचे ओठांचा रंग गुलाबी होईल. 

ओठांवर सुज आल्यास काय काळजी घ्यावी :

ओठांवर सुज कोणत्या कारणांमुळे येते व आपण त्यावर कोणते घरगुती उपाय करू शकतो, हे बघितले. तसेच ओठांवर सूज आल्यास, नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे अनेकांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊया, की कोणती काळजी घ्यायला हवी. 

  • प्रदूषण युक्त वातावरणात जाणे टाळावे, 
  • लिपस्टिकचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा, 
  • हिरव्या पालेभाज्या व प्रोटीन युक्त आहार घ्यावा, 
  • बाहेर जाताना ओठांवर मास्क किंवा रुमाल बांधावा, 
  • ओठ गुलाबजल ने नेहमी पुसावे, 
  • ज्यावेळी ओठ सुजलेले असतात, अशा वेळी तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नका. 
  • बाहेरून आल्यावर ओठ कोमट पाण्याने धुवावेत. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला तुमचे ओठ सुजण्याची कारणे, व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही तुमचे ओठ सुजलेले असेल, अशावेळी तुम्ही कोणती काळजी घ्यावी, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करून, जर तुम्हाला काही फरक पडत नसेल, तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आणि ओठ हे तीन ते चार दिवसाच्या वर सुजलेले असतील, तर तातडीने डॉक्टरांकडे हे दाखवायचे. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                        धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here